Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणी योजनेच्या मुख्य पाईपलाईनचे काम काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडले असून, यामुळे संपूर्ण गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात शेडगाव ग्रामपंचायत कार्यालयाने संगमनेरच्या तहसीलदारांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. जलजीवन योजनेचे मुख्य पाईपलाईनचे काम उद्भवापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत पूर्ण झाले होते, मात्र गावातील काही शेतकरी ही पाईपलाईन त्यांच्या क्षेत्रातून नेण्यास मज्जाव करत आहेत. यामध्ये दिलीप श्रीहरी नागरे, सत्पाल भिमाजी नागरे आणि सुखदेव रामभाऊ नागरे या शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकण्यास विरोध दर्शवला आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी वारंवार विनंती करूनही हे शेतकरी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर शहराच्या अस्मितेचा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न आता प्रत्यक्ष कृती आराखड्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला असून, शहरवासीयांनी दिलेल्या कौलानुसार संगमनेर बसस्थानक परिसरात महाराजांचे भव्य ‘पूर्णाकृती अश्वारूढ स्मारक’ उभारले जाणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. या स्मारकाचा प्रवास संघर्षाचा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा राहिला आहे. २०१८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी बसस्थानक परिसरातील मोक्याची जागा स्मारकासाठी मिळावी, अशी अधिकृत मागणी करत या लढ्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा प्रस्ताव शासनदरबारी ताकदीने मांडला. मात्र, एसटी महामंडळाच्या धोरणानुसार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर शहरातील नामांकित सोनांबेकर हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांवर रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने दाखल झाला आहे. मात्र, हा कायदेशीर तपास प्रक्रियेचा भाग असतानाही, डॉक्टरांच्या असोसिएशनच्या संगमनेर शाखेने संघटित होऊन पोलीस प्रशासन आणि प्रसारमाध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील दत्तात्रय दळवी यांच्यावर सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नाशिकला हलवण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली होती. विशेष म्हणजे, चार महिने पाठपुरावा करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने अखेर फिर्यादीला न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील १८२ गावांसाठी निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली आहेत, मात्र सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिण्याचे पाणी आणि पशुधन वाचवण्यासाठी पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निळवंडे धरणातून लाभक्षेत्रासाठी तातडीने उन्हाळी आवर्तन सोडावे, अशी आग्रही मागणी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घुलेवाडी येथील कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या कार्यालयात जाऊन मागणीचे निवेदन दिले. हे निवेदन कार्यकारी अभियंता कवडे व हापसे यांनी स्वीकारले असून, यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे, प्रभाकर गायकवाड, विजय मगर, विलास…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत (TCS) नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणिलैंगिक शोषणाच्या धक्कादायक प्रकाराचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या हिंदू तरुणींचे पद्धतशीरपणे ब्रेन वॉशिंग करून त्यांचे धर्मांतर करण्याचा आणि त्यांना लैंगिक जाळ्यात ओढण्याचा हा भयानक कट समोर आला असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाची सुरुवात एका तरुणीच्या वागण्यातील बदलामुळे झाली. संबंधित तरुणीने हिंदू असूनही अचानक रोजे पाळण्यास सुरुवात केली, तिचा पेहराव बदलला आणि तिने हिजाब परिधान करण्यास सुरुवात केली. मुलीच्या या संशयास्पद वर्तणुकीमुळे तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली, ज्यातून या संपूर्ण रॅकेटची माहिती समोर आली. तपास यंत्रणांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी सिन्नर (नाशिक) येथील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट रूपाली चाकणकर यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकर आणि पुतण्या तन्मय चाकणकर यांची शिर्डी पोलीस ठाण्यात गेल्या गोपनीय आणि कसून चौकशी सुरू आहे. समता पतसंस्थेमध्ये चाकणकर कुटुंबाच्या नावे असलेल्या चार बँक खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले असून, या व्यवहारांचा अशोक खरातशी काही संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. सकाळपासूनच या दोघांचे सविस्तर जबाब नोंदवले जात आहेत. यापूर्वी अशोक खरातशी असलेल्या कथित संबंधांमुळेच…
संगमनेर | विशेष प्रतिनिधी संगमनेर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप रुग्णाचा बळी गेल्याचा आरोप होत आहे. पण त्याच डॉक्टरांना वाचवण्यासाठी संगमनेरचे पोलीस चार महिने तक्रारदाराला उंबरठे झिजवायला लावतात, यावरून येथील कायदा सुव्यवस्था नेमकी कोणाच्या खिशात आहे, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी अखेर न्यायालयाच्या आदेशाने डॉ. अजिंक्य सोनांबेकर आणि डॉ. अभिजीत कोरडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाने पोलीस दलातील शांततेचे वाभाडे निघाले आहेत. दत्तात्रय दळवी या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी न्यायासाठी, आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दिलेला लढा थक्क करणारा आहे. १० डिसेंबर २०२५ रोजी संगमनेर शहर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर शहर आणि तालुक्यात सध्या गोवंश हत्या आणि मांस तस्करीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाचा धाक उरला नसल्याने की काय, पण तालुक्यात गोवंश कत्तलींचे सत्र अगदी ‘धडाक्यात’ सुरू असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी गोवंश कत्तलींविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाही, प्रत्यक्षात यंत्रणांच्या अभद्र युतीमुळे जमिनीवर मात्र काहीच बदल होताना दिसत नाही. तात्पुरत्या मलमपट्टीचा अपवाद वगळता सर्व काही जैसे थे होताना दिसत आहे. प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी, पोलीस आणि स्थानिक नेत्यांनी या कत्तलींना जणू मूक संमतीच दिल्याचे भासते. या संपूर्ण गोरखधंद्यात पोलीस प्रशासन, बडे राजकीय नेते, पदाधिकारी, कथित पत्रकार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर येथील डॉ. सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप एका पीडित पतीने केला आहे. यामुळे आधीच एका प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. रोहीदास गणपत डोंगरे (रा. निमज, ता. संगमनेर) यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनसह जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी होणाऱ्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे. तक्रारदार डोंगरे यांनी दिलेल्या केलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी मिना डोंगरे यांना छातीचा त्रास होत असल्याने २८ जानेवारी २०२६ रोजी डॉ. सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे डॉ. कोरडे…
जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वत:ची ओळख सांगणारा भारतीय जनता पक्ष 46 वर्षांचा झाला. भारतीय राजकारणात अनन्यसाधारण महत्व प्राप्त करणार्या या पक्षाचे एकेकाळी देशात केवळ दोन खासदार होते. आज त्यांची संख्या 240 आहे. गेल्या 12 वर्षात या पक्षाने स्वत:ची केलेली प्रगती अक्षरश: तोंडात बोटं घालायला लावणारी आहे. प्रगतीचा हा आलेख सतत्याने वाढतोच आहे. 1984 साली 404 जागा मिळवून एकहाती सत्ता मिळवली त्या काँग्रेससारख्या पक्षालाही जे जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं आणि वयाची पन्नाशी गाठण्याआधी ‘घरावर झेडा’ उत्सव साजरा केला. आपल्या अस्तित्वाची जाणीव त्या पक्षाने करून दिली. समाजमाध्यमांवर याचे पाहिलेले फोटो साजर्या उत्सवाला साजेसे होते. पण त्यात उत्साह किती होता,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोषित, वंचित आणि शेतकरी वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडत जगाला समता व बंधुतेचा विचार दिला. सर्वधर्मसमभाव जोपासणारा त्यांचा हा मानवतावादी विचारच देशाला प्रगतीच्या पथावर पुढे नेणारा आहे, असे प्रतिपादन जय हिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. संगमनेर येथील माळीवाडा भागात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, ॲड. निशा शिवूरकर, डॉ. नामदेव गुंजाळ, अमजद पठाण यांच्यासह विविध पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. तांबे म्हणाले की, भारतीय लोकशाही आणि राज्यघटनेचा पाया हा छत्रपती शिवाजी महाराज,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर समाजातील विविध स्तरावर कौशल्याधारित काम करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे आता अधिकृत शैक्षणिक प्रमाणपत्र प्राप्त होणार असून, यामुळे अनेकांसाठी रोजगाराची नवीन दारे उघडली जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे अनुभवाचे रूपांतर शैक्षणिक पात्रतेत होऊन सर्वसामान्य नागरिकांना प्रगतीची नवी दिशा मिळेल, असा विश्वास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या पूर्व शिक्षण मान्यता मूल्यांकन केंद्राच्या माध्यमातून या प्रक्रियेला गती देण्यासाठी संगमनेर येथील सह्याद्री महाविद्यालयात एका विशेष प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे आयोजन जयहिंद लोकचळवळचे समन्वयक उबेद शेख,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर बहुचर्चित ठरलेल्या काकडी-सुकेवाडी गांजा कारवाईतील न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपीचा जामीन अर्ज संगमनेरचा अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आरोपीचा मुक्काम आता कोठडीतच राहणार आहे. अटकेत असलेल्या प्रथमेश सुरेश गोलवड या आरोपीने आपल्या वकिलामार्फत संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. शेख यांच्या न्यायालयासमोर या जामीन अर्जासंदर्भात सुनावणी झाली. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, १ मार्च २०२६ रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शिर्डीकडून संगमनेरकडे येणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर कारचा पाठलाग करून काकडी परिसरात पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत कारमधून २१ किलो ४९० ग्रॅम अमली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन भोंदूगिरी आणि तोतया पोलिसांच्या मदतीने एका महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅप्टन अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच या नवीन गुन्ह्याने नाशिक शहरात खळबळ उडाली असून फसवणुकीचे हे स्वरूप एखाद्या चित्रपटातील कथानकासारखे भासत आहे. ४० लाखांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या डोंबिवलीतील एका महिला व्यावसायिकाला बाबूराव जाधव नावाच्या व्यक्तीने नाशिकच्या विठोबा जाट या भोंदूबाबाबद्दल माहिती दिली होती. दैवी शक्तीच्या साहाय्याने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून या महिलेला नाशिकला बोलावण्यात आले. सातपूर परिसरातील अमृत गार्डन येथे सुरुवातीला विधी करून महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मुख्य पूजेसाठी तिला सापुतारा परिसरातील निर्जन डोंगरदऱ्यात नेण्यात आले. तेथे दोन कोटी रुपये…
विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. फुकटाच्या योजना चालवताना ज्यांची देणी देता येत नाही, ही बाब अधोरेखित करत न्यायालयाने सरकारचे कान उपटले. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैधानिक हक्कांपासून वंचित ठेवणं कोणत्याही परिस्थितीत अस्वीकारार्ह आहे. सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन आणि अनन्य लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आणि कठोर शब्दांत म्हटले की, सरकारी किंवा महानगरपालिका प्रशासन निधीच्या कमतरतेचे कारण देऊन निवृत्ती वेतन आणि प्रलंबित लाभांच्या वितरणास…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला वारकरी संप्रदाय हा जात-धर्म आणि भेदापलीकडे जाऊन सर्व समाजाला एकत्र गुंफण्याचे कार्य करतो, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. संगमनेर खुर्द येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. कविराज महाराज झावरे यांचे कीर्तन संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, वारकरी संप्रदायाला थोर संतांची परंपरा लाभली असून, संत ज्ञानेश्वरांनी रचलेले ‘पसायदान’ हे केवळ काव्य नसून ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असलेले महाकाव्य आहे. सध्याच्या जागतिक युद्धाच्या आणि अशांततेच्या वातावरणात जगाला पसायदानाचा विचारच तारू शकतो. ज्ञानेश्वर माउलींनी स्वतःच्या आयुष्यात मोठा संघर्ष सोसूनही जगाच्या सुखासाठी साकडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एका छोटा हत्ती वाहनावर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ६४ हजार ५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात दोन खराब आरोपींचा समावेश आहे. स्थानिक पोलीस, राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत सुरू असलेल्या अवैध दारू वाहतुकीवर शुक्रवारी सकाळी अकोले ते धामणगाव पाट रोडवर पाझर तलावाजवळ ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे संगमनेरमधून ही दारू विक्रीसाठी नेली जात होती. श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अकोले परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ व्याख्यानमालेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त जयंती महोत्सव समिती आणि बळीराजा अभ्यास मंडळ यांच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी, ११ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम लेखक आणि पत्रकार पी. साईनाथ हे ‘शेती आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. त्यानंतर १२ एप्रिल रोजी तरुण पिढीतील लोकप्रिय वक्ते डॉ. स्वप्नील चौधरी यांचा ‘चल दंगल समजून घेऊ’ हा संवेदनशील विषयावरील विशेष कार्यक्रम होईल. १३ एप्रिल रोजी वारकरी संप्रदायातील प्रभावी प्रवचनकार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले: उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गुरुवारी सायंकाळी निळवंडे धरणातून १४०० क्युसेक वेगाने पाण्याचे आवर्तन प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे संगमनेर, राहाता आणि श्रीरामपूर या तालुक्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जलसंपदा विभागाला तातडीने सूचना दिल्या होत्या. संगमनेर, राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून गावपातळीवरील जलस्रोत आटले आहेत. यामुळे नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतींसमोर पाणीपुरवठ्याचे मोठे संकट उभे राहिले होते. या सर्व परिस्थितीचा विचार करून हे बिगरसिंचन आवर्तन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले भंडारदरा धरणाच्या मागील बाजूकडील सर्व आदिवासी गावे आणि धरण भिंतीच्या पूर्व भागातील परिसराला शासकीय योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणास अखेर सुरुवात झाली आहे. किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेल्या लाँग मार्चमधील मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी अकोले तहसील कार्यालयात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा व सीटूच्या विविध संघटनांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभाग नोंदवला, तर प्रांताधिकारी अरुण उंडे आणि तहसीलदार मोरे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. बैठकीत कोळेकर यांनी माहिती दिली की, लाँग मार्चमध्ये मान्य झालेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…
