Author: अनंत पांगारकर

अहिल्यानगर –  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे धनगरी काठी, घोंगडी, अहिल्यादेवींची मूर्ती आणि पुस्तक देऊन पारंपरिक स्वागत केले. मंत्र्यांसाठी खास कांस्य धातूच्या थाळी-वाट्यांमध्ये पुरणपोळी, आमरस, शिपी आमटी, मासवडी अशा १८ पदार्थांची मेजवानी असून कर्जतची खास ओळख असलेली शिपी आमटी स्थानिक महिलांकडून तयार करून घेण्यात आली. एका कास्य थाळीची किंमत ३,९९९ रूपये आहे. ग्रामीण भागात पहिल्यांदाच होत असलेल्या या बैठकीसाठी चौंडीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे स्वतः दोन…

Read More

घारगाव (संगमनेर) घारगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत, संगमनेरच्या दिशेने जाणारी एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी (क्रमांक एम.एच.१७ बी.वाय. ८५५६) थांबवून तपासणी केली असता या गाडीतून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रभाकर आण्णासाहेब गुळवे (वय ३९, रा. रणखांब, ता. संगमनेर) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (५ मे) सकाळी ११:०० वाजता पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, घारगावातून संगमनेरच्या दिशेने एका पिकअप वाहनातून अवैध गुटखा विक्रीसाठी नेला जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पुजारी यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाई…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यातील महसूल आणि पोलीस प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे. आमदारांच्या स्पष्ट आदेशानंतरही अवैध वाळू वाहतूक सर्रास सुरू असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर, आमदार अमोल खताळ यांनी स्वतः कारवाई करत रविवारी रात्री समनापूर येथून वाळू भरून रायतेवाडीकडे निघालेला डंपर तनपुरवाडी रस्त्यावर पकडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोन वाळू तस्करांसह डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार, आमदार अमोल खताळ हे रायतेवाडी येथे एका कार्यक्रमासाठी रविवारी रात्री जात असताना त्यांना तनपुरवाडी रस्त्यावर वाळूने भरलेला डंपर येताना दिसला. तात्काळ त्यांनी आपले वाहन थांबवून डंपर चालकाची विचारपूस केली असता, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाणीवाटपावरून संगमनेर तालुक्यात संघर्ष पेटला आहे. जलसंपदा विभागाच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देत, “आम्हालाही सहआरोपी करा,” अशी मागणी केली आहे. सध्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यातील अनधिकृत पाइपलाइन काढण्याची मोहीम जलसंपदा विभागाने हाती घेतली होती. मात्र, शेतकऱ्यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला. शेतकऱ्यांचे नेतृत्व करत इंद्रजीत थोरात यांनी प्रशासनाच्या भूमिकेला आव्हान दिले. जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रमोद माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निमगाव पागा ते खळी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर निळवंडे कालव्यातील पाणीवाटपावरून निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा विभागाला महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. “लाभक्षेत्रातील प्रत्येक गावाला त्यांच्या हक्काचे पाणी मिळायलाच हवे आणि ही पाटबंधारे विभागाची जबाबदारी आहे. यासाठी योग्य वेळापत्रक तयार करून ते काटेकोरपणे पाळले जाईल, असा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे,” असे मत थोरात यांनी व्यक्त केले. थोरात म्हणाले की, हा प्रश्न केवळ राहुरी किंवा राहत्याला पाणी देण्यापुरता मर्यादित नाही, तर ज्यांचा हक्क आहे, त्यांना पाणी मिळायलाच पाहिजे. या संदर्भात पाटबंधारे विभागाचा संवाद कुठेतरी कमी पडत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधून चर्चेतून मार्ग काढण्याची आवश्यकता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – सरकारी मॅग्नेट प्रोजेक्टच्या नावाखाली एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची तब्बल २ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सलोखा असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील एक मोठे पदाधिकारी अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती बाळासाहेब ऊर्फ प्रवीणकुमार नाहाटा आणि गजनिया शेल्टर्स कंपनीचे संचालक अजय चौधरी यांच्या विरोधात पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत ११ जणांची फसवणूक उघडकीस आली असून, फसवणुकीचा आकडा ९ कोटी ४९ लाख ३५ हजारांवर पोहोचला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात राहुल रामराजे मक्तेदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे “काँग्रेसला फोडा आणि रिकामी करा,” असा कानमंत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना दिला. भाजपच्या कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बावनकुळे म्हणाले, “काँग्रेसचे लोक आपल्याकडे आले तरी तुमचा आधी विचार केला जाईल. प्रत्येक जिल्ह्यात मंत्री दोन दिवस वेळ देतील. तुम्ही घाबरू नका.” ते पुढे म्हणाले, “संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सर्वस्व दिले, तरी त्यांना पक्ष सोडावा लागला. काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा नाहीत. काँग्रेसला कोणतेही धोरण नाही. जो-जो काँग्रेस किंवा इतर पक्षातून आमच्याकडे येईल, त्याचे स्वागत आहे. तुम्ही थकून जाल, इतके लोक आमच्याकडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – रात्री जेवण झाल्यानंतर बहिणी सोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या २९ वर्षीय महिलेचा शुक्रवारी रात्री अकरा वाजता विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगर शहरातील सावेडी भागात पाईपलाईन परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विनायक नन्नवरे (वय ३२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, यशोदानगर कॉलनी, पाईपलाईन रस्त्यावर राहणारा विनायक नन्नवरे याने महिलेकडे टक लावून पाहिले आणि अश्लील हावभाव केले. तसेच, त्याने हातातील प्लास्टिकच्या पिशवीतून काहीतरी काढून महिलेला दाखवत असभ्य वर्तन केले. यानंतर, आरोपीने पीडितेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज –  सध्या डिजिटल पेमेंटच्या जमान्यात गुगल पे आणि फोन पे चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, याच ऑनलाइन पेमेंटमुळे एका तरुणीला मनस्ताप सहन करावा लागला आहे. वाघोली ते विमाननगर असा प्रवास करणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने रिक्षाभाडे म्हणून केवळ २० रुपये गुगल पे द्वारे भरले आणि याच कारणामुळे एका रिक्षाचालकाने तिला अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवून तिचा विनयभंग केला. या घृणास्पद कृत्याबद्दल पुण्याच्या हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी वाघोलीहून विमाननगरला रिक्षाने जात होती. तिने रिक्षाचे भाडे ऑनलाइन पद्धतीने चुकते केले. त्यामुळे तिचा मोबाईल नंबर रिक्षाचालकाकडे गेला.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – राजुर (अहिल्यानगर) राजूर गावात काविळीचा वाढता प्रादुर्भाव गंभीर बनला आहे. आतापर्यंत २६३ रुग्ण आढळले असून, दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला तातडीने सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत यासाठी डॉक्टरांचे पथक पूर्णवेळ तैनात राहणार असून, रक्त तपासणीचे अहवाल लवकर मिळावेत यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी आज राजूर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. डॉक्टरांकडून सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. यावेळी आमदार किरण लहामटे, माजी आमदार…

Read More