Author: Annant Ppangarkar
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास घेऊन येईल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी पूर्ण करून घेणे फायदेशीर ठरेल. मित्र आणि कुटुंबाच्या सहकार्याने मोठी कामे पार पडतील. आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल. वृषभ – व्यवसायात धनलाभाचे उत्तम योग आहेत. भौतिक सुखांमध्ये वाढ होईल आणि अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. कामातील गुप्त गोष्टी आणि वादग्रस्त विषय योग्य रीतीने हाताळा. मिथुन – जिद्दीने आणि मेहनतीने काम केल्यास अपेक्षित यश मिळेल. जुने नातेवाईक आणि मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन योजना आखू शकाल, मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कर्क – दैनंदिन कामांमध्ये काही अडथळे येण्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: दलित, शोषितांचा आपल्या साहित्यातून आवाज बुलंद करणारे आणि हक्कांसाठी लढा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून मोठी क्रांती केली आहे. त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी असून लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून संगमनेर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अद्यावत स्मारक लवकरात लवकर साकारण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली. संगमनेर हायटेक बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तही त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी बोलताना डॉ. तांबे यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर येथील ‘मालपाणी हेल्थ क्लब’ येथे गुरुवारी ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या सत्रात उपस्थितांनी आर्थिक नियोजन आणि संपत्ती निर्मितीविषयक मार्गदर्शन घेतले. सुरत येथील प्रसिद्ध प्रशिक्षक व आर्थिक तज्ज्ञ पलक शाह यांनी या कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनातील सोपी उदाहरणे देत आर्थिक शिस्त, ध्येय-आधारित गुंतवणूक, महागाईचा प्रभाव, चक्रवाढ व्याजाची ताकद, एसआयपी, वारसा नियोजन आणि मृत्युपत्राचे महत्त्व यांसारख्या मुद्द्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन बालरोगतज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश सिकची यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपीठावर ‘एनजे वेल्थ’चे विभागीय प्रमुख विक्रमसिंह परदेशी, लेखापरीक्षक…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत धनलाभाचे योग आहेत, परंतु विनाकारण होणारा खर्च टाळणे गरजेचे आहे. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि उत्साह राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज व्यवसायात किंवा नोकरीत थोडे संयमाने काम करण्याची गरज आहे. घाईगडबडीत घेतलेले निर्णय नुकसान पोहोचवू शकतात. आर्थिक स्थिती मध्यम राहील, त्यामुळे जुन्या गुंतवणुकीवर भर द्या. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्याने गैरसमज दूर होतील. संध्याकाळच्या वेळी मानसिक शांतता लाभेल. मिथुन – आजचा दिवस सकारात्मक बदलांचा आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे वेगाने पूर्ण होतील.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीचा लढा आता एका निर्णायक वळणावर पोहोचला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगामी ९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रांतीदिनी सकाळी ९ वाजता नाशिक-पुणे महामार्गावर एकाच वेळी भव्य ‘चक्काजाम’ जनआंदोलन पुकारण्यात आले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या आंदोलनाची घोषणा करताना ही लढाई कोणत्याही एका राजकीय पक्षाची किंवा नेत्याची नसून, ती सामान्य नागरिकांच्या भविष्याची असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. सध्या एका बाजूला केंद्रीय मंत्र्यांकडून हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले जात असले तरी दुसरीकडे जनतेच्या अपेक्षा आणि गरज अद्यापही कायम आहेत. सरकारने कोणत्याही प्रकारचा संकुचित नफा-तोट्याचा विचार न…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल आणि हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात परस्पर सुसंवाद आणि आनंद राहील. वृषभ – आज तुमच्या प्रगतीची नवीन दालने उघडतील. व्यवसायात नवीन विचारांचा अंमल कराल. जोडीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. निर्णय घेताना घाईगडबड टाळा आणि बोलण्यावर संयम ठेवा. मिथुन – आजचा दिवस संमिश्र तऱ्हेचा राहील. व्यापाऱ्यांना व्यवसायात चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि मुलांकडून आनंददायी बातमी मिळेल. कर्क – मालमत्तेशी संबंधित व्यवहारांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरीमध्ये मनासारखी जबाबदारी मिळाल्याने उत्साह वाढेल. कामाचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत संगमनेर तालुकास्तरीय विशेष शिबिर व कार्यक्रम उद्या शुक्रवारी (३१ जुलै) आयोजित करण्यात आला आहे. मालपाणी लॉन्स येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे. या कार्यक्रमात विविध शासकीय विभागांच्या योजनांचे लाभ नागरिकांना प्रत्यक्ष वाटप केले जातील. तसेच नवीन योजनांचे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या कल्याणकारी योजना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज अजिंक्य राहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्तीची घोषणा करताना अजिंक्य अत्यंत भावुक झाला होता. देशासाठी खेळताना नेहमीच सच्चेपणाने योगदान दिल्याचे सांगत, भारतीय क्रिकेटच्या या गौरवशाली पर्वाचा भाग होता आल्याबद्दल त्याने मनापासून समाधान व्यक्त केले. खेळणे थांबवले तरी खेळाप्रति योगदान देण्याचा ध्यास कायम राहील, असा विश्वासही त्याने यावेळी दिला. डोंबिवली ते मुंबई असा लोकल ट्रेनने खडतर प्रवास करत क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या अजिंक्यने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईसाठी दमदार कामगिरी करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले होते. सुरुवातीच्या काळात दिग्गजांच्या उपस्थितीमुळे प्रदीर्घ वेळ राखीव बाकावर बसावे लागले, तरीही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई / संगमनेर: संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याप्रकारणी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलेला निर्णय कायम ठेवताना, सर्वोच्च न्यायालयाने खताळ यांची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे खताळ यांच्याविरोधात उच्च न्यायालयात रीतसर खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांची आमदारकी थेट धोक्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान अमोल खताळ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली व्यावसायिक भागीदारी, उत्पन्न आणि कराची थकबाकी लपवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला होता. थोरात यांच्या बाजूने वकील ॲड. अमित…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: मुलींच्या शिक्षण व स्वावलंबनाच्या गप्पा मारल्या जात असतानाच संगमनेर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी अल्पवयीन आहे हे स्पष्ट माहीत असूनही कायद्याची पायमल्ली करत तिचे लग्न लावून देणाऱ्या ५ जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साकुर येथील राजा बिरोबा मंगल कार्यालयात २४ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा बालविवाह पार पडला. मुलगी १८ वर्षांपेक्षा लहान असल्याची पूर्ण जाणीव असतानाही आरोपींनी लपून-छपून हा विवाह उरकला. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी सागर परसराम रसाळ (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता असून त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्या आणि महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचला. वृषभ – आज तुम्हाला व्यवसायात आणि दैनंदिन कामात चांगले यश मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत संयम बाळगणे गरजेचे आहे, अवाजवी खर्च टाळावा. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. मिथुन – आजचा दिवस सर्जनशील कामांसाठी आणि नवीन योजना आखण्यासाठी उत्तम आहे. तुमचे विचार स्पष्ट असल्यामुळे तुम्ही इतरांना प्रभावित करू शकाल.…
संगमनेर: तहसील, प्रांत, दिवाणी व जिल्हा न्यायालय आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजय मिळवूनही मंगळापूर येथील शेतकऱ्यांना अजूनही सामाईक रस्ता मिळालेला नाही. सक्षम प्राधिकरणांचा शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागूनही संगमनेर तहसील कार्यालयाकडून प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने उच्च न्यायालयाचे आदेश मोठे की तहसीलदार, असा संतप्त सवाल तालुक्यातील शेतकरी उपस्थित करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील सर्व्हे नंबर ७८ मधील सामाईक रस्त्यावर काही व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून तो अडवला आहे. यामुळे बाधित शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून मशागत, पिकांची व अवजारांची वाहतूक करणे अशक्य झाले आहे. याविरोधात आप्पा पवार, सिताराम पवार, सूर्यभान पवार, बाळकृष्ण पवार, रावसाहेब…
अहिल्यानगर | प्रतिनिधी: येथील बोल्हेगाव फाटा परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात ( दिंडोरी प्रणित) रविवारी ( ता. २६ जुलै) सकाळी ८ ते ११ या वेळेत स्वामी चरित्र या ग्रंथाचे तब्बल २७ हजार पारायण पार पडले. राज्याच्या अध्यात्मिक क्षेत्रातील एकाच दिवसाच्या पारायणाचा हा उच्चांक मानला जातो. केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर (काका) लोळगे यांच्या नेतृत्वाखालील टीमने हा अभिनव उपक्रम यशस्वी केला. आज सकाळी सात वाजल्यापासूनच केंद्राकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पारायणासाठी आलेल्या भाविकांसाठी भव्यदिव्य मंडपात प्रशस्त बैठक व मोठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी आठ वाजता एका सेवेकरी जोडप्याच्या हस्ते स्वामी समर्थांची आरती होवून पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. तीन टप्प्यांमध्ये…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, परंतु आरोग्याबाबत थोडी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावले उचला आणि अनावश्यक खर्च टाळा. वृषभ – आजचा दिवस संयम आणि शांततेने काम करण्याचा आहे. व्यवसायात नवीन योजना आखताना घाईगडबड करू नका, अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल आणि आर्थिक स्थिती स्थिर राहील. मिथुन – आज तुम्हाला विविध क्षेत्रांत यश मिळण्याचे योग आहेत. बुद्धिमत्ता आणि संवाद…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या प्रत्येक लढाईमध्ये भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य आणि त्याग दाखवला आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर रात्रंदिवस पहारा देणाऱ्या सैनिकांमुळेच देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित आणि शांत झोपू शकतो. पाकिस्तानच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी कारगिल युद्धात मिळवलेला विजय हा आपल्या इतिहासातील अत्यंत सुवर्ण आणि महत्त्वाचा अध्याय आहे. या पराक्रमाचे आणि हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण कायम राहावे, यासाठी संगमनेरमध्ये राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक उभारले जाईल. या स्मारकासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वेल्हाळे परिसरातील ४२ गुंठे जागा देण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री…
प्रवीण पुरो दिल्लीच्या जंतरमंतरवर जमलेल्या देशातील युवा पिढीने नरेंद्र मोदींच्या सरकारची घमेंड पुरती मोडली आहे. “कुठल्याही परिस्थितीत राजीनामा नाही म्हणजे नाही,” असा सूर आवळून बसलेल्या मोदींना अखेर माघार घ्यावी लागली. ती त्यांची मजबुरी होती. ‘जेन झी’ला कस्पटासमान वागवणाऱ्या सरकारवर नामुष्की आली आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात लाडके मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिपद सोडावे लागले. प्रधान यांनी पद सोडले नसते तर देशभर हल्लाबोल झाला असता, याची जाणीव मोदी आणि अमित शहांना झाली हे बरे झाले. भक्तांच्या खोट्या पाठिंब्यावर या दोघांची मदार असते. भक्त काल आणि परवाही सत्तेची लाली टिपत होते. प्रधानांनी राजीनामा दिला तरीही भक्तांची जात ४० पैशांचे काम इतबाराने करत होती.…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही अतिशय उत्तमरीत्या पार पाडाल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रियजनांचे सहकार्य लाभेल. आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. वृषभ – आज आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. व्यापाऱ्यांना नवीन योजनेतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय राखून चालल्यास मनःशांती लाभेल. दिवसभरात एखादी गोड बातमी ऐकायला मिळू शकते. मिथुन – आज कला आणि निर्मितीक्षम कामांमध्ये तुमची आवड वाढेल. नोकरदारांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. निरर्थक चिंतांपासून दूर राहून सकारात्मक विचारांवर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: केंद्रातील हुकूमशाही आणि गर्विष्ठ सरकारला देशातील तरुणाईने पुरते नमवले आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्यानंतर पेटून उठलेल्या या संघर्षापुढे झुकत केंद्र सरकारला शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच लागला. या ऐतिहासिक यशाचे संगमनेरमध्ये काँग्रेससह सर्व समविचारी व पुरोगामी पक्षांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी व केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी आता संपूर्ण तरुणाई सज्ज झाली आहे, असा घणाघाती इशारा संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिला. दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या २८ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर अभूतपूर्व यश मिळाले. संगमनेर बस स्थानक परिसरात शहर व तालुका युवक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, आळेफाटा: हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पोती धरून कचरा गोळा करण्याचा बनाव करत बंद घरांची रेकी करून घरफोडी करणाऱ्या एका अट्टल टोळीचा आळेफाटा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सतर्क नागरिकांच्या मदतीने दोन महिलांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आळेखिंड परिसरातील समाधान हॉटेलच्या मागील भागात दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. संतवाडी शिवारात राहणाऱ्या भामाबाई सोनभाऊ निमसे यांचे घर बंद असल्याचे पाहून ३ महिला व १ पुरुष अशा चार जणांच्या टोळीने दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश केला. घरातील जुनी तांब्या-पितळची भांडी आणि पाण्याचा बंब त्यांनी आणलेल्या पोत्यात…
आजचे राशीभविष्य मेष – आजच्या दिवशी आर्थिक नियोजनावर भर देणे आवश्यक ठरेल. अनपेक्षित खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु व्यावसायिक क्षेत्रातील नवीन योजनांमुळे भविष्यात चांगला नफा मिळेल. कौटुंबिक वातावरणात आनंद राहील आणि मुलांकडून शुभवार्ता मिळतील. वृषभ – कामाच्या ठिकाणी आजचा दिवस अतिशय फायदेशीर ठरेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन मालमत्ता किंवा गुंतवणूक करताना पूर्ण काळजी घ्या. आर्थिक आवक स्थिर असली तरी विनाकारण खर्च करणे टाळा. मिथुन – आज सहजीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. अनावश्यक खरेदी टाळून बजेटवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी काही अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. कर्क – व्यावसायिक…
