Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात एका अल्पवयीन मुलीच्या चेहऱ्यावर अॅसिड सदृश्य द्रव पदार्थ एकूण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या अमानवीय कृत्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (१७ मार्च) घडली. पीडित मुलगी शाळेतून सायकलवरून घरी जात असताना हाडकीच्या ओढ्याकडून जाणाऱ्या महादेव मळ्याकडील कच्च्या रस्त्यावर एका अज्ञात इसमाने तिला अडवले. साधारण ३२ ते ३५ वयोगटातील या व्यक्तीने रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीला थांबवले आणि अचानक आपल्याकडील बाटलीतील अॅसिडसदृश द्रव पदार्थ तिच्या तोंडावर उजव्या बाजूने फेकला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संगमनेरच्या एका मळ्यात घडली. पीडित मुलगी ही आपल्या ओळखीच्या एका घराकडे खाऊ आणण्यासाठी जात असताना, आरोपीने तिचा पाठलाग केला. आरोपीने निर्जन ठिकाणी मुलीचा हात पकडून तिला ओढत नेले आणि तिचे कपडे काढून तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर पीडित मुलीच्या ३६ वर्षीय मातेने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीविरुद्ध…
शिर्डी, विशेष प्रतिनिधी- तीर्थक्षेत्र शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या एका २४ वर्षीय तरुणीचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आस्था सिंग (रा. सतना, मध्य प्रदेश) असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. निमगाव शिवार येथील ‘हॉटेल साईबाबा इंटरनॅशनल सुप्रीम’मध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला आहे. पाडव्याच्या दिवशी समोर आलेल्या या घटनेमुळे पोलीस यंत्रणे समोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आस्था सिंग आणि तिच्यासोबत आलेल्या व्यक्तींनी बुधवारी या हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक केल्या होत्या. मात्र, त्याच रात्री उशिरा आस्था राहत असलेल्या खोलीतून जोरात ओरडण्याचे आणि…
नाशिक रोड (प्रतिनिधी): इतिहास सांगतो की ज्या-ज्या वेळी शेअर बाजार कोसळतो, त्यानंतर तो पुन्हा सावरतो आणि वाढतो. सध्या इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांच्या मनातही चिंतेचे युद्ध सुरू आहे. मात्र, अशा काळात विचलित न होता संयमाने गुंतवणूक सुरू ठेवणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर तुमची गुंतवणूक मुलांचे शिक्षण किंवा निवृत्तीनंतरचे नियोजन अशा दीर्घकालीन ध्येयासाठी असेल, तर युद्धाच्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या मनातील भीतीचे युद्ध थांबवा, असे प्रतिपादन तज्ज्ञ सुनील कडलग यांनी केले. नाशिक रोड येथील जय भवानी ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे हॉटेल हरियालीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ‘म्युच्युअल फंडाद्वारे पेन्शनचे नियोजन व सायबर सिक्युरिटी’ या विषयावर आयोजित विशेष कार्यक्रमात…
आजचे राशीभविष्य: गुरुवार, १९ मार्च २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होऊन वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, मात्र घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याने चालल्यास मोठे लाभ होतील. मिथुन: आज तुम्हाला बौद्धिक कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीकारक ठरेल.…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर झालेल्या अमानवीय ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवारी) संगमनेरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या भ्याड हल्ल्यातील आरोपीला त्वरित अटक करून त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनाद्वारे शिवसेनेने प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये पीडित विद्यार्थिनीला तातडीने उत्तम वैद्यकीय उपचार आणि शासनाकडून भरीव आर्थिक नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असल्याचे…
संगमनेर, प्रतिनिधी- तालुक्यातील वडगाव पान येथे एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर भरदिवसा झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्यामुळे संपूर्ण तालुका हादरून गेला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी वडगाव पान आणि तळेगाव फाटा परिसरातील ग्रामस्थ, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. संतप्त आंदोलकांनी महामार्ग अडवत जोरदार ‘रास्ता रोको’ केला आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांसह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवून पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही संतापजनक…
संगमनेर, प्रतिनिधी- राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आणि आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर शहरातील रस्ते विकासासाठी रस्ते अनुदान योजनेतून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमांतून रस्ता अनुदानासाठी एकूण १५७.६० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. या मोठ्या निधीतून संगमनेर शहराच्या वाट्याला ५० लाख रुपये मिळावेत, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी शासन स्तरावर विशेष प्रयत्न केले होते.…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील शालेय विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने केलेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेर शहरात सुवर्णकार समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, सुवर्णकार समाज संघटनेसह सराफ, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. बाजारपेठ, सय्यदबाबा चौक, मेनरोड या शहरातील प्रमुख मार्गावरून शांततेत काढण्यात आलेल्या या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी कोणतीही घोषणाबाजी न करता आपला तीव्र निषेध नोंदवला. प्रांत अधिकारी, पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस ठाण्यावर नेलेल्या मूक मोर्चेकर्यांनी पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपाधीक्षक कार्यालयाचे मोरे आणि नायब तहसीलदार माळवे…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे काल एका अल्पवयीन मुलीवर ॲसिडसदृश पदार्थाने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अद्याप आरोपींचा पत्ता लागलेला नसला तरी दहा पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना झाली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२४(१) आणि १२६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तब्बल दहा पथके तैनात करण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांसह सायबर…
