Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा भाग असलेला सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला आहे. बेळगावी सीमा वादावरील न्यायालयीन प्रकरणावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारने चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमावादावरील सर्वोच्च न्यायालयातील खटल्यावर चर्चा करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई प्रशासनाने मंगळवारी संध्याकाळी तातडीची बैठक बोलावली. “राज्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रात कन्नडिग आहेत, ज्यांचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे, असंही ते म्हणालेत. बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुका कर्नाटकात समाविष्ट करण्याचे सूतोवाच केलेत. कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील कन्नड-माध्यम शाळांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जत तालुक्यातील ४० गावं कर्नाटकमध्ये सामील करण्याची मागणी २०१२ मधील असल्याचे सांगत “एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही, याची जबाबदारी आमची” असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. कर्नाटकमधील भाजपा सरकारचे प्रमुख, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील ४० गावं कर्नाटकमध्ये सामील करण्याच्या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असं वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यात सीमाभागातील गावांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलताना यावर पहिली प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले, याबाबत आमची काल-परवाच एक बैठक झाली. हा जुना वाद न्यायालयात प्रलंबित आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक बुधवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर त्यांच्या समवेत उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या साई दर्शनावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, प्रांताधिकारी गोविंद शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक शिर्डीमध्ये खास हेलिकॉप्टरने साई बाबांच्या दर्शनासाठी आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साईबाबा संस्थानच्या हेलिपॅडवर दुपारी आगमन झाल्यानंतर महसूल, पशुसंवर्धन,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून सदैव छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर केला आहे. शिवरायांच्या जन्मस्थानी नमन करण्यासाठी ते वयाच्या ७९ व्या वर्षी शिवनेरी किल्ला पायी चढून गेले. असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, राज्यपालांकडून पदवीदान समारंभात जे वक्तव्य झाले त्याचे कोणी समर्थन करत नाही. परंतु, केवळ एखाद्या विधानावरून त्यांना कोंडीत पकडू नये. भारतीय जनता पार्टीचे कोट्यावधी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजापासून प्रेरणा घेऊन काम करतात. शिवरायाचे इतिहासातील महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लाजिरवाण्या शब्दात टीका केली संपूर्ण महाराष्ट्राने या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी सेवा सोसायटीच्या संस्था नियुक्त सचिवांची “स्वाभिमानी सचिव संघटना’ स्थापन करण्यात आली आहे. नगरच्या मधुरंजनी सभागृहामध्ये नुकताच सहकारी सेवा सोसायटीच्या सचिवांचा मेळावा पार पडला. यामध्ये संस्था नियुक्त सचिवांच्या विविध मागण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. नगर जिल्ह्यात जवळपास २००-२५० सचिव हे संस्था नियुक्त आहे. महाराष्ट्रात सहकार हे शेतकरी विकासाचे नेहमी द्योतक राहिले आहे. सहकाराच्या माध्यमातून शेतकरी बांधवाला नेहमी न्याय देण्याचे व उभे राहण्याचे बळ दिले जाते. त्याच माध्यमातून ग्रामीण भागात सेवा सोसायटी ही शेतकऱ्याच्या थेट सेवेत असते. जिल्हा बँकेच्या संलग्नतेतून शेतकरी बांधवाना कर्ज वाटप, विविध व्यवसाय व शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अशा महत्वाच्या भूमिकेत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लोकशाहीर विठ्ठल उमप लोककला थिएटरमार्फत दिले जाणारे लोककला प्रबोधन पुरस्कार २०२२ जाहीर करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे (संगमनेर), लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे, नाट्य सिने अभिनेते मिलींद शिंदे आणि पार्श्वगायक चंदन कांबळे यांचा पुरस्कारार्थीमध्ये समावेश आहे. रविवारी (ता. २७) मुंबईच्या परळमधील दामोदर हॉलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षण मंत्री दिपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, भारतीय जनता पक्षाचे आमदार व गटनेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती लोकशाहिर विठ्ठल उमप लोककला थिएटरचे अध्यक्ष संदेश उमप, मंगेश वडांगळे यांनी दिली. मुळचे संगमनेरकर असलेल्या लोकशाही विठ्ठल उमप…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी साडेचार वाजता प्रसिध्द शेतकरी कवी प्रा. संतोष पवार यांच्या काव्यसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विधिमंडळ पक्षनेते व भारत जोडो यात्रेचे समन्वयक माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषद सदस्य आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत हा अभिवादन व काव्यसंध्या कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली. अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेच्यावतीने दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या पुण्यस्मरण दिनी अभिवादन केले जात असून या निमित्त महाराष्ट्रातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील सामाजिक न्याय भवन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण करतांना ‘‘आता यापुढे पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल.’’ अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा प्रत्यक्षात अहमदनगर जिल्ह्यात मूर्त स्वरूपात आली आहे. पासपोर्टच्या धर्तीवर जागेवरच कागदपत्रे तपासून जातवैधता प्रमाणपत्र देणारी अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात पहिलीच समिती ठरली आहे. राहाता तालुक्यातील लोणी येथील पद्मश्री विखे-पाटील महाविद्यालयांत व नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता माध्यमिक तांत्रिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इय्यता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वाटपाचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरमध्ये पोलीस यंत्रणेचा धाक संपुष्टात आल्याने शहरातील गजबजलेल्या ठिकाणी अकोल्या नाका परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण लंपास केले आहे. चोरटे पसार झाले असून त्यांचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. गुन्हेगारांवर धाक निर्माण करण्याचे काम पोलीस यंत्रणेचे असते मात्र शहरात गेल्या काही दिवसांपासून हे चित्र दुर्मिळ बनले आहे शहरातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाली असून दररोज दुचाकी चोऱ्या सुरू असतानाच आता महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील धूम स्टाईलने लंपास करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. वरवर हे प्रकार किरकोळ दिसत असले तरी पोलीस यंत्रणा मात्र याबाबतीत फारशी गंभीर दिसत नाही. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात खासगीरित्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी राज्यात प्रथमच राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या समितीच्या स्थापनेचा शासन आदेश निर्गमित झाला असून, 11 सदस्यांच्या समितीची संरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पशुसंवर्धन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत होणाऱ्या या समितीत पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, सहायक आयुक्त, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे समन्वयक, कंत्राटी पद्धतीने मांसल कुक्कूट व्यवसाय करणारे तीन शेतकरी, ओपन पद्धतीने मांस कुक्कूट व्यवसाय करणारे शेतकरी, कुक्कूट अंडी उत्पादन करणारे पाच शेतकरी, कुक्कूट…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गायरान जमिनीवरील सरसकट सर्व अतिक्रमणे येत्या 31 डिसेंबर 2022 पर्यंत निष्कसित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या निष्कासनाच्या कारवाई करण्यापूर्वी सर्व प्रशासनाने गायरान जमिनीवरील अतिक्रमनाबाबत 2011 साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. गायरान जमिनीवरील अनुसूचित जाती जमातीचे अतिक्रमण; शाळा; दवाखाने आणि शेती यांना वगळून अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे आहेत. त्या निर्देशांचे पालन करून अतिक्रमण निर्मूलनची कारवाई करताना दलितांवर अन्याय होता कामा नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अस्मितेला हात घालत बेताल वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपतींविषयी एकाच वेळी दोघांनी केलेल्या विधानामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात राज्यभर आंदोलनांचा सिलसिला सुरू आहे. कोश्यारी यांची हकालपट्टी करावी तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात असताना आता, खासदार उदयनराजे भोसलेदेखील आक्रमक झाले आहेत. संतापलेले उदयनराजे म्हणाले, कोश्यारी यांचे वय झालेले आहे. आपण काय बोलत आहोत, हे त्यांना समजत नाही. राज्यपालांना कुठेतरी लांब फेकून दिले पाहिजे.…
यापुढे बेताल वक्तव्य कराल तर राज्यात फिरू देणार नाही; तुमचं धोतर फेडल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या अस्मितेविरोधात सातत्याने बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने सोमवारी अनोखे आंदोलन केले. डमी राज्यपालांच्या वेशात धोतर, टोपी आणि कोट घालत आंदोलन स्थळी आलेले शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत राज्यपाल कोश्यारी छत्रपतींची माफी मागत असल्याचा प्रसंग उभा केला. वारंवार आपल्या वादग्रस्त विधानांमुळे टीकेचे लक्ष होणारे महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच “शिवाजी महाराज हे जुन्या काळचे आदर्श होते” असे वादग्रस्त विधान करून पुन्हा महाराष्ट्रातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान फोन केला असल्याचे ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर विविध पक्षाकडून टीका सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील गांधींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. यामुळे विकास आघाडीच्या एकसंघतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र आता खासदार गांधी आणि खासदार राऊत यांच्यातील फोननंतर महाविकास आघाडीतील घटक असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमधील हे नाते आणखी घट्ट झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवसेना नेते असलेल्या खासदार संजय राऊत यांना ईडीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क चॅनलमधील मुली साडी का घालत नाहीत, शर्ट आणि ब्राउझर का घालतात, मराठी भाषा बोलताना मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टीचे वेस्टनॉयझेशन करत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील पत्रकारांच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी समाचार घेतला आहे. ‘टिकलीवर टीका करणारे साडीवर या नेत्यांना सोडणार का…? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या’ बिंदी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाची चांगलीच झाडाझडती घेतली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपला कारभार सुधारण्यासाठी त्यांनी महिनाभराचा अवधी दिला आहे त्यानंतर मात्र अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. पालकमंत्री विखे यांच्या उपस्थितीत शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या कामासंदर्भातील आढावा बैठक झाली. यावेळी माजी मंत्री आमदार राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आदींसह पदाधिकारी उपस्थित…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क “नफरत छोडो, भारत जोडो”चा नारा लहान-थोरांमध्ये आता चांगलाच लोकप्रिय झाला आहे. गावामध्ये दुतर्फा उभ्या असलेल्या गर्दीला भारत यात्री साद घालताच त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यावरुन ही यात्रा घराघरात पोहचल्याचे दिसत होते. वडशिंगी (जिल्हा बुलढाणा) मध्ये हे चित्र पाहायला मिळाले. हजारो आदिवासी आपल्या मागण्या घेऊन यात्रेत पुढे चालत होते. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील आदिवासी सांगत होते की, वडिलोपार्जित कसलेल्या जमिनींची मालकी मिळावी, सातबारा नावावर करून मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. त्यासोबत शिक्षण, आरोग्य सारख्या मूलभूत सोयी मिळाव्यात या मागण्या घेऊन हजारो आदिवासी महिला पुरुष यात्रेत सहभागी झाले होते. लाल, भगव्या, साड्या, डोक्यावर पदर तर पुरुषांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क प्रबोधनकार म्हणजेच केशव सिताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. प्रबोधनकारांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे नातू म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. याशिवाय आज ‘प्रबोधनकार डॉट कॉम’या संकेतस्थळाचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होत आहे. प्रबोधनकारांच्या संकेतस्थळाचे निमित्ताने हे दोन्ही नेते आज एकाच व्यासपीठावर येत आहेत. सायंकाळी साडेसात वाजता दादरच्या शिवाजी मंदिरात संकेतस्थळाचा लोकार्पण कार्यक्रम होत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रबोधनकार पोहोचवावे या उद्देशाने ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान, १७ सप्टेंबर २०१० रोजी प्रबोधनकारांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सामाजिक न्याय भवनातून सामाजिक न्यायाची भावना वृद्धींगत होण्यासाठीच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांना अभिप्रेत असा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ, कणखर आणि सदृढ महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांनी दृरदृष्यप्रणालीद्वारे केले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महापौर रोहीणी शेंडगे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार स्नेहलता…
रविवार विशेष : प्रवीण पुरो (लेखक दैनिक आपलं महानगर या वृत्तपत्राचे माजी निवासी संपादक आहेत) विद्यमान उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची एकूणच पध्दत ही बदला घेणारी असल्याचं त्यांच्याच तोंडून स्पष्ट झालं. आता ते केवळ कपटी नाहीत. तर आपल्याला अपेक्षित असलेलं साध्य होत नसेल तर ते बदला घेऊ शकतात हे लक्षात घेतलेलं बरं. सत्तेसाठी कोणत्याही थराला माणूस जाऊ शकतो, यासाठी आवश्यक असलेली कुठलीही गोष्ट करायला तो मागेपुढे पाहत नाही हे फडणवीसांच्या कबुलीवरून आता स्पष्ट झालं. आजवर असं करणारे वृत्तीने गुंड, पुंड असायचे. आता त्याची काही आवश्यकता नाही. आता हुशार, चाणाक्ष, बुध्दीमानही या मार्गाचा वापर करू शकतो, हे…
