Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामात यश मिळेल आणि नवीन संधी चालून येतील. आर्थिक बाबींमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर सहज मात कराल. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतो. तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा. मिथुन: आज तुम्ही उत्साही आणि आनंदी राहाल. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे जाईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. कर्क: आज तुम्हाला भावनिकदृष्ट्या थोडे अस्थिर वाटू शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुम्हाला मिळेल, ज्यामुळे दिलासा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: शहरातील प्रवरा नदीच्या पात्रात मंगळवारी रात्रीच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी गेलेले विजय संभाजी कुटे (वय अंदाजे ४०) हा तोल जाऊन वाहत्या पाण्यात पडल्याने बेपत्ता झाला आहे. या घटनेमुळे संगमनेर शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिक आणि प्रशासन कसून प्रयत्न करत आहेत. दरम्यान अद्यापही शोध कार्य सुरू असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिली आहे. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या दरम्यान प्रवरा नदीवरील छोट्या पुलावर घडली. मूळचे रंगार गल्ली, संगमनेर येथील रहिवासी असलेले विजय कुटे हे आपल्या स्कुटी गाडीवरून कचरा टाकण्यासाठी आले असल्याची माहिती चर्चेत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहर आणि तालुक्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या प्रभा निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. आमदार तांबे म्हणाले की, गणपती बाप्पाचं आगमन हे आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येतं. गणेशोत्सव आपल्याला नवीन कामांची सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. संगमनेरकर नागरिक हे दहा दिवस मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. विविध गणेश मंडळांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी शहरात गर्दी होते, तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी नागरिक उत्साही असतात. यावेळी बोलताना त्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी गणेशोत्सवानिमित्त राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक सुखी, समाधानी व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे. तसेच, मराठा आरक्षणाचे आंदोलन यशस्वी होऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. थोरात यांनी आपल्या ‘सुदर्शन निवासस्थानी’ सपत्नीक गणेशाची स्थापना केली, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत कन्या डॉ. जयश्री थोरात आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. हसमुख जैन उपस्थित होते. यावर्षी काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी काही ठिकाणी पाऊस कमी आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडून शेतकरी सुखी आणि समाधानी व्हावा, अशी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन शिर्डी: शिर्डी शहर आणि परिसरातील धार्मिक वातावरणात अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत, साई मंदिर परिसरातून अनैतिक व्यवसाय चालवणाऱ्या ४ हॉटेल्सवर छापा टाकून ती सील करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस उपनिरीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. यापूर्वी पिटा कायद्यान्वये कारवाई झालेले हॉटेल सील करण्यासाठी प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता या प्रस्तावाला मान्यता मिळताच ही कारवाई करण्यात आली.  या पथकाने शिर्डी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत सांस्कृतिक मंडळाच्यावतीने यंदा गणेशोत्सव काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी महसूल आणि शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये चित्रपट अभिनेते, अभिनेत्री आणि प्रसिद्ध कलावंत सहभागी होणार आहेत. अमृतेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत ५६ व्या वर्षीच्या गणेशोत्सवाचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आणि कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली. यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा एक मोठा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघत आहे. बुधवारी, (२७ ऑगस्ट) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून सुरू होणारा हा मोर्चा अहिल्यानगर जिल्ह्यातून पुढे जाणार असल्याने, जिल्हा प्रशासनाने येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शेवगावपासून पारनेरपर्यंतच्या रस्त्यांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या मोर्चादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहेत. हा मोर्चा अहमदनगर जिल्ह्यात कर्‍हेटाकळी (ता. शेवगाव) येथे प्रवेश करेल आणि त्यानंतर घोटण, तळणी, शेवगाव शहर, ढोरजळगाव, मिरी, माका, जेऊर, दुधडेअरी चौक,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतो. तुम्ही तुमच्या कामात लक्ष केंद्रित कराल आणि अपेक्षित यश मिळवाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन आनंदी राहील. वृषभ (Taurus): आज तुम्हाला कामात काही आव्हाने येऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या संयमाने त्यावर मात कराल. कोणत्याही कामात घाई करणे टाळा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मिथुन (Gemini): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक आहे. तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधाल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. तुमच्या बोलण्याने इतरांवर चांगला प्रभाव पडेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कर्क (Cancer): आज तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर, दि. २६ – अव्यावसायिक कार, जीप व व्हॅन वाहनांसाठी १५ ऑगस्ट २०२५ पासून वार्षिक टोल (फास्टॅग) पास सेवा सुरु झाली आहे. हा पास राजमार्ग मोबाईल ॲप किंवा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळवता येईल, असे पुणे येथील प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी कळविले. वार्षिक टोल पासची किंमत ३ हजार रुपये असून त्याची वैधता एक वर्ष किंवा २०० एकेरी फेऱ्या, यापैकी जे आधी पूर्ण होईल तेवढीच राहील. हा पास केवळ राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती महामार्गांवरील टोल प्लाझांसाठी वैध असेल. अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरगाव पावसा टोल प्लाझावरही तो लागू राहील. अधिक माहितीसाठी १०३३ या हेल्पलाइन क्रमांकावर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  मुंबई, विशेष प्रतिनिधी: मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले आणि मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. जरांगे यांनी येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली होती, परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर आज मंगळवारी (२६ ऑगस्ट) सुनावणी झाली, यानंतर न्यायालयाने जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. विशेष म्हणजे, गणेशोत्सवामुळे मुंबईतील वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, जरांगे यांना…

Read More