Author: Annant Ppangarkar

अमोल शेलकर- १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. गेल्या आठ दशकांच्या या प्रदीर्घ आणि ऐतिहासिक प्रवासात भारताने गरिबी, भीषण अन्नटंचाई, युद्धे, दुष्काळ आणि गंभीर आर्थिक संकटे यांसारख्या अनेक आव्हानांवर यशस्वीपणे मात केली आहे. आज जगाच्या पाठीवर भारताने एक स्वाभिमानी, सशक्त आणि महत्त्वाची जागतिक महासत्ता म्हणून स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. परंतु, या प्रवासाकडे केवळ अभिमानाने आणि कौतुकाने पाहून चालणार नाही. स्वातंत्र्याच्या या टप्प्यावर काही मूलभूत आणि गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. आपण स्वातंत्र्य मिळवले, पण त्याचा खरा अर्थ जपला का, आपण संविधान स्वीकारले, पण त्यातील मूल्ये खरोखर अंगीकारली का आणि आपण…

Read More

प्रविण बागडे, नागपूर  15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. शतकानुशतके चाललेल्या परकीय सत्तेच्या जोखडातून देश मुक्त झाला. तिरंगा अभिमानाने फडकला, स्वातंत्र्याची पहाट उगवली आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला अर्थ प्राप्त झाला. पण आज, स्वातंत्र्याच्या दशकांनंतर एक प्रश्न मनाला अस्वस्थ करतो, देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का? हा प्रश्न देशाच्या स्वातंत्र्यावर संशय घेणारा नाही, उलट स्वातंत्र्याचा खरा अर्थ शोधणारा आहे. कारण राष्ट्र स्वतंत्र झाले, सत्ता आपल्या हातात आली, राज्यघटना मिळाली, पण समाजातील प्रत्येक माणूस भय, भूक, विषमता, जातीयता, अन्याय आणि शोषणापासून मुक्त झाला का? स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेला हद्दपार करणे नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी नव्या संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. आर्थिक बाबतीत नियोजनपूर्वक पावले उचला. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुम्हाला प्रत्येक कामात संयम ठेवावा लागेल. विनाकारण कोणाशीही वाद घालणे टाळा. व्यवसायात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, अन्यथा नुकसान होऊ शकते. सायंकाळच्या वेळी एखाद्या जुन्या मित्राशी भेट झाल्यामुळे मन प्रसन्न होईल. पैशांची उधळपट्टी टाळा आणि भविष्यासाठी बचत करण्यावर भर द्या. मिथुन – आजचा दिवस अत्यंत फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि यश मिळेल. नवीन आर्थिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौणखनिज चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना निलंबित करण्यात आले आहे. गौणखनिज चोरी व अवैध वाहतुकीवर रोख लावण्यात निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा दाखवल्याचा ठपका ठेवत महसूल व वन विभागाने हे निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.  या कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभागात तीव्र खळबळ उडाली असून, चौकशीअंती आणखी एका तहसीलदारावर कारवाई प्रस्तावित असल्याची चर्चा रंगल्याने इतर अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. हे संपूर्ण प्रकरण सावखेडा येथील वाळू घाटाशी संबंधित आहे. २६ मे रोजी या घाटावर नियमबाह्य पद्धतीने मशीनद्वारे मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा सुरू असल्याचे महसूल व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  पुणे: पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या संगमनेरच्या भूमिपुत्रांनी संगमनेरमार्गे पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सुरु करण्याच्या मागणीसाठी कंबर कसली आहे. या मागणीला व्यापक पाठिंबा मिळवून देण्यासाठी पुणे शहरात लवकरच एका विशेष ‘पुणे–नाशिक रेल्वे परिषदेचे’ आयोजन केले जाणार आहे. पुणे आणि नाशिकदरम्यानचा हा प्रकल्प संपूर्ण प्रदेशाच्या दळणवळणासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. हा रेल्वे मार्ग संगमनेरला जोडल्यास परिसरातील नागरिकांना दोन्ही प्रमुख शहरांशी जलद व आधुनिक रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुण्यात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी राहणाऱ्या संगमनेरकरांना एकाच व्यासपीठावर आणून या हक्काच्या मागणीसाठी भक्कम पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या परिषदेमध्ये प्रकल्पाची सद्यस्थिती, संगमनेरमार्गे रेल्वेची तांत्रिक व व्यावहारिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन साकूर: संगमनेर तालुक्यातील मांडवे आणि बिरेवाडी गावांच्या हद्दीवर नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या पोल्ट्री शेडवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी बिरेवाडी येथील संतोष माणिक गळंगे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज शुक्रवारपासून (१४ ऑगस्ट) बिरेवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा ठाम इशारा त्यांनी दिला आहे. संतोष गळंगे यांनी मांडवे बुद्रुक हद्दीत आपल्या घरापासून अवघ्या ५० फुटांवर असलेल्या अनधिकृत पोल्ट्रीवर कारवाई करण्याची आणि बिरेवाडी हद्दीतील दोन पोल्ट्रींची ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ (एनओसी) रद्द करून त्या सीलबंद करण्याची प्रमुख मागणी लावून धरली आहे. परिसरात तीन पोल्ट्री शेड कार्यरत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: लावणीचा युवक महोत्सवात लोकनृत्य म्हणून समावेश करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी म्हटले आहे. यामुळे शासन स्तरावर लावणीला लोकनृत्याचा दर्जा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संगमनेर शाखेच्या वतीने पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी संगमनेर नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार दळवी, प्रमुख कार्यवाह विशाल कदम, उपाध्यक्ष बाबासाहेब मेमाणे, द्वारकानाथ जाधव, दत्ता बटवाल आदी मान्यवर उपस्थित होते सत्कार प्रसंगी नाट्य परिषदेच्या संगमनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार दळवी यांनी राज्यपाल कार्यालयामार्फत गेल्या २१ वर्षांपासून आयोजित होणाऱ्या ‘इंद्रधनुष्य’ या अंतरविद्यापीठ युवक महोत्सवात…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि पूर्वी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल, परंतु रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या आणि आर्थिक बाबतीत कोणताही घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. वृषभ – आज आर्थिक दृष्टिकोनातून काळ अनुकूल आहे. प्रदीर्घ काळापासून अडकलेली कामे मार्गी लागतील आणि धनलाभाचे योग बनत आहेत. कुटुंबातील सदस्यांशी असलेले नाते अधिक घट्ट होईल. नोकरी व व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील, फक्त विचारपूर्वक भांडवल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मिथुन – आज तुमची सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता उच्च शिखरावर असेल.…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आपली प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाबींमध्ये लाभ होण्याचे योग आहेत, परंतु अनावश्यक खर्च टाळणे योग्य ठरेल. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि सलोखा राहील. आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – आज आपल्याला धैर्याने आणि संयमाने काम करण्याची गरज आहे. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्यास जुने मतभेद मिटतील. संध्याकाळी एखादी चांगली बातमी कानावर पडण्याची शक्यता आहे. मिथुन – आजचा दिवस सर्जनशीलता आणि नवीन कल्पना राबवण्यासाठी उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने १५ आणि १६ ऑगस्ट रोजी अकोले तालुक्यातील भंडारदरा व परिसरातील पर्यटन स्थळांवर होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रंधा फाटा ते भंडारदरा मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.  स्वातंत्र्यदिन आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार व रविवारी पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे आणि अहिल्यानगर येथून मोठ्या संख्येने पर्यटक भंडारदरा, रंधा धबधबा, कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड व कोकण कडा परिसरात येण्याची शक्यता आहे. या परिसरातील रस्ते अरुंद असून काही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर:  दरवर्षी नवनवीन आणि अभिनव उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या संगमनेर येथील प्रसिद्ध ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’ने यंदाच्या गणेशोत्सवात ‘डिजिटल इंडिया’ आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कागदी पावती पुस्तकांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्गणी संकलनासाठी ‘डिजिटल पावती पुस्तक’ वापरणारे बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळ हे संगमनेर शहरातील पहिलेच मंडळ ठरले आहे. गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कागदी पावत्या छापल्या जातात. मात्र, डिजिटल युगाची गरज ओळखून मंडळाचे मार्गदर्शक व नगरसेवक योगेश (चिकू) जाजू यांच्या संकल्पनेतून हे विशेष मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. आता मंडळाचे कार्यकर्ते घरोघरी आणि दुकानांमध्ये जाताना पावती पुस्तक न नेता मोबाईलमधील ॲपद्वारे वर्गणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर:  संगमनेरमध्ये अवैध दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठे कारवाई केली. संबंधित ठिकाणी सातत्याने कारवाया झाल्याने आरोपींच्या आस्थापना कायमस्वरूपी सील करण्याची मागणी दारूबंदी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. संगमनेर शहरात गोवा बनावटीची व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली बनावट दारू विक्री करणाऱ्यांविरोधात संगमनेरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ६ ऑगस्ट रोजी मोठी कारवाई केली. या कारवाईत ‘रॉयल इम्पॅक्ट’ व्हिस्कीचे ३४ बॉक्स, विविध नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट दारू बनवण्याचे साहित्य आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पथकाने शिवाजी नगर, वडजे मळा परिसरातील…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. व्यापाऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता असून जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. मन शांत ठेवण्यासाठी नामस्मरण किंवा ध्यानधारणा करणे फायदेशीर ठरेल. वृषभ – आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे नियोजनबद्ध रीतीने काम करणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आणि विनाकारण खर्च करणे टाळा. कौटुंबिक जीवनात लहान-सहान कारणांवरून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर:  राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा दर्जा ढासळत असून शासन नवीन शिक्षक भरती करण्याऐवजी शिक्षकांना अतिरिक्त ठरवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत असल्याचा घणाघाती आरोप ‘छात्र भारती’ विद्यार्थी संघटनेने केला आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणा विरोधात हजारो विद्यार्थी मोर्चाने रस्त्यावर उतरले होते. यात विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. बदलत्या शैक्षणिक धोरणांविरोधात छात्र भारतीने तीव्र आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन संगमनेरचे प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून देत त्वरित कार्यवाहीची मागणी केली आहे. गेल्या १२ वर्षांपासून राज्यात योग्य प्रमाणात शिक्षक भरती न झाल्यामुळे शिक्षण व्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे. यावर मार्ग काढण्याऐवजी…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारा ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील आणि जवळच्या लोकांचे पूर्ण सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल. आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. फक्त घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा आणि आरोग्याची योग्य काळजी घ्या. वृषभ – आजचा दिवस संयम आणि शांततेने घालवण्याचा आहे. मनामध्ये अनेक प्रकारचे विचार एकाच वेळी येतील, ज्यामुळे थोडे मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. आर्थिक बाबींमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबत संवाद चांगला ठेवल्यास नात्यातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: आश्वी परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या एका धक्कादायक घटनेत अज्ञात दोन भामट्यांनी एका ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. आश्वी-प्रतापपूर रस्त्यावरील आंधळे पेट्रोल पंपाजवळ बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली असून, या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतापपूर येथील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय शकुंतला गंगाधर चतुरे या आंधळे पेट्रोल पंपाजवळ चहाची टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास त्या दुकानात असताना दोन अज्ञात इसम तेथे आले. त्यांनी चहा मागण्याच्या बहाण्याने शकुंतला यांच्याशी संवाद साधला. दुकानात आणि आसपास गर्दी नसल्याचा फायदा घेत या भामट्यांनी अचानक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर (प्रतिनिधी): नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरलेला निसर्गरम्य ‘तामकडा’ धबधबा प्रवाहित झाला असून या तामकड्याचे जलपूजन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. हिरव्यागार वनराईच्या कुशीतून वाहणारा हा पांढराशुभ्र धबधबा परिसरातील नागरिकांसह प्रवाशांसाठी मोठा आनंददायी ठरत आहे. जलपूजनानंतर बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, अकोले व संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य परिसर आहे. बाळेश्वर पर्वतावरून वाहणाऱ्या नदीमुळे घाटातील हा सुंदर तामकडा निर्माण झाला असून पावसाळ्यात तो पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. नाशिक-पुणे महामार्गावरून प्रवास करताना अनेक पर्यटक व नागरिक या ठिकाणी थांबून निसर्गाचा आनंद घेतात.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शेकडो वर्षांची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या संगमनेरच्या मानाच्या पहिल्या गणपती श्री सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळाच्या गणेशोत्सव २०२६ च्या अध्यक्षपदी रोशन आमले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. रंगारगल्ली येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात मंडळाच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करून नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी अभिजीत पाटणकर, तर उपाध्यक्षपदी संकेत काजळे व ऋषिकेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदाची जबाबदारी अक्षय ढोरे यांच्याकडे तर सहसचिवपदाची जबाबदारी प्रथमेश गरुडकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मंडळाच्या तिजोरीची धुरा खजिनदार देवेंद्र काळे व कैलास बुरसे सांभाळणार असून प्रकल्पप्रमुख…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर | अनंत पांगारकर गोवा बनावटीच्या आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दारूची अवैध तस्करी, विक्री व बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईत गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स, नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे आणि दुचाकी वाहन असा तब्बल ५ लाख ३८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (८ ऑगस्ट) रोजी रात्री संगमनेर शहरातील जनता राजा मैदानाजवळील शिवाजीनगर परिसरातील एका घरात गोवा राज्यातील प्रतिबंधित मद्याचा मोठा साठा असल्याची खात्रीशीर बातमी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. बातमीच्या आधारे पथकाने तातडीने रचून छापा टाकला. या कारवाईत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर:  नातवाला वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी घेतलेल्या आजोबांचा नातवासोबतच बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.  या अपघातामुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. पांडुरंग रखमा गुळवे (वय ६५) आणि सर्वेश संतोष गुळवे (वय १३, दोघेही रा. गुळवे वस्ती, सावरगाव तळ, ता. संगमनेर) अशी मृत झालेल्या आजोबा-नातवाची नावे आहेत. गुळवे वस्तीवर राहणाऱ्या गुळवे कुटुंबाच्या घराशेजारीच शेततळे आहे. रविवारी सायंकाळी सर्वेशचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. हा प्रकार त्याच्या मोठ्या बहिणीच्या लक्षात येताच तिने तात्काळ आरडाओरड केली. आवाज ऐकून जवळच असलेल्या आजोबा पांडुरंग गुळवे यांनी क्षणाचाही विचार न…

Read More