Author: Annant Ppangarkar

शनिवार, १० ऑगस्ट  शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहर पोलिसांनी शहरातील दोन ठिकाणी तीन गॅस रिपेरिंग सेंटरवर छापे टाकले. या दोन्ही ठिकाणाहून भारत गॅस, एचपी गॅस, इंडेन गॅसच्या घरगुती वापराच्या टाक्यांसह, एक मारुती ओमनी कार, रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे सुमारे पंधरा लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. शहरातील अलकानगर परिसरात हावडा ब्रिजच्या पाठीमागे एका लोखंडी टपरीमध्ये व जोर्वे नाका या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. पहिल्या कारवाईत मोहसीन रफिक शेख, वय ३५ वर्ष, इम्रान रऊफ शेख वय ३८ वर्ष, व इम्तियाज रफिक शेख (तिघे रा. अलकानगर, संगमनेर) या तिघांवर तर दुसऱ्या कारवाईत सोहेल शकील शेख वय ३४ वर्ष, रा.…

Read More

शनिवार, १० ऑगस्ट  अहमदनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांची शुक्रवारी सायंकाळपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील तब्बल सात लाख आठ हजार महिलांचे अर्ज आले असून त्यापैकी २५ हजार महिलांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे या संकेत मोठ्या संख्येने वाढ होण्याची चिन्हे आहेत. दाखल झालेल्या अर्जांपैकी जवळपास दाखल झालेल्या अर्जांपैकी जवळपास २५ हजार अर्ज अपात्र ठरविण्यात आले असून या सर्वांना योजनेचा फायदा घेण्यासाठी नव्याने अर्ज भरावे लागणार आहे. त्यानंतर या अर्जांची पुर्नपडताळणी केली जाणार आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांची संख्या…

Read More

शनिवार, १० ऑगस्ट मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे सोमवारी नगर शहरात शांतता रॅली काढणार असल्याने या रॅलीच्या पार्श्वभूमीवर नगर शहर व उपनगरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून तसे परिपत्रक सर्व शाळांना पाठविण्यात आले आहे. जरांगे यांच्या शांतता रॅली वेळी होणाऱ्या गर्दीचा विचार करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे परिपत्रक प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी संयुक्तपणे नगर शहर व उपनगरातील शाळांना पाठविले. जरांगे सोमवारी पुण्याहून नगर मध्ये येत आहे. यावेळी केडगाव उपनगरात त्यांचे स्वागत करण्यात येणार असून तेथून माळीवाडा, बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला…

Read More

शनिवार, १० ऑगस्ट  मुंबईतील दोघा व्यावसायिकांनी अहमदनगरमधील एका व्यावसायिकाची ७५ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीतून पाठविलेल्या प्लायवूड आणि पार्टिकल बोर्डच्या मालाचे पैसे न देता ही फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात नगरमधील व्यावसायिक सुरेंद्र मोतीलाल लोढा (रा. माणिकनगर, आनंदऋषी हॉस्पिटल मागे, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरीकिसन भट्टड आणि ब्रिजेश भट्टड (पूर्ण नाव माहित नाही दोघे रा. १०४, बालाजी भवन, नरिमन पॉईंट, मुंबई) अशी फसवणूक करणाऱ्या आणि गुन्हा दाखल झालेल्या मुंबईतील व्यावसायिकांची नावे आहे. लोढा यांचे एस. मोतीलाल इंडस्ट्रीज नावाची कंपनी…

Read More

शनिवार, १० ऑगस्ट  लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण शरद पवार यांच्यावर काही बोलू नये, अशी विनंती पुण्यात केली होती, पण मोदींनी प्रचार सभेत शरद पवारांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका महायुतीला बसला असल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांच्या येवला येथील कार्यालयात महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील जागा कमी का झाल्या याबाबत चर्चा करताना अजित पवार यांनी उपस्थित त्यांना निवडणुकीवेळी घडलेला हा किस्सा सांगितला. बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातील पराभवाबाबत चर्चा झाली. एका विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातून महायुतीच्या…

Read More

शुक्रवार, ०९ ऑगस्ट विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे दौरे सुरू झाले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही मराठवाडा दौरा सुरू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात झाली. मात्र, या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं विधान राज ठाकरेंनी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. राज ठाकरेंविरुद्ध घोषणाबाजीही करण्यात आली होती. त्यानंतर, राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये संवादही झाल्याचं पाहायला मिळालं. आता, हिंगोलीतून राज ठाकरेंचा दौरा बीड जिल्ह्यात पोहोचला असता, शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे…

Read More

शुक्रवार, ०९ ऑगस्ट संगमनेर – जिल्ह्याचे पालकमंत्री तथा विद्यमान महसूल मंत्री यांनी संगमनेरमध्ये महसूल सप्ताहानिमित्त विविध दाखल्यांच्या वितरणाचा कार्यक्रम ठेवला. मात्र या कार्यक्रमात लाभार्थी आणि नागरिकांनी मोठी उदासीनता दाखवली, कार्यक्रमाला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थिती बंधनकारक करून कार्यक्रम करणे चुकीचे असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे याबाबत पत्रकाद्वारे दिवटे यांनी म्हटले आहे की, सरकारच्या योजना ह्या सर्वसामान्य जनतेच्या असतात. सरकार हे कोणत्याही एका व्यक्तीचे नसते. मात्र अहमदनगर जिल्ह्यात संपूर्णपणे चुकीचे चित्र निर्माण केले जात आहे. पालकमंत्र्याच्या नावाखाली भाजपचे काही कार्यकर्ते संगमनेरमध्ये दमदाटी करत आहेत. अशा वर्तनामुळे महसूलमंत्र्यांच्या कार्यक्रमाला लाभार्थी व नागरिकांनी मोठी उदासीनता दाखवली असल्याचे म्हटले आहे. काही…

Read More

शुक्रवार, ९ ऑगस्ट  चार दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील झोळे गावात झालेल्या वृद्धाच्या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. भूषण कांताराम वाळे (वय २३, रा. झोळे, ता. संगमनेर) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याला गुरुवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. दरम्यान याप्रकरणी झारखंड कनेक्शन समोर आले आहे. ५ ऑगस्टला सकाळी झोळे गावातील साहेबराव उनवणे (वय ७७ वर्ष) यांची झोपेत अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याने त्यांचा मृतदेह पहाटेच्या वेळी आढळून आला होता. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक देविदास…

Read More

शुक्रवार, ०९ ऑगस्ट मुंबई : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ असे म्हणत संत तुकारामांनी वृक्षवल्लींचे महत्त्व साऱ्या जगाला कित्येक वर्षापूर्वी कथन केले होते. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेत झाडांची लागवड करणे काळाची गरज आहे, मात्र काही जण विनापरवाना वृक्षतोड करतात. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून बदलत्या हवामानाला प्रचंड होणारी वृक्षतोडही कारणीभूत आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यास आता ५० हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि राज्यातील हरित आच्छादन वाढविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहेत. अवैध वृक्षतोडीवर निर्बंध आणण्यासाठी वृक्षतोड अधिनियम १९६४’ अन्वये १ हजार…

Read More

शुक्रवार, ०९ ऑगस्ट  अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संपूर्ण अहमदनगर जिल्हा सेनेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७(१) व ३७(३) नुसार १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे किंवा जमा करणे. कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा…

Read More

शुक्रवार, ०९ ऑगस्ट  दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात आरोप पत्र दाखल झाल्यानंतर पहिल्याच तारखेला आरोपी भाऊसाहेब कुटेने न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करतानाच माझ्याविरुद्ध सक्षम पुरावा नसल्याने मला आरोपातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. या दोन्ही अर्जांवर न्यायालयाने सरकारी वकिलांचे म्हणणे मागविले आहे. दरम्यान गुरुवारी (८ ऑगस्ट) न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाऊसाहेब गुंजाळ व भाऊसाहेब कुटे या दोघांसह लहानु गणपत कुटे, उत्तम शंकर लांडगे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते व अमोल प्रकाश क्षीरसागर हे आरोपी न्यायालयात उपस्थित होते. भाऊसाहेब कुटेच्यावतीने न्यायालयात ॲड. राहुल जामदार यांनी वकीलपत्र दाखल केले असून आरोपीला नियमित जामीन मिळावा तसेच फौजदारी…

Read More

गुरुवार, ०८ ऑगस्ट  संगमनेरमधील एचडीएफसी बँकेतून काढलेले दोन लाख रुपये अल्टो कारमधून लंपास करण्याची घटना घडवून आठ दिवसांचा कालावधी उलटला असून संगमनेर पोलिसांना अद्यापही चोरट्यांचा शोध लावण्यात अपयश आले आहे. शहरातील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांचे गुन्हेगारांवरील नियंत्रण संपले असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अवैध धंद्यांना उधाण आले असून दागिने दुचाकी आणि रोकड रकमेच्या चोऱ्या देखील वाढल्या आहेत. पोलिसांना गुन्ह्यांचा छडा लावण्यात अपयश येत आहे. दुचाकी चोर, धूम स्टाईल दागिने पळविणारे आणि रोकड लंपास करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध लागत नसल्याने गुन्हेगारांचे फावले आहे. २ ऑगस्ट रोजी वरवंडी येथील प्रवीण सोन्याबापु वर्पे हे आपला मित्र प्रमोद भाऊसाहेब शिंदे याच्यासोबत संगमनेर…

Read More

गुरुवार, ०८ ऑगस्ट  पुण्य कर्म करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमारने राम मंदिरासाठी तब्बल तीन कोटी रुपयांची देणगी दिली होती. आता अक्षय कुमारने मुंबईतील हाजी अली दर्ग्यात दर्शनासाठी गेल्यानंतर दर्ग्याच्या नूतनीकरणासाठी करोडोंची दिलेली देणगी चर्चेत आली आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या ‘खेल खेल में’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अक्षय कुमारने हाजी अली दर्ग्यात दर्शन घेतले. यावेळी अक्षयने दर्ग्याच्या नूतनीकरणासाठी १.२१ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्याचे दर्ग्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या हाजी अली दर्ग्यात नूतनीकरणाचे काम सुरू आहे. अक्षय कुमारने दिलेल्या देणगीनंतर दर्गा ट्रस्ट टीम आनंदी आहे.…

Read More

गुरुवार, ०८ ऑगस्ट अकोले तालुक्यातील एका खून खटल्यात संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने आरोपीला निर्दोष मुक्त करताना गंभीर दुखापत करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तीन वर्ष कारावास आणि १००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दोन पैकी एका आरोपीचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला तर दुसऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरविले. नामदेव रामा सारोक्ते व नामदेव इंद्रभान सारोक्ते (रा. सोमलवाडी, ता. अकोले) यांनी केलेल्या मारहाणीत बुळेवाडी, (ता. अकोले) येथील ५५ वर्षीय प्रभाकर रामभाऊ गंभीरे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राजुर (अकोले) पोलीस ठाण्यात मृत प्रभाकर गंभीरे यांची सासू यमुनाबाई तुळशीराम सारोक्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपीं विरोधात खून केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक…

Read More

विशेष विमानांद्वारे बाधीत देशवासियांना आणणार परत मदतीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याची परराष्ट्र मंत्र्यांची माहिती गुरुवार, ०८ ऑगस्ट बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते ईत्यादींना मदत करणे आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची तसेच अभियंते आदी बाधित लोकांची त्यांच्या लोकेशनसह माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्यांना तातडीने मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. परराष्ट्रमंत्री एस.…

Read More

बुधवार, ०७ ऑगस्ट  वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या एका विद्यार्थिनीवर देवदुताची उपाधी मिळालेल्या डॉक्टरनेच तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर व रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुर तालुक्यातील घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलींच्या वसतीगृहावर असतांना ताप तसेच हातपाय दुखत असल्याने रेक्टर व मैत्रीण अशा आम्ही तिघी डॉ. कुटे हॉस्पीटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी गेलो. तेथे असलेल्या कर्मचारी महिलेने तरुणीला ओपीडीत नेले. तेथे डॉ. रवींद्र कुटे आले. त्यांनी विचारपूस केली व झोपण्यास सांगीतले. तपासणी करत असताना डॉ. कुटे…

Read More

बुधवार, ०७ ऑगस्ट  चार मजली इमारतीचे दोन मजले अवैध असल्याने त्यावर निष्काशनाची कारवाई न करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या व त्यापोटी ७५ लाखाचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्देशित अधिकाऱ्यासह आणखी दोन खासगी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार अशोक तारी, (निर्देशित अधिकारी, के पूर्व विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, अंधेरी पूर्व मुंबई), मोहम्मद शहजादा मोहम्मद यासिन शहा (प्रॉपर्टी इस्टेट एजंट) आणि प्रतीक विजय पिसे (कंत्राटदार) असे गुन्हा दाखल झालेल्या तिघा आरोपींची नावे आहे. मंगळवारी (६ ऑगस्ट) ही कारवाई करण्यात आली असून या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ७ आणि ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Read More

बुधवार, ०७ ऑगस्ट भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी अंतिम सामन्यात भाग घेण्यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेश ५० किलो वजनी गटातील अंतिम स्पर्धेतून बाहेर पडली आहे. त्यामुळे विनेशला यापुढे ऑलिम्पिकमध्ये कोणतेही पदक जिंकता येणार नाही. असे म्हटले जात आहे की सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी विनेश फोगटचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा १०० ग्रॅम जास्त होते. मंगळवारी विनेशने प्री-क्वार्टर फायनलमध्ये जगातील नंबर वन खेळाडूचा आणि सेमीफायनलमध्ये क्युबाच्या खेळाडूचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमधील ५० किलो वजनी गटात विनेश फोगटचे किमान रौप्य पदक निश्चित झाले. पॅरिसमध्ये उपस्थित असलेल्या पीटीआय या वृत्तसंस्थेचे वार्ताहर अमनप्रीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनेशचे वजन जास्त…

Read More

बुधवार, ०७ ऑगस्ट  सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील १६ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस अधीक्षक, उपयुक्त श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या समावेश असून छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई या शहरातील अधिकाऱ्यांच्या प्रामुख्याने बदल्या करण्यात आल्या आहे. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे कंसात बदलीचे ठिकाण… ★ संदीप पालवे – पोलीस अधीक्षक दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजी नगर (पोलीस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड) ★ संदीप भाजीभाकरे – पोलीस उपायुक्त लोहमार्ग मुंबई (उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग नागपूर) ★ विवेक विठ्ठल मासाळ – समादेशक, राज्य राखीव पोलीस दल, गट क्रमांक १३, गडचिरोली…

Read More

मंगळवार, ०६ ऑगस्ट राहाता – सलग दुसर्‍या हंगामासाठी जिल्हा सहकारी बँकेने राजकिय दबावापोटी श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचे कर्ज नाकारले, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सभासद व शेतकर्‍यांच्यावतीने जिल्हा बँकेच्या राहाता शाखेवर येत्या सोमवारी (१२ ऑगस्ट) सकाळी १० वाजता भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक अ‍ॅड. नारायणराव कार्ले पाटील यांनी दिली. या आंदोलना बाबतचे निवेदन सर्व संबंधितांना पाठविल्याचे सांगत अ‍ॅड. कार्ले म्हणाले, श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याला मागील हंगामात जिल्हा सहकारी बँकेने ४० कोटी रुपये कर्ज मंजुर केले होते. तसे पत्रही जिल्हा बँकेने कारखान्याला दिले होते. परंतु मंजुर केलेले कर्ज राजकिय सुडबुध्दीने बँकेने नाकारले.…

Read More