Author: Annant Ppangarkar

बुधवार, दि. ०४ सप्टेंबर मुंबई – महिला आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून करणाऱ्या नराधमांना सर्वोच्च न्यायालयात आरोप सिद्ध होऊन फाशीची शिक्षा सुनावली तरी त्यांना राष्ट्रपती यांच्याकडे दयेचा अर्ज करण्याचा अधिकार आहे. अशा अर्जावर राष्ट्रपती कार्यालयाकडून दीर्घ काळ निर्णय घेतला जात नाही, पर्यायाने अशा गुन्हेगारांची फाशी लांबते. त्यामुळे अशा घटनेतील पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी राष्ट्रपतींनी असे दयेचे अर्ज नाकारावे आणि अर्जावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली. राष्ट्रपतींनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपानंतर…

Read More

बुधवार, दि. ०४ सप्टेंबर सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबईच्या रिक्त पदी असलेल्या मुख्य अभियंता पदी गेल्या काही दिवसापासून पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राजेंद्र रहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहणे यांनी नव्या पदाचा पदभार त्वरित स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्य सरकारने बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहे. राहणे गेल्या काही दिवसापासून नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेरीस त्यांची सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंतापदी मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे.

Read More

बुधवार, दि. ०४ सप्टेंबर महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून दररोज नवीन घटना समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीच्या नगरसेवकानेच बारा वर्षीय अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक असलेल्या हितेश कुंभार याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दररोजच्या अत्याचाराच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे महाराष्ट्रात नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले येथे नगरसेवकानेच अल्पवयीन मुलीची छेड काढत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. आरोपी जबाबदार नागरिक आणि नगरसेवक असल्याने त्याच्या विरोधात जनमानसात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे महायुतीचे सरकार राज्यात ‘मुख्यमंत्री…

Read More

बुधवार, दि. ०४ सप्टेंबर  पोलीस प्रशासनाच्या भूमिकेमुळे सातत्याने वादात सापडणाऱ्या शांतता समितीच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शांतता समितीचे नेमके सदस्य कोण असा प्रश्न उपस्थित करत या बैठकीला जाणीवपूर्वक डावल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी केला आहे. मंगळवारी (ता. ३ सप्टेंबर) यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या सभागृहात पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. यावर्षी संगमनेर शहराची, येथील सण उत्सवाची कोणतीही पार्श्वभूमी माहीत नसलेल्या अधिकाऱ्यांच्या (बढतीवर बदली झालेल्या पोलीस उपअधीक्षकांचा अपवाद वगळता) हातात गणेशोत्सवाची सूत्रे गेल्याने काही ठराविक लोकांनाच त्या बैठकीचे निमंत्रण दिले गेले. अचानक तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस खात्याचे अधिकारी समाजातील…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागीय, जिल्हा प्रशासनाला सूचना बुधवार, दि. ०४ सप्टेंबर मुंबई : विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, यासंदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी. विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन…

Read More

असा असेल आजचा आपला दिवस… मेष – बाहेरगावी जाण्याचे योग. आर्थिक लाभ होण्याचा दिवस. पोटाचे आजार संभवतील. वृषभ – रागावर नियंत्रण ठेवा. आज तुमची कामे संथ गतीने होतील. वाहन चोरीची शक्यता, वाहन सांभाळा. मिथुन – जितका लाभाचा तितकाच खर्चाचा दिवस. चिडचिड, संतापावर नियंत्रण ठेवा. कर्क – आजचा दिवस अतिशय फायदेशीर असा आहे. जिथे जाल तिथे तुमचा सन्मान केला जाईल. मात्र भाऊबंदकीपासून चार हात दूर राहा. सिंह – अतिशय प्रेमळ आणि आपुलकी जपणारी व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात येत आहे, तिला मान द्या. पैसा जास्त खर्च करू नका. कन्या – रडका आणि रडविणारा असा आजचा दिवस आहे. आज मित्रांपासून सावध राहा. कोणतेही…

Read More

मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर विशेष प्रतिनिधी / मुंबई ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्य परीवहन महामंडळ म्हणजेच एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पहिलाच दिवस असून याचा एसटीच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. संपामुळे अंदाजे १४ ते १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच ४८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी…

Read More

महिलांना मानसिक व आर्थिक सक्षम करणारा महोत्सव मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर संगमनेर : भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये विकृत मानसिकता वाढली आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज महिला, चिमुकल्या सुरक्षित नाही. महिलांवरील अत्याचार वाढले असून बदलापूर घटनेनंतर पोलीस पीडीतेचा एफआयआरदेखील दाखल करून घेत नव्हते. दिल्लीत कुस्तीपटूंवर झालेल्या अन्यायाची कोणी दखल घेत नाहीत अशा परिस्थितीत भ्रष्टाचार देखील वाढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेला होता भ्रष्टाचाराच प्रतीक असल्याचा खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटल आहे. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर एकविरा फाउंडेशन आणि अमृत उद्योग समूहाच्या पुढाकारातून पंधरा हजार महिलांच्या उपस्थितीत आयोजित ‘इंदिरा महोत्सव’ शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या.…

Read More

ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत शुभारंभ मंगळवार, दि. ३ सप्टेंबर  मुंबई : ई गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचे माध्यम आहे. यामुळे पारदर्शकता येत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनावर विश्वास निर्माण होतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याची रक्कम अतिशय कमी वेळेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात केवळ ई गव्हर्नन्समुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा आयोजन मुंबई येथे मंगळवारी करण्यात आले होते. “विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण” अशी संकल्पना असलेल्या या दोन दिवसीय परिषदेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते…

Read More

मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर मुंबई / संगमनेर : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा मागण्या विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी मान्य कराव्या, असा इशारा देत एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूरसह राज्याच्या अनेक भागातील कर्मचारी संपात उतरल्याने आता ऐन गणेशोत्सवात लालपरीची चाके थांबलेली दिसत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी कामगारांच्या आर्थिक मुद्द्यांची सोडवणूक तातडीने व्हावी, यासाठी सोमवारी राज्यभर तीव्र निदर्शने करण्यात आली, तर मंगळवारपासून संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. सोमवारी दुपारी १.३० वाजता मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्यावतीने निदर्शने व द्वारसभा आयोजित करण्यात आली होती, त्याचवेळी सरकारला संपावर जाण्याचा…

Read More

मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संगमनेरमधील वकील शरीफ पठाण आणि त्यांच्या भावावर प्राणघातक हल्ल्याचा प्रकार घडला होता. हल्ल्याच्या घटनेपासून फरार असलेल्या आरोपींना संगमनेरच्या न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आता औरंगाबाद खंडपीठातही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आले आहे. ॲड. पठाण यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा ते मागे घेत नाहीत, या कारणावरून अशपाक इब्राहिम पटेल (रा. साकुर), सादिक रज्जाक शेख, आयाज रज्जाक शेख, आयान सादीक शेख, जुनेद सादीक शेख, कदीर नुरमोहम्मद उर्फ लतिफ शेख, इमरान बशीर शेख (सर्व रा. संगमनेर) यांनी वकील शरीफ शेख आणि त्यांच्या भावाला शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाजवळ कोयता, गज, दांडके, हॉकी स्टिकच्या…

Read More

मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना आता ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी (२ सप्टेंबर) यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. राज्य सरकराने जून महिन्यात राज्याचा सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात महिना १ हजार ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने १ जुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी…

Read More

आजचे राशीभविष्य मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर २०२४ मेष – जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला. आज कोणावरही विसंबून राहू नका. आळस करू नका. भाग्य तुमच्या पाठीशी आहे. वृषभ – आज अचानक धनलाभ संभवतो. शुभ दिवस परंतु अतिशय खर्चिक असा दिवस. आज शक्यतो प्रवास करू नका. मिथुन – संतती आज आपल्याला खुश ठेवेल. संध्याकाळ नंतर आर्थिक समस्या सुटतील. कर्क – आज घरी बसा, आराम करा. आनंदी दिवस. मध्यांनी मात्र मानसन्मानाची आणि होण्याची शक्यता. सिंह – प्रेमी युवकांसाठी आनंदाची बातमी. आजचा दिवस भाग्यशाली. आज जे मागाल ते मिळेल. कन्या – आईकडच्या नातलगाकडून, मामा कडून आर्थिक फायदा संभवतो. मान सन्मानात वाढ होईल. तुळ…

Read More

सोमवार, ०२ सप्टेंबर  वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्या विरोधात अहमदनगरमध्ये चितावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर येथे रविवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये भाजप आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. या मोर्चाच्या समारोपाच्या भाषणावेळी आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे विधान त्यांनी केले होते. यातून मुस्लिम समाजाच्या भावना देखील मोठ्या प्रमाणावर दुखावल्या गेल्या आहेत. नितेश राणेंनी मुस्लिम समुदाय विषय केलेले वक्तव्य त्यांना भोवले असून सामाजिक कार्यकर्ते आसिफ चांदसाहब शेख त्यांच्या तक्रारीवरून नगरच्या तोफखाना पोलीस…

Read More

गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या प्रकाराने पुण्यात खळबळ सोमवार, दि. २ सप्टेंबर पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली असून रात्री उशिरा खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान आंदेकर यांचा मृत्यू झाला. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या प्रकाराने पुण्यात खळबळ उडाली आहे. आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. आंदेकर यांच्यावर हल्ला का करण्यात आला याचा देखील तपास केला जात असून या प्रकरणी तीन ते चार संशयितांची नावे पोलिसांना समजली आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते.…

Read More

जाणून घ्या… आजचे राशीभविष्य सोमवार, दि. २ सप्टेंबर २०२४ मेष – आज भाग्येश शनी कर्म स्थानात असल्याने बऱ्याच दिवसानंतर अडकलेली कामे मार्गे लागतील. आर्थिक समस्या दूर होतील. जोडीदाराबरोबर सहलीचा आनंद घ्याल. वृषभ – व्ययेश मंगळ धनस्थानी असल्याने अचानक प्रवासाचे योग. अचानक खर्च वाढतील. ओळखीचा कोणालाही फायदा घेऊ देऊ नका. मिथुन – जन्मस्थानी असलेल्या मंगळामुळे आज तुमच्या स्वभावातील शांतता भंग पावेल. कर्क – अचानक धनलाभाचे योग येतील. आज जोडीदार तुम्हाला समजून घेईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक समस्या दूर होतील. सिंह – जन्मस्थानी असलेल्या सूर्य चंद्रामुळे नोकरीच्या ठिकाणी प्रकर्षाने आपला प्रभाव जाणवेल. अडकलेली कामे पूर्णत्वास न्याल. कन्या – आर्थिक फसवणूक होऊ…

Read More

निळवंडे धरण, कालवे नक्की कोणी केले हे जनतेला माहिती सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याची ५७ वी वार्षिक सभा उत्साहात  रविवार, दि. ०१ सप्टेंबर  संगमनेर – अनेक अडचणींवर मात करत आपण निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम केले, मात्र ज्यांचे कोणतेही योगदान नाही ते आता फोटो काढत आहे. मात्र वस्तुस्थिती तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला माहिती आहे. भेदभाव निर्माण करत चांगल्या वातावरणात काही लोक विष कालविण्याचा प्रयत्न करत असून सत्तेचा गैरवापर करत दहशत निर्माण करत आहे. मात्र अशाप्रकारे दहशत निर्माण करणाऱ्यांचा पुढील काळात बंदोबस्त करू, अशा शब्दात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विरोधकांना फटकारले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…

Read More

रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर – फॅब्रिकेशन व्यवसायासाठी भागीदार म्हणून घेतलेल्या बाप-लेकाची न वटणाऱ्या धनादेशाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेरच्या न्यायालयाने अमृतवाहिनी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राध्यापकाला दोन गुन्ह्यात प्रत्येकी सहा महिने कारावास आणि दहा लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर दोन खटल्यांचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. ईश्वर देविदास फापाळे (रा. घोडेकर मळा, संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. या संदर्भात सुरुवातीला मुरलीधर किसन काकडे यांनी संगमनेरच्या न्यायालयात सर्वज्ञ फॅब्रिकेशन व फर्निचर व्यावसायिक प्राध्यापक ईश्वर देविदास फापाळे यांच्या विरोधात प्रत्येकी दीड लाखाचे दोन आणि साडेतीन लाख रुपयांचे दोन धनादेश न वटल्याप्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स १३८ प्रमाणे ॲड. राजेश भुतडा यांच्यामार्फत…

Read More

रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर – कायद्याची पायमल्ली करत, राजरोसपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकत शनिवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सहा लाख रुपये किमतीचे तीन टन गोमांस आणि तीन लाखाची पिकअप जीप जप्त केली आहे. गेल्या काही दिवसातील पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जाते. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक जण फरार झाला आहे. सादिक मुनीर शहा (वय २५ वर्ष, रा. जमजम कॉलनी, संगमनेर) असे पोलिसांनी कारवाईदरम्यान पकडलेल्या आरोपीचे नाव असून कारवाई केलेल्या कत्तलखान्याचा चालक असलेला कमरअली गुलाम जिलानी सौदागर (रा.…

Read More

रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर तालुका दूध संघासह तालुक्यात गाव पातळीवरील संस्थांवर सौर ऊर्जा युनिट बसविले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येकी ५० लिटर दूध देणाऱ्या गाई निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत १२५० गाईंचा गट करून २५ डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांची आरोग्य तपासणी, निर्जंतुकीकरण, रक्त तपासणीसह गाय भरणीसाठी दूध संघाच्या माध्यमातून काम केले जाणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची (राजहंस दूध) वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार थोरात यांच्या उपस्थितीत आणि दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. यावेळी थोरात बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, डॉ.…

Read More