Author: Annant Ppangarkar

सोमवार, २३ डिसेंबर नाशिक – राज्याचे नवे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची अहिल्यानगर जिल्हा ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (सर्वांसाठी मानवाधिकार) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये भेट घेत त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या माध्यमातून राज्यभर मानवी मूल्यांचे जतन व्हावे व सर्वांना न्याय मिळावा या भावनेने काम केले जात असताना मानवाधिकार संघटनेच्या या कामकाजामध्ये झिरवाळ यांचे पदाधिकाऱ्यांना नेहमी सहकार्य मिळत असते. नासिक येथील समाजसेवक व संस्थापक अध्यक्ष वसीम सय्यद (गुड्डू भाई) यांच्यामार्फत या संस्थेचे काम सुरू आहे. संघटनेच्या कामकाजासाठी सातत्याने मंत्रालय किंवा शासकीय विभागामध्ये सर्वसामान्य माणसांना न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागतो. समाजातील सर्व शहरातील गोरगरीब व पिळवणूक झालेल्या नागरिकांना न्याय…

Read More

रविवार, २२ डिसेंबर  संगमनेर – संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी परिसरात वन विभागाच्या आखत्यारीत येणाऱ्या जंगलामध्ये शनिवारी रात्री शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाचा घातपात झाला की बिबट्याच्या हल्ल्यात याचा मृत्यू झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही मात्र बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. रामनाथ सूर्यभान गुरकुले (वय ३४, रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) असे या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी (संगमनेर) येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेह लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या तरुणाच्या…

Read More

कथित मतांच्या आधारे राज्यात प्रचंड बहुमताची सत्ता प्राप्त होताच यापुढे बदला नव्हे बदल करणारी सत्ता राबवली जाईल, असं आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. हे आश्‍वासन त्यांच्या बुध्दीचातुर्याप्रमाणे सत्ता सुरू होताच विरळ होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. मिळालेल्या बहुमताचा आधार घेत आपल्याला नको असलेल्या व्यक्ती, संस्था यांचा काटा काढण्याचा पध्दतशीर मार्ग अवलंबला जात आहे. केंद्रातल्या मोदी सरकारने आणि २०१४ नंतर राज्यातल्या युती सरकारने शहरी नक्षलवादाच्या नावाखाली केलेल्या कारवाया कशा कट कारस्थानी होत्या हे स्पष्ट दिसलं. खर्‍या नक्षलींना आवर घालण्याचा आव असला तरी प्रत्यक्षात सत्तेला जाब विचारणार्‍यांची तोंडं बंद करण्याचा हेतू स्पष्ट दिसत होता. सत्तेला जाब विचारणार्‍यांची मुस्कटदाबी करण्यासाठी घातक…

Read More

शनिवार, २१ डिसेंबर  नागपूर – राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल महिनाभराने मंत्रिमंडळाचे रखडलेले खातेवाटप शनिवारी जाहीर करण्यात आले. फडणवीस शिंदे पवार सरकारच्या मंत्रिमंडळातील खाते वाटपाला अखेर मुहूर्त लाभला असून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील महसूल खात्याच्या चाव्या दुसऱ्या मंत्र्यांकडे देण्यात आल्या आहे. विखेंकडील महत्त्वाचे खाते काढून आता त्यांच्याकडे जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास) खात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर गृह खाते मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच ठेवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाचे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला होता. महायुतीच्या ३९…

Read More

शनिवार २१ डिसेंबर  संगमनेर – सातत्याने विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन होत असलेल्या संगमनेरमध्ये जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला कला महोत्सव नक्कीच आनंद महोत्सव ठरेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी ते बोलत होते. जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, बालभारतीचे डॉ. अजितकुमार लोळगे, पुणे व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या दिपाली जोगदंड, राजेंद्र वाकळे, प्रकल्पप्रमुख…

Read More

शनिवार २१ डिसेंबर  संगमनेर – लोकशाही आणि संविधानाच्या नावावर निवडून सत्तेवर यायचे आणि त्यानंतर संविधानाची सर्व मूल्य पायदळी तुडवायची ही भाजपची नीती असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेले वक्तव्य भाजपाची समाजविरोधी चालत आलेली कायमची प्रवृत्ती दर्शवत असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. यासाठी झाले आंदोलन – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी व बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुषपणे झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकासह आघाडीच्यावतीने आयोजित निषेध आंदोलनात थोरात बोलत होते यांची उपस्थिती – माजी…

Read More

शनिवार २१ डिसेंबर  संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडून २०२४-२५ या वर्षाच्या गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातील ऊसाला प्रति टन २८०० रुपये व २०० रुपये उसविकास अनुदान याप्रमाणे प्रति टनामागे तीन हजार रुपयांचा भाव देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर वाटचाल करणाऱ्या व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांचे हीत सातत्याने जोपासले आहे. सातत्याने सर्वाधिक भाव देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यक्षेत्रासह कार्यक्षेत्र बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर मोठा विश्वास दर्शविला…

Read More

शुक्रवार २० डिसेंबर अहिल्यानगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २१ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

शुक्रवार २० डिसेंबर संगमनेर – परभणी येथील घटना व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केले. भाजपला आंबेडकरांविषयी असलेला राग या वक्तव्याच्या निमित्ताने समोर आला आहे. या वक्तव्यामुळे देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे संगमनेरमध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने हे निषेध आंदोलन होत असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे. दिवटे म्हणाले, संसदेमध्ये संविधानावर चर्चा…

Read More

शुक्रवार २० डिसेंबर संगमनेर – अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांची निवड आणि योजनेची अंमलबजावणी यासंदर्भात प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. या योजनेचा लाभ गरीब झोपडपट्टी धारक, अल्पभूधारक, छोटे व्यवसाय, टपरीधारक, हातगाडीवर व्यवसाय करणारे, विधवा, ज्येष्ठ नागरिकांना व पात्र गरजूंना देण्यात यावा, अशी मागणी करत यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे. गरीब गरजू नागरिक व शिवसेनेच्यावतीने गुरुवारी (१९ डिसेंबर) प्रांताधिकार्‍यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. गरजूंना या योजनेचा लाभ मिळत नसून सध्या दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि बेरोजगारी यामुळे अंत्योदय योजनेतून अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो, मात्र या योजनेचा लाभ गरजूं ऐवजी नोकरदार…

Read More

शुक्रवार २० डिसेंबर  संगमनेर – एकीकडे दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, वाढत असलेली महागाई, शेतमालाचे वाढते भाव आणि दुसरीकडे सातत्याने पाडले जात असलेले शेतीमालाचे भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीमालाचे भाव सरकारकडून विचार करूनच पाडले जाताय की काय? असा प्रश्न आता प्रत्यक्ष शेतकऱ्यालाच पडू लागलेला आहे. यावरून आता शिवसेना उद्धव ठाकरे आक्रमक झाली असून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न शेतकरी शिवसैनिक पंकज पडवळ यांनी उपस्थित केला आहे. पडवळ म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून आम्ही संगमनेर, अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी सातत्याने दूध दरावर आंदोलन करत आहोत. परंतु यावरही तात्पुरती मलमपट्टी करून सरकार शेतकऱ्यांचीच गळचेपी करण्याची भूमिका सातत्याने घेत…

Read More

शुक्रवार २० डिसेंबर नागपूर – राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिमानाने व आत्मविश्वासाने विधानसभेत स्पष्ट केले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात १ जुलै…

Read More

शुक्रवार २० डिसेंबर अहिल्यानगर – जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून तापमान वारंवार १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरत आहे. आगामी काळातही थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहूराज मोरे यांनी केले आहे. थंडीच्या लाटेबाबत स्थानिक हवामान अंदाज रेडिओ, टीव्ही व वर्तमानपत्रांद्वारे नियमित तपासावा. नागरिकांनी स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे तसेच चादर यांसारखे पुरेसे उबदार कपडे वापरावेत. शक्यतो थंड वाऱ्यात बाहेर जाणे टाळावे व शरीर कोरडे ठेवावे. शरीर ओले झाल्यास त्वरीत कपडे बदलून शरीरातील उष्णता टिकवावी. निरोगी अन्न, विशेषतः…

Read More

गुरुवार १९ डिसेंबर संगमनेर – विधानसभा निवडणूक होऊन बराच काळ झाला आहे, तरीदेखील विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएमच्या संदर्भात खोटा प्रचार सुरू असून खोट्या बातम्या, खोटे फोटो, व्हिडिओ असे प्रसारित केले जात आहे. अशा प्रकारे खोटे वृत्त प्रसारित करणाऱ्या विरोधात निवडणूक आयोगाने गुन्हे दाखल करण्याची मागणी संगमनेरच्या भारतीय जनता पक्षाने केली असल्याची माहिती दिनेश सोमाणी यांनी दिली आहे. यांना दिले निवेदन – विरोधकांकडून केली जात असलेले कृती लोकशाहीच्या विरोधात असून या संदर्भातील मागणीचे निवेदन संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना देण्यात आले आहे. यासाठी केली मागणी – भारतीय कायद्यानुसार लोकांमध्ये गैरसमज पसरवणे, अफवा पसरवणे, संभ्रम पसरवणे गुन्हा आहे. हे माहिती असून सुद्धा जर…

Read More

गुरुवार १९ डिसेंबर मुंबई – संगमनेरच्या अतिक्रमणित झोपडपट्टी व भाड्याच्या घरात राहणाऱ्या संगमनेरकरांसाठी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत मोठी मागणी केली आहे. पंतप्रधान योजनेतून दिल्या जाणाऱ्या घरकुलासंदर्भात त्यांनी सभागृहात आवाज उठविला आहे. या योजनेअंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून दिला जाणारा निधी हा अपुरा असून यात वाढ करण्याची मागणी तांबे यांनी केली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाचा धागा पकडत आपल्या सभागृहातील भाषणात शासनाचे लक्ष वेधताना तांबे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी राज्य शासनातर्फे एक लाख रुपये व केंद्र शासनातर्फे एक लाख रुपये असे दोन लाखाची मदत शहरी भागासाठी दिली जाते. संगमनेर शहरात अडीच हजारावर कुटुंब अशी आहेत की जी भाड्याच्या घरात…

Read More

गुरुवार, १९ डिसेंबर  मुंबई – लोकसभा निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी पराभूत झालेल्या शिवसेना गटाचे (ठाकरे गट) नेते अमोल कीर्तीकर यांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. कीर्तीकर यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातील शिवसेनेचे शिंदे गट नेते रवींद्र वायकर यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिले होते. कीर्तीकर यांचा वायकर यांच्याकडून ४८ मतांनी पराभव झाला होता. वायकर यांना ४,५२,६४४, तर कीर्तीकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली होती. मतमोजणीच्या दिवशीच तफावत आढळून आल्याने पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला होता, असा दावा करून उत्तर-पश्चिम मतदारसंघातील खासदार म्हणून वायकरांची निवड रद्दबातल करावी, तसेच, आपल्याला निर्वाचित उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणी कीर्तीकर यांनी या निवडणूक याचिकेतून केली…

Read More

गुरुवार १९ डिसेंबर मुंबई – अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या राज्य, जिल्हा आणि ब्लॉकस्तरीय सर्व समित्या तत्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात आल्या आहेत. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील महिला काँग्रेसच्या सदस्यत्व मोहिमेला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी संध्या सव्वालाखे या कायम राहून नवीन समित्या स्थापन करण्याच्या प्रक्रियेचे नेतृत्व करणार आहेत. राज्यातील महिला काँग्रेसची सदस्य मोहीम पुढे नेण्यासाठी आणि नारी न्याय सभासदत्व सत्कार समारंभ आयोजित करणे आणि महाराष्ट्रातील महिला काँग्रेस संघटनेच्या उभारणीसाठी संध्या सव्वालाखे यांच्या सोबत खालील विधानसभा क्षेत्रातील महिला पदाधिकारी सहकार्य करणार आहेत. १) दिपाली लालाजी…

Read More

गुरुवार १९ डिसेंबर मुंबई – विधान परिषदेच्या सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे महायुतीकडून भाजपचे प्रा. राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिंदे यांच्या निवडीचे औपचारिक घोषणा केली. शिंदे यांच्या रूपाने अहिल्यानगर जिल्ह्याला दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे तसेच विरोधकांचे आभार मानले. विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे यांनीच एकमेव अर्ज दाखल केला होता, त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात होती. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची ७ जुलै, २०२२ रोजी मुदत संपली होती. तेव्हापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त होते. राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी…

Read More

बुधवार १८ डिसेंबर  मुंबई – गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटा आयलंडकडे जात असलेल्या बोटीच्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये १० प्रवाशी आणि तीन नेव्ही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या अपघातात दोन गंभीर जखमींवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिस आणि नौदलाकडून करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, सध्याची आकडेवारी संध्याकाळी साडेसात पर्यंत उपलब्ध होती आणि अंतिम आकडेवारी गुरुवारी सकाळी जाहीर केली जाईल. यावेळी फडणवीस यांनी यावर सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून, मुंबई पोलिस आणि नौदलाकडून या प्रकरणाची तपासणी करण्यात येणार आहे. “अद्याप काही…

Read More

बुधवार १८ डिसेंबर  सिन्नरचे माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे यांच्या मुलावर हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. हल्लेखोरांनी सागर लोंढे यांच्या पाठीवर, डाव्या हातावर, डोक्यावर कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. दुकानात शिरून हल्ला – सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील रस्त्यावर वावी वेस जवळील दोस्ती ट्रेडर्स या स्टीलच्या दुकानात आय ट्वेंटी या चार चाकी कारमधून आलेल्या चौघांपैकी तिघांनी दुकानाचे संचालक सागर नामदेव लोंढे (वय २८) यांच्यावर दुकानात शिरून हा हल्ला केला. सागर यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाल्याने आसपासच्या नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले. हल्लेखोर संगमनेरच्या दिशेने – हल्ल्यादरम्यान चार चाकी वाहनात थांबून असलेल्या एकाने हवेत…

Read More