Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र ही संत व विचारवंतांची भूमी आहे. देशाच्या राजकारणाला महाराष्ट्राने कायम दिशा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगणार्‍या या भूमीत स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी कृषी-औद्योगिक क्रांतीचा पाया घालून विकसित महाराष्ट्र निर्माण केला. याच विचारांचा वारसा घेऊन राज्यात कार्यरत असलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात हे सर्वसामान्य जनतेचे खऱ्या अर्थाने आश्वासक व महाराष्ट्राचे राजहंस नेतृत्व ठरले असून सर्वांगीण विकासाचे आर्किटेक्ट आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन १९८५ साली बाळासाहेब थोरात यांनी सर्वात कमी वयाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाला सुरुवात केली. पाण्यासाठी आग्रह धरताना भंडारदर्‍याच्या पाण्यावर…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्री पदावरून सत्ताधारी महायुतीत धुसफूस सुरू असताना भाजपने बुधवारी १७ जिल्ह्यात संपर्क मंत्र्यांची नेमणूक जाहीर केली. पक्ष आणि सरकार यामध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हा संपर्क मंत्री नियुक्त केल्याचे भाजपने म्हटले असले, तरी ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्क मंत्री देऊन पक्षाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याचे बोलले जाते. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. गृह विभागाने राजपत्र प्रकाशित करत पुढील आदेशापर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय सेठी या आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. यापूर्वी एसटीची सारी जबाबदारी ही परिवहन मंत्र्यांकडे दिली जायची.…

Read More

संगमनेर दि. ०६ फेब्रुवारी – पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पोलीस उपविभागाच्यावतीने अकोले व संगमनेर तालुक्यातील शाळकरी मुला-मुलींसाठी सुरक्षितता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्ष कार्यशाळेबरोबरच थेट प्रक्षेपणाद्वारे (ऑनलाइन) देखील यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि सदर कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. कार्यशाळेमध्ये बालकांबाबत घडणारे गुन्हे, त्याचा प्रतिबंध, स्वसंरक्षण, बालकासंबंधीच्या महत्त्वाच्या कायद्यातील तरतुदी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या दृष्टीने करिअरचे महत्त्व, तसेच पालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत प्रबोधन करण्यात आले. कार्यशाळा अकोले तालुक्यातील कळस येथील कळसेश्वर विद्यालयामध्ये घेण्यात आली. ऑनलाइन कार्यशाळेमध्ये विविध प्रकारचे व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने संगमनेर पंचायत समितीचे गटविकास…

Read More

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या मंत्र्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ‘जनता दरबार’ आयोजित केला होता. शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत या जनता दरबारावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ देखील उपस्थित होते. शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालय, बाळासाहेब भवन येथे पार पडलेल्या या विशेष उपक्रमात मंत्री शंभुराजे देसाई, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर यांनी राज्यभरातून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून तातडीने निर्णय घेतले. सामान्य जनतेला थेट शासनाशी जोडण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, दर सोमवार, मंगळवार आणि बुधवार शिवसेनेचे मंत्री बाळासाहेब भवन येथे जनतेसाठी उपलब्ध राहणार आहेत. या दरबारात नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित निर्णय घेण्यात येत असून, प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने मदत केली जात आहे. जनतेच्या समस्या…

Read More

संगमनेर, दि. ०६ फेब्रुवारी – निवडणुकांमध्ये जय पराजय होत असतात. परंतु सातत्याने जनतेच्या विकासासाठी काम करणारे नेतृत्व हे जनतेच्या हृदयात असते. अत्यंत स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणे सातत्याने काम करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात हे राजकारणातील संत असल्याचे गौरवोद्गार साहित्यिक संजय कळमकर यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालय येथे सह्याद्री संस्थेच्या आजी-माजी पदाधिकारी पालक व सेवकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे, लहानुभाऊ गुंजाळ, डॉ. सोमनाथ सातपुते, साहेबराव कवडे, नानासाहेब गुंजाळ, सिताराम वर्पे, सेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्टर आचार्य बाबुराव गवांदे, प्राचार्य…

Read More

संगमनेर, दि. ०६ फेब्रुवारी – संगमनेरमधील कचरा लाख मोलाचा असून या कचऱ्याच्या माध्यमातून लाखो रुपये नगर परिषदेला मिळतील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संगमनेर शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कला महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाट्य परिषदेचे प्रा. डॉ. संजयकुमार दळवी होते. कोकरे म्हणाले, संगमनेर शहरातील कचऱ्याचे लवकरच व्यवस्थापन केले जाणार असून कचरा व्यवस्थापना अंतर्गत समाज जागृतीसाठी अभियान हाती घेतले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणजे विविध स्पर्धांचे आयोजन यासाठी केले जाणार आहे. तसेच शहराच्या वैभवात भर घालणारे कवी अनंत पंडित नाट्यगृह…

Read More

अहिल्यानगर, दि. ०६ फेब्रुवारी – गरजू रुग्णांना झटपट मदत मिळावी यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. अहिल्यानगर मध्ये देखील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात शेजारी या योजनेचे कार्यालय सुरू केले जाणार आहे.  गंभीर आजारावरील उपचारासाठी गरजू नागरिकांना, रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडून आर्थिक मदत दिली जाते. यासाठी संबंधितांना मदतीकरिता मुंबईला संपर्क करावा लागत असे. आता मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सुरू करण्यात येत असल्याने जिल्हास्तरावर रुग्णांना मदत उपलब्ध होण्यास सुरुवात होणार आहे.  आजाराचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरिता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे, रुग्णालय सलग्नी करण्यासाठी, विविध निकष ठरविण्यासाठी शासनाकडे ही समिती…

Read More

अहिल्यानगर दि. ०६ फेब्रुवारी – सुरक्षित वाहतुकीसाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील महामार्गालगतची अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावी आणि रस्त्याच्या बाजूला असलेले धोकादायक फलकही काढण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. मंगळवारी (०४ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमणे काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहतील. तोडलेल्या रस्ता दुभाजकांची दुरूस्ती करण्यात यावी. दुभाजक तोडणाऱ्या संबंधित पेट्रोल पंप चालक अथवा आस्थापना मालकावर कारवाई करावी. वाहतूक सुरक्षेबाबत सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात…

Read More

अहिल्यानगर, दि. ०६ फेब्रुवारी – शिर्डीत मंगळवारी भल्या पहाटे तीन जणांवर जीव गेला हल्ला करण्याचा प्रकार घडला. शिर्डी संस्थांच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना नियंत्रण कक्षात बोलाविण्यात आले असून त्यांच्या जागेवर राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गलांडे यांनी यापूर्वी शिर्डीत काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा शिर्डी पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय गलांडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. शिर्डीत घडलेल्या घटना नंतर…

Read More

शिर्डी, दि. ०६ फेब्रुवारी – साईबाबांच्या शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाचा प्रकार घडल्यानंतर सतर्क झालेल्या साई संस्थानने साई भक्तांसाठी आता मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून लगेचच केली जाणार असल्याचे संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी म्हटले आहे. साई दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या साई भक्तांना आता दर्शन रांगेतच मोफत प्रसाद भोजन कुपन मिळणार आहे. तसेच, संस्थानच्या भक्त निवासात राहणाऱ्या भक्तांनाही हे कूपन वितरित केले जाणार आहे. दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर साई संस्थांचे यंत्रणा सतर्क झाली आहे. यापूर्वी साई संस्थानच्या प्रसादालयात थेट प्रवेश मिळत असे. ज्यामुळे मोफत जेवणासाठी कुणालाही सहज प्रवेश करता येत होता. यापूर्वी मोफत भोजनासाठी थेट प्रसादालयात प्रवेश दिला…

Read More

मुंबई दि. ०५ फेब्रुवारी –  मतदार संघात पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीज, आरोग्य सेवा आणि ग्रामपंचायतींच्या विकासासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्यांसंदर्भात चर्चा करत मतदारसंघातील गावांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित योजना मंजूर करून निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. आमदार खताळ यांनी बुधवारी (०५फेब्रुवारी) मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची सदिच्छा भेट घेऊन मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. ग्रामस्थांच्या गरजा आणि स्थानिक प्रशासनाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात मंत्री गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत…

Read More

अहिल्यानगर दि. ०५- श्रीगोंदा येथे झालेल्या घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घरी भेट घेवून सांत्वन केले. या संदर्भात उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांचीही त्यांनी भेट घेतली, यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनामार्फत मदतीसाठी तातडीने प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देशही मंत्री राणे यांनी प्रशासनाला दिले. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, तहसीलदार क्षितिजा वाघमारे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे आदी उपस्थित होते.

Read More

संगमनेर, दि. ०५ फेब्रुवारी –  सांस्कृतिक उपक्रम हे व्यक्तिमत्व विकासाचे सर्वोत्तम साधन असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुक्त आविष्कार असल्याचे प्रतिपादन संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांनी केले आहे.  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने यंदाचा कला महोत्सव दिगंबर गणेश सराफ विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कला महोत्सवात नाटिका, नाट्यछटा, रंगभरण, भेटकार्ड आदी विविध स्पर्धांमधून दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला गेला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे, बाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद गाडगीळ यांच्या उपस्थितीत प्रा. डॉ. संजयकुमार दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी बोलताना कोकरे म्हणाले, कोणत्याही कलेची आवड सुसंस्कृत…

Read More

पुणे, दि. ०५ फेब्रुवारी – संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह. भ. प. शिरीष महाराज मोरे (वय ३०) यांनी देहूतील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. प्राथमिक माहितीनुसार आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज असून या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरीष महाराज मोरे यांनी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसापूर्वीच मोरे यांनी नुकतेच नवीन घर बांधले होते. खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते. मंगळवारी रात्री ते आपल्या वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. सकाळी साडेआठ वाजल्यानंतर देखील ते खाली आले नाही म्हणून घरातील लोकांनी…

Read More

संगमनेर दि. ०५ फेब्रुवारी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील देवस्थानचा पर्यटन निधी मधून मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. यातील वेल्हाळे, मालदाड, खळी, आश्वी येथील देवस्थान क वर्ग तीर्थस्थानाचा दर्जा देण्याची मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी अहिल्या नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. वेल्हाळे येथील श्रीक्षेत्र हरीबाबा देवस्थान, मालदाड येथील चैतन्य मच्छिंद्रनाथ देवस्थान, आश्वी बुद्रुक येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थान, खळी येथील खंडोबा महाराज देवस्थान आणि निळवंडे येथील दत्त महाराज देवस्थान या तीर्थस्थानांचा यात समावेश आहे. या संदर्भात आमदार तांबे यांनी म्हटले आहे की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका अनेक मोठ्या विकास…

Read More

संगमनेर, ०५ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १४२ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात एकूण ९,१७६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी दिली. आमदार खताळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून संगमनेर तालुक्यात महायुतीचे काम सुरू आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत समाजातील सर्वात गरीब आणि वंचित घटकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र शासन ६०% आणि राज्य शासन ४०% असा आर्थिक सहभाग देत आहे. यात SC/ST घटकांसाठी २,५६४, अल्पसंख्याकांसाठी ९९२ आणि इतर घटकांसाठी ६,६२० घरकुलांचे वाटप करण्यात आले…

Read More

मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यात राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावरुनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा-युती सरकार असो, या सरकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजप युती सरकारच भ्रष्ट आहे, असं नाना पटोले यांनी केली. “भाजपा युती…

Read More

शिर्डी, दि. ०४ –  पुरातन मंदिरे ही हिंदू धर्म आणि संस्‍कृतीची प्रतिके आहेत. विकासाची प्रक्रिया राबविताना आध्‍यात्मिक वारसा जोपासणे हे आपले कर्तव्‍य असून मंदिर परिसरांच्‍या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी‌ ग्वाही जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. राहाता शहराचे आराध्‍यदैवत श्री वीरभद्र महाराज मंदिराला ‘क’ वर्ग देवस्‍थानाचा दर्जा प्राप्‍त करुन दिल्‍याबद्दल पालकमंत्री विखे यांचा विश्‍वस्‍त मंडळाच्‍यावतीने सत्‍कार करण्‍यात आला. तसेच वीरभद्र महादेव मंदिराच्‍या जीर्णोद्धार कार्यक्रमाच्‍या कोनशिलेचे अनावरण करण्‍यात आले. याप्रसंगी माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, मुकुंदराव सदाफळ, देवस्‍थान ट्रस्‍टचे अध्‍यक्ष साहेबराव निधाणे, ॲड.रघुनाथ बोठे, उपाध्‍यक्ष सचिन बोठे, माजी नगराध्‍यक्ष…

Read More

संगमनेर दि. ०४ फेब्रुवारी –  संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा फसवी ठरली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पालकमंत्र्यांनी संगमनेरकरांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे बोलले जात आहे. यावरून पालकमंत्री साहेब राजकारण करा पण संगमनेर तालुक्याच्या अस्मितेशी खेळू नका, छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आहे. अशा शब्दात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी जाहीर केलेल्या निधीचे काय झाले, तो निधी अद्याप का मिळाला नाही अशी विचारणा केली…

Read More

संगमनेर दि. ०४ फेब्रुवारी – राज्य शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर संगमनेरमध्ये दहा ई टॉयलेट व शहरातील जोर्वे नाक्यावर भव्य क्रीडांगण विकसित करण्यासाठी प्रत्येकी एक-एक कोटींचा निधी मंजूर झाल्याने ही कामे सुरू होत असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. आमदार तांबे म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात विकासाच्या अनेक योजना सातत्याने राबविल्या गेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून संगमनेरला वैभवशाली संगमनेर शहराची ओळख मिळाली आहे. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर स्वच्छतेसाठी नगर परिषदेला विविध पारितोषिक मिळाली आहे. शहरातील नागरिकांची वर्दळ लक्षात घेता शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची टॉयलेटची व्यवस्था व्हावी यासाठी १० ई टॉयलेटसाठी १ कोटीचा निधी,…

Read More