Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: कोल्हार-घोटी राज्यमार्गावर संगमनेरनजीक निमगाव जाळी गावाजवळ चिंचपूर फाटा येथे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने उडविले आहे. धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला असून पायांसह कमरेखालील भाग निकामी झाल्याचे सांगितले जाते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनी बिबट्याला उपचारासाठी निंबाळे येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत आणले. सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास संगमनेर लोणी रस्त्यावर चिंचपूर फाटा येथे असलेल्या अस्मिता दूध डेअरीजवळ ही घटना घडली. बिबट्याला दिलेल्या जोराच्या धडकेनंतर वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला. तर गंभीर जखमी झालेला बिबट्या वाहनाच्या धडकेने उडून जवळच्या झुडपात जाऊन पडला होता. त्याच्या विव्हळण्याचा आवाजाने येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. नागरिकांनी याची माहिती वनविभागाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरः संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी शब्दकोष समृद्ध करून शब्दज्ञान अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन डॉ. रवींद्र मुळे यांनी केले. श्री दामोदर मालपाणी मेमोरिअल ट्रस्ट, संस्कृत संवर्धन मंडळ व महाविद्यालय शाळा समूह योजना संगमनेर केंद्र व संगमनेर महविद्यालयातील संस्कृत भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत विविध गुणदर्शन मराठी, इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर दामोदर मालपाणी मेमोरिअल ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त व शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, श्रीमती सुवर्णा मालपाणी, प्राचार्य डॉ. प्रो. डॉ. अरुण गायकवाड, प्राचार्य मुकुंद डांगे, प्रा. अरुण लेले, संस्कृत विभाग प्रमुख डॉ. अनिरुद्ध मंडलिक, स्पर्धा समन्वय अधिकारी डॉ. रोशन भगत आदी उपस्थित होते. डॉ. मुळे म्हणाले, वर्णोच्चारण स्थानाचे ज्ञान, आवाजातील चढ-उतार, शब्दस्वरूप या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीसह अन्य मागण्यासाठी राज्यभरातील विविध शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (१४ मार्च) संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे या संपामध्ये संगमनेर नगर परिषदेतील कर्मचारीदेखील सहभागी होणार आहेत. संपामध्ये सहभागी होत असल्याच्या आशयाचे पत्र नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना देण्यात आले आहे. या संपामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी देखील सहभागी होणार असल्याने पालिकेतील अत्यावश्यक सेवा कोसळण्याची चिन्हे आहे. राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती, संवर्ग अधिकारी, स्थानिक नगर परिषद कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी यांच्या विविध मागण्या तसेच जुनी पेन्शन लागू करणेबाबत वेळोवेळी नगरपरिषद प्रशासन संचनालय यांना निवेदन देण्यात आलेले आहे. तसेच नगर विकास मंत्री यांच्यासोबत बैठक…
महाराष्ट्र संवाद न्यूज रंगपंचमीचा जल्लोष सुरू असताना अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील दुःखद बातमी समोर आली आहे. घरासमोरील शेततळ्यात बुडून दोघा लहान भावंडाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे ही घटना घडली. आर्यन बंडोपंत साळुंखे (वय 9 वर्ष) आणि अनिकेत बंडोपंत साळुंखे (वय 8 वर्षे) अशी शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या भावंडांची नाव आहेत. या घटनेमुळे रंगपंचमीच्या उत्सवाला दुःखाची किनार लाभली. लोणी व्यंकनाथ ते येळपणे रस्त्यावर बंडोपंत साळुंखे यांचे कुटुंबीय राहावयास आहे. शेतीच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी त्यांनी आठ दिवसापूर्वी घरासमोर शेततळे केले होते. साळुंखे दांपत्य रविवारी दुपारी दुसऱ्याच्या शेतात कामासाठी गेले होते. रविवारची सुट्टी असल्याने आर्यन आणि अनिकेत ही…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : पोलंडहून भारतात नोकरी निमित्त आलेल्या एका परदेशी महिलेवर मुंबईत तब्बल सात वर्ष बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेने अंबोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलंडहून एक महिला भारतात 2016 मध्ये नोकरीसाठी आली होती. तिला Asian Business Exhibitions and Conferences Ltd (ABECL)चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष गांधी यांनी नोकरीची ऑफर देऊ केली. सुरुवातीचे काही महिने व्यवस्थित गेले. मात्र, त्यानंतर मनिष गांधी पीडितेला त्रास देऊ लागला. तिच्या मोबाईलवर अश्लिल चित्रफित पाठवून तिच्याशी जवळीक साधू लागला. त्यानंतर, जर्मनीमध्ये एका प्रदर्शनासाठी दोघेही गेले होते. तेथे एका हॉटेलवर मनिषने पीडितेवर बलात्कार केला.या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जनतेने आपल्यावर प्रेम केले आहे. सत्ता असो अथवा नसो, तरीदेखील आपण तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम राखला असून जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी काम केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. शहरालगत नव्याने स्थापित झालेल्या ढोलेवाडी ग्रामपंचायत स्थापनेच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, राष्ट्रवादीचे नेते आबासाहेब थोरात आदि व्यासपीठावर उपस्थित होते. थोरात म्हणाले, गुंजाळवाडी ग्रामपंचायतचे विभाजन झाले असून ढोलेवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळाला. 34 कोटी रुपयांच्या निधीतून ढोलेवाडी व गुंजाळवाडी ग्रामपंचायतसाठी पाणीपुरवठा योजना राबविली आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर: जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये असलेल्या मढी येथील यात्रेत गाढवाच्या बाजारामध्ये पंजाबी संकरित तीन गाढवांपैकी एक गाढव तब्बल एक लाख रुपयाला विकले गेले आहे. त्यामुळे यात्रेतील हे गाढव लाख मोलाचे ठरलं. याशिवाय या यात्रेमधील गाढवाच्या बाजारात काठेवाडी गाढवांची टंचाई निर्माण झाल्याचे दिसून आले. काठेवाड गुजरात येथून बाजारासाठी पायी येत असलेल्या तीनशे पैकी एकशे तीस गाढवांची रस्त्यातच विक्री झाली. त्यामुळे मढीच्या बाजारात पोहोचेपर्यंत अवघी 170 गाढवेच शिल्लक राहिली होती. मढीची गाढवांची यात्रा देशभर प्रसिद्ध आहे. या यात्रेत भरणाऱ्या बाजारामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात व्यापारी येत असतात. पाथर्डी तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर मढी येथे कानिफनाथ देवस्थान…
महाराष्ट्र संवाद न्यूज बुलढाणा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट ठरलेल्या नागपुर-मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. समृद्धी महामार्गावर आज झालेल्या एका अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. वेगवान कार उलटून हा अपघात झाला आहे. या मार्गावर मोठ्या संख्येने दररोज होत असलेल्या अपघातांमुळे समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार औरंगाबादहून शेगावच्या दिशेनं जात होती. मेहकर जवळ सिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर कारचा अपघात झाला. अपघातात 2 मुले 3 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात…
रविवार विशेष | प्रवीण पुरो मुंबईत फुटपाथवर झोपलेल्या चार जणांच्या मृत्यूला कारण ठरलेल्या सलमान खान याला मुंबईच्या सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा वरच्या न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर निकाल लावणार्या जोशी नावाच्या न्यायमूर्तींनी आपल्या विवेकाला साद घातली असती तर या घटनेत सलमान खान सुटू शकला नसता. सलमान निर्दोष सुटतो आणि निकाल देणारे न्यायमूर्ती पीठावरून दुसर्या दिवशी निवृत्त होतात, हा योगायोग नाही. या निकालानंतर प्रश्न उपस्थित झाला की सलमान निर्दोष असेल तर त्या गरीबाच्या मृत्यूला जबाबदार कोण? हा निकाल देताना मृत्यूला जबाबदार असलेल्याचा शोध घ्यायला न्यायालयाने सांगितलं असतं तर एकवेळ ठिक. पण ते न झाल्याने मृत्यूला कारण कोण याचं आजवर उत्तर मिळू शकलं…
महाराष्ट्र संवाद न्यूज माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यावर आज सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मनी लाँड्रिंग प्रकरणी झालेल्या या कारवाई प्रकरणी कोर्टाने हसन मुश्रीफ यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. या दरम्यान ईडीने हसन मुश्रीफ यांना सोमवारी चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. मुश्रीफ यांच्यावर आज सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकत तब्बल साडे नऊ तास चौकशी केली. मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागलमधील निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहोचले होते. ईडीने दोन महिन्यात केलेली ही तिसरी छापेमारी होती. दरम्यान ईडीने आता नव्याने हसन मुश्रीफ यांना समन्स बजावलं असून पुढील आठवड्यात मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर, कर्जत येथील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नवीन बांधकाम केलेल्या ३८ निवासस्थानांचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी कर्जत येथे करण्यात आले. तर जामखेड येथील ३८ निवासस्थानांचे कर्जत येथून ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. यावेळी महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे, विशेष पोलीस उप महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कर्जत येथील या नवीन पोलीस निवासस्थांनाची पाहणी केली. पोलीस कर्मचारी व बॅंड…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क वीस वर्षीय भावाने आपल्या एकत्र कुटूंबातीलच १७ वर्षाच्या चुलत बहिणीवर वारंवार बलात्कार केल्याचे व त्या संबधातून ती गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यात समोर आली आहे. पिडीत मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलमजुरी करुन एकत्र कुटूंब चालविणाऱ्या दोन भावंडाच्या कुटूंबात ही धक्कादायक घटना घडली असून वीस वर्षाच्या भावाने आपल्या सतरा वर्षाच्या बहिणीला भुरळ घालत काही महिन्यापासून तिच्यावर सातत्याने अत्याचार केला. यातून पिडीत मुलगी गरोदर राहिली. मुलीचे पोट वाढल्याने आईच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे पिडीतेला तातडीने लोणीच्या प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पिडीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये येथील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, स्वातंत्र्य सेनानी, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची तेरावी पुण्यतिथी मंगळवारी (१४ मार्च) साजरी केली जाणार आहे. सकाळी नऊ वाजता थोरात कारखान्यावरील अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना पुष्पांजली व अभिवादन केले जाणार आहे. स्वातंत्र्य संग्रामानंतर सहकाराच्या माध्यमातून गोरगरीब माणसांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करताना सहकारमहर्षी थोरात यांनी सहकारात आर्थिक शिस्त, पारदर्शकता, काटकसर, व आधुनिकता ही तत्वे रुजवली. याच रचनात्मक वाटचालीवर विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूह काम करत आहेत. थोरात यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर: दारु पिऊन न्यायालयात साक्ष देणे साक्षीदाराला चांगलेच महागात पडले आहे. दारुच्या अंमलाखाली साक्ष देणाऱ्या साक्षीदाराविरोधात न्यायालयाच्या आदेशावरुन शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ देमाजी चत्तर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नांव आहे. ४ थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर एका नियमीत फौजदारी खटल्याची सुनावणी सुरु होती. या खटल्यामध्ये सोमनाथ देमाजी चत्तर (वय ४९ वर्षे, रा. नान्नजदुमाला ता. संगमनेर) यांची साक्ष सुरु होती. साक्षीदरम्यान सोमनाथ चत्तर हे दारुच्या अंमलाखाली साक्ष देत असल्याचे आरोपीच्या वकीलांच्या लक्षात आल्याने त्यांनी साक्षीदारावर आक्षेप घेतला. त्यामुळे आरोपीच्या वकीलांच्या आक्षेपावरुन साक्षीदार सोमनाथ चत्तर याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज आश्वी: प्रांत अधिकाऱ्यांच्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत तालुक्यात फिरणाऱ्या रवींद्र उर्फ बंटी साहेबराव उर्फ आबासाहेब मदने (रा. आश्वी बुद्रुक ता. संगमनेर, जि. अहमदनगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र उर्फ बंटी साहेबराव उर्फ आबासाहेब मदने याला संगमनेरच्या प्रांताधिकार्यांनी तालुका क्षेत्रातून 7 डिसेंबर 2022 ते 6 जून 2023 या कालखंडासाठी हद्दपार केले होते. हद्दपार केलेला कालावधी संपण्यापूर्वीच मदने हा आश्वी बुद्रुक गावाच्या शिवारामध्ये असलेल्या हॉटेल साईदीप मध्ये फिरत असल्याची माहिती आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक भंडारे यांनी तातडीने पोलीस कर्मचारी निलेश…
मुंबई, शेतकऱ्यांच्या शेतीला दळणवळणासाठी रस्त्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी गावनकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडीवाट, रस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्या-येण्याचे रस्ते खुले करण्यासाठी मिशन मोडवर विशेष अभियान राबवण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य अभिमन्यु पवार यांनी याबाबत लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. मंत्री विखे-पाटील म्हणाले, राज्यातील शेत जमिनीची मोजणी, जमीन महसूलाची आकारणी व प्रथम जमाबंदीची कार्यवाही सन १८९२ ते १९३० दरम्यान पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामध्ये शेतजमीनीचे सर्व्हे निहाय गाव नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. सदरचे सर्व्हे नंबरचे गाव नकाशावर मुळ जमाबंदीवेळचे विविध प्रकारचे रस्ते, गाडीवाट, पायवाट दर्शविलेले आहेत. मुळ जमाबंदीचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याचे माजी मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने तब्बल 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. माजी मंत्री आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम आहे. निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्यांच्या कामासाठी आ. थोरात हेच सातत्याने पाठपुरावा करत असून तालुक्यातील विविध रस्ते व विकास कामे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सुचवलेल्या व पाठपुरावा केलेल्या कामातून रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी अर्थसंकल्पातून नव्याने 38 कोटी रुपये निधी मिळवला आहे. या अंतर्गत राज्यमार्गांमधील…
महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत असताना केवळ भारत भूमीच नव्हे तर संपूर्ण राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावे यासाठी शपथ घ्यायला हवी. परकीयांनी आपल्या देशातील संपत्ती लुटली मात्र त्यांना आपल्या मनगटातील बळ लुटता आले नसल्याने या बाळाच्या बळावर आता आपण छत्रपतींच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करण्याचे आवाहन कालीचरण महाराज यांनी केले. शिवजयंती युवक उत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून कालीचरण महाराज यांच्या उपस्थितीत मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीस प्रारंभ होण्यापूर्वी कालीचरण महाराज बोलत होते. उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. कालीचरण महाराज म्हणाले, साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्य स्थापन करत छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमण थोपविले…
महाराष्ट्र संवाद न्यूज दरोडाच्या तयारीत असलेली टोळी पकडण्यात पोलीस उपाधीक्षक आणि शहर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. टोळीतील चौघांना पोलिसांनी घातक शस्त्रास्त्रासह पकडले तर त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. गेल्या अनेक दिवसानंतर संगमनेर पोलिसांनी केलेली कामगिरी दिलासादायक ठरली आहे. त्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पाऊले टाकतील अशी आशा निर्माण झाली आहे. अधिक माहिती अशी, पोलीस उपाधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या आदेशावरून दोन दिवसांपूर्वीच्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल, पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर, अण्णासाहेब दातीर शहर पोलीस ठाण्याचे वाहनचालक अजय आठरे, अमृत आढाव, सुभाष…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील पंचामृत हे विकासाचे, सामाजिक हिताचे आणि राज्याला संमृध्दीच्या दिशेने नेण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. राज्यात प्रथमच गो-सेवा आयोगाची ऐतिहासिक घोषणा आणि नगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाचे मुख्यालय स्थापन करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, या अर्थसंकल्पातून शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसी समाज घटकांच्या न्याय हक्कांचे संरक्षण तसेच अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या मानधनात समाधानकारक वाढ करण्यात आली. रोजगार…
