Author: Annant Ppangarkar
आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जवळच्या नातेवाइकांशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील. आर्थिक बाबींमध्ये घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ – आजच्या दिवशी तुम्हाला संयम बाळगण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा. वेळेचा योग्य वापर करून प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर द्या. पैशाच्या व्यवहारात स्पष्टता ठेवा. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभल्यामुळे मनाला शांतता मिळेल. प्रवासाची योजना आखत असाल तर काळजीपूर्वक पूर्वतयारी करा. मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नाशिक-पुणे बायपासवरील घुलेवाडी हद्दीत रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बुलेट आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात बुलेटस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुलेटस्वार आपल्या ताब्यातील बुलेट नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. घुलेवाडी हद्दीत बुलेट पुढे चाललेल्या कंटेनरला बुलेटने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कंटेनरचा टायर फुटला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात बुलेटस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने स्थानिकांनी त्याला तात्काळ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शेखावत गजेंद्र सिंग रा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर येथून नगर-मनमाड रस्त्याने भिवंडी येथे बेकायदेशीरपणे विक्रीसाठी नेण्यात येणारा सुगंधीत सुपारी, तंबाखू व गुटख्याचा साठा स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने हस्तगत केला आहे. नांदगाव शिवारातील इसार पेट्रोलपंपासमोर करण्यात आलेल्या या धडक कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह तब्बल १२ लाख ८१ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह चार जण फरार झाले आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महायुती व महाविकास आघाडीने शिवसेनेला विश्वासात न घेता निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्याला आव्हान देत शिवसेनेने जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत उमेदवार उतरवण्याची भूमिका घेतली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेर तालुक्यातील तीन उमेदवारांनी आपल्या अर्ज दाखल केले आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने स्वतंत्रपणे ताकद दाखवत सहकार क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाकडून शेती सहकारी संस्था मतदारसंघातून निमज येथील बादशाह…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. थोरात-विखेंच्या एकीने बिनविरोध कडे जाणाऱ्या निवडणुकीवर आक्षेप घेणाऱ्या विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी बँकेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी आता कोणाची निवड केली जाते, याकडे लक्ष लागले आहे. बँकेवर वर्चस्व असलेल्या थोरात-विखेंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी एकत्र येत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये बैठकांचे सत्रही झडले. विधान परिषदेचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत संगमनेर तालुका सोसायटी मतदारसंघातून रणजीतसिंह देशमुख यांची, तर भटक्या-विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातून गणपतराव सांगळे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे. संगमनेरमधील सहकार आणि राजकीय समीकरणांवर तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा नेहमीच मोठा प्रभाव राहिला आहे. ज्येष्ठ नेते थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजकीय रणनीतीनुसार संगमनेर मतदारसंघातून रणजीतसिंह देशमुख, गणपतराव सांगळे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आल्याने या जागेवरील लढत अधिकच रंजक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. बाळासाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सध्याच्या टंचाईच्या परिस्थितीत सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट गावागावात जाऊन दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांबाबत तत्परतेने कार्यवाही करावी, असा स्पष्ट आदेश देत कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नका, असा कडक इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. रविवारी संगमनेर येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे आणि गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पशुसंवर्धन विभागाच्या भोंगळ कारभारावर पालकमंत्र्यांनी अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त…
आजचे राशिभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन कल्पनांचे कौतुक होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, विनाकारण होणारे खर्च टाळावेत. कुटुंबातील वातावरणात आनंद आणि सौहार्द राहील. प्रवासाचे योग येत असून त्यातून नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या आणि वेळेवर आहार घ्या. वृषभ- आज मनात नवीन विचार येतील आणि मानसिक शांतता लाभेल. व्यवसायात धनलाभाची शक्यता असून नवीन गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे. मित्र आणि जवळच्या नातेवाईकांशी गाठीभेटी झाल्याने मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात मनासारखे यश मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि जुने मतभेद दूर होतील. मिथुन- कामाचा…
बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष, आक्रमकता, निष्ठा, संघटन आणि विचार यांची जी परंपरा निर्माण झाली, ती महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचा अध्याय आहे. आजही लाखो शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेबांचे विचार आहेत. भगवा झेंडा आहे. शिवसेनेशी असलेली निष्ठा आहे. मात्र आज या निष्ठावान शिवसैनिकाच्या मनात काही प्रश्न आहेत. हे प्रश्न नेतृत्वापर्यंत पोहोचत आहेत का? त्याची उत्तरे त्याला मिळत आहेत का? हा प्रश्न केवळ एका कार्यकर्त्याचा नाही; हा प्रत्येक स्थानिक शिवसैनिकाच्या मनातील प्रश्न आहे. स्थानिक शिवसैनिक नेमके काय म्हणतो? जो शिवसैनिक वर्षानुवर्षे पक्षासाठी रस्त्यावर उभा राहिला, आंदोलन केले, संघर्ष केला,…
प्रवीण पुरो- एखाद्या साहित्यातील विचारांची विषाशी तुलना करणं, हे कोण्या सामान्याचं काम नाही. समाजात विद्वेष पसरवणाऱ्यांसाठी ती पर्वणी आणि देश तोडणाऱ्यांना ती संधीच म्हणावी. पण अशा साहित्याला आपल्या पंतप्रधानांच्या कार्यालयानेच उचलून धरलं तर? ज्या कोणाच्या डोक्यात हे आलं त्याचं मुस्कट फिरवल्याशिवाय याचं उत्तर मिळू शकत नाही. समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना तिलांजली देणाऱ्या, सामाजिक सलोखा निर्माण करणाऱ्या, शोषितांना जगण्याची वाट दाखवणाऱ्या साहित्याला विष संबोधून अशा साहित्याची समीक्षा करण्याचं फर्मान काढत देशाच्या पंतप्रधान कार्यालयाने हद्द पार केलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचं साहित्य विषाची पेरणी करतं हे सांगण्याची हिंमत तरी कशी होते? आणि तिला प्रोत्साहन देण्याचा आगाऊपणा पंतप्रधानांचं कार्यालय करू कसं…
माणूस या जगातून निघून जातो, पण त्याच्या आठवणी कधीच मरत नाहीत. आईच्या हातचा स्वयंपाक, वडिलांचा कडक शिस्तीचा धडा, भावाच्या खांद्यावरची साथ, बहिणीचे निरपेक्ष प्रेम, पत्नीची आयुष्यभराची सोबत, मुलाच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य… माणूस जातो, पण त्याच्याशी जोडलेल्या आठवणी आपल्या मनात कायम जिवंत राहतात. म्हणूनच आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती जपण्याची प्रत्येकाची धडपड असते. मात्र या स्मृती जपण्याची पद्धत काळानुसार बदलण्याची गरज आहे का? हा प्रश्न आज पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर गंभीरपणे विचारला पाहिजे. प्रचलित परंपरेनुसार अंत्यसंस्कारानंतर अस्थी नदीमध्ये विसर्जित केल्या जातात. या प्रथेमागे श्रद्धा, भावना आणि सांस्कृतिक परंपरा आहेत. त्या भावनांचा अवमान करण्याचा प्रश्नच नाही. मात्र श्रद्धा आणि पर्यावरण यांच्यात संघर्ष निर्माण होऊ…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- बदलते हवामान, वाढते तापमान आणि राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यावर मात करण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी केवळ शासनच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे जोपासना व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज (नाणीजधाम) यांच्या नाशिक रामशेज उपपीठातून निघालेल्या ‘वसुंधरा पायी दिंडी सोहळ्याचे संगमनेर-सिन्नर सरहद्दीवरील कर्हे घाट येथे अहिल्यानगर जिल्हा भक्त मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. घुलेवाडी येथील मुक्कामानंतर ही दिंडी आळेफाट्याकडे मार्गस्थ होत असताना चंदनापुरी येथील सिद्धू लॉन्स येथे दर्शन व महाप्रसादासाठी थांबली होती. याप्रसंगी आमदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर बीबे, लिंबू आणि कवड्या ठेवून जादूटोणा व अघोरी कृत्य करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंगेश सुभाष गोंदके याच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेळकेवाडी येथील रहिवासी ज्योती बाळासाहेब कडू यांचे पती मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. कडू यांच्या शेताजवळच संशयित आरोपी मंगेश गोंदके याचे शेत आणि घर आहे. आरोपी गोंदके याने दोन वर्षांपूर्वी कडू यांच्या शेतातील वालवडीची दोरी कापून नुकसान केले होते, तर सहा महिन्यांपूर्वी कडू…
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला रासेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल. व्यापाऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरणात आनंद आणि सौहार्द राहील. आरोग्य उत्तम राहील, तरीही आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ- आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु संयमाने मार्ग काढता येईल. आर्थिक व्यवहारात काळजी घेणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास मनःशांती मिळेल. कौटुंबिक बाबींमध्ये इतरांचे ऐकून घेऊन निर्णय घेणे हिताचे ठरेल. जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवता येईल. मिथुन- आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केवळ पुस्तक प्रकाशित करून थांबून चालणार नाही. आजच्या काळात पुस्तकाचे ऑडिओ स्वरूप तयार करण्याबरोबरच त्यातील छोट्या-छोट्या कथा, प्रसंग आणि विचार रील्स तसेच लघु व्हिडिओंच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. आजचा जमाना रील्सचा आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याकडे असलेला समृद्ध वैचारिक आणि ऐतिहासिक ठेवा प्रभावीपणे समाजापर्यंत नेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. राहुल कोसंबी यांनी अनुवादित केलेल्या ‘जवाहरलाल हाजिर हो’ या पुस्तकाचे प्रकाशन थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. माजी आमदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – वेगवेगळ्या ५०० राजांच्या अधिपत्याखाली विखुरलेल्या देशाला एकत्र आणण्याचे ऐतिहासिक कार्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले. बलाढ्य आणि जुलमी ब्रिटिशांविरुद्ध भारतातील गोरगरीब व सर्व जाती-धर्मातील नागरिकांना एकत्र आणून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांची नैतिकता व निर्भयता ही मूल्ये जगासाठी अनुकरणीय असून, महात्मा गांधींमुळे संपूर्ण जगात भारताची मोठी ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. जयहिंद लोकचळवळीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर शहरात भव्य प्रभात फेरी व गांधी भजनांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते बाळासाहेब थोरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- एका गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या आणि बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूण उर्फ माऊली दत्तात्रय गणगे (वय ३२, रा. सुरेगाव दही, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अहिल्यानगर जिल्हयातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – “देशाला ‘विश्वगुरू’ बनल्याच्या घोषणा ऐकवल्या जात आहेत; पण प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका, चीन आणि पाकिस्तानच्या बाबतीत भारताची भूमिका पाहिली तर अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच आज देश म्हणतोय—मजबुरी का नाम मोदी, मजबुती का नाम महात्मा गांधी!” असा घणाघाती आरोप संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी केला. “महात्मा गांधींकडे सत्ता, सैन्य किंवा अण्वस्त्रे नव्हती; पण त्यांच्या सत्याग्रह आणि अहिंसेच्या ताकदीसमोर ब्रिटिश साम्राज्याला झुकावे लागले. आज भारताकडे जगातील मोठी अर्थव्यवस्था, प्रचंड लष्करी सामर्थ्य आणि अण्वस्त्र क्षमता असूनही जागतिक पातळीवरील अनेक प्रसंग सरकारच्या परराष्ट्र धोरणाची परीक्षा घेत आहेत.” पाकिस्तानसोबतच्या संघर्षानंतरचा प्रश्न- “पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन…
आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमचे नेतृत्वगुण इतरांना प्रभावित करतील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या, निष्काळजीपणा टाळा. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत होईल. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुमच्या कामात संयम आणि सातत्य ठेवणं गरजेचं आहे. व्यवसायात धनलाभाचे योग बनत आहेत, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि शांतता राहील. जुन्या मित्राची भेट होऊ शकते, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. मिथुन – आजच्या दिवशी बुद्धिमत्ता आणि चातुर्याने तुम्ही कठीण प्रश्न सहज सोडवू शकाल. नवीन काम…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. शेती पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा, शेतकऱ्याला हेक्टरी जास्तीत जास्त कशी मदत मिळेल तसेच मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या अनियमिततेचे संकट निर्माण झाले असून, त्याचा मोठा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सर्वच लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील हिवरगाव पठार अंतर्गत येणारी सुतारवाडी, पायरवाडी, कौठे…
