Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज घारगाव – गावाकडे साकुर येथे घरी आलेल्या दोन जावांमधील वादाची परिमिती नवरा-बायकोने महिलेला मारहाण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करत तिचा विनयभंग करण्यापर्यंत पोहोचली. वादामध्ये महिलेच्या बोटालाही चावा घेऊन तिच्या अंगावरील कपडे फाडण्यात आले. संगमनेरच्या पठार भागात साकुर येथे गुरुवारी हा प्रकार घडला. पीडित महिला आपल्या पतीसह गावी साकुर येथे राहावयास असून पतीच्या नोकरी निमित्ताने चिंचवड पुणे येथे रहावयास आहे. अधून मधून कुटुंबीयासह पीडित महिलेचे आपल्या पतीच्या गावी साकुर येथे येणे-जाणे असते. साकुर येथील घरी महिलेचा दीर आपल्या कुटुंबीयासह रहावयास आहे. गावाकडे आल्यानंतर हे सर्वजण एकत्र राहत असत. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेचे पती बाहेरून येताना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – उन्हाची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याने सर्वांगातून घामाच्या धारा वाहत असतांना संगमनेरच्या गीता परिवार संचलित संस्कार बाल भवनच्या शंभरावर मुलांनी जलक्रीडेचा आनंद घेतला. मालपाणी हेल्थ क्लबच्या सहकार्याने यासर्व मुलांना जीव रक्षकांच्या निगराणीत जलतरण तलावात सोडण्यात आले. यावेळी लहान मुलांसाठी असलेल्या स्वतंत्र वर्तुळाकार हौदात बाल भवनमधील सर्वाधीक लहान मुलांची धम्माल अनुभवायला मिळाली. मुलांनी पाण्यात मनसोक्त डूंबण्याचा आनंद घेतला. गीता परिवाराच्यावतीने दरवर्षी उन्हाळ्यात ज्या प्रमाणे संस्कार शिबिरांचे आयोजन होते, त्या धर्तीवर बाल भवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी यांनी बाल भवनमधील मुलांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले आहे. सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने बरीच लहान मंडळी पाहुणे म्हणून संगमनेरात आली आहेत. त्यांच्यासह…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शहरातील मोठ्या वर्दळीच्या नवीन नगर रस्त्यावर दुपारी साडेबाराच्या सुमारास एका वृक्षाची धोकादायक फांदी अचानक तुटून रस्त्यावर पडली. फांदी रस्त्यावर पडत असताना तेथून जाणाऱ्या-येणाऱ्याचा अंगावर पडण्याची शक्यता होती. मात्र सतर्कता दाखविल्याने दुर्घटना टळली. शहरातील नवीन नगर रस्त्यावर एका डेरेदार वृक्षाच्या काही धोकादायक फांद्या तुटून रस्त्यावर पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. दरम्यान शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारस कडकड करत एक फांदी अचानकपणे तुटून मोठ्या वर्दळीच्या रस्त्यावर पडली. यावेळी रस्त्यावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू होती. फांदी तुटत असताना मोठा आरडाओरडा झालेला येथून लोक बाजूला पळाले. तुटणारी फांदी एका त्वचा की जवळ पडली त्यामुळे दुचाकी चालविणारा वृद्ध गृहस्थ आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  काय ग !!!! कालच तुला खडसावून सांगितले, की बंगल्याच्या भिंतीला पण स्पर्श करायचा नाही… तरी तू आज परत आलीस फुलं मागण्यासाठी ? ती कळकट मळकट फ्रॉक घातलेली ८-९ वर्षांची मुलगी अंत्यत केविलवाणा चेहरा करून करुणेच्या स्वरात आवाजात कापर भरत बोलली ….. ताय, वंजळभरच पायजेती.. द्याकीव. तुमच्या झाडाला हायती बी फुलं म्हणून मागत्या. इथं कुठच येवढी फूलं नायत, फकस्त तुमच्याच बंगल्यात हायत. ती आठ नऊ वर्षांची मुलगी काकुळतीला येऊन अनघाला तिच्या बंगल्यातील मोगऱ्याची फुले मागत होती. अनघा – नाही म्हणून सांगितले ना. निघ इथून. असं म्हणून अनघा बंगल्यात गेली. कुठून कुठून येतात फुलं मागायला. काय फुकट येतात का?…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिसांनी मोठी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी पकडली असून यात 1 कोटी 28 लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. गुटख्यासह लाखो रुपये किमतीची दोन वाहने देखील ताब्यात घेण्यात आली आहे. नासिकहून मुंबईच्या दिशेने दोन वाहनांमधून बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने इगतपुरी जवळील ग्रँड परिवार हॉटेल समोर वाहन पकडण्यासाठी सापळा लावला होता. पोलीस पथकाने संशयित वाहनांची तपासणी केली असता त्यांना दोन्ही वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा आढळून आला. पोलिसांनी…

Read More

समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी (उमाका वृत्तसेवा) – हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत. विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार असून डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर येत्या काळात राज्यात समृद्धीसारखे अनेक प्रकल्प‌ राज्यात राबविण्यात येतील. राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जेऊर कुंभारी (ता.कोपरगाव) शिर्डी पथकर प्लाझा येथे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर, दि.26 मे (जिमाका वृत्तसेवा) – राज्यातील जनतेच्या हितासाठी राज्य शासनामार्फत अनेक महत्त्वकांक्षी (फ्लॅगशिप )कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व कार्यक्रमांची प्रशासनाने गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीस राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गुन्हा करण्याच्या उद्देशाने विनापरवाना २१ इंच लांबीची गुप्ती जवळ बाळगणाऱ्या चार जणांना संगमनेर तालुक्यातील शिवारामध्ये वडगाव पान ते तळेगाव रस्त्याच्या पाटावर करुले शिवारात पकडण्यात आले आहे. आरोपी पैकी तिघेजण बुलढाणा जिल्ह्यातील असून एक आरोपी संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील आहे. कैलास अशोक सावंत (वय २४ वर्ष), मारुती बळवंत सावंत (वय ७० वर्ष, दोन्ही रा. मु. गोसिंग गाव, पोस्ट नांदुरा, जि. बुलढाणा), राजू रावसाहेब शिंदे (वय २३ वर्ष, रा. मुंबरा पो. बोरजवळा ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि जितेश भाऊसाहेब गोडे (वय २४ वर्ष, रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर, सर्व हल्ली रा. समनापुर, ता. संगमनेर) अशी आरोपींची…

Read More

अनंत पांगारकर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अहमदनगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यातील वादा संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अहमदनगरमध्ये मोठे भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर मध्ये आले असता त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी त्यांना तुमच्या शेजारी बसलेल्या (विखे-शिंदे) दोन नेत्यांमध्ये वाद असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस यांनी मार्मिक उत्तर देत मी त्यांना घेऊन बसलो आहे. वाद असला तरी वादळ नाही, तो चहाच्या पेल्यातला वाद आहे, तो संपलेला आहे… त्यामुळे चिंता करू नका. अशा शब्दात या वादावर भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले बघा व्हिडिओ…

Read More

अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अहमदनगर दौऱ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विकास कामांच्या आढावा बैठकीनंतर फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना यावेळी ते म्हणाले; नाना पटोले आणि संजय राऊत हे बोलघेवडे लोक आहेत. तुम्हाला काम पाहिजेत, म्हणून ते बोलतात. आम्हाला भरपूर काम आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना उत्तर देत नाही. जलजीवन मिशनच्या सगळ्या कामांना केंद्र सरकारने पैसा दिला असला तरी या कामांचे टेंडर हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात निघाले आहे. केंद्र…

Read More

(महाराष्ट्र संवाद न्यूज) नाशिक ते शिर्डी महामार्गावर सिन्नरच्या पांगरी गावाजवळ नादुरुस्त झालेल्या व रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसच्या चालकाने कंबरेच्या करदोऱ्याच्या सहाय्याने बसच्या छताला लटकून फाशी घेतली. राज्य परिवहन महामंडळ नाशिक आगार- १ चे चालक राजू हिरामण ठुबे (वय ४९) असे मयत चालकाचे नाव आहे. बस चालक ठुबे हे शिर्डी येथून नाशिककडे बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवशाही बस (एमएच – ०९, इएम -१२८०) घेऊन निघाले होते. शिवशाही बस वावी ते पांगरी दरम्यान शिंदेवस्तीजवळ येताच नादुरुस्त झाली. महिला वाहकाने प्रवाशांना अन्य बसमध्ये बसून दिल्यानंतर बस नादुरुस्त झाल्याची माहिती संबंधित आगारांना कळविण्यात आली. त्यानंतर प्रवासी व महिला वाहक दुसरा…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करून तिला गरिबांसाठीच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे अमिष दाखवून तिच्याजवळील पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ‘सय्यद’ नावाच्या चोरट्याने लांबविण्याचा प्रकार गुरुवारी दुपारी पोलीस ठाण्यासमोरील कुदळ मिसळ समोर घडला. पद्मा कांतीलाल चोरडिया (वय 75 वर्ष, रा. साकुरी, ता. राहाता) या महिलेने या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, वृद्ध महिला बाभळेश्वर येथून संगमनेरला येण्यासाठी एसटी बसमध्ये बसली होती. याचवेळी तिच्यासोबत एक अनोळखी इसम बसमध्ये बसून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याने आपले नाव…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)-  राष्ट्रपतीपद हे देशाचे सर्वोच्च पद असून नवी दिल्ली येथे बांधलेल्या नवीन सेंट्रल व्हिस्टा या संसद इमारतीचे उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठी आणि समृद्ध लोकशाही असलेल्या भारतात राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. या पदावर महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मु या आदिवासी समाजातील आहेत. उद्घाटनाचा अधिकार हा राष्ट्रपती महोदयांचाच आहे. मात्र असे होताना दिसत नाही हे संपूर्ण देशाला वाईट वाटणारे आहे. आदिवासी, मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना संधी…

Read More

अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रात्री अहमदनगरमध्ये मुक्कामी येत आहे. पुण्याहून रात्री ते अहमदनगरला येणार असून त्यांच्या समवेत राज्याचे महसूल संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील नगरमध्ये येत आहेत. फडणवीस उद्या नगर मधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. फडणवीस यांच्या उपस्थितीत नगरमध्ये शुक्रवारी भाजपचा मेळावा होत असून या मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय त्यांच्या उपस्थितीत आणखी काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फडणवीस गुरुवारी रात्री नगरमध्ये येत असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना रात्रीच्या भेटीत ते नेमका काय कानमंत्र देतात याची कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्या हस्ते अहमदनगरच्या नूतन शासकीय विश्रामगृहाचे भूमिपूजन केले जाणार आहे. या कार्यक्रमा…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची सर्रासपणे विक्री होत आहे. अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यावर झापड बांधल्याने शहर पोलिसांनी गुटखा विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. दोघा विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईत पोलिसांनी दोन दुचाकींसह सुमारे 57 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय येथील प्रमुख गुटखा विक्रेत्याला नगरच्या एलसीबीने ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. शहर पोलिसांनी रफिक पीरमोहम्मद शेख (वय 65 वर्ष, रा. अँग्लो उर्दू हायस्कूलसमोर, नाईकवाडपुरा, संगमनेर) आणि दिलीप सयाजी शिंदे (वय 34 वर्षे, युनिकॉर्न सोसायटी, गुंजाळवाडी, संगमनेर) या दोघा विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. कारवाई पोलिसांनी त्यांच्याकडून दोन दुचाकी हस्तगत केल्या असून साधारणत: आठ…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) गुणवत्ता व उत्कृष्ट निकालाच्या परंपरेसह यूजीसीचे अनेक मानांकन आणि आयएसओ अवॉर्ड मिळालेल्या अमृतवाहिनी एमबीएच्या 45 विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच चांगल्या पॅकेजवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एम. लोंढे यांनी दिली. डॉ.लोंढे म्हणाले, माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी एमबीएने आपल्या गुणवत्तेचा लौकिक जपला. या महाविद्यालयातून 2286 विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केली आहे. यामधील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहे. यावर्षी विविध कंपन्यांनी संस्थेत येऊन घेतलेल्या कॅम्पस इंटरव्यूमधून 45 विद्यार्थ्यांची चांगल्या पॅकेजवर निवड झाली आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँक, विवंता…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर बस स्टॅन्डजवळील अकोले रोड चौफूलीवर होत असलेली वाहतूक कोंडी आणि पोलिस नियंत्रण चौकी बसवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागणी तातडीने पूर्ण केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. संगमनेर बस स्टॅन्ड जवळील अकोले रोड चौफूलीवर सतत वाहतूक कोंडी होत आहे. याचे मुख्य कारण ट्रैफिक सिग्नल असून नसल्यासारखे आहेत. वाहतूक नियंत्रण पोलिस चौकी नाही. सदर ठिकाणी असलेला अनधिकृत रिक्षा स्टॉप, आसपास झालेली व्यावसायिक अतिक्रमणे वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरत आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये मनसेकडून विनंती करण्यात आली की, सदर ठिकाणी तात्काळ पोलिस नियंत्रण चौकी बसवण्यात यावी व रोडवरील घुलेवाडीलाईन अनधिकृत रिक्षा…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार करून वेळोवेळी तिच्याकडून सुमारे 30 लाख रुपये घेऊन ते परत देण्यास नकार देत विधवेच्या मुलीस मारून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. सप्टेंबर 2020 चे 1 मे 2023 या काळात संगमनेर आणि शिर्डीमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या संदर्भात संबंधित महिलेने शहर पोलीस ठाण्यात बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरून आळंदी (जि. पुणे) येथील योगेश सुभाष टोपेकर यांच्या विरोधात अत्याचार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश टोपेकर याची कोविड काळामध्ये फेसबुकवर पीडित महिलेची ओळख झाली होती. फेसबुकवर झालेल्या संभाषणातून ती विधवा असल्याची माहिती टोपेकर याला मिळाल्यानंतर त्याने या महिलेशी वेळोवेळी फोनवरून संपर्क…

Read More

अकोले (महाराष्ट्र संवाद न्यूज) अकोले तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व महाविकास आघाडी प्रणित शेतकरी समृद्धी मंडळाचे संचालक भानुदास तिकांडे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचेच रोहिदास भोर निवडून आले. विरोधी भाजप उमेदवारांचा या निवडणुकीत पराभव झाला. बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीसाठी बुधवारी निवडणूक पार पडली. सभापतीपदासाठी मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे व भाजप प्रणित शेतकरी विकास मंडळाकडून बाळासाहेब सावंत यांनी, उपसभापती पदासाठी मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेसचेच माजी उपसभापती रोहिदास भोर व भाजपकडून शिवराम अरज यांनी अर्ज दाखल केले होते. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी दोन अर्ज आल्याने गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली यात सभापतीपदासाठी भानुदास…

Read More

विशेष वृत्त लेख शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते २६ मे २०२३ रोजी कोकमठाण येथील शिर्डी इंटरचेंज येथून होत आहे. यामुळे नाशिक-मुंबई-पुणे हा विकासाचा सुवर्ण त्रिकोण उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील १० जिल्ह्याशी थेट व १४ जिल्ह्यांशी अप्रत्यक्ष जोडला जाणार आहे. समृध्दी महामार्गावरील सर्वात मोठ्या सिन्नर इंटरचेंजमुळे शिर्डी, अहमदनगर, नाशिक व पर्यायाने उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. एका अर्थाने विकासाच्या सुवर्ण त्रिकोणाला जोडणारी ही महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ मोठे पूल, १८ छोटे…

Read More