Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना महावितरणकडून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांकडून सुरू असलेली सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संगमनेर शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी केली आहे. शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार केला. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, अशा परिस्थितीत वीज बिलांच्या वसुलीसाठी नागरिकांवर दबाव आणणे योग्य नाही. तसेच थकीत बिलांच्या कारणास्तव दुष्काळग्रस्तांची वीज जोडणी तोडण्याची कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली. जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना सातत्याने संघर्ष करत असून, दुष्काळग्रस्त…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीची केंद्र शासनाने गंभीर दखल घेतली असून, वस्तुस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक उद्या शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. पावसाच्या अभावामुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न या पार्श्वभूमीवर हे पथक स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष भेटी देऊन सविस्तर पाहणी करणार आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान पथकातील सदस्य टंचाईग्रस्त गावांतील पाणीपुरवठा नियोजन, टँकरची स्थिती आणि उपलब्ध जलस्रोतांची पाहणी करतील. तसेच पावसाअभावी सुकलेली पिके, नुकसानीचे पंचनामे आणि पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता याबाबत शेतकरी, स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून या दौऱ्याची पूर्वतयारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोव्यात निधन झाले. यांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली. या पार्श्वभूमीवर नानांना संगमनेर मधून राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नानांच्या निधनाबद्दल दुःख दुःख व्यक्त केले असून ते म्हणाले, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या सशक्त अभिनयाची अमीट छाप उमटविणारे, दमदार संवादफेक आणि रोखठोक स्वभावामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या अभिनयातील ताकद, भारदस्त आवाज, परखड विचार आणि सामाजिक बांधिलकी कायम स्मरणात राहील.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या (कार्डियाक अरेस्ट) तीव्र झटक्याने निधन झाले. गोव्यातील निवासस्थानी प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले होते, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. नाना पाटेकर यांनी आपल्या पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. ‘गमन’ चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर ‘परिंदा’, ‘क्रांतीवीर’, ‘अग्नी साक्षी’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि २०१३ च्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित नाना यांनी ‘प्रहार’ चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. अभिनयासोबतच त्यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून…

Read More

आजचे राशिभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने पार पाडाल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जवळच्या नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाबींमध्ये घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या आणि वेळेवर विश्रांती घेणे आवश्यक आहे. वृषभ – आज तुम्हाला आर्थिक बाबतीत चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम शेवटी पूर्ण होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत मनमोकळा संवाद साधल्याने अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. संध्याकाळी एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महात्मा गांधी हे खऱ्या अर्थाने देश व समाज समजलेले नेते होते. त्यांनी अखंड जीवनभर भारतीय परंपरा आणि धर्माचा अभिमान बाळगला, मात्र त्यांचा धर्म हा माणूसपणापासून दूर गेलेला किंवा द्वेष व मत्सराने भरलेला नव्हता, असे प्रतिपादन राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे सदस्य व ज्येष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे यांनी केले. सबनीस शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक वाल्मीकराव चौधरी हे होते, तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. बाळासाहेब मुरादे यांची प्रमुख उपस्थिती होती. वाकचौरे पुढे म्हणाले की, महात्मा गांधींनी आयुष्यभर उत्तम माणूस होण्याचा प्रयत्न केला आणि विचारांच्या पलीकडे…

Read More

विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनाम्याची मागणी करत काँग्रेससह विरोधकांच्या खासदारांनी दिल्लीत मंगळवारी मोठे आंदोलन केले. यावेळी, पोलिसांनी त्यांना अडवले आणि अटक केली. त्यानंतर दोन तासांनी त्यांची सुटका करण्यात आली. पण, दुसऱ्या दिवशी बुधवारी (७ ऑक्टोबर) पुन्हा एकदा इंडिया आघाडी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाली. यावेळी, राहुल गांधींनी पुन्हा एकदा सरकारवर आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी मेडल असल्याचं सांगत त्यांनी ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आमचा विरोध कायम राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीमधील जनपथ येथील निवासस्थानी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचं आयोजन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील तीव्र दुष्काळजन्य परिस्थिती आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेता, प्रलंबित असणाऱ्या सर्व पाणीपुरवठा योजनांची कामे नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा, असे कठोर निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुख्य अभियंता प्रशांत भामरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती देशपांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यातील घुलेवाडी, गुंजाळवाडी, तळेगाव, निमोण, सुकेवाडी, खांजापूर, चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा, वरवंडी, कासारा दुमाला आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महामार्गावरून पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत निष्काळजीपणे कंटेनर घुसवून चार जणांना चिरडून तब्बल १५ ते १६ वारकऱ्यांना गंभीर जखमी करणाऱ्या आरोपी चालकाला गुन्हा सिद्ध झाल्याने संगमनेर न्यायालयाने ३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. छोटेलाल अलगु पाल असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. नेमकी घटना काय होती? ३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० वर खंदरमाळवाडी शिवारात वारकऱ्यांची दिंडी पायी चालली होती. यावेळी आरोपीने अत्यंत बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे आपला कंटेनर थेट दिंडीत घुसवला. कंटेनर खाली चिरडले गेल्याने चार निष्पाप वारकऱ्यांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला होता. हा कंटेनर पालखी रथावर जाऊन आदळला, यामध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सातारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत संगमनेरच्या गीता परिवाराच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर सुवर्ण यश मिळवले आहे. संगमनेर आणि पुणे-हडपसर येथील गीता परिवाराच्या दैनिक कराटे वर्गातील खेळाडूंनी या स्पर्धेत सर्वच प्रकारांत वर्चस्व गाजवत तब्बल १२६ पदकांची भरघोस कमाई केली आणि उपविजेतेपदाचा बहुमान पटकावला. या राज्यस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, मुंबई, नवी मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, पनवेल आणि तळेगाव दाभाडे अशा महाराष्ट्रातील विविध भागांतून ७०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत कुमिते (प्रत्यक्ष लढत), काता आणि ग्रुप काता अशा तीन मुख्य प्रकारांत चुरस पाहायला मिळाली. गीता परिवारातील केवळ ६४ खेळाडूंनी या तिन्ही प्रकारांत आपल्या शिस्तबद्ध…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्रात अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने दांडी मारल्याने राज्यभरात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाची छाया पसरली आहे. हाताशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पुरते हादरले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना विनाअट दोन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळाली होती. परंतु सध्याचे सरकार केवळ दुष्काळ पाहणी दौरे, आढावा बैठका आणि हवेतील घोषणांमध्येच व्यस्त असल्याचा थेट आरोप शेतकरी वर्ग करत आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत राज्यातील सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळातील धोरणात्मक निर्णयक्षमतेची तसेच शेती-मातीची जाण असणाऱ्या खऱ्या नेतृत्वाची तीव्र उणीव भासू लागली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात यांनी तब्बल सहा वर्षे राज्याचे…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेला आणि कष्टाला योग्य सन्मान मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी आजचा काळ अत्यंत अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे हितकारक ठरेल; विनाकारण होणारे खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि संतुलित दिनचर्या पाळा. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस नफा देणारा ठरेल. वृषभ – आज तुम्हाला प्रत्येक निर्णयात अत्यंत संयम आणि विवेक बाळगण्याची गरज आहे. घाईगडबडीत घेतलेले निर्णय नुकसान पोहोचवू शकतात. नोकरीत वरिष्ठांशी संवाद साधताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्याचे आयोजन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली असून, उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान मातब्बर नेत्यांच्या अर्जांवर परस्परांनी घेतलेल्या हरकतींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार किरण लहामटे, आमदार मोनिका राजळे तसेच माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉ. प्रणोती जगताप यांच्यासह अनेक प्रमुख उमेदवारांविरोधात मंगळवारी जोरदार आक्षेप नोंदवण्यात आले.  उमेदवारी अर्जांच्या छाननीची व हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, याचा अधिकृत निकाल बुधवारी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली. बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण ३६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दुष्काळाच्या तीव्र संकटामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च पालकांसाठी मोठे आव्हान ठरत असल्याने दुष्काळग्रस्त भागातील शालेय, कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मासिक एस.टी. बस पासचे शुल्क शंभर टक्के माफ करावे, अशी आग्रही मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी केली. यात खताळ यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी दररोज आपल्या गावातून तालुका, शहर अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी एस.टी. बसने प्रवास करावा लागतो.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधाचा फॉर्म्युला राबविण्याच्या हालचाली सुरू असताना संगमनेर आणि राहाता तालुक्यातील घडामोडींनी या निवडणुकीला नवे वळण मिळाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत विरोधी उमेदवारांच्या सूचकांनी केलेली सही आपली नसल्याचे इन कॅमेरा निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितले आहे. यामुळे या दोन्ही जागा आता बिनविरोधच्या मार्गावर आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी संगमनेरमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय चर्चेला सुरुवात झाली होती. थोरात आणि सुजय विखे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी सहकार क्षेत्रातील ही निवडणूक टाळण्यासाठी एकमताचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर विविध राजकीय पक्ष आणि स्थानिक नेत्यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहर व परिसरातील गरीब, गरजू आणि होतकरू युवक-युवतींना पोलीस भरतीसाठी योग्य मार्गदर्शन व आवश्यक सहाय्य पुरवण्यासाठी ‘मिशन खाकी पोलीस भरती योद्धा सहाय्यता अभियान’ अंतर्गत शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली २ ऑक्टोबर रोजी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून, त्याअनुषंगाने शहरातील विविध पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला जात आहे. पोलीस भरतीची तयारी करताना विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता आणि अभ्यासाचे नियोजन अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्युज ऑनलाईन- देशात आणि राज्यात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात तरुणाईमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. एसआयआरच्या (SIR) मुद्द्यावर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोग उत्तरे देऊ शकत नाही. निवडणूक आयोग हा पूर्णपणे भाजपचे बाहुले झाला असून ज्ञानेश कुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे प्रमुख हत्यार बनले आहेत, अशी जोरदार टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे बोलताना केली. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर बोलताना थोरात म्हणाले की, सरकारने पंचनाम्याचा कोणताही फार्स न करता तातडीने शेतकऱ्यांना विनाअट मोठी मदत केली पाहिजे. आपण स्वतः राज्यात कृषी व महसूल मंत्री असताना…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी सोमवारी (५ ऑक्टोबर) दिल्ली नाका परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने गतिरोधक बसविण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही उपाययोजना स्वागतार्ह आहे. मात्र, केवळ गतिरोधक बसविल्याने दिल्ली नाका परिसरातील अपघातांची समस्या कायमस्वरूपी सुटणार नाही, अशी भूमिका भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा सचिव इरफानभाई मन्सुरी यांनी व्यक्त केली. दिल्ली नाका परिसरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक, रस्त्यावरील अतिक्रमणे, अरुंद झालेले रस्ते, बेशिस्त पार्किंग आणि वाहतुकीचे नियोजन या बाबींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अवजड वाहने शहरातील गर्दीच्या भागातून जात असतील तर त्यासाठी पर्यायी मार्ग किंवा वेळेचे नियोजन करण्याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा. “गतिरोधक हा वाहनांचा वेग कमी करण्यासाठीचा…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर शहरातील कुरण रोड परिसरातील ५० वर्षीय राम अवतार या बेकरी चालकाने जमिनीच्या व्यवहारातून झालेल्या कथित फसवणुकीला कंटाळून रायतेवाडी परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम अवतार हे कुरण रोड परिसरात बेकरी व्यवसाय चालवत होते. जमिनीच्या व्यवहारातून आपली फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी काही व्हिडिओ तयार केल्याची माहिती समोर आली असून, या व्हिडिओमध्ये त्यांनी संबंधित जमिनीच्या व्यवहारातील काही व्यक्तींची नावे घेतल्याचे सांगितले जात आहे. राम अवतार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांसह संगमनेर शहरातील काही सामाजिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- उडीसा आणि आसाम या राज्यांतून पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी होत असल्याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. संगमनेर तालुक्यातील सायखिंडी फाटा येथे सोमवारी सकाळी रचलेल्या सापळ्यात तब्बल १५२ किलो ६१ ग्रॅम वजनाचा उच्च दर्जाचा गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत वाहनासह एकूण ८८ लाख ७७ हजार ४७० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून दोन तस्करांना रंगेहात अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह तीन साथीदार अद्याप फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव व त्यांचे पथक भागात गस्त घालत असताना, पांढऱ्या रंगाच्या नेक्सॉन…

Read More