Author: Annant Ppangarkar
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३१ मे २०२३ रोजी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी होत आहे. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. धरण लाभक्षेत्र परिसरातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून पाण्यासाठी असलेली प्रतिक्षा संपणार आहे. निळवंडे प्रकल्प नेमका काय आहे ? त्याच्या वैशिष्ट्याविषयी माहिती देणारा लेख… महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : ‘संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सुरू असताना, साखर आयुक्तांकडे तातडीची बैठक घेऊन श्री गणेश सहकारी साखर कारखाना हा विखे पाटील कारखान्याला पाच वर्षे कराराने चालवायला देणे हा शेतकरी, सभासद आणि कामगारांशी विश्वासघात आहे. यापूर्वी दहा वर्ष गणेश सहकारी साखर कारखाना हा विखे पाटील कारखान्याच्या ताब्यात होता, त्याच काळात गणेश कारखाना संकटात सापडला, त्यांना दहा वर्षात जे जमले नाही ते पाच वर्षात काय जमणार? मुळात हा करार कारखाना चालवण्यासाठी नाही तर कारखाना कायमचा बंद करण्यासाठी केलेला आहे, सत्तेचा हा गैरवापर गणेश परिसरातील सभासद व शेतकरी सहन करणार नाही’, असा घणाघात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. थोरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर, शहरातील जोर्वे नाका भागात झालेल्या किरकोळ कारणावरील हाणामारीचे रूपांतर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत जाऊन पोहोचले. या हल्ल्यात तब्बल आठ जण जखमी झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी जिल्हा पोलिसांनी दिवस-रात्र घरपकड करत 16 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने 2 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून जोर्वे नाका भागांमध्ये जोर्वे येथील नागरिकांवर धारदार शास्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार झाला. यात सुनील पोपट थोरात, तन्मय राजेश दिघे, पुंडलिक पोपट दिघे, विजय मंजाबापू थोरात, अजय भिमाजी थोरात, जितेंद्र कैलास…
कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचे महत्त्वपूर्ण योगदान संगमनेर तालुक्यात सर्वांना सन्मानाची वागणूक महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्शावर संगमनेर तालुक्याचा सहकार वाटचाल करत असून आज सहकाराचे आदर्शवत मॉडेल हा तालुका ठरला आहे. कारखान्याच्या विकासात कामगारांचेही महत्त्वपूर्ण योगदान असून तालुक्यात शेतकरी, कामगार, युवक, महिला, सर्वसामान्य नागरिक यांच्यासह सर्वांना सन्मान दिला जात असून तालुक्यातील वातावरण हे एक परिवारासारखे आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूल व कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 29 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर, येथील मालपाणी उद्योग समूहाच्या पुढाकाराने केंद्र सरकार पुरस्कृत ‘भविष्य निर्वाह निधी आपल्या दारात’ हा उपक्रम संगमनेरमध्ये झाला. जनता दरबार स्वरूपाच्या या उपक्रमामध्ये अनेकांच्या भविष्य निर्वाह निधीच्या आणि निवृत्त वेतनाशी संबंधित समस्यांची सोडवणूक झाल्याने कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू सफल झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. भविष्य निर्वाह निधीच्या नगर विभागाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी मालपाणी इंडस्ट्रियल पार्कच्या शिवशक्ती सभागृहामध्ये सोमवारी (ता.29) दिवसभर लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यामध्ये अंमलबजावणी अधिकारी अमित आहुजा, दीपक चौधरी, समन्वयक अन्वर खान आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे महेश धनके यांचा समावेश होता. मालपाणी उद्योग समूहाचे मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक शिवाजी आहेर यांच्यासह कारखान्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आपल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विद्यालये यांची गुणवत्ता चांगली असल्याने आज याच शाळांमधून केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील मंगेश पाराजी खिलारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ३९६ व्या रँकने उत्तीर्ण होत यश मिळविले. याबद्दल आमदार थोरात यांच्या हस्ते तालुक्यातील सुकेवाडी येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव कुटे, माजी नगरसेवक व उद्योजक गोरख कुटे, सरपंच योगिता सातपुते, उपसरपंच सुभाषराव…
अप्पर पोलीस अधीक्षक, डीवायएसपी, पोलीस निरीक्षक यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचे नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात दहशत अवैध व्यवसाय आणि गुंडागर्दीचा अड्डा म्हणून जोर्वे नाक्याची ओळख महाराष्ट्र संवाद न्यूज प्रतिनिधी – रविवारी रात्री शहरातील जोर्वे नाका परिसरात झालेली हाणामारीची घटना आणि त्यामुळे संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात झालेले तणावाचे वातावरण या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता बाळगत परिस्थिती नियंत्रणात ठेवली असली तरी या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. वादाला कारणीभूत ठरलेली अतिक्रमनेच नगर परिषदेच्या माध्यमातून उध्वस्त करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळीच मोठ्या पोलीस फौज फाट्यासह नगरपालिकेने ही कारवाई सुरू केलेली कारवाई दुपारी बारा वाजेपर्यंत देखील सुरूच होती. श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज चंद्रपूर : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर (वय 47 वर्ष) यांचे नवी दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. धानोरकर राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. चारच दिवसांपूर्वी त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. वडिलांपाठोपाठ चार दिवसांनी मुलाचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पिता पुत्राच्या लागोपाठ झालेल्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर आणि दोन मुले असा परिवार आहे. प्रकृती अस्वस्थामुळे भद्रावती येथे झालेल्या वडिलांच्या अंतिम संस्काराला बाळू धानोरकर उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे वडिलांचे अंतिम विधी धानोरकर यांचे भाऊ अनिल यांनी केले होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर / शिर्डी :- निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कालव्याची कामे ठेकेदारांनी निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मात्र कामामध्ये जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी राहाता आणि संगमनेर तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या कामांची सोमवारी पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी, मनोली, घुलेवाडी, कुरण, खांजापूर, निळवंडे, कौठे कमळेश्वर, गोगलगाव, आडगाव, मापारवाडी, लोणी खुर्द, बाभळेश्वर, पिंप्री निर्मळ, वाकडी आदी गावात कालव्यांच्या सुरू असलेल्या…
वाळू वाहतुकीकरिता खुली परवानगी देणार मोदी आवास योजनेअंतर्गत मागील त्याला घरकुल देणार वाळू तस्करांना पाठीशी घालणारे महसूल पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार महाराष्ट्र संवाद न्यूज पुणतांबे :- वाळू धोरणात सुटसुटीतपणा आणून वाळू वाहतूकीकरिता खूली परवानगी देण्यात येईल. ओबीसी समाजाच्या घरकुलासाठी मोदी आवास योजना केंद्र शासन आणत आहे, यात मागेल त्याला घरकुल देण्यात येईल तसेच गायरान जागेवर बांधण्यात आलेले घरकुले नियमित करण्यात येतील. अशा महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केल्या. राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील पहिल्या शासकीय वाळू केंद्राचे उद्घाटन व लोकार्पण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी, उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या चाचणी शुभारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. ३१ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची तयारी धरण स्थळावर सुरू करण्यात आली असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंददायी अशा सोहळ्यास उपस्थित राहावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. त्यांनी या कार्यक्रमास येण्याचे मान्य केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर :- पुण्याहून संगमनेरमध्ये विक्रीसाठी आणलेला गांजा संगमनेर शहर पोलिसांनी पकडला आहे. दोन किलो गांजा सह पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आणलेली आलिशान टाटा कंपनीची नेक्सन कार आणि विवो कंपनीचा मोबाईल असा 4 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोर्वे रोडने जाणाऱ्या एका संशयित वाहनचालकाला त्यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र वाहन चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत वाहन वेगात घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पथकाने त्याला कोल्हेवाडी रस्त्यावरील चर्चजवळ पकडले. वाहनाचे झडती घेतली…
महाराष्ट्र संवाद न्यूज आळंदी :- शिक्षणाचा मूल्याधिष्ठीत विचार हा संत साहित्यात सातत्याने प्रतिबिंबीत झाला आहे. समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. मात्र शिक्षण अधिकाधिक मूल्याधिष्ठीत होण्यासाठी संताच्या विचारातील शिक्षण विषयक दृष्टीकोन जाणून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक शिवाजीराव तांबे यांनी केले. चपराक प्रकाशनच्यावतीने संदीप वाकचौरे लिखित ‘शिक्षणाचे पसायदान’ या पुस्तकाच्या आळंदी येथे झालेल्या व्दितीय आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य शासनाचा कंठसंगीत पुरस्कार विजेते जेष्ठ संगीतकार कल्याण गायकवाड, सुप्रसिध्द गायिका कार्तिकी गायकवाड, माजी शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, चपराक प्रकाशनचे प्रमुख जेष्ठ संपादक घनश्याम पाटील, रवींद्र कामठे, अरूण कमळापूरकर, आळंदी देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी…
आरोपींनी केला लाकडी दांडके, फायटर, चॉपर, रॉड, तलवारीचा वापर; सतर्क पोलिसांमुळे परिस्थिती नियंत्रणात… गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पिकअप मधून जाताना शहरातील जोर्वे नाका येथे हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून पिकअपमधील लोकांना टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून उपचारानंतर घरी परतत असणाऱ्या या लोकांवर पुन्हा शंभर ते दीडशे लोकांनी “ये वही लोग है जो अपने खिलाफ पोलीस स्टेशन को तक्रार देने गये थे, आज इन्हे जिंदा घर नही जाने देंगे” असे म्हणत तलवार, चॉपर, फायटर, लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने हल्ला करीत त्यांना जिवे मारण्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. या हल्ल्यात आठ जण…
महाराष्ट्र संवाद न्यूज स्मिता मांजरे नावाची एक मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातील मुलगी. बारावी झाल्यावर तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. पण घर थोडे जुन्या वळणाचे, काय करायचे मुलीला इतके शिकवून, असा विचार करून जवळच्याच कॉलेजमध्ये तिला बी.ए.साठी प्रवेश घेऊन दिला. या युवतीला थोडे वाईट वाटले, पण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे आणि पुढे जायचे हा तिचा मूळ स्वभाव!! बीए करतांना भरपूर वेळ मिळायला लागला. अभ्यास थोडासा असायचा, त्यातून मग खेळाची आवड निर्माण झाली. सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. अभाविप, छात्र युवा संघर्षवाहिनी यांचे आंदोलने कार्यक्रम यात ती सहभागी होऊ लागली. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काहीतरी व्यवसायाभिमुख शिक्षण घेतले पाहिजे असे तिच्या मनात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जीवनाचे ध्यासपर्व मानून निळवंडे धरण आपण पूर्ण केले. अनेक अडचणीवर मात करून कालव्यांची कामे मार्गी लावली. रात्रंदिवस काम सुरू ठेवून ऑक्टोबर 22 मध्येच दुष्काळी भागाला पाणी द्यायचे होते. सरकार बदलले त्यामुळे कामे मंदावली मात्र आता दहा टीएमसी पाणी शिल्लक असताना श्रेयवादासाठी उशीर न करता तातडीने पाणी सोडले पाहिजे. धरणाचे काम कोणी केले हे सर्वांना माहीत असून नशिबाने तुम्हाला संधी मिळाली आहे तर पाणी सोडण्यास उशीर का केला, असा सवाल निळवंडे धरणाचे जनक काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. बुधवारी 31 मे निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेतली जात आहे. आमदार थोरात यांनी गेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे, अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कार्यस्थळावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जलसंपदा विभागाचे अभियंता अरूण नाईक, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीनिवास वर्पे, कृषी विभागाचे गायकवाड, माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, सिताराम भांगरे,…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर-अकोलेच्या पोलीस उपअधीक्षक पदाचा पदभार भुसावळ येथून बदलून आलेल्या सोमनाथ वाकचौरे यांनी शनिवारी सायंकाळी स्वीकारला. संगमनेरचे प्रभारी डीवायएसपी संजय सातव यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे घेतली. दीर्घकाळ रिक्त असलेल्या या पदावर गृह विभागाने वाकचौरे यांची नियुक्ती केल्याने त्यांचा येथील कार्यकाळ कसा राहतो हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. संगमनेरचे तत्कालीन डीवायएसपी राहुल मदने यांची नागपूरला बदली झाल्यापासून संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक पद रिक्त होते. या पदाचा अतिरिक्त पदभार शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्याकडे सोपविण्यात आला होता. संगमनेरची नियुक्ती निश्चित झाल्यानंतर वाकचौरे यांनी शनिवारी सायंकाळी नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भावनातील आपल्या कार्यालयात प्रभारी डीवायएसपी संजय…
महाराष्ट्र संवाद न्यूज एका बांधकामाच्या साईटवर कामगारांची काही मुले खेळत होती. वाॅचमनचा छोटा पोरगा (साधारण वय वर्ष आठ) एका कोपर्यात बसून ईतरांचा पकडा पकडीचा खेळ बघत होता. कुणी धडपडले तर टाळ्या वाजवत होता, हसत होता. पण खेळत नव्हता. मी त्याला विचारले… ” बारक्या ! तू का रे खेळत नाहीस ?” त्याने खेळावरील नजर न हटवता मला ऊत्तर दिले . “आय नको म्हनत्या…” “आई खेळायला कशाला नको म्हणेल ? तूच काहीतरी आगाऊपणा करत असशील !” त्याने ऊत्तर देण्याचे टाळले. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून पुन्हा खेळ बघत बसला. मलाच त्याला चिडवण्याची खुमखूमी गप्प बसू देईना…. “मला माहीती आहे, आई तूला खेळायला का…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष लेख व्यवस्थेला पोखरून स्वत:चे खिसे भरणार्या पांढर्या पोषाखातल्या नव्या डाकूचा सीबीआयने नुकताच शोध लावला आहे. या डाकूने त्याच्या इलाख्यातील जंगलांची लयलूट केलीच, पण आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्याला शहरात घुसण्याचा मार्ग भाजपने आखून दिला. विरोधी पक्षांना त्रासदायक ठरलेल्या चार यंत्रणांमधील नाकोर्टिक ही आणखी एक संस्था बनली. आता अति झाल्यावर या डाकूवर छापेमारी सुरू झाली आहे. पांढर्या डगल्यातला हा इसम यंत्रणेला पोखरतो आहे, असा जाहीर आरोप करणार्या नवाब मलिक यांना देशद्रोही ठरवून देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अतिआत्मविश्वासूंनी या डाकूला साथ दिली. खर्याचं खोटं करणार्या या इसमाचं नाव आहे समीर वानखेडे. एका महत्वपूर्ण खात्याच्या विभागीय जबाबदारीतून समीरचा ‘अमीर’…
