Author: अनंत पांगारकर
रविवार, ०७ जुलै १६ वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका खटल्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. २००७ साली स्थापन केलेल्या मनसे पक्षाच्या सुरुवातीच्या काळातच राज यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे आंदोलन केले होते. २००८ साली रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं रान उठवलं होतं. मध्य रेल्वेने विविध पदांसाठी भरती सुरु केली होती. त्यात मराठी मुलांना संधी द्यावी यासाठी मनसेने महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला शिराळा तालुक्यात काही ठिकाणी हिंसक वळण…
रविवार, ०७ जुलै दुधाला ४० रुपये प्रति लिटर भाव मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा मोठा सहभाग वाढला असून युवक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत. अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी कोतुळ येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. दूध उत्पादकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले व प्रश्न सोडवण्यासाठी यथायोग्य सहकार्य करू असे आश्वासन दिले. राज्य सरकारने दुधाला ३० रुपये भाव सहकारी व खाजगी संघांनी द्यावा व सरकार ५ रुपयाचे अनुदान देईल, याप्रमाणे ३५ रुपये भाव देण्याचा शासन आदेश काढलेला आहे. मात्र राज्यातील…
भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसद भवनात गेल्या आठवड्यात पार पडलेल्या दोन महत्वाच्या भाषणांवरचं देशाचं लक्ष आजही सरत नाहीए. त्यात एक होतं ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं तर दुसरं होतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. या दोन भाषणांची तुलना करायची तर एक झकास आणि दुसरं भकास, असंच म्हणता येईल. संसदीय कार्यपध्दतीत सरकारवर होणार्या आरोपांना मुद्देसूद उत्तरं देणं ही उत्तर देणार्याची जबाबदारी असते. ती त्याने पार न पाडली तर संसदीय प्रणालीला ते मारक मानलं जातं. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यापासून संसदीय कार्यपध्दतीचा पुरता हिरमोड झाला आहेच. लोकसभेतील विरोधी पक्ष खासदारांची संख्या अगदीच मर्यादित झाल्याचा फायदा घेत मोदींच्या सरकारने नको…
शनिवार, ०६ जुलै जिल्ह्याच्या विकासाचे सातत्य टिकवून ठेवताना दर्जेदार व गुणवत्तापूर्वक विकास कामे करण्याचे व विकास कामांमध्ये अधिक गतिमानता आणण्यासाठी यंत्रणा प्रमुखांनी प्रलंबित प्रकरणांचा क्षेत्रीय स्तरावर आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे पालकमंत्री विखे यांनी हे निर्देश दिले. यावेळी सभागृहात आमदार प्रा. राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार सत्यजित तांबे, आमदार लहू कानडे, आमदार संग्राम जगताप हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश…
प्रवीण पुरो | मुंबई राज्याची राजधानी असलेली मुंबई राजरोसपणे लुटली जात आहे. दुग्धविकास विभागाची साडेआठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली जात असल्याचा गंभीर आरोप व मुंबईला अदानीपासून वाचवा. तसेच जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमापुढे केला. विधानसभेत मुंबईतील जमिनी हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना त्यांनी अदानी कंपनीला मुंबई विकली जात असल्याचा आरोप केला. अदानी पूर्ण मुंबई गिळंकृत करीत असताना अदानीला राज्याचे प्रमुख पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. भाजपाचे नेते याविरोधात सांगत असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.…
शनिवार, ०६ जुलै संजय गांधी निराधार योजनेचे जून महिना अखेर पर्यंतचे २ कोटी ४८ लाख ०४ हजार ८०० रुपयांचे अनुदान शनिवारी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली. असे आहे अनुदानाचे वाटप – संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ५२४० लाभार्थ्याना ७७ लाख ७६ हजार ६०० रुपये जून महिन्याचे अनुसूचित जातीसाठीचे ५६२ लाभार्थ्याना ८ लाख ३५ हजार २०० रुपये एप्रिल, मे आणि जून महिन्याचे अनुसूचित जमातीसाठीचे २२६ लाभार्थ्यांना १० लाख ०८ हजार रुपये जूनचे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनत सर्वसाधारण ५३११ लाभार्थ्यांना ७९ लाख ६६ हजार…
शनिवार ६ जुलै फायनान्स कंपनीकडे वारंवार केल्या जात असलेल्या पैशाच्या मागणीला कंटाळून संगमनेर तालुक्यातील कनोली येथील शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दीपक दादासाहेब बलसाने असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोट्सच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता असल्याने पोलिसांना त्या दृष्टीने तपास करावा लागणार आहे. दरम्यान या संदर्भात आश्वी (संगमनेर) पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी बलसाने याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपण फायनान्स कंपनीला वारंवार पैसे दिले मात्र फायनान्स कंपनीतील कर्मचारी आपल्याकडे वारंवार पैशाची मागणी करत असल्यामुळे या मागणीला कंटाळून आपण आत्महत्या करत…
प्रवीण पूरो / मुंबई विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील मुंबईतील चार खेळाडूंचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आणि नंतर विधानभवन येथे सत्कार केला. राज्य सरकारच्यावतीने भारतीय टीमला ११ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळाल्यानंतर सर्व देशवासीयांनी भारतीय संघाचं तोंड भरून कौतुक करत जल्लोष साजरा केला होता. मायदेशी परतल्यानंतर मुंबईत भारतीय संघाचा विश्वचषकासह रोड शो पार पडला. त्यानंतर वानखेडे मैदानावर भव्य कार्यक्रम झाला. संघाला सव्वाशे कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. तब्बल ११ वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. वेस्टइंडीज…
शनिवार ६ जुलै खरीप हंगामातील पर्जन्यमान चांगले झाले असल्याने जिल्ह्यातील सर्व भागात पेरण्यांची कामे पूर्णत्वास जात आहे. शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत असून खतांची मागणी जास्त असल्याचे पाहून काही खत कंपन्या आणि विक्रेते हे एका खतासोबत दुसरे खत किंवा औषधे घेण्याची शक्ती शेतकऱ्यांना करत आहे. यासंदर्भात तक्रारी प्राप्त होत असून संबंधित कंपन्या आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत राजस्व सभागृहामध्ये कृषी विभागाचे अधिकारी, खत कंपन्यांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील खत विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी निलेश कानवडे,…
प्रत्येक नागरिकांनी या अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन शुक्रवार ५ जुलै थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी रस्त्यांच्या दुतर्फा, गावोगावी, मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असून या हरितसृष्टी निर्माण करणाऱ्या अभियानाचा यावर्षीचा प्रारंभ शनिवारी ६ जुलैपासून करण्यात येणार असून या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात आयोजित १८ व्या दंडकारण्य अभियान नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ…
