Author: अनंत पांगारकर
मंगळवार २६ नोव्हेंबर – मुंबई माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत जे घडलं ते शिवसेनेच्या बाबतीत घडू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरेपूर काळजी घेत आपल्या सर्व विजयी झालेल्या आमदारांना मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये ठेवले होते. या नवनिर्वाचित आमदारांना एका अटीवर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आपल्या मतदारसंघात परतू शकणार आहेत. आमदारांबाबत खबरदारी – विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या दष्टीने राजकीय घडामोडी सुरू आहेत. स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांबाबत विशेष खबरदारी घेतली आहे. ताज लँड या…
संगमनेर विधानसभा निवडणूक विश्लेषण – अनंत पांगारकर राज्यात काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या आणि दिग्गज नेते, हायकमांडशी थेट संपर्कात असलेले म्हणून देशभरात परिचित असलेल्या बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून धक्कादायक पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर टाकलेला अति आत्मविश्वास आणि लाभार्थी, चमचे, ठेकेदार, तरुणाईचा न आलेला अंदाज, लाडक्या बहिणीचा फॅक्टर, संगमनेरमध्ये निर्माण केलेले धार्मिक ध्रुवीकरण, चिट्ठी संस्कृती यांच्यामुळेच थोरात यांना पराभव स्वीकारावा लागला. मतदार संघातील लाभार्थ्यांचे घोटाळे, मतदार संघातील प्रश्न, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी निर्माण झालेली दहशत हे मुद्दे घेऊन प्रचारात उतरलेले आणि शिवसेनेकडून निवडून आलेले अमोल खताळ थोरात यांच्या पराभवासाठी केवळ निमित्तमात्र ठरले. परंपरागत विरोधी शिवसेना सोबत असूनही पराभव -…
विशेष प्रतिनिधी | मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा आता सुटल्यात जमा आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा आग्रह करणारे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि सिडकोचे चेअरमन संजय शिरसाठ यांनी आग्रह धरूनही भाजपने त्यांना धूप घातली नाही. अखेर मुख्यमंत्रीपदाची मागणी शिंदे गटाला म्यान करावी लागली आहे. हे पद भाजपकडे जाणार हे निश्चित आहे. मात्र ते कोणाच्या गळ्यात जाईल हे स्पष्ट झालं नसलं तरी त्या पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पहिली पसंती असल्याने फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं मानलं जातं. फडणवीस दिल्लीला – विधानसभा निवडणुकीतील दिग्विजयानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अंतर्गत बैठका सुरु आहेत. उपमुख्यमंत्री…
सोमवार २५ नोव्हेंबर – मुंबई गेल्या विधानसभेच्या तुलनेत या विधानसभेमध्ये महिला आमदारांची संख्या घटली आहे. एकीकडे सत्ताधारी महायुतीला लाडक्या बहिणींनी भरभरून पाठिंबा देताना स्पष्ट जनादेश दिला असताना दुसरीकडे मात्र सभागृहातील महिला आमदारांची संख्या कमी झाली आहे. विधिमंडळाच्या सभागृहात आता केवळ २१ महिला आमदार दिसणार असून यात सर्वाधिक १४ महिला आमदार भारतीय जनता पक्षाच्या आहे. केवळ अडीचशे महिला उमेदवार – निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असताना दुसरीकडे मात्र महिला उमेदवारांना नाकारल्याचे समोर येत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत २८८ जागांसाठी एकूण ४ हजार १३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी २५० च्या आसपास लाडक्या बहिणी उमेदवार होत्या.…
सोमवार २५ नोव्हेंबर राज्यात निवडणूक निकाल जाहीर झाल्या असून या निकालांमध्ये राज्यातील अनेक दिग्गजांना विशेषतः महाआघाडीतील प्रमुख नेत्यांना पराभवाचा धक्का पत्करावा लागला आहे. अशातच आता काँग्रेसवर सत्ताधारी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेत्यांवर निशाणा – माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या पराभूत झालेल्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. “ज्यांनी-ज्यांनी त्रास दिला ते सगळे साफ झाले. लातूरला एक पडला आणि दुसरा निसटता निसटता निघाला”, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी अमित देशमुख, धीरज देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यावर टीका केली. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशोक चव्हाण म्हणाले -…
सोमवार २५ नोव्हेंबर – कराड विधानसभा निवडणूक पार पडली असून आता महायुतीला सत्ता स्थापनेचे वेध लागले आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रोहित पवारांची भेट झाली. अजित दादांनी मिश्किल शब्दात पुतण्याला कोपरखळी मारली. दोघांमधील झालेल्या भेटीतील हा किस्सा आता चांगलाच चर्चेत आला आहे. आज दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी – यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेते कराडला पोहोचले आहे. यात शरद पवारांसह अजित पवारांचाही समावेश आहे. यावेळी त्यांची भेट अगदी काठावर दुसऱ्यांदा निवडून आलेल्या पुतण्या रोहित पवार यांच्याशी झाली. या भेटीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिश्किल शब्दांत पुतण्या रोहित पवार यांना टोला लगावला आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – कराड विधानसभेत आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. त्यामुळे विधिमंडळात फार मोठे लढाई होणार नसली तरी लोकांचे प्रश्न पत्रकार परिषद आणि बैठकांच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. राज्यात महायुती सरकारला स्पष्ट जनादेश मिळाला – तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते पद मिळेल एवढी आमदार संख्या देखील महाविकास आघाडीतील एकही पक्षाला मिळालेली नाही. विरोधी पक्षनेते पदासाठी सभागृहाच्या एकूण संख्याबळाच्या एक दशांश सदस्य असणे आवश्यक असते. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी २९ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक असून ते कोणत्याच पक्षाकडे नाही. महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २०, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद…
रविवार, २४ नोव्हेंबर – संगमनेर शनिवारी संगमनेर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी १०५६० मतांनी पराभव केला. मतदार संघातील सर्वच गावांमध्ये खताळ यांना थोरात यांच्यापेक्षा निर्णायक आघाडी मिळाली. टपाली मतदानामध्ये खताळ यांना ८९१ तर थोरात यांना २१८३ मते मिळाली. या निवडणुकीत अमोल खताळ यांना १,१२,३८६ तर थोरात यांना १,०१,८२६ मते मिळाली. थोरात आणि खताळ यांना मतदान केंद्र आणि गाव निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे… इमेज झूम करून बघा..
रविवार, २३ नोव्हेंबर लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाची परिणती आपसातील हाय व्होल्टेज लढतींवर झाली होती. काही मतदारसंघात कौटुंबिक लढती रंगल्या होत्या. बारामतीमध्ये थेट सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत रंगली होते. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना पुतण्या युगेंद्र पवार यांच्याशी सामना करावा लागला. राज्यात विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आल्यानंतर प्रत्येक जण आपापल्यापरीने कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार जिंकला, किती मितं मिळाली, कोणता उमेदवार पडला, बलाढ्य उमेदवारांचं काय झालं, कौटुंबिक लढतींचं काय झालं, हाय व्होल्टेज लढतींचं काय झालं? या मागची कारण शोधत त्यावर विश्लेषण करत आहे. मात्र अशाच एका लढतीची उत्सुकता अजित पवार यांच्या विधानामुळे…
रविवार, २४ नोव्हेंबर राज्यातील जनतेचा स्पष्ट कौल मिळाल्यानंतर महायुतीने सरकार स्थापन करण्याचा हालचाली सुरू केल्या आहे. राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून २६ नोव्हेंबर पूर्वी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा येत्या काही तासात होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागते याच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहे. सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पाऊले टाकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर पार पडली आहे. या बैठकीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी…
