Author: Annant Ppangarkar

शुक्रवार, २८ जून  राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील चवरसांगवी (श्रीगोंदा) येथे वाळू तस्करांकडून महसूलच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर जिल्ह्यातील महसूलचे कर्मचारी आंदोलनात उतरले आहे. यामुळे जिल्ह्यात महसूलचे कामकाज बंद पडले असून कामानिमित्त आलेल्या जनतेचे हाल सुरू आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या मुंबईत अधिवेशनात व्यस्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असून जिल्ह्यातील महसूल यंत्रणेचे कामकाज बंद पडले असल्याचे दिसते. संगमनेर मध्ये देखील कामानिमित्त आलेले नागरिक तहसील कार्यालयात ताटकळताना दिसत होते. किरकोळ ॲफिडेव्हिटसारखी कामे मार्गे लावण्यासाठी देखील कोणताही अधिकारी दुपारी बारा वाजेपर्यंत तहसील कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हाल झाले. दरम्यान…

Read More

दोघा लाचखोरांच्या शोधासाठी पथके रवाना लाचखोर जावळेच्या आयुक्तपदी नेमणुकीची शिफारस केली होती या आमदाराने तर या तत्कालीन मंत्र्याने केली होती नियुक्ती शुक्रवार, २८ जून  तब्बल आठ लाखाची लाच मागणाऱ्या अहमदनगर आयुक्त डॉ. पंकज जावळे आणि त्यांचा स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्यावर लाच मागणीचा गुन्हा नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघेही लाचखोर अधिकारी फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. तर देशपांडे यांच्या घरी घेतलेल्या घरझडतीत लाच लुचपतच्या पथकाला घबाड हाती लागल आहे. डॉ. जावळे आणि देशपांडे यांच्या मागावर लाच लुचपतची तीन पथके विविध ठिकाणी कार्यरत झाली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांचे मोबाईल नॉट रिचेबल येत…

Read More

गुरुवार, २७ जून  अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तांनी बांधकाम परवानगीसाठी नऊ लाख तीस हजाराची लाच मागितल्याचे समोर आले आहे. एसीबीच्या कारवाईनंतर अहमदनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यकावर नगरमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान महापालिकेतील जावळे यांचे कार्यालय एसीबीने सील केले आहे. जालना एसीबीने ही कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांच्या भागीदारांसह 4k रियाल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे नालेगाव येथे २२६०.२२ चौरस मीटर प्लॉट खरेदी केला आहे. सदरच्या प्लॉटवर तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांना बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेकडे १८ मार्च २०२४…

Read More

आरोपींच्या २४० कोटीच्या व्यवहारामुळे महाराजांच्या फंडिंगचे नेमके कनेक्शन काय?  या आर्थिक व्यवहाराचे कॅनडा, युएसए, हवालासारखे कनेक्शन तर नाही ना? गुरुवार, २७ जून दूधगंगा पतसंस्थेत तब्बल ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप असलेल्या आरोपींनी सभासद नसलेल्या चेतन नागराज कपाटे उर्फ सुदर्शन महाराजच्या श्रीकृष्ण आश्रम ट्रस्टला करोडो रुपये देणगीच्या रूपाने मिळवून देण्याचा घाट घातला होता. या अनुषंगाने आरोपी आणि महाराजांमध्ये आर्थिक व्यवहार देखील झाल्याचे बोलले जाते. नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचा त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. बडी राजकीय आसामी असलेल्या भाऊसाहेब कुटेसह दूधगंगा नागरी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्यातील छत्रपती संभाजीनगर येथील चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज एक प्रमुख आरोपी आहे.…

Read More

गुरुवार, २७ जून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारी (२७ जून) मुंबईमध्ये प्रारंभ झाला. १२ जुलै पर्यंत अधिवेशन चालणार आहे. अधिवेशना दरम्यान उद्या शुक्रवारी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन्ही सभागृहात मांडला जाणार आहे. गुरुवारी विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा कामकाज चालविण्यासाठी तालिका अध्यक्ष म्हणून पाच जणांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. यात भारतीय जनता पक्षाकडून दोघांची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकाची, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एकाची व काँग्रेसकडून एका आमदाराची निवड यासाठी करण्यात आली आहे. यात अजित पवार गटाकडून नगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचा समावेश आहे. असे आहेत तालिका अध्यक्ष … कालिदास कोळंबकर…

Read More

गुरुवार, २७ जून भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. रात्री १०.३० वाजता त्यांना एम्समध्ये आणण्यात आले. त्यांना एम्सच्या जुन्या खासगी वॉर्डात ठेवण्यात आले असून त्यांना यूरोलॉजीशी संबंधित समस्या असल्याने युरोलॉजीचे अमलेश सेठ त्यांच्यावर उपचार करत आहेत. एम्सने आपल्या जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. लालकृष्ण अडवाणी यांना यावर्षी भारत सरकारने भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला आहे. ते देशाचे उपपंतप्रधानही राहिले आहेत. अडवाणी १९४२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते सामील झाले. स्वातंत्र्यानंतर महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून अडवाणींनी…

Read More

बुधवार, २६ जून  स्कूलबसच्या धडकेत दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी नाशिक शहरातील सिडको परिसरात त्रिमूर्ती चौकात घडली. मयूर दत्ता गुंजाळ (वय १८ वर्ष) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अंबड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयुर दत्ता गुंजाळ हा त्याच्याकडील इलेक्ट्रिक दुचाकीवरून त्रिमुर्ती चौकाकडुन सिटीसेंटर मॉलकडे जात असतांना गोलीवडाजवळ एका स्कूल बसने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत मयूरला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सदर अपघाताची माहिती तात्काळ अंबड पोलीसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघात स्थळाची पाहणी केली. यानंतर याप्रकरणी…

Read More

बुधवार, २६ जून शेतकऱ्यांचे फसवणूक टाळण्यासाठी भरारी पथकाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात कृषी केंद्रांची तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान त्रुटी आढळून आलेल्या ३५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषी विभाग ॲक्शन मोडवर आल्याचे बोलले जाते. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या दृष्टीने पेरणीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग सतर्क झाला आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कृषी सेवा केंद्रांवर नजर ठेवली जात असून या सेवा केंद्रांची तपासणी केली जात आहे. बाजारपेठेत कपाशी, सोयाबीनसह कडधान्य पिकांच्या बियाणांना मोठी मागणी आहे.…

Read More

बुधवार 25 जून  नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान होत आहे. या मतदारसंघात नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे. या मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानात सुरुवात झाली असून नऊ वाजेपर्यंत ची पहिल्या दोन तासाची टक्केवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. बघा कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाले…

Read More

बुधवार, २६ जून  प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यकाचे बिल स्वाक्षरी करून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी दहा टक्के प्रमाणे लाच मागणाऱ्या मेडिकल ऑफिसर विरुद्ध लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. डॉ. अंबर श्रीराम मडावी (वय ४४ वर्ष) असे लाचखोर मेडिकल ऑफिसरचे नाव असून त्याची नेमणूक वैद्यकीय अधिकारी म्हणून बाराभाटीच्या आयुर्वेदिक दवाखान्यात आहे. याशिवाय त्याच्याकडे महागाव तालुका अर्जुनी मोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त कार्यभार आहे. तक्रारदार हे प्राथमीक आरोग्य केंद्र महागाव येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असून त्यांच्या वेतन निश्चिती, नक्षलभत्ता, प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकीच्या फरकाचे ६ लाख ७ हजार ३२० रुपये…

Read More

बुधवार, २६ जून पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत. पुणे शहरात अमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निर्देश दिले. पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

Read More

मंगळवार, २५ जून  शेतकरी, नागरिकांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावे. खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिले. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत राज्यातील खरीपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, पणन मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाच्या प्रधान…

Read More

मंगळवार, २५ जून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून २७ जून मुंबईत सुरू होत असून अधिवेशन १२ जुलैपर्यंत चालणार आहे. यादरम्यान राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्पदेखील अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (२८ जून) दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे…

Read More

दूधगंगा पतसंस्था आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे सिव्हिल रुग्णालयात करतोय आराम! ठेवीदार आक्रमक, चौकशीची मागणी मंगळवार, २५ जून  दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या सुमारे ८१ कोटीहून अधिक रुपयांच्या ठेवीला चुना लावत आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी, राजकीय आसामी असलेला भाऊसाहेब कुटे वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात आराम करत असल्याचे समोर आले आहे. आरोपीला तुरुंगातून दूर ठेवण्यासाठी संगमनेरातील त्या बहुचर्चित डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून कुटेच्या पाहुणचारासाठी तालुकास्तरावरील वैद्यकीय यंत्रणेपाठोपाठ आता जिल्हास्तरावरील यंत्रणा सरसावली असल्याचा आरोप होत आहे. दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण आरोपी बडी राजकीय असामी असल्याने सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तब्बल नऊ महिने मुख्य आरोपीला न्यायालयाने…

Read More

मंगळवार, २५ जून जिल्ह्यातील पोलीस आणि पोलिसांच्या विविध पथकांच्या हप्तेखोरीला कंटाळून संगमनेरातील मटका धंदा बंद करण्याची राळ उठवणाऱ्या मटका किंग मंडळींकडून शहरात मटका जोमात सुरु ठेवण्यात आला आहे. नगर एलसीबीने शनिवारी शहरातील दिल्ली नाका या ठिकाणी कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकत एकाला पकडल्याने शहरातील मटका काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी सुरूच असल्याचे समोर आले आहे. बशीर इसाक शेख, (वय ३० वर्षे, रा. मोमीनपुरा, संगमनेर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस चौकशीत त्याने मटका मालक आपणच असल्याची कबुली पोलिसांना दिली असली तरी मूळ मालक मात्र कारवाईतून बचावले असल्याचे बोलले जाते. दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाच्या पाठामागे बोळीमध्ये…

Read More

मंगळवार, २५ जून  लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राज्य सरकार मोर्चेबांधणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात गरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबवण्याच्या हालचाली सुरू आहेत. याअंतर्गत गरीब महिलांना दरमहा १२०० ते १५०० रुपये दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक १५ ते २० हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ ही योजना आणली. त्या निवडणुकीत सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपने राज्यात पुन्हा बहुमत मिळविले. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मध्यप्रदेशने २९ पैकी २९…

Read More

मंगळवार, २५ जून  नगरजवळ पाथर्डी परिसरात ओडिशा राज्यातून आणण्यात आलेला दोन कोटी रुपयांचा गांजा पकडण्यात व गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात अमली पदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) यश आले आहे. ओडिसा राज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गांजाची तस्करी होत असल्याची माहिती ‘एनसीबी’ला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर ‘एनसीबी’ने तस्करांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. माहितीच्या आधारे एनसीबी आरोपींचा शोध घेत होती. पण आरोपी लपण्याचे ठिकाण, मार्ग, मोबाईल क्रमांक वारंवार बदलत होते. त्यांची कार्यपद्धती लक्षात घेऊन त्यांच्यावर पाळत ठेवून एनसीबीने आरोपींबाबत मोठ्या प्रमाणात माहिती गोळा केली. त्या माहितीच्या आधारे नगर येथील पाथर्डीजवळ सापळा रचण्यात आला होता. या कारवाईत १११ किलो गांजा जप्त करण्यात…

Read More

सोमवार, २४ जून नगर अर्बन बँकेच्या २९१ कोटीच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे नगर मधील प्रतिष्ठित डॉक्टर निलेश शेळके याला सोमवारी दुपारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. उद्या मंगळवारी शेळके याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली आहे. नगर अर्बन बँकेच्या कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत संचालक, बँकेचे अधिकारी, कर्जदार यांना अटक करण्यात आली आहे. यातच कर्ज फसवणूक केल्या प्रकरणी प्रतिष्ठित डॉक्टर शेळके याला सोमवारी अटक करण्यात आली. बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी माझी संचालक राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, अच्युत पिंगळे आदींनी या संदर्भात सातत्याने आवाज उठवत पाठपुरावा केला आहे. राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून…

Read More

सोमवार, २४ जून  अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातून अज्ञात महिलेने ११ महिन्याच्या अपहरण झालेल्या चिमुकल्याची संगमनेर पोलिसांच्या मदतीने रविवारी रात्री सुटका करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला पुढील चौकशीसाठी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अपहरण झालेल्या बालकाला संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी येथून ताब्यात घेत त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले. अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातील एका महिलेने स्वानंद आकाश खडसे या ११ महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण केले होते. या संदर्भात नगर रेल्वे पोलिसांकडे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरचे अपहरण झालेले बालक संगमनेरमध्ये असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. नगर रेल्वे पोलीसचे उपनिरीक्षक एस. जी. लोणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संगमनेर शहर…

Read More

सोमवार, २४ जून १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरवात झाली असून खासदारांना शपथ दिली जात आहे. बघा लोकसभा अधिवेशनाचे लाईव्ह (live) कामकाज.. https://www.youtube.com/live/aQZwbc7cHww?si=Nha-iRFq19_FL2Zm https://www.youtube.com/live/YAcRXrrEFZQ?si=v1yDk9KKfrDNj0Kw

Read More