Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संपूर्ण जगाला सत्य व अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळीच्यावतीने संगमनेर शहरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जयहिंदचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या महोत्सवात सकाळी १५७ विद्यार्थ्यांची गांधीवेषातील प्रभात फेरी, भजन संध्या आणि दुपारी ‘जवाहरलाल हाजीर हो’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रंगणार आहे. २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता यशोधन कार्यालय येथील मैदानापासून महात्मा गांधींजींची वेशभूषा केलेल्या १५७ विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता संगमनेर बस स्थानक येथे गांधीजींच्या आवडत्या भजनांचा कार्यक्रम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचे राजकीय वजन कमी झाल्याचा दावा करणाऱ्यांना अलीकडील अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निमित्ताने घडलेल्या राजकीय घडामोडींनी पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेरमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत थोरात आणि त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक सुजय विखे पाटील एकाच व्यासपीठावर आले. सुजय विखे यांनी थोरातांना वाकून नमस्कार केल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. याच पार्श्वभूमीवर “पराभूत होऊनही बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही?” हा प्रश्न त्यांच्या विरोधकांकडून विचारला जात असेल, तर त्याचे उत्तर केवळ निवडणुकीच्या निकालात शोधता येणार नाही, असे मत संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – वादग्रस्त ठरलेल्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. पूजा खेडकर यांचे वडील, निवृत्त सनदी अधिकारी दिलीप कोंडिबा खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रात्री उशिरा पाथर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.  दिलीप खेडकर यांच्याकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल १०२ टक्के (दुप्पट) म्हणजे १३ कोटी ३० लाख ९१ हजार ६९६ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याने ही धडक कारवाई करण्यात आली आहे. २८ वर्षांच्या कालावधीची चौकशी- दिलीप खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात प्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत होते व मे २०२३ मध्ये…

Read More

आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन काम सुरू करण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होईल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी आर्थिक व्यवहारात लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या आणि घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. वृषभ- आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने समोर येऊ शकतात, परंतु तुम्ही संयमाने त्यावर मात कराल. आर्थिक बाबतीत थोडे नियोजनबद्ध चालणे फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यामुळे पैशांच्या बाबतीत सावध राहा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक शांतता लाभेल. मिथुन- आज तुम्हाला सर्व क्षेत्रांत यश मिळण्याचे योग आहेत. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या एका सराईत टोळीचा अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांच्या पथकाने तब्बल ९२ लाख ९ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत बारामती येथील तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड टाकण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून ५०० रुपये दराच्या तब्बल १८४१९ बनावट नोटा, ५ मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली फोक्सवॅगन कार (MH 14 DF 0365) असा एकूण १ कोटी ३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश…

Read More

– बाळासाहेब घोडके महाराष्ट्र शासनाने २०२६ चा कोरडा दुष्काळ जाहीर केला. बरं झालं. कारण या परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पण या दुष्काळापेक्षाही मोठे नुकसान काही राजकीय नेत्यांचे, पुढाऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे झाले असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण दुष्काळ कोणताही असो, खरे नुकसान यांचेच होते आणि याचा खरा लाभही यांनाच मिळवता येतो. जाऊ द्या. पण काल-परवा अहिल्यानगरच्या राजकारणात एक आगळी-वेगळी घटना घडली. काही कार्यकर्त्यांसाठी ती सुखद आणि सकारात्मक असेल, तर काहींसाठी नकारात्मक आणि दु:खदही असेल. असणारच. कारण नाण्याला दोन बाजू असतात. आणि जेव्हा त्या दोन्ही बाजू जोडल्या जातात, एकत्र येतात, तेव्हाच ते नाणे चालते, त्याला किंमत मिळते…

Read More

आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेला योग्य वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ व्यतीत होईल. आर्थिक बाबतीत नफ्याचे योग आहेत, तरीही अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची साथ उत्तम लाभेल. वृषभ- आज दिवसभर मन शांत आणि समाधानी राहील. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मोठा दिलासा मिळेल. व्यवसायात जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. घरातील मोठ्यांचा सल्ला तुमच्यासाठी खूप मोलाचा ठरेल. जोडीदारासोबतच्या नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. अचानक लहान प्रवासाचा योग येऊ शकतो, जो…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- “सध्याच्या डिजिटल युगात अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबत ‘मोबाईल डेटा’ ही चौथी मूलभूत गरज बनली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे घरातील संवाद संपला असून गोष्टी सांगणे पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे आजच्या काळात विद्यार्थ्यांऐवजी पालकांसाठीच संस्कार शिबिर घेण्याची खरी गरज निर्माण झाली आहे,” असा घणाघाती टोला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी लगावला.  संगमनेर येथील मातोश्री लॉन्सवर आयोजित बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष दुर्गाताई तांबे, उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक डॉ. स्वाती महाळंक, कार्यवाह प्रसाद मिरासदार, श्रीमती सुवर्णाताई मालपाणी, डॉ. नितीन संगमनेरकर, प्रा. बाबा खरात, संगमनेर शाखेचे अध्यक्ष अनिल देशपांडे, अनिल सोमणी, अरविंद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एलसीबीने अटक केलेल्या तौसिफ ताहीर कुरेशी याच्या पोलीस कोठडीत पुन्हा दुसऱ्यांदा बुधवारपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे पोलीस कोठडीच्या पुढील तीन दिवसात तपासात आणखी काय धक्कादायक माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे. ड्रग्स प्रकरणी स्थानिक पोलिस अधिकारी उपनिरीक्षक श्रीकांत सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी कासिफ असद कुरेशी याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला होता. पोलिसांचा हा कथित कारनामा समोर आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तपास अधिकारी उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांची कंट्रोल रूमला बदली केली. सावंत यांना कंट्रोल जमा केल्यानंतर श्रीरामपूरचे अपर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शंभरावे साहित्य संमेलन पुण्यात होत असून, पुढील १०१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संगमनेरमध्ये आयोजित करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत, असा महत्त्वपूर्ण मानस संमेलनाच्या स्वागताध्यक्ष, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केला.  महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, संगमनेर यांच्या संयुक्तवतीने मातोश्री लॉन्स येथे आयोजित बालकुमार साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष पदावरून त्या बोलत होत्या. १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये घेण्याच्या घोषणेनंतर उपस्थित साहित्यिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या उत्स्फूर्त कडकडाटात या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून दरोडा टाकणाऱ्या आणि गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मुसक्या आवळल्या आहेत. अंकुश उर्फ अर्जुन नामदेव पवार (वय २९, रा. प्रगती शाळेसमोर, राहुरी) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अभिजीत अरकल, रमीजराजा आत्तार, आजिनाथ पाखरे, सागर ससाणे, रोहित येमुल, प्रशांत राठोड आणि जालींदर साखरे यांच्या पथकाने राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध मोहीम केली होती. शोध मोहिमेदरम्यान पोलिसांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, कोतवाली आणि राहुरी पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्ह्यांत फरार…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन “राजकारणात सूडबुद्धी आणि स्वार्थ हाच अंतिम शब्द नसून, तिथे संवेदनशीलतेचा आणि महाविकास आघाडीच्या धर्माचा अनोखा अध्यायही जपला जाऊ शकतो, याचा प्रत्यय संगमनेरमधील एका भावूक प्रसंगाने दिला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते भाऊसाहेब हासे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय औदार्याचा व संवेदनशीलतेचा आलेला वैयक्तिक अनुभव समाज माध्यमावर मांडत थोरात साहेबांना ‘देव माणूस’ असे संबोधले आहे. राजकीय वैर बाजूला सारून एका सामान्य कार्यकर्त्यासाठी न्यायालयात जाऊन साक्ष देण्यापासून ते वैयक्तिक दुःखात पाठीशी उभे राहण्यापर्यंत बाळासाहेब थोरात यांनी जपलेली माणूसकी आणि महाविकास आघाडीचा धर्म आज तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.”…

Read More

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे पार पाडाल. नवीन योजना आखण्यासाठी किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वेळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे, अनावश्यक खर्च टाळल्यास फायदा होईल. आरोग्याची साथ उत्तम राहील, पण आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ- आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कामात काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात, परंतु संयम आणि समंजसपणा दाखवल्यास सर्व प्रश्न सुटू शकतील. व्यवसायात मोठे व्यवहार करताना घाईगडबड करू नका. जोडीदाराशी असलेले नाते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. संगमनेर येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना येथे रविवारी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या आणि शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी निवडणूक टाळण्यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले. जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आणि सहकार क्षेत्रापुढील गंभीर आव्हाने लक्षात घेता अनावश्यक राजकीय स्पर्धा टाळण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. अहिल्यानगर जिल्हा बँकेने नेहमीच सहकाराची राजकारणविरहित वाटचाल जपली आहे. हीच परंपरा पुढे नेत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या बँकेचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शेतात टोमॅटो तोडण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर हाणामारी, विनयभंग आणि दंगलीत झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी (पिंपळगाव देवा) येथे घडली आहे. गुरुवारी (२४ सप्टेंबर) घडलेल्या या घटनेप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो (POCSO), ॲट्रॉसिटी आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी शेतात काम करत असताना आरोपी कानिफनाथ वाळूंज याने महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या प्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या तक्रारदार महिलेचा विनयभंग करण्यात आला तसेच तिच्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला अश्लील भाषेचा वापर करत धमकी देण्यात आली. आरोपींनी तक्रारदार महिलेच्या गळ्यातील सुमारे…

Read More

वीस वर्षांचा साहिल रवींद्र वाकोडे. यवतमाळ जिल्ह्यातील शेलू ब्राह्मणवाडा या गावातून देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आयआयटी मुंबईत पोहोचलेला विद्यार्थी. एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या साहिलचा मृत्यू १८ सप्टेंबर २०२६ रोजी झाला आणि त्यानंतर उभे राहिलेले प्रश्न केवळ एका कुटुंबाच्या दुःखापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते देशाच्या उच्च शिक्षणव्यवस्थेच्या अंतःकरणाला भिडणारे प्रश्न आहेत. या घटनेच्या आधी परीक्षेदरम्यान साहिलकडे मोबाईल आढळल्याचे आणि त्यातून प्रश्नपत्रिका ChatGPT वर अपलोड केल्याचे आयआयटी प्रशासनाने सांगितले. प्रशासनाने सुरुवातीला त्याच्यावर तत्काळ कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू केली नव्हती, असे म्हटले होते. मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर संस्थेने आपल्या सुरुवातीच्या संवादाबद्दल माफी मागितली. दुसरीकडे साहिलच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर जातीय भेदभाव व मानसिक छळ…

Read More

डॉ. सुधीर तांबे संस्थापक, जयहिंद लोकचळवळ देशाच्या सर्वांगीण प्रगतीकरिता सर्व क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय क्षेत्रात चांगल्या प्रतिनिधीची गरज असते. दूरदृष्टी, बौद्धिक क्षमता, कामाचा मोठा आवाका, प्रभावी वकृत्व, विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी, अत्याधुनिक व्यवस्थापन आणि प्रशासनाची सांगड घालून समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वामध्ये आज सत्यजित तांबे यांचा राज्यातील अत्यंत प्रमुख व महत्त्वाच्या नावांमध्ये समावेश आहे. खरे तर लहानपणापासूनच सत्यजित, हर्षल, करण हे हुशार होते. तिघेही आपल्या वर्गामध्ये पहिले यायचे. माझी इच्छा होती की सत्यजित यांनी डॉक्टर व्हावे किंवा अकॅडमिक्समध्ये आपले करिअर करावे. मात्र लहानपणापासूनच त्याला समाजकार्याची मोठी आवड असल्याने सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतंत्र असे आपले मोठे वलय त्यांनी तयार केले आहे. २००४…

Read More

प्रवीण पुरो  भारताच्या सार्वभौम लोकशाहीला ज्या-ज्या कोणी वाळीत टाकले त्यात प्राधान्याने ज्ञानेश वर्मा या व्यक्तीचे नाव घेतले जाईल. पेशाने ते आयएएस असले तरी ते स्वीकारताना लोकशाहीच्या संवर्धनाची घेतलेली शपथ या माणसाने पायदळी तुडवली आहे. देशात राबवल्या जात असलेल्या निवडणूक प्रक्रियेत घटनात्मक बदलाचा वापर करण्याऐवजी या आयुक्ताने मनमानेल असे बदल केले आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला फायदा होईल, असा हिणकस कारभार केला. किमानपक्षी तक्रारी झाल्या की त्याची दखल घ्यावी, असेही ज्ञानेश यांना वाटले नाही. हा माणूस सत्ताधारी भाजपला विकला गेला, असा आरोप खुलेआम का होतो ते आज उघड झाले आहे. स्वतःला सत्यावानाचा अवतार समजणाऱ्या या व्यक्तीने निर्लज्जतेच्या सारे मर्यादा पार केल्या…

Read More

आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला आणि कष्टाला मोठे यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवता येईल. आर्थिक बाबींमध्ये घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ- आजचा दिवस तुमच्यासाठी संयमाचा आणि समंजसपणाचा आहे. व्यवसायात धनलाभाचे योग बनत आहेत, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल, ज्यामुळे तुमच्या अनेक अडचणी दूर होतील. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ निसर्गात किंवा ध्यानात घालवणे उत्तम ठरेल. मिथुन- आज तुम्हाला विविध क्षेत्रातून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्र आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील विळद घाटातील ‘मातोश्री वृद्धाश्रमा’त आज, शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास एका वृद्धाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात सुरक्षारक्षकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले.  शारीरिक व्यंगावरून वृद्धाश्रमातील इतर रहिवाशांनी केलेली चेष्टामस्करी सहन न झाल्याने संतप्त झालेल्या एका वृद्धाने झोपेत असलेल्यांवरच लोखंडी रॉडने भीषण हल्ला चढवला. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली असून एमआयडीसी पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या हल्लेखोराला तात्काळ अटक केली आहे. महंकलेश्वर बाबुराव हेने (वय ५८, रा. भिंगार) आणि दत्तात्रय शंकर हरके (वय ८०, रा. जामखेड) अशी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर गोरक्ष हरिभाऊ फुंदे, गणेश छबु घोडके, बाबासाहेब…

Read More