Author: Annant Ppangarkar
गुरुवार, २९ ऑगस्ट मुंबई – गृह विभागाने गुरुवारी राज्यातील सात पोलीस उपाधीक्षकांच्या बढतीवर बदल्या केल्या आहेत. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचा यात समावेश असून त्यांची बदली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५, दौंड येथे समादेशक म्हणून झाली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. पोलीस अधीक्षक, पोलीस उप आयुक्त (असंवर्ग) पदावर या अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. या संबंधीच्या आदेश गुरुवारी शासनाचे अपर सचिव संदीप ढाकणे यांनी काढले आहेत बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे (कंसात मिळालेली पदोन्नती)… नरसिंग पंचम यादव (नियंत्रक, नागरिक संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई) सोमनाथ फकीरा वाघचौरे (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक…
गुरुवार दि.२९ ऑगस्ट अहमदनगर : संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीकरिता भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत ० ते १८ वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी ‘चाईल्ड हेल्पलाईन सेवा १०९८’ हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना २४x७ हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. सदर सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकतो किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ.…
गुरुवार, दि. २९ ऑगस्ट अहमदनगर : राज्य शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरीता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृतीसह जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा…
गुरुवार दि.२९ ऑगस्ट अहमदनगर : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सर्व नागरिकांना आधारशी संलग्न ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत असणे आवश्यक असून नागरिकांनी आधारशी संलग्न माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात शासकीय १०२ आधार केंद्र, महिला बाल विकास विभागाच्या ६९ आधार केंद्र, सीएससी ई-गव्हर्नन्स चे ७५ केंद्र, बँकेचे १४, बीएसएनएलचे ४, पोस्ट ऑफिसच्या ९८ अशा जिल्ह्यातील एकूण ३८८ आधार केंद्रांवर आधार नोंदणी आणि माहिती अद्ययावत करता येईल. महिला व बालकल्याण विभागांतर्गत ० ते ५ वयोगटातील बालकांची आधार नोंदणी अंगणवाडीमध्ये करण्यात येत आहे. ही नोंदणी नि:शुल्क आहे. बालकांच्या नोंदणीसाठी जिल्ह्यामध्ये ६९…
गुरुवार, २९ ऑगस्ट मुंबई : मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा येथे संबंधितांची बैठक बोलाविली होती. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री…
गुरुवार, २९ ऑगस्ट संगमनेर : शेतात मेंढपाळ कळपासह मुक्काम करत असताना मेंढ्यावर हल्ला करण्यासाठी गेलेल्या बिबट्याला रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने गुराखी महिलेला ओरबाडले. पती मदतीसाठी धावताच बिबट्या पळाला यात महिला जखमी झाल्याची घटना वडगाव लांडगा येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी, साकुर येथील मेंढपाळ आपला मेंढ्याचा कळप घेवून फिरत असतांना रात्रीच्या वेळी मारुती लांडगे यांच्या शेताजवळ मुक्कामासाठी थांबले. मंगळवारी (२६ ऑगस्ट) पहाटे साडेचारच्या सुमारास बिबट्या मेंढ्याची शिकार करण्यासाठी आला. याच ठिकाणी मेंढपाळ पती-पत्नी येथेच झोपलेले होते. कळप पाहून बिबट्याने मेंढ्यावर हल्ला करण्यासाठी झडप टाकली. मात्र रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने बिबट्याचा पंजा महीलेच्या गालाला लागल्याने त्यांना जाग आली. यामुळे…
गुरुवार, २९ ऑगस्ट चालढकल आणि गांभीर्य नसणे यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ताशेरे ओढत राज्य सरकारला पुन्हा एकदा ‘लाडकी बहीण योजना’ थांबविण्याचा इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा या योजनेच्या अनुषंगाने सरकारचे कान पिळले आहेत. पुण्यातील पाषाण परिसरातील खाजगी मालकीची जमीन अधिग्रहित केल्यानंतर राज्य सरकारने मूळ जमीन मालकांना त्या जमिनीचा योग्य मोबदला दिला नाही. त्यामुळे जमीन मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. जमीन अधिग्रहण प्रकरणाच्या या नुकसान भरपाईवरून राज्य सरकार चालढकल करत असून सरकारला याचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. राज्य सरकारने अर्जदाराला देण्याची भरपाईची रक्कम पुन्हा मोजून सादर न…
गुरूवार दि. २९ ऑगस्ट २०२४ मेष – अचानक धनलाभाचे योग. परंतु आज खिसा, पाकीट सांभाळा. आर्थिक फसवणुक होण्याची शक्यता. वृषभ – अतिशय यशस्वी दिवस. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. संततीमुळे आज मानहानी संभवते. मिथुन – महादेवाची उपासना लाभदायक होईल. वाहन सांभाळून चालवा. कर्क – आजचा दिवस कटकटीचा असेल. पाकीटासह महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. सिंह – आपली हुशारी व आपल्या समय सूचकतेनुसार आजच्या दिवसाचे आर्थिक नियोजन यशस्वी कराल. कन्या – गणेशाची आराधना करा. दिवस आनंदात जाईल. पोटदुखीने हैराण व्हाल. तूळ – आनंदी व लाभदायक दिवस. आईकडील नातलग भेटण्याचा दिवस. वृश्चिक – भाग्यशाली दिवस. आज जे मागाल ते मिळण्याचा दिवस. प्रेमी युवकांसाठी भाग्यशाली दिवस.…
बुधवार, २८ ऑगस्ट अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा कार्यभार डॉ. किरण मोघे यांनी आज बुधवारी स्वीकारला. डॉ. किरण मोघे हे अहमदनगर येथे रूजू होण्यापूर्वी पुणे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून २०२१ पासून कार्यरत होते. त्यांच्या जागेवर अहमदनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर यांची बदली झाली आहे. अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी पदावर रूजू झाल्यावर त्यांचे शिर्डी उपमाहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संतोष गुजर, धनंजय जगताप, सुरज लचके, प्रविण मुठे, चिंतादेवी जयस्वार यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. मोघे यांनी यापूर्वी नांदेड, रत्नागिरी, नाशिक, नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आणि मुख्यमंत्री सचिवालयात माहिती…
बुधवार, २८ ऑगस्ट अवैध धंद्यासाठी बहुचर्चित असलेल्या शक्तिमान टॉवरचा अखेर संगमनेर शहर पोलिसांना पत्ता सापडला असून पोलिसांच्या डिटेक्शन ब्रांचच्या (डीबी) कर्मचाऱ्यांनी येथील एका गाळ्यात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सोमवारी साडेसहा वाजता छापा टाकला. कल्याण मटक्याचे आकडे घेणाऱ्या एकाला पोलीस पथकाने पकडत त्याच्यावर कारवाई केली, मात्र याचवेळी येथे सुरू असलेल्या अन्य अवैध धंद्यांकडे पोलीस पथकाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. राज्यात सुसंस्कृत म्हणून पुढे येत असलेल्या संगमनेरला गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचा कलंक लागला असून गल्लोगल्ली हे धंदे राजरोसपणे रस्त्यांवर सुरू आहे. पोलिसांसह अन्य संबंधित सर्वच विभागांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी…
बेजबाबदार शासनाला जनतेने शिक्षा द्यावी – माजी आमदार डॉ. तांबे मालवणची घटना दुर्दैवी व वेदनादायी – डॉ. जयश्री थोरात बुधवार, २८ ऑगस्ट संगमनेर – महाराष्ट्रासह देशवासीयांची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रत्नागिरी समुद्रकिनाऱ्यावरील पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळल्याने राज्यभरात भ्रष्ट सरकार विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. बुधवारी संगमनेरमध्ये देखील महाविकास आघाडीच्यावतीने निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकार्यांना या संदर्भातील निवेदन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. संगमनेरकर नागरिक, शिवप्रेमी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा यात समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जमलेले सर्वजण भ्रष्ट भाजप सरकार विरोधात घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालयात आले होते.…
बुधवार, २८ ऑगस्ट शाळेत विद्यार्थिनी गैरवर्तन केल्याप्रकरणी चार महिन्यांपूर्वी न्यायालयात आरोप सिद्ध झालेल्या प्राथमिक शिक्षकाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर सेवेतून बडतर्फ केले आहे. मदन रंगनाथ दिवे असे कारवाई झालेल्या या प्राथमिक शिक्षकाचे नाव आहे. डिसेंबर २०२२ मध्ये राहुरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेवर उपाध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या शाळेतील विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दिवे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३५४(अ), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात शिक्षक दिवे याला पोलिसांनी अटक देखील केली होती. त्यामुळे संबंधित शिक्षकावर जिल्हा परिषदेने निलंबनाची कारवाई केली होती. न्यायालयीन खटल्या दरम्यान…
बुधवार, २८ ऑगस्ट गोविंदा पथकांच्या पाठीशी हे शासन नेहमीच खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. शासनाकडून गोविंदांसाठी जे-जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल. ‘लाडक्या बहिणी’ प्रमाणेच ‘सुरक्षित बहीण’ ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासनाने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे. हे शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक, संस्कृती युवा प्रतिष्ठानचे इतर सर्व पदाधिकारी, विविध गोविंदा पथके व गोविंदाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हा खेळ पाहून आम्हालाही आमचे…
बुधवार, २८ ऑगस्ट विश्व हिंदू परिषद हीरक महोत्सवानिमित्त बजरंग दलाच्यावतीने संगमनेरमध्ये भव्य हिंदू संमेलनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेस यावर्षी साठ वर्षे पूर्ण होत आहे भारतासह संपूर्ण विश्वातील हिंदूंची सेवा सुरक्षा व संस्कार करणे हे ध्येय समोर ठेवून विश्व हिंदू परिषद अखंड कार्य करीत आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी आंदोलन, न्यायालयीन लढा आणि मंदिराच्या निर्माण पर्यन्त चे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने केले आहे. अनेक मोठमोठ्या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेने यशस्वीपणे आपली भूमिका घेतली आहे. आणि यापुढेही हिंदू हिताचे कार्य अखंडितपणे चालू राहणारच आहे. रविवारी (१ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे मार्गावरील शेती…
मंगळवार, २७ ऑगस्ट पुणे : धडापासून हातपाय वेगळे केलेल्या आणि शिरच्छेद झालेला अवस्थेत पुण्याच्या खराडी भागात नदीपात्रात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. १८ ते २० या वयोगटातील असलेल्या या तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. तरुणीची ओळख पटविण्याचे आणि आरोपीचा शोध घेण्याचे काम चंदननगर पोलिसांनी सुरू केले आहे. खराडी परिसरात जेनी लाइट कन्स्ट्रक्शनकडून इमारतीचे काम सुरू आहे. नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह वाहून आल्याचे बांधकाम मजुरांनी पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता हा मृतदेह एका तरुणीचा असल्याचं दिसून आलं. तरुणीची ओळख पटू नये म्हणून शिर धडावेगळे करण्यात आले…
बुधवार, २८ ऑगस्ट संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला उच्चांकी ७१०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. तर कांद्याला ४१०१ रुपयापर्यंत भाव मिळाला. यामुळे डाळिंब आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ आणि अध्यक्ष शंकरराव खेमनर यांनी म्हटले आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डमध्ये मंगळवारी (२७ ऑगस्ट) डाळिंबाला चांगला भाव मिळाला. एक नंबर डाळिंबास २५१ ते ३५० रुपये प्रति किलो, दोन नंबर डाळिंबास १५१ ते २०० रुपये प्रति किलो, तीन नंबर डाळिंबास ८० ते १०० रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५२८१ कांदा गोण्यांची आवक…
जाणून घ्या… आजचे राशीभविष्य बुधवार दि. २८ ऑगस्ट २०२४ मेष – आज आपल्यावर आलेल्या संकटात भावाची मोलाची मदत मिळेल. आपल्या संततीमुळे आज आपला मान सन्मान वाढेल. वृषभ – आपल्या राशीमध्ये असलेला राजयोग आज आपल्याला प्रकर्षाने जाणवेल. जोडीदाराकडून आर्थिक मदत मिळेल. मिथुन – अतिशय खर्चिक दिवस. आज स्वभाव चिडचिडा बनेल. स्वभावावर नियंत्रण ठेवा. कर्क – आज संततीसाठी किंवा संततीकडून अतिशय पैसा खर्च केला जाईल. आज आपलं भाग्य आपल्याला साथ देणार नाही. सिंह – आज तब्येत साथ देणार नाही. साथीच्या आजारामुळे वैतागून जाल. आज आराम करा. कन्या – लाभस्थानी असलेला राशी स्वामी बुध आज शेअर मार्केटमध्ये लाभ मिळवून देण्याची शक्यता. तूळ -…
मंगळवार, २७ ऑगस्ट नाशिक – मालेगाव महापालिका हद्दीत केलेल्या विविध विकास कामांची पडताळणी आणि मूल्यमापन न करता २० लाख ६७ हजार ६०७ रुपयांची शासनाची आर्थिक फसवणूक करत स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतल्याचा चौकशीअंती ठपका ठेवत नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिकेच्या १५ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या तक्रारीवरून २० लाख ६८ हजार ६०७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये छावणी पोलीस ठाण्यात शहर अभियंता कैलास राजाराम बच्छाव, सेवानिवृत्त तत्कालीन कनिष्ठ अभियंता मुरलीधर हरी देवरे, तत्कालीन कनिष्ठ अभियंता संजय जनार्दन जाधव, सेवानिवृत्त तत्कालीन उपअभियंता राजेंद्र काशिनाथ बाविस्कर, खाजगी व्यक्ती सोहेल अब्दुल रहमान…
विशेष प्रतिनिधी / मुंबई मंगळवार, २७ ऑगस्ट ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. सत्ताधाऱ्यांच्या घिसाड घाईमुळेच पुतळा उध्वस्थ झाल्याचं स्पष्ट झालं. या घटनेने केंद्र सरकारबरोबरच नौदल आणि राज्यातल्या सरकारची छी थू होऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ महिन्यांपूर्वी ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या कार्याला मानवंदना करण्याकरिता शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. पंतप्रधानांनी अनावरण केलेला हा महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त होतेय. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. सिंधुदुर्गचे आमदार…
आजचे राशीभविष्य मंगळवार २७ ऑगस्ट २०२४ मेष – तृतीयेमधील मंगळ आप्तस्वकीयांच्या रोषाला कारणीभूत होऊ नका. भाग्येश गुरु धनस्थानी असल्याने अजूनही भाग्य तुमच्या बाजूने आहे. वृषभ – मंगळाचे धनस्थानातील आगमन आर्थिक समस्या उद्भवू शकतात. आज नवीन वास्तूचे सुख अनुभवाल. मिथुन – आजचा दिवस संतापी. शांत राहून गोड बोलून काम करून घ्या. भाग्येश शनी मंद गतीने प्रगती दर्शवतो. कर्क – आज वाहन सांभाळून चालवा, अपघाताची शक्यता. आजच्या दिवशी आप्तस्वकीय विचित्र वागतील. सिंह – आज नोकरीच्या ठिकाणी मान सन्मान वाढेल. खिसा, पाकीट सांभाळा आर्थिक नुकसानीचा दिवस. कन्या – आज खोट्याचा सामना होईल. तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. भाग्य तुमच्या बाजूने आहे. तुळ -…
