Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर येथील जेष्ठ पत्रकार विनोद बूब (वय ७८) यांचे रविवारी (दिनांक २० सप्टेंबर) पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळातून दुःख व्यक्त केले जात आहे. पत्रकार अंकुश बुब यांचे ते चुलते होते. गेल्या काही दशकांपासून त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून संगमनेर आणि परिसरातील विविध समस्यांवर सातत्याने प्रकाश टाकला. अभ्यासू वृत्ती, समाजकार्याची आवड आणि नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करण्याची त्यांची शैली यामुळे पत्रकारिता क्षेत्रात ते परिचित होते. त्यांच्या निधनाने एका मार्गदर्शक आणि अभ्यासू पत्रकाराला समाज मुकला आहे. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी (२१ सप्टेंबर) २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघून…
प्रवीण पुरो- बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी गेली अनेक वर्षे लढा देणाऱ्या मराठी महाराष्ट्राच्या खपल्या कशा काढल्या जात आहेत, आणि सत्तेसाठी लाचार झालेले त्या कशा पचवताहेत, याचा आखोहाल नुकताच नवी मुंबई वाशीत पाहायला मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या देखत देशाचे गृहमंत्री असलेल्या अमित शहांनी महाराष्ट्राच्या मराठीचा धडधडीत अपमान करत हे राज्य देशातील सर्वात मोठे बहुभाषिक राज्य असल्याचे सांगून टाकले. एखाद्या राज्याचा जाणीवपूर्वक अवमान करण्याचा हा अश्लाघ्य प्रकार होय. ठरवून आणि मराठीचा अवमान करावा, अशा हेतूने हे सारे घडत असताना राज्यकर्ते निमूट गृहमंत्र्यांचे तोंड पाहत होते. अमित शहांपुढे तोंड उघडण्याची हिंमत त्यांनी केव्हाच गमावली आहे. राज्यातल्या सत्तेचे जणू अमित शहाच मालक…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन आला आहे. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आज तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि धनलाभाचे योग आहेत. आरोग्याची साथ उत्तम लाभेल, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मनासारख्या गोष्टी घडल्याने दिवस आनंदात जाईल. वृषभ – आज मनात प्रसन्नता राहील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल, ज्यामुळे रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवनात गोडवा राहील आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवता येईल. अचानक काही प्रवास घडू शकतात,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा, ऐनवेळी होणारे शटडाऊन आणि त्रासदायक भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या हक्कासाठी संगमनेर तालुका काँग्रेस आक्रमक झाली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात येत आहे. या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गावोगावी धाव घेत जोरदार जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे तसेच युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस अध्यक्ष अजय फटांगरे, शहर काँग्रेस अध्यक्ष सोमेश्वर दिवटे आणि कार्याध्यक्ष अमोल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके जळून खाक झाली असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने पंचनाम्यांचा फार्स न करता राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. वडगाव पान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात आयोजित शेतकरी मेळावा, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. सभापती शंकर पाटील खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माधवराव कानवडे, डॉ. जयश्रीताई थोरात, बाबासाहेब ओहोळ, उपसभापती गीताराम गायकवाड आणि सचिव सतीश…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पारदर्शक कामकाज आणि गुणवत्तेच्या जोरावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सभासद व शेतकऱ्यांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. आगामी २०२६-२७ च्या गळीत हंगामात कमी कालावधीत जास्त गाळप करण्याचे आव्हान असून, ११ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवून सर्वांनी पूर्ण क्षमतेने काम करावे, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ या वर्षाच्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, माधवराव कानवडे, व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, बाबा ओहोळ, डॉ. जयश्रीताई…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत बेकायदेशीर गॅस रिफिलींगचा काळाबाजार उघडकीस आणला आहे. तपोवन रोडवरील दक्षतानगर भागात छापा टाकून पोलिसांनी २१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये भारत व एचपी कंपनीच्या तब्बल १३३ घरगुती व कमर्शियल टाक्यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करत होते. तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना, तपोवन रोड येथील दक्षतानगरमध्ये किरण संतोष गलांडे याच्या गाळ्यामागील मोकळ्या जागेत घरगुती गॅस…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने आयोजित ‘संगमनेर फेस्टिव्हल’च्या तिसऱ्या दिवशी ‘सजदा’ या सुफियाना संगीत सोहळ्याने रसिकांना संगीताची अनोखी पर्वणी दिली. प्रसिद्ध गायक संदीप पंचवटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या सुरेल रचनांमुळे संपूर्ण वातावरण अध्यात्मिक आणि सुफियाना रंगात न्हाऊन निघाले होते. गेल्या १८ वर्षांपासून संगमनेरचा सांस्कृतिक मानबिंदू ठरलेल्या या महोत्सवात संदीप पंचवटकर यांनी आपल्या दिलखुलास सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली. ‘सुकून के साथ… करते हैं आगाज’ या भावाने सुरू झालेल्या या मैफलीत एकापाठोपाठ एक सरस फिल्मी आणि गैर-फिल्मी सुफी गीते सादर करण्यात आली. ‘सजदों से जब मेरी जागे…’ यांसारख्या प्रसिद्ध रचनांवर रसिक श्रोते तल्लीन…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी चालून येतील आणि तुमच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण झाल्याने मानसिक समाधान लाभेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. वृषभ – आजचा दिवस मध्यम फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे संयम बाळगणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळावा आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. संध्याकाळच्या वेळी कौटुंबिक सदस्यांसोबत वेळ घालवल्याने ताणतणाव कमी होईल. मिथुन – आज तुम्हाला सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यापाऱ्यांना व्यवसायात नवीन मार्ग सापडतील आणि चांगला धनलाभ संभवतो. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. प्रिय व्यक्तीशी मनमोकळा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे. संगमनेर शहर पोलिसांच्या एकूणच संशयास्पद आणि धक्कादायक कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर, या संपूर्ण प्रकरणाचा तपास अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) वर्ग करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी संगमनेर दौऱ्यावर असताना काल हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. वरिष्ठांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला असला, तरी एका निष्पाप तरुणाला बनावट गुन्ह्यात अडकविणाऱ्या त्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्याला अद्यापही ‘अभय’ का दिले जात आहे, असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक आणि विविध स्तरातून विचारला जात आहे. मागील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्याचा विकास हा कष्टातून उभा राहिला असून केवळ मोबाईलवर अफवा आणि गैरसमज पसरवणाऱ्या निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये, असा घणाघाती हल्ला राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर केला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, दुर्गाताई तांबे, रणजीत सिंह देशमुख, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, डॉ. जयश्रीताई थोरात, बुवाजी बाबा पुणेकर, शरद नाना थोरात, मधुकरराव नवले, लहानभाऊ गुंजाळ, आर. बी. राहणे, रामदास वाघ, गणपतराव सांगळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर फेस्टिव्हलमधील दुसरा दिवस गाजवला तो विख्यात संगीतकार ए.आर.रहमान यांच्या सदाबहार गीतांनी. या गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला. सुरुवातीपासूनच कार्यक्रमाने रसिकांच्या मनाची पकड घेतली आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रम रंगतच गेला. वाद्यवृंद क्षेत्रातील दिग्गज कलावंत मिलिंद ओक यांच्या निश एंटरटेनमेंट्स या संस्थेची निर्मिती असलेला ‘अ म्युझिकल ऑन ए.आर.रहमान – स्टोरी ऑफ अ जनरेशन’ हा सुपरहिट नव्या आणि जुन्या गीतांचा संगीतमय नजराणा मालपाणी लॉन्सच्या आलिशान रंगभूमीवर सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला रसिकांनी क्षणोक्षणी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अक्षरशः डोक्यावर घेतले. रंगमंचावरील मोठ्या एलईडी पडद्यावर रहेमान यांच्या जीवनप्रवासाची दृश्ये, सिनेक्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतींचे अंश, चित्रपटातील गीतांची निवडक दृश्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील प्रवाशांच्या सुविधेसाठी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी बसफेऱ्या कोकणाकडे वळवण्यात आल्याने स्थानिक प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी सरकार व एसटी प्रशासनाच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बसेस पाठवण्यात आल्याबद्दल आक्षेप नाही; मात्र त्यामुळे ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द करून प्रवाशांना वेठीस धरणे अयोग्य असल्याचे शेलकर यांनी स्पष्ट केले. कोकणातील नागरिक हिंदू आहेत आणि ते गणेशोत्सव साजरा करतात म्हणून तेथे गाड्या दिल्या; मग ग्रामीण महाराष्ट्रात हिंदू नाहीत का आणि येथे गणेशोत्सव नाही का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. ग्रामीण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. डॉक्टरांनी आपल्या ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाचा उपयोग समाजातील गरजू, वंचित व दुर्गम भागातील नागरिकांच्या सेवेसाठी करून सेवा भाव सातत्याने जपला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सतिष महाजन यांनी केले. अकोले तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘आत्मा गणेश उत्सव २०२६’ अंतर्गत “डॉक्टर आणि समाजकारणातील संधी” या विषयावर विशेष परिसंवाद पार पडला. या परिसंवादात बोलताना डॉ. महाजन यांनी स्पष्ट केले की, डॉक्टर हा समाजातील अत्यंत विश्वासार्ह घटक आहे. रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा आणि छुप्या मार्गाने होणाऱ्या वाळू वाहतुकीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कारवाईचा बडगा उचलला आहे. राहाता आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापे टाकून वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ३ आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे, तर कारवाईदरम्यान २ आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर, विशेषतः वाळू माफिया आणि अवैध वाळू वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशांच्या…
आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमचे सर्व अडकलेले काम आज मार्गी लागेल. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसून येईल, परंतु वायफळ खर्च टाळणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्यास नाते अधिक दृढ होईल. आरोग्याची काळजी घ्या आणि वेळेवर आहार घ्या. वृषभ आज मनात नवीन विचार येतील जे तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जातील. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनाला प्रसन्नता लाभेल. घरातील वातावरणात आनंद आणि शांतता राहील. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयावर विचारपूर्वक पाऊल टाका. दिवसभरात मानसिक प्रसन्नता टिकून राहील. मिथुन आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. कामाच्या ताणामुळे थोडी…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ आज तब्बल चार लाख लिटरपर्यंत दूध संकलन करत आहे. प्रत्येक टप्प्यावर दूध संघाने यशस्वी वाटचाल केली असून, मुक्त संचार गोठा आणि मुरघास ही या संघाने संपूर्ण राज्याला दिलेली मोठी देण आहे. संगमनेर तालुका दूध संघाचे भक्कम संरक्षण पाठीशी असल्यामुळेच आज खाजगी व्यावसायिक शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव देत आहेत. निर्भेळ आणि गुणवत्तेचे दूध हेच वैशिष्ट्य असल्याने राजहंस हा गुणवत्तेचा व विश्वासाचा अस्सल ब्रँड बनला आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- तणावग्रस्त जीवनशैलीच्या काळात लोकांना हसवणे हे सर्वात मोठे पुण्याचे काम असून औषधांपेक्षा हास्याचे डोस अधिक गुणकारी आहेत, असे प्रतिपादन संगमनेर फेस्टिवलचे प्रणेते व उद्योगपती मनीष मालपाणी यांनी केले. राजस्थान युवक मंडळ, मालपाणी उद्योग समूह, संगमनेर नगरपरिषद, शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळे आणि संगमनेरकरांच्या सहभागातून आयोजित १८ व्या संगमनेर फेस्टिवलचे शानदार उद्घाटन संगमनेरच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या हस्ते मालपाणी लॉन्स येथे पार पडले. पहिल्याच दिवशी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते समीर चौगुले यांच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ या एकपात्री प्रयोगाने संगमनेरकरांना हसवून जिंकून घेतले. उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय मालपाणी, राजस्थान युवक मंडळाचे कार्याध्यक्ष सागर…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: ‘आपली संस्कृती, आपला अभिमान’ या विचाराला कृतीची जोड देत आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आलेला ‘महावादन सोहळा’ बुधवारी अत्यंत जल्लोषात पार पडला. परंपरेचा आणि संस्कृतीचा समृद्ध ठेवा जपणारा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो संगमनेरकरांनी गर्दी केली होती. पाच प्रसिद्ध ढोल-ताशा पथकांच्या दमदार सादरीकरणाने संपूर्ण संगमनेर शहर मंत्रमुग्ध होऊन गेले. महावादन सोहळ्याचे हे दुसरे वर्ष होते. या सांस्कृतिक सोहळ्यात तांडव, हिंदूराजा, रुद्र प्रतिष्ठान, छावा आणि एकलव्य गर्जना या पाच ढोल-ताशा पथकांनी आपल्या उत्कृष्ट वादनाचे प्रात्यक्षिक सादर केले. पथकांच्या पारंपरिक कौशल्यामुळे, शिस्तीमुळे आणि जोशपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले. ढोल-ताशांच्या कडकडाटात…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शेतकी सहकारी संघ ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. तिची काळजीपूर्वक जपणूक करताना काळाची गरज ओळखून धाडसी, दूरदृष्टीचे आणि शेतकरीहिताचे निर्णय घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर शेतकी सहकारी संघाच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे उपस्थित होते. थोरात म्हणाले, शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून अनेक संस्था उभ्या राहिल्या. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या…
