Author: Annant Ppangarkar

संगमनेर दि. – २३ गेल्या दोन-तीन महिन्यांपासून संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये राजकीय पक्षांच्या, बिगर राजकीय व व्यावसायिकांच्या फ्लेक्सला उधाण आले आहे. राजकीय नेत्याची छबी मिरवत हे फ्लेक्स विनापरवाना अनेक दिवसांपासून दर्शनी भागात लावण्यात आले आहे. या फ्लेक्सच्या माध्यमातून गावागावात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते, त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हे फ्लेक्स बोर्ड हटविण्याची मागणी करत यासाठी फ्लेक्स फाडो आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे (ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिला आहे. संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना या संदर्भात शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गुरुवारी निवेदन देण्यात आले. कतारी यांच्यासह युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण, प्रशांत खजुरे, राजू सातपुते, इम्तियाज शेख, फैजल…

Read More

अहिल्यानगर दि. २३ –  राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज सभागृह, न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे २६ व २७ जानेवारी २०२५ रोजी दोन दिवसीय अहिल्यानगर ‘ग्रंथोत्सव २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (२६ जानेवारी) सकाळी १० वाजता जलसंपदा, (गोदावरी व कृष्ण खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे भूषविणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजीत तांबे, आमदार शिवाजीराव…

Read More

दावोस, दि. 23 जानेवारी दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल. आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा…

Read More

मुंबई, दि. २२ :-  जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. तेथून त्यांनी या दूर्घटनेची माहिती घेतली. दूर्घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन पोहचून मदत व बचावासाठी आवश्यक गोष्टींचे व्यवस्थापन करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दृकश्राव्य संदेश जारी केला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचा उल्लेख करून त्यांनी म्हटले आहे की, काही लोकांचा मृत्यूची ही…

Read More

अहिल्यानगर दि. २२-  कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करुन कृषी योजनांचा शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या माहितीमधून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी नजिकच्या सीएससी केंद्र, आपले सरकार केंद्र, सेतु केंद्र येथे जाऊन आपली आधार जोडणी विनामूल्य करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. शेतकऱ्यांना शेतातील हंगामी पिकांची आणि जमीन नकाशांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कृषी योजनांसाठी ॲग्रीस्टॅक कार्डसाठी नोंदणी सुरु केली आहे. ॲग्रीस्टॅकद्वारे शेतकऱ्यांचा डेटा एकत्रित केला जाणार असून त्याआधारे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करुन कृषी योजनाचा शेतकऱ्यांना…

Read More

संगमनेर –  १६ जानेवारीपासून मोठ्या गर्दीत सुरू असलेल्या लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या बिझनेस एक्स्पोसमोर सोमवारी रात्री एका तरुणाकडून गोळीबार करण्यात आला असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मोठ्या गर्दीत हा प्रकार घडल्याने मोठा अनर्थ निर्माण झाला असता. त्यामुळे गोळीबार करणारा हा तरुण कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रश्नचिन्ह झाले निर्माण… दरम्यान या संदर्भात पोलिसांनी असा प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे. हजारो लोकांसमोर घडलेला हा प्रकार नेमका काय होता असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. एक्स्पोसमोर गर्दीत घडला प्रकार… शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या मालपाणी लॉन्सवर गेल्या काही दिवसापासून लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरचा बिझनेस एक्स्पो मोठ्या गर्दीत…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यातील बुजुर्ग पत्रकारांना सन्मानाच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विधीमंडळ वार्ताहर संघाने सुचवलेल्या दुरुस्त्यांचा शासकीय स्तरावर विचार केला जाईल. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून त्रुटी दूर करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. तोवर सध्या सुरु असलेल्या सन्मान योजनेतील मासिक ११ हजार रुपयांची रक्कम येत्या आर्थिक वर्षांपासून २० हजार रुपये करण्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२३ व सन २०२४ च्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, माहिती…

Read More

संगमनेर – अनंत पांगारकर  पोलीस ठाण्यात दररोज विविध प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात. यात आरोपींमध्ये पुरुष, महिला, मुला-मुलींचा समावेश असतो. मात्र गेल्या आठवड्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका डॉक्टरच्या कुत्र्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. गेल्या बुधवारी घडलेल्या या प्रकारासंदर्भात रविवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेने दिलेल्या जबाबावरून पाळीव कुत्र्या विरोधात दाखल झालेल्या या गुन्ह्याची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. आरोपीमध्ये प्रथमत:च एका पाळीव कुत्र्याचा समावेश असल्याने पोलीस याप्रकरणी नेमका काय तपास करतात, याकडे लक्ष लागले आहे. संगमनेर शहरालगत घुलेवाडी शिवारात असलेल्या नवशीचा मळा येथे…

Read More

मुंबई : २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात घोषणा करून सुरू करण्यात आलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळं या योजनेत बदल करण्यासंदर्भातील शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं राज्य सरकारला दिल्याची माहिती आहे. राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात एक रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करुन योजनेची अमंलबजावणी सुरु करण्यात आली. या योजनेला सर्वसमावेशक पीक विमा योजना हे नाव देण्यात आलं. या योजनेद्वारे केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकारकडून भरला जायचा, शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरुन…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई जेष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केल्यानंतर राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन निवडणूक आयुक्तांवर असणार आहे. दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. मंत्रिपरिषदेने नव्या निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस केली होती. राज्यपालांची दिनेश वाघमारेंच्या नावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने वाघमारेंच्या नियुक्तीचा एक आदेश जाहीर करण्यात आला आहे. दिनेश वाघमारे हे पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याचे निवडणूक आयुक्त असतील. त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई-  बदलापूर येथील चिमुरड्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन सरकारचे फेक नरेटिव्ह उघड पाडलेत. न्यायालायाने चौकशी अहवालात हे एन्काउंटर घडवून आणल्याचं म्हटल्याने सरकारची चांगलीच कोंडी झाली. या एन्काऊंटरला पोलीस जितके जबाबदार आहेत, तितकेच जबाबदार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत काढण्यात आलाय. पोलिसांकडील बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आलंय. बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजपा संस्थाचालकांवर कारवाई झाली नाही, तर दुसरीकडे आरोपी…

Read More

संगमनेर – मोहसीन खलील शेख बदनामी करण्याच्या उद्देशाने साखरपुड्याचे जुने फोटो व्हायरल करून त्या बदल्यात पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा अजित सारडा (रा. अशोक चौक) गोविंद नागरे (रा. नेहरू चौक) आणि ओंकार राऊत (रा. घुलेवाडी) अशी खंडणी मागणाऱ्या आरोपींची नावे आहेत. या तिघांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शहरातील एक तरुणी व एका सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी होईल व यामुळे वैवाहिक जिवन संपुष्टात येईल असे माहित असताना देखिल तिघा जणांनी त्यांचे जुने साखरपुड्याचे फोटो व्हायरल करून त्याबदल्यात सामाजिक कार्यकर्त्याकडे…

Read More

संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त एसएमबीटी हॉस्पिटलच्यावतीने सोमवारी शहरातील प्रभाग १ मधील पी.जे. आंबरे पाटील कन्या विद्यालयात महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात मोफत उपचार घेण्यासाठी सकाळपासून अनेक रुग्णांनी गर्दी केली. अनेक रुग्णांवर शिबिरस्थळी उपचार करण्यात आले तर पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एसएमबीटी हॉस्पिटल येथे उपचारांसाठी नेण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला. अधिक माहिती अशी की, शहरातील नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी दर रविवारी विविध प्रभागात या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १० पेक्षा अधिक प्रभागांमधील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार…

Read More

संगमनेर – संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथील नगरपालिकेच्या शासकीय जागेत असलेल्या अनधिकृत सागर वाईन्स, सरकारमान्य देशी दारूच्या दुकानाविरोधात आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. सदरील दुकानाचे बोगस लायसन्स रद्द व्हावे, नगरपालिकेने अनधिकृत अतिक्रमण हटवावे अशा मागण्या उपोषणकर्त्या सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी केल्या आहेत. सदरील दुकान हे अनेक वर्षांपासून खोटी कागदपत्रे बनवून नगरपालिका व उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांत धूळफेक करत चालवत असल्याचा आरोप बानोबी शेख यांनी केला असून सदरील दुकान तात्काळ बंद करून खोटे कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. आता नगरपालिका प्राशासन व उत्पादन शुल्क विभाग काय…

Read More

नाशिक – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करता केवळ नोटीस देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करून यातील १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या देवळा पोलीस ठाण्याच्या सहायक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. कैलास जगताप (वय ५४ वर्ष, रा. मुंजवाड, सटाणा) असे लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. हा पोलीस अधिकारी देवळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारदारावर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करता नोटीस देण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहायक उपनिरीक्षक कैलास जगताप (५४, मुंजवाड, सटाणा) याने २० हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. २०…

Read More

संगमनेर – ‘एफडी तोडो, म्युच्युअल फंड स्वॅप से नाता जोडो’ आणि ‘सपनोंको स्किप नही, एसआयपी करो!’ असा संदेश देणाऱ्या कडलग इन्व्हेस्टमेंटच्या स्टॉलला संगमनेरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. मालपाणी लॉन्स येथे दि. १६ ते २२ जानेवारी पर्यंत सफायर बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. धम्माल, मस्ती, मनोरंजनाबरोबरच संगमनेरकरांनी मुलांचे शिक्षण, लग्न, पेन्शन सारख्या काही अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्याकरिता कडलग इन्व्हेस्टमेंटच्या प्रतिनिधींशी चर्चा केली व भविष्यकालीन उपायोजनांकरिता क्यू आर कोड स्कॅन करून आपले नाव नोंदविले. ‘एफ डी तोडो, म्युच्युअल फंड स्वॅप से नाता जोडो ‘ आणि ‘सपनोंको स्किप नही, एसआयपी करो!’ या कडलग इन्व्हेस्टमेंटच्या स्लोगनला संगमनेरकरांनी दाद…

Read More

मुंबई – महायुती सरकार मध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेले मतभेद समोर आले आहे. महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आले. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आल, त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील झाला. या गोंधळानंतर महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली पहायला मिळाल्या असून १९ जानेवारीला रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. पालकमंत्रिपदावरुन रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद असून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यातच काही मंत्र्यांना पालकमंत्री पदावरून डच्चू देण्यात आल्याने महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचं दिसत आहे.…

Read More

मुंबई, दि. १९ : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे. मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील. ठाणे – उपमुख्यमंत्री…

Read More

संगमनेर – अलिबाग (जि. रायगड) येथील साईभक्त वाहनातून शिर्डी येथे जात असताना कौठे कमळेश्वर (ता. संगमनेर) येथील गावच्या पुढे आल्यानंतर त्यांच्या वाहनाला चार अज्ञात लुटारूंनी कार आडवी लावत मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. एकूण ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. ही घटना शनिवारी (ता.१८) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की अलिबाग येथील साईभक्त प्रवीण वसंत नाईक, अभय रवींद्र ठाकूर, गणेश दत्तात्रय मेस्त्री, ऋषिकेश पडवळ, जयेश जयराज कोंडे, राजेंद्र ठाकूर हे सर्व साईभक्त वाहनातून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कौठे कमळेश्वर गावच्या पुढे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर…

Read More

अहिल्यानगर – स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मध्यप्रदेशातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने संगमनेर शहरात घरफोडी केल्याचे समोर आले आहे. या आरोपीच्या दुसऱ्या साथीदार फरार असून पोलिसांनी संबंधित आरोपींकडून सुमारे सहा लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळविले. गेल्या वर्षी (६ डिसेंबर) संगमनेर शहरातील मालपाणी नगरमध्ये राहत असलेल्या रुपेश मुरलीधर भालेराव (वय ४८, रा. मालपाणीनगर, सुदर्शन बंगला, संगमनेर) यांच्या बंगल्याच्या टेरेस वरील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश मिळवत ३ लाख ७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरून नेले होते. याबाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध गु.र.नं. १०१३/२०२४ बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला…

Read More