Author: अनंत पांगारकर

मंगळवार, १६ जुलै म्युच्युअल फंड्स गुंतवणूक, जीवन विमा, मेडीक्लेम विमा क्षेत्रातील प्रथितयश ब्रँड म्हणून नावारूपास आलेल्या कडलग इन्व्हेस्टमेंट या फर्मच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी माईंड एक्सलंस प्रोग्रामचे प्रशिक्षण माईंड एक्सलंस कोच व ट्रेनर सुधीर फरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे. माईंड एक्सलंस टेक्नॉलॉजीजद्वारे आयोजित हा १४ आठवड्यांचा कार्यक्रम अत्याधुनिक पद्धतीने संमोहन व NLP तंत्रांचा वापर करून व्यक्तिगत व व्यावसायिक क्षमतांचा विकास घडवून आणण्यासाठी बनवला आहे. कडलग इन्व्हेस्टमेंट फर्मचे संचालक सुनील कडलग व आदित्य कडलग यांच्या प्रेरणेतून या प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे पहिले सत्र नुकतेच पार पडले असून, फरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू झाले आहे. यामुळे कर्मचार्‍यांचे मानसिक ताण तणाव कमी…

Read More

मंगळवार, १६ जुलै  सध्या सुरू असलेल्या पावसामुळे संगमनेरमधून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाच्या झालेल्या दुरवस्थेवर सोमवारी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने एका बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकताच काही वेळातच या मार्गाच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांसह स्थानिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. या मार्गाची काही छायाचित्रे या परिसरातील स्थानिक जागरूक नागरिकांनी महाराष्ट्र संवाद न्यूजला पाठविली होती. संगमनेर शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्णत्वास गेल्याने हा मार्ग अतिशय चांगला झाला, हा समज संगमनेरात सध्या सुरू असलेल्या पावसाने खोटा ठरविला असून यामुळे ठेकेदाराच्या कामाची पोलखोल झाली आहे. यामुळे सरकारचा या कामावरील पैसा पाण्यात गेला आहे. या संदर्भात महाराष्ट्र संवाद न्यूजने…

Read More

सोमवार १५ जुलै  खरीप हंगामामध्ये सर्वसाधारण आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मुग, उडिद, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफुल या ११ पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या पीक स्पर्धेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेमध्ये वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशिल शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पाकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढुन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकुण उत्पादनात भर पडेल, या…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत सेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांच्या नावाने बारावा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानेच शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले होते. मात्र मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा उद्धव ठाकरेंचा हट्ट त्यांनी अखेरपर्यंत सोडला नाही. हीच जयंत पाटील यांच्यासाठी ती धोक्याची घंटा ठरली. अशात शरद पवार यांनी जयंत पाटील यांना पूर्ण पाठिंबा दिला असला तरी, उद्धव ठाकरे यांचा जयंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होता, अशी चर्चा आता समोर आलीय. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधात जयंत…

Read More

सोमवार १५ जुलै  शहर आणि उपनगरात घंटागाड्यांच्या माध्यमातून फिरून स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या कामगारांच्या मोकळ्या मैदानावरील वस्तीमुळे, त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत. शहर स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने या सफाई कामगारांच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र करावी, यासाठी परिसरातील नागरिक एकवटले असून या नागरिकांचे त्रासातून मुक्तता करण्यासाठी स्थानिक प्रशासन दखल घेत नसल्याने थेट आरोग्य मंत्रालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख प्रसाद पवार यांनी दिला आहे. शहर स्वच्छतेचा ठेका नाशिकच्या एका कंपनीला देण्यात आला या कंपनीशी संलग्न सफाई कामगारांची शहरातील परदेशपुरा भागातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ अनाधिकृत वस्ती निर्माण करण्यात आली असून या…

Read More

सोमवार १५ जुलै  दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतुळ येथे शेतकरी गेली दहा दिवस धरणे आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आज कोतुळ बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी व ग्रामस्थांनी दूध उत्पादकांच्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधले. कोतुळ येथील खटपट नाका चौकामध्ये शेकडोच्या संख्येने शेतकरी यावेळी एकत्र आले होते. आंदोलनाच्या मंडपाच्या समोर दूध हंडी फोडण्याचे आंदोलन यावेळी करण्यात आले. वारकरी संप्रदायाने यावेळी आंदोलनाला पाठिंबा दिला. अभंग व भजनाच्या निनादांमध्ये मध्यवर्ती चौकात बांधण्यात आलेली हंडी शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडली व सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणा दिल्या. दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळाला पाहिजे, दूध क्षेत्रातील अस्थिरता संपवण्यासाठी दुधाला…

Read More

सोमवार १५ जुलै  ६५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या आणि १४ वर्षापेक्षा अधिक शिक्षा भोगलेल्या आरोपीला सोडून देण्यासाठी आवश्यक असणारे फिटफॉर सर्टिफिकेट देण्याकरिता तीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या नासिकमधील मध्यवर्ती कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यास एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. डॉ. आबिद आबू अत्तार (वय ४०, वर्ग- १ पद – मुख्य वैदयकिय अधिकारी, मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड रा. मध्यवर्ती कारागृह वसाहत, नाशिकरोड) व डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (वय ४२, वर्ग-२ पद- वैदयकिय अधिकारी, मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड रा. इंदिरानगर, नाशिक) अशी लाच घेणाऱ्या दोघा डॉक्टरांची नावे असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या एसीबीने रविवारी ही कारवाई केली. अधिक माहिती अशी, एसीबीकडे तक्रार…

Read More

सोमवार १५ जुलै संगमनेर शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्णत्वास गेल्याने हा मार्ग अतिशय चांगला झाला, हा समज संगमनेरात सध्या सुरू असलेल्या पावसाने खोटा ठरविला असून यामुळे ठेकेदाराच्या कामाची पोलखोल झाली आहे. यामुळे सरकारचा या कामावरील पैसा पाण्यात गेला आहे. संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गाला बाह्यवळण मार्ग मिळाल्यानंतर त्या पाठोपाठ संगमनेरमधून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाचेही काम झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी रुंद झाला होता. मात्र या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट राहिल्याने वारंवार धुळीचा सामना करावा लागत होता. त्यातच आता पावसाळा सुरू झाल्याने वर्षभराच्या आतच या रस्त्याच्या कामाचे प्रगती पुस्तकच समोर आले आहे. या कामावर सरकारचा कोट्यावधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला…

Read More

सोमवार, १५ जुलै  लग्नाच्या काही महिन्यानंतर किरकोळ कारणांवरून वाद उकरून काढत पतीपासून घटस्फोट मिळविण्यासाठी न्यायालयाची पायरी चढणाऱ्या महिलांना पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने गेल्या आठवड्यात एका निकालाच्या माध्यमातून चपराक लगावली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास तिची नैतिक अथवा आर्थिक जबाबदारी पतीवर राहत नाही, असे नमूद करीत न्यायालयाने पत्नी कमावती असल्याने तिचा पोटगीचा अर्ज नाकारत केवळ मुलीला पोटगी देण्याचा आदेश दिला. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश रघुवेंद्र आराध्ये यांनी हा निकाल दिला. दावा दाखल केल्यापासून याचिकेचा निकाल लागेपर्यंत मुलीला दरमहा पाच हजार रुपये पोटगी द्यावी, असे आदेशात नमूद आहे. राकेश आणि सीमा (नावे बदललेली) यांचा विवाह २९ डिसेंबर १९९६ रोजी झाला होता. या दांपत्याला एक…

Read More

रविवार, १४ जुलै उधारीवर घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यापोटी दिलेला चेक बँकेत न वठल्याने दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये संगमनेर न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी संदीप रंगनाथ आव्हाड या आरोपीला सहा महिने साधा कारावास आणि तक्रारदाराला ३ लाख ३८ हजार २६० रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली आहे. समीर महाले यांचे शिवसाई ज्वेलर्स नावाने दागिन्यांचे दुकान असून संदीप आव्हाड आणि तक्रारदार समीर महाले यांच्यात असलेल्या ओळखीतून आव्हाड याने जुलै २०१७ मध्ये ५० ग्रॅमची एक सोन्याची साखळी आणि ९.३२० मिलीची एक सोन्याची अंगठी असे १,६९,१३० रुपये किमतीचे दागिने तीन महिन्यांच्या उधारीवर घेतले होते. महाले यांनी वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर आरोपीने संगमनेर शाखेचा बंधन बँकेचा १,६९,१३०…

Read More