Author: Annant Ppangarkar
शुक्रवार, २७ डिसेंबर नवी दिल्ली – भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री नवी दिल्लीमधील ‘एम्स’ रुग्णायामध्ये वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मनोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी म्हणजेच २८ डिसेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून आज सकाळी ११ वाजता मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल. सात दिवसांचा शासकीय दुखवटा… मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच आज (२७ डिसेंबर) रोजी कर्नाटक सरकारने सुट्टी…
गुरुवार २६ डिसेंबर विशेष प्रतिनिधी / मुंबई गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील हत्यासत्र ज्या गतीने सुरु आहे ते पाहता राज्यात कायद्याचं राज्य राहिलं नसल्याचं काँग्रेसचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. सध्या राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या हत्या सत्रांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशामध्ये काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून जाग येण्यासाठी आणखी किती वाट पाहणार आहात? असा सवाल त्यांनी यावेळी राज्य सरकारला केला आहे. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पुण्यामध्येही दोन बहिणींची हत्या करण्यात आली. तर, पुणे…
गुरुवार २६ डिसेंबर एका पाच वर्षाच्या चिमुरडीला चॉकलेटचे अमिष दाखवून पोलिसाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रक्षकच भक्षक बनल्याने पोलीस दल हादरले आहे. दरम्यान संबंधित पोलिसाला अटक करण्यात आली आहे. सचिन वसंत सस्ते असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. सस्ते याने बंदोबस्तावर असताना विसापूर किल्ला परिसरात आई-वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी (२५ डिसेंबर) घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित पोलीस आरोपीला अटक केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात…
गुरुवार २६ डिसेंबर अल्पवयीन मुलीस तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सातत्याने अत्याचार करणाऱ्या आरोपीस कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश के. एस. होरे यांनी २० वर्षांचा कारावास आणि २ लाख ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संगम संभाजी डुबल (२८) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती येथील सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी दिली. अल्पवयीन मुलीची सोशल मीडियावर संगम डुबल याच्याशी ओळख झाली होती. अल्पवयीन मुलीस तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत संगम संभाजी डुबल याने मुलीवर सातत्याने अत्याचार केला होता. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात…
गुरुवार, २६ डिसेंबर एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या पती-पत्नीला अटक केली आहे. अटक केलेल्या पती-पत्नीला कल्याणच्या न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण पूर्व येथे ही घटना घडली. विशाल गवळी असे यातील मुख्य आरोपीचे नाव असून त्याला बुलढाणा येथून अटक करण्यात आली. तर पतीच्या दुष्कृत्यावर पडदा टाकत पत्नीने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी कल्याण पूर्व येथील नागरिकांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली निषेध मोर्चा काढत विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. कल्याण पूर्व येथील एका अल्पवयीन मुलीचे २३ तारखेला संध्याकाळी…
गुरुवार, २६ डिसेंबर मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कचाट्यात सापडलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत डिसेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. ७० लाखांहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया मंगळवारपासून पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या १२,८७,५०३ पात्र महिलांना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी…
गुरुवार, २६ डिसेंबर राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर, खेड्यांमध्ये मूळ गावठाणात वाडवडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्यांना आता त्यांच्या जमिनीची मालकी अर्थात स्वामित्व मिळणार आहे. देशातील नागरिकांच्या मालमत्तांना अधिकृत चेहरा देणाऱ्या केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी ‘स्वामित्व’ योजनेचा शुभारंभ शुक्रवारी (२७ डिसेंबर) राज्यात ३० जिल्ह्यांत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्वपूर्ण ‘स्वामित्व’ योजना जाहीर केली असून, या योजनेच्या माध्यमातून ३० हजार ५१५ गावांतील मालमत्ताधारकांना ‘डिजिटल प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक पत सुधारण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळाल्याने शेतकऱ्यांना मालमत्ता कर सुलभरीत्या भरता येणार असून,…
गुरुवार, २६ डिसेंबर मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची समाज माध्यमातून पोस्ट व व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्या १२ प्रोफाइल विरोधात राज्याच्या सायबर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया संदर्भात गंभीर पावलं – सोशल मीडिया संदर्भात सरकारने उचलली गंभीर पावलं – समाज माध्यमाचा चुकीच्या पद्धतीने होत असलेला वापर लक्षात घेत राज्य सरकारने आता सायबर गुन्ह्यांसंदर्भात गंभीर पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाबरोबरच गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. काय आहे प्रकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्या भाषणांमध्ये छेडछाड करून ती समाज माध्यमात पोस्ट करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपच्यावतीने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली…
बुधवार, २५ डिसेंबर संगमनेर नगर परिषदेने अखेर मोठी कारवाई केली आहे. शहरातील दोघा प्लास्टिक विक्रेत्यांवर छापे टाकत पालिकेच्या पथकाने दीड टन प्लास्टिक जप्त केले. यात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांसह प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश आहे. संगमनेर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर मुख्याधिकारी म्हणून रामदास कोकरे यांनी पदभार घेतला होता. कोकरे यांनी पदभार घेतल्यानंतर पालिकेच्या पथकाला बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पालिकेच्या पथकाकडून सातत्याने शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडून प्लास्टिक जप्तीची कारवाई केली जात होती. एकीकडे किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई सुरू…
बुधवार, २५ डिसेंबर संगमनेर – डॉ. जयश्री थोरात यांनी सावरगाव तळ येथील रामनाथ गुरकुले यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. मयत गुरुकुले कुटुंबाच्या पाठीशी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे सदैव उभे असल्याचे सांगत या कुटुंबीयांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे. चंदनापुरी शिवारात ढग्या डोंगराजवळ वनविभागाच्या मालकीच्या जंगलावर रामनाथ गुरुकुले (वय ३४ वर्ष रा. सावरगाव तळ, संगमनेर) यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता. बिबट्याच्या हल्ल्यात यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. थोरात म्हणाल्या, बिबट्यांचे मानवी वस्तीतील हल्ले दिवसेंदिवस वाढले आहे. यामुळे या परिसरात भीतीदायक वातावरण आहे. यापूर्वीही तीन मृत्यू या हल्ल्यातून झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी…
बुधवार, २५ डिसेंबर संगमनेर – संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या आदेशावरून महसूलच्या पथकाने केलेल्या कारवाईत वाळू वाहतूक करणारी विना क्रमांकाची पिकअप वाळूसह पकडली असून विनापरवाना बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या अमोल संजय जोंधळे (रा. गोल्डन सिटी, संगमनेर) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना शहरातून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. मांजरे यांनी तात्काळ आपल्या महसूलच्या अधिकाऱ्यांना गेल्या बुधवारी शहर व आसपासच्या परिसरात शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. ग्राम महसूल अधिकारी संतोष जाधव, मच्छिंद्र तात्याबा राहणे आदींनी तहसीलदारांच्या आदेशावरून शहर व परिसरात विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांचा शोध सुरू…
बुधवार २५ डिसेंबर मुंबई – रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाला मुहूर्त लाभल्यानंतर मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान मंगळवारी तब्बल डझनभर आयएएस अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने बदल्या केल्या आहेत. दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी अनिल डिग्गीकर यांची बदली करण्यात आली. तर बेस्टमध्ये खांदेपालट करत नवे महाव्यवस्थापक म्हणून हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजनकोच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. महाजनकोचे अध्यक्ष अनबल्गन यांच्याकडे आता उद्योग विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांच्याकडे नागपूर टेक्सटाईल आयुक्तपदाची धुरा असणार आहे तर आयुक्त अविशांत पांडा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात…
अहिल्यानगर दि.२४ – सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान होईल अशी कोणतीही कृती कारखान्यांनी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखान्यांच्या प्रश्नाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्रादेशिक सहा संचालक साखर संतोष बिडवई, निवासी उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपसंचालक साखर संजय गोंदे, जिल्हा सहकार उपनिबंधक गणेश पुरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, विशेष लेखा परीक्षक आर. एफ. निकम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा कमी दर देऊ नये. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्याचे समाधान होईल असा दर देण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्याला अधिकची रक्कम देता…
मंगळवार, २४ डिसेंबर अहिल्यानगर – न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत राज्यात बहुतांश ठिकाणी बेकायदेशीर फ्लेक्सचा सुळसुळाट झाला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात बोर्ड लावल्याचे प्रकार समोर आल्याने अशा अनधिकृत फलकांवर व फ्लेक्स बोर्डवर महानगरपालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संगमनेर नगरपरिषद अशी कारवाई कधी करणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.गेल्या महिनाभरात महानगरपालिका प्रशासनाने १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर ७११ फलकांवर कारवाई करत ३४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही माहिती दिली. अनधिकृत फ्लेक्स बोर्ड संदर्भात कारवाईसाठी न्यायालयाने आदेश दिलेले…
मंगळवार २४ डिसेंबर संगमनेर – येथील शांती फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्ष व माजी नगराध्यक्षा दूर्गाताई तांबे यांनी पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. ५ जानेवारीला संगमनेरमध्ये विविध मान्यवरांचे उपस्थितीत पुरस्कारार्थींचा सन्मान केला जाणार आहेत. नाट्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल आणि मराठी, हिंदी विविध दूरचित्र वाहिन्यांवरील मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे उलटा चष्मा फेम डॉ. राजेश आहेर यांना नाट्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तमाशा क्षेत्रात योगदान देऊन ग्रामीण व शहरी जनतेचे मनोरंजन करतानाच प्रबोधनाची परंपरा चालवणारे जेष्ठ कलावंत आणि महाराष्ट्र राज्य लोकनाट्य मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांना कांताबाई सातारकर…
मंगळवार, २४ डिसेंबर एका सॉफ्टवेअर इंजिनियरने आपल्या पत्नीसोबत केलेल्या विचित्र कृत्यामुळे पती-पत्नीच्या नात्याला तडा गेला आहे. पतीच्या विचित्र मागण्या आणि नको त्या गोष्टीसाठी केलेली जबरदस्ती आणि त्याही पुढे जात ओलांडलेल्या सर्वच मर्यादांमुळे कल्याणमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कल्याण पश्चिमेला तो राहातो. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहाणाऱ्या एका तरुणीबरोबर त्याचा जानेवारी २०२४ मध्ये विवाह झाला होता. हा त्याचा दुसरा विवाह होता. लग्नानंतर तो दुसऱ्या पत्नी बरोबर कल्याणमध्ये राहत होता. लग्नाला दोन तीन महिने झाल्यानंतर सोहेल हा आपले रंग दाखवू लागला. तो पत्नीला त्रास देवू लागला. पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी त्याने पत्नीकडे माहेरून पंधरा लाख रुपये आणण्याची…
अहिल्यानगर दि.२३ – जिल्हा विकास आराखड्याबाबत जिल्हा वार्षिक योजनेतील राखीव निधीचा विनियोग करताना विविध योजनांचे अभिसरण करून आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करण्यावर आणि विकास आराखड्यात रोजगार निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांवर भर द्यावा, अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसामुद्रे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. गेडाम म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या कामांचा प्राधान्याने विचार व्हावा. विविध योजनांच्या अभिसरणाद्वारे विकासाचे…
परभणी, दि. २३ डिसेंबर परभणीतील तरुण सोमनाथ सुर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करणारा होता. तो दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली आहे. हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे २० ते २५ मिनिटे संवाद साधला. परभणीतील घटनेची सर्व माहिती जाणून घेतली व कुटुंबाला धीर दिला. सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीतील मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे.…
सोमवार २३ डिसेंबर संगमनेर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली संजय गांधी निराधार योजनेसह विविध प्रकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांची प्रकरणे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आली आहे. गोरगरीब, वृद्ध व निराधार लाभार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी ही प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत केली आहे. या मागणीचे निवेदन संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना सोमवारी देण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.…
सोमवार, २३ डिसेंबर श्रीरामपूर – श्रीरामपूरमध्ये मटका व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी लाच मागितल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी दोघांना श्रीरामपूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल महादेव नरवडे, गौतम शंकर लगड व पोलीस नाईक रघुवीर ओंकार कारखीले या पोलीस कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस हवालदार राहुल नरवडे व गौतम लगड यांनी ॲड. एजाज पठाण व ॲड. पंकज म्हस्के यांच्यामार्फत श्रीरामपूर न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. साळवे यांच्यासमोर…
