Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर हे अत्यंत विकसित आणि वैभवशाली शहर म्हणून ओळखले जाते. नागरिकांना अत्याधुनिक नागरी सुविधा पुरवण्यासोबतच शहरात स्वच्छतेची एक नवी संस्कृती रुजली आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्या या चळवळीत स्थानिक नागरिकांचा सहभाग अत्यंत मोलाचा असून नगरपरिषदेने सेवेत दाखल केलेल्या नवीन अत्याधुनिक वाहनांमुळे ‘आदर्श स्वच्छ व सुंदर संगमनेर’ ही संकल्पना आता पूर्णत्वाकडे जात आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर यशोधन कार्यालय येथे संगमनेर नगरपालिकेच्या वतीने ‘एक पणती स्वच्छतेची’ या विशेष उपक्रमांतर्गत सुमारे ५ कोटी रुपये खर्चाच्या विविध स्वच्छता वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये २ अत्याधुनिक स्वीपिंग मशीन, १० नवीन घंटागाड्या, ५ जुन्या घंटागाड्यांचे नूतनीकरण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दिवाळीच्या ऐन तोंडावर संगमनेर तालुक्यातील शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगारांची दिवाळी अत्यंत गोड आणि आनंददायी ठरणार आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तब्बल २२ कोटी ११ लाख रुपये बँकेत वर्ग केले आहेत. या मोठ्या निर्णयामुळे संगमनेरच्या बाजारपेठेत प्रचंड उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक व्यापाराला मोठी आर्थिक गती मिळणार आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी ही माहिती दिली. घुले म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर संगमनेरची सहकार चळवळ आणि कारखान्याची यशस्वी वाटचाल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराला स्वच्छतेतून समृद्धीकडे नेण्यासाठी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ४ वाजता यशोधन कार्यालयापासून ‘एक पणती स्वच्छतेची’ या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या अभियानामुळे शहरात स्वच्छतेचे एक नवे पर्व सुरू होणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपरिषदेने यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्वच्छतेमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासोबतच विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.…

Read More

संगमनेर (विशेष प्रतिनिधी): अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात गेल्या ३५ दिवसांत निर्माण झालेले समन्वयाचे आणि सहमतीचे वातावरण केवळ जिल्हा बँकेच्या निवडणुकीपुरते किंवा राजकीय समीकरणांपुरते मर्यादित न राहता, त्याचा प्रत्यक्ष फायदा संगमनेर तालुक्याला मिळावा, अशी रोखठोक अपेक्षा संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्याच्या पातळीवर निर्माण झालेली ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेर तालुक्याच्या प्रलंबित प्रश्नांच्या रुळावर धावणे गरजेचे असून, राजकीय सहमतीचा खरा सन्मान सामान्य जनतेच्या समस्या सुटल्यानंतरच होईल, असा सूर त्यांनी आळवला आहे. जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी समोर आलेला सहकार्याचा हात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत योग्य मान-सन्मान राखत स्वीकारला…

Read More

आजचे राशिभविष्य- मेष – आजच्या दिवशी तुमच्या प्रयत्नांना नशिबाची उत्तम साथ मिळेल. कार्यालयात उच्च अधिकारी तुमच्या कामाची उघडपणे प्रशंसा करतील. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा घराच्या संदर्भातील प्रकरणात कोणतीही चांगली बातमी कानाला मिळू शकते. मात्र, स्वतःच्याच मतावर ठाम राहणे टाळावे, अन्यथा घरातील एखाद्या व्यक्तीसोबत विनाकारण वाद होऊ शकतो. वृषभ – सकाळच्या सत्रात थोडी धावपळ होईल, परंतु दुपारनंतर परिस्थिती पूर्णपणे तुमच्या अनुकूल होईल. व्यवसायात हालचाल वाढल्याने उत्पन्नाचे नवीन स्रोत हाती येतील. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने मनाला मोठा दिलासा मिळेल. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक पाऊल उचलावे. मिथुन – भाग्यसाथीमुळे रखडलेली कामे मार्गी लागतील आणि लाभाच्या नवीन संधी समोर येतील. कुटुंबातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शहराच्या स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आणि सुंदर भविष्याचा संकल्प दृढ करण्यासाठी ‘एक पणती स्वच्छतेची, संगमनेरच्या सुंदर भविष्याची’ या संकल्पनेअंतर्गत एका विशेष जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही भव्य रॅली उद्या, बुधवारी (दिनांक ४ नोव्हेंबर) सायंकाळी ठीक ४:०० वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संगमनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी दिली आहे. लोकनेते व राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विद्यमान आमदार सत्यजित तांबे तसेच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपरिषद सातत्याने लौकिकास्पद कामगिरी करत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छतेच्या रॅलीचा औपचारिक शुभारंभ संगमनेरच्या माजी प्रथम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अकोले तालुक्यातील गणोरे येथील शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली सुनील कडलग यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) २०२६-२७ चा प्रतिष्ठेचा ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला. त्यांनी लोकसहभागातून तब्बल २२ लाखांचा निधी उभारून शाळेचा कायापालट केला आहे. शिंदेवाडी, गणोरे (ता. अकोले) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका वृषाली कडलग यांनी ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. अध्यापनासोबतच शाळेच्या भौतिक विकासासाठी त्यांनी माजी विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून आवाहन केले, याला ग्रामस्थ आणि दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे २२ लाख रुपयांचा लोकसहभाग मिळवून दिला.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नगरपालिका निवडणुकीत पराभव झाला तरी नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता शहराच्या विकासासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. संगमनेरमधील दादागिरी आणि दहशतीचे दिवस आता संपले असून, सामान्य शेतकऱ्याचा मुलगाही जनतेच्या आशीर्वादाने आमदार होऊ शकतो हे शिवसेनेने सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. साईनगर येथे शहरातील पहिल्या महिला शिवसेना शाखेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. साईनगर येथील या शाखेचे उद्‌घाटन आमदार अमोल खताळ आणि आदिशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा नीलम खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. हे शाखा कार्यालय शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी व या प्रभागाच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी मेहनत आणि परीक्षेचा असू शकतो. बदलत्या परिस्थितीनुसार तुम्ही आखलेली धोरणे नक्कीच यशस्वी ठरतील. काही वेळ शांतपणे विचार करण्यात आणि आत्मचिंतनात घालवा. त्यामुळे तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यासाठी थोडा खर्च होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामांमध्ये निष्काळजीपणा करू नका. पती-पत्नीमधील संबंध चांगले राहतील. वृषभ – आज घरात नातेवाईकांच्या आगमनामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासह एकत्र बाहेर जाऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि नियोजित महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. एखादी चांगली बातमी मिळाल्यामुळे तुमचे मन दिवसभर प्रसन्न राहील. मोठा खर्च करताना किंवा घर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात पूर्वकल्पना व प्रशासकीय सूचना झुगारून लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांतील लोकांमध्ये आपसांत हाणामारी व झुंज झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील एकूण बेचाळीस जणांवविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दिनांक १ नोव्हेंबर) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जोर्वे गावातील मुख्य चौकात ही घटना घडली. पोलीस प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या सूचनांना व आदेशांना न जुमानता आरोपींनी एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव जमवला. जोर्वे गावातील मुख्य चौकात लोखंडी पोल लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन्ही गट आपसांत भिडले आणि त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार…

Read More

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी राहणार आहे. विचारांमध्ये सकारात्मकता राहील आणि कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि रखडलेले पैसे परत मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळेल. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि आत्मविश्वासाचा असेल. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी कराल, ज्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन शारीरिक ऊर्जा वाढेल. मित्रांच्या सहकार्याने काही महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मिथुन – आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. कला आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींना विशेष यश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता तालुका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. राहाता तालुक्यातील पिंपळस येथे राहाता तालुका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची धमाकेदार सुरुवात झाली. राजकारणातील सततची धावपळ आणि विकासकामांचा मोठा व्याप बाजूला सारत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी थेट मैदानात उतरत फलंदाजी केली. त्यांच्या या दिलखुलास आणि उत्साही सहभागामुळे उपस्थितांमध्ये मोठा जोश पाहायला मिळाला. राजकीय जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही मनातला खेळाडू जिवंत ठेवणाऱ्या या क्षणाने उपस्थितांची मने जिंकली.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका म्हणजे काही जणांची जहागीरदारीच झाली होती. जमिनीचा सातबारा उतारा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नावावर असला, तरी प्रत्यक्ष मालकी दुसऱ्यांची असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, तालुक्यातील जनतेने परिवर्तन घडवून आणत मला काम करण्याची संधी दिली आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. पिंपळे येथे शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महायुतीचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार खताळ म्हणाले की, सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळेच मी आमदार झालो आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांचे प्रश्न सोडविणे हेच माझे कर्तव्य आहे. माझ्याकडे कोणती पदवी आहे यापेक्षा मी जनतेसाठी काय करतो हे महत्त्वाचे आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अकोले तालुक्यातून एक खळबजनक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील वाशेरे शिवारात एका शेतकऱ्याने दोडक्याच्या पिकाआड लपून बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याचे उघडकीस आले आहे. अकोले पोलिसांनी या शेतात धाड टाकून तब्बल १५ लाख ३६ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून, आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कठोर पावले उचलण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. वाशेरे शिवारात राहणारा विजय रघुनाथ गजे याने आपल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुकानांच्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला असून एका नगरसेवकाच्या भूमिकेमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. मुख्याधिकारी किंवा नगराध्यक्ष मोठे की हा नगरसेवक मोठा? असा सवाल उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख अमर कतारी यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. समाज माध्यमात व्हायरल झालेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून कतारी यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी संगमनेरचे नगराध्यक्ष, सीओ साहेब, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, आमदार अमोल खताळ आणि आमदार सत्यजीत तांबे या सर्वमान्य नेत्यांना पत्र देऊन दिवाळीत लहान-मोठ्या व्यावसायिक व दुकानदारांना रहदारीस कोणताही अडथळा न येता १० ते १५ दिवसांसाठी दुकान…

Read More

प्रवीण पुरो- राज्यात सरकार टिको वा न टिको, पण गुजरातच्या जोडगोळीची मर्जी सांभाळल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी मानसिकता राज्यातल्या युती सरकारने स्वत:ची करून ठेवली आहे. अहमदाबादकडे जाणारी बुलेट ट्रेन असो की नागपूरहून गोव्याकडे जाणार्‍या शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प असो. दिल्ली सरकारच्या मनमानीचे सारे प्रयोग सध्या महाराष्ट्रावर लादले जात आहेत. आम्ही निमूटपणे त्यांचा अंमल करत आहोत, कारण आम्ही मुर्दाड आहोत. बुलेट ट्रेन हा पूर्णत: गुजरातच्या फायद्याचा प्रकल्प. मुंबईवर नजर ठेवण्याच्या हेतूने किंबहुना मुंबई गिळंकृत करण्याच्या कपटापोटी हा प्रकल्प उभारला जात असताना या प्रकल्पाला सर्वाधिक निधी देऊन आपलेच पाय आपण कापत आहोत. कारण आम्ही बिनडोक आहोत. शक्तीपीठ महामार्गही याच तोडीचा. या प्रकल्पाची महाराष्ट्राला…

Read More

आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस आपल्यासाठी उत्साही आणि ऊर्जेने भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. वृषभ- आजचा दिवस संपत्ती आणि समृद्धीच्या दृष्टीने शुभ फलदायी राहील. व्यावसायिक क्षेत्रात नवीन करार किंवा भागीदारी फायदेशीर ठरू शकते. जुन्या मित्राची अचानक भेट झाल्यामुळे मन प्रसन्न होईल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता राखणे गरजेचे आहे, यश नक्की मिळेल. मिथुन- आज मानसिक ताणतणाव जाणवू शकतो, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दिवाळीचे दिवस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असल्याने ठेकेदाराने विधी महाविद्यालय ते एकता चौक या रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करावी. विकासकामांसाठी निधी आपण उपलब्ध करून देतो, परंतु रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास लोकप्रतिनिधींची बदनामी होते. त्यामुळे कामाचा दर्जा उत्तमच राहिला पाहिजे आणि त्यात कोणतीही तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी आमदार अमोल खताळ यांनी ठेकेदाराला दिली. संगमनेर येथील विधी महाविद्यालय ते एकता चौक हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी आमदार खताळ यांच्या विशेष पाठपुराव्यातून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ आमदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशात ‘गरीबी हटाव’चा नारा देत पाकिस्तानचे दोन तुकडे करून जगाचा नकाशा बदलणाऱ्या स्व. इंदिरा गांधी यांचे कणखर आणि खंबीर नेतृत्व भारताला लाभले. बांगलादेशची निर्मिती आणि बँकांचे राष्ट्रीयीकरण यांसारखे ऐतिहासिक व धाडसी निर्णय घेणाऱ्या इंदिराजींनी देशाची अखंडता आणि एकात्मता टिकवण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील ‘शक्तीस्थळ’ येथे अमृत उद्योग समूहाच्या वतीने स्व. इंदिरा गांधी यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना बाळासाहेब थोरात बोलत होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बाजारपेठेतील मर्चंट बँकेच्या मध्यरात्री वाजू लागलेल्या कर्णकर्कश सायरनमुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी पोलिसांच्या मदतीने अलार्म बंद करायला लावला असून, मोबाईलवर अलर्ट जात असतानाही बराच वेळ दुर्लक्ष झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या मर्चंट बँकेच्या सुरक्षा यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे रात्रीच्या शांततेत कर्णकर्कश सायरन वाजत असल्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी झोपमोड होत आहे. विशेष म्हणजे, या अलार्मचे थेट अलर्ट बँकेच्या संचालक मंडळाच्या मोबाईलवर जात असल्याचे सांगितले जाते. असे असतानाही कुणीही गांभीर्याने घेत नाही, यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मध्यरात्री अडीच वाजता बाजारपेठ शाखेतील सायरन वाजू लागल्याने त्रस्त…

Read More