Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना या निर्णयामुळे विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण लागू असेल. महसूलमंत्री विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात वारी नियोजनाच्या आढावा बैठकीत वारकरी बांधवांना विमा योजना लागू करण्याबाबत सूतोवाच केले होते.‌ याबाबत त्यांनी व्यक्तीश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून या योजनेला मूर्त स्वरूप दिले. वारीत एखाद्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अल्पवयीन मुलीवर सतत पाच वर्ष अत्याचार करणाऱ्या आरोपी विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग पाच वर्ष या मुलीला धमकावत, घरच्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत, ब्लॅकमेलिंग करून हा प्रकार घडला आहे. विनोद दत्तू गडकरी (रा. पेमगिरी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याच्याविरोधात एकोणवीस वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान 376, 376(2), (I,N), 506 कलमान्वये व बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 चे कलम 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीसोबत काढलेल्या फोटोचा गैरफायदा घेत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – कोपरगावच्या दर्शना पवार हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे पोलीस यशस्वी झाले आहे. संशयित आरोपी आणि दर्शनाचा मित्र राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. लग्नाला नकार दिल्याच्या कारणातून ही हत्या झाल्याचे समोर येत आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एमपीएससी परीक्षेत यश मिळवत रेंज फॉरेस्ट ऑफिसर (RFO) झालेल्या दर्शनाचा मृतदेह काटवणामध्ये आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालानंतर तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीस तपासात ती मित्र राहुल हंडोरे यांच्यासोबत राजगडावर गेली होती. मात्र काही वेळानंतर राहुल हंडोरे हा एकटाच गडावरून खाली आल्याचे निष्पन्न झाले होते. घटनेनंतर तो गायब झाल्याने या हत्याप्रकरणी पोलिसांची संशयाची सुई राहुलच्या दिशेने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – तक्रारदाराच्या कुटुंबीयांवर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये जामीन प्रक्रियेत मदत केली म्हणून व गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणारा लाचखोर पोलीस हवालदार चार हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे (नेमणूक बेलवंडी पोलीस स्टेशन, श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे या लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. अहमदनगर एसीबीचे पोलीस उपाधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. तक्रारदाराने एसीबीकडे केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार त्याची पत्नी, मुलगी व मुलगा यांच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात 1 जून 2023 रोजी गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये 12 जून रोजी लाचखोर आरोपी…

Read More

समनापुर येथे दूध संघाच्या मेडिकल शुभारंभ महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तालुक्यात दररोज सात लाख लिटर दूध उत्पादित होत असून साखर कारखाना व दूध संघामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती मिळाली आहे. संगमनेरचे चांगले वातावरण काहींना पहावत नाही, हे अत्यंत दुर्दैवाचे आहे. संगमनेर तालुक्याचा विकास व प्रगतीमुळे राज्यात सन्मान होत असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. समनापुर येथे दूध संघाच्यावतीने ‘राजहंस मेडिकल’च्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, संचालक विलास वर्पे, संतोष मांडेकर, डॉ. प्रमोद पावसे, सोमनाथ जोंधळे, सरपंच कमलताई बर्डे, भास्कर शरमाळे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – सर्वसामान्‍य नागरिकांसाठी सुरु केलेल्‍या वाळू धोरणाची अंमलबजावणी शासन प्रभावीपणे करणार आहे. तेव्हा शासनाच्या या कल्याणकारी उपक्रमात अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे. यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला. संगमनेर तालुक्‍यातील आश्‍वी बुद्रूक येथे जिल्ह्यातील तिसऱ्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते‌. यावेळी अहमदनगरचे जिल्‍हाधिकारी सिद्धाराम सालिमठ, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी सुहास मापारी, संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विखे पाटील म्‍हणाले, वाळू व्यवसायातून सुरु असलेले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात सेवा, समर्पण आणि गरीबाच्या कल्याणासाठी काम झाल्याने भारत वेगाने विकासाच्या दिशेने जात आहे. सर्व समाजाचा विकास आणि उन्नती करण्याचे स्वप्न केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार साकारीत आहे. सरकारची नऊ वर्षातील ही कामगिरी सोशल मीडियातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन हिमाचल प्रदेशचे प्रभारी तथा चंदिगड प्रदेश अध्यक्ष संजय टंडन यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल @9 अभियानांतर्गत शिर्डीमध्ये ‘सोशल मीडिया प्रभावशाली व्यक्ती भेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टंडन बोलत होते. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सामाजिक क्षेत्रात वेगळा दबदबा असलेल्या व विविध लोकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून संगमनेरकरांच्या मनात स्थान निर्माण करणार्‍या राजस्थान युवक मंडळाच्या अध्यक्षपदी उद्योजक मनीष मालपाणी यांची फेरनिवड करण्यात आली. तर मंडळाच्या कार्याध्यक्षपदी सम्राट भंडारी, उपाध्यक्षपदी सुदर्शन नावंदर, खजिनदारपदी व्यंकटेश लाहोटी, सहखजिनदार आदित्य मालपाणी, सचिवपदी ओंकार इंदाणी व सहसचिवपदी आनंद लाहोटी यांच्या नावावर एकमत झाले. संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्राला विस्तृत करणारा, राज्यात नावारुपाला आलेला संगमनेर फेस्टिव्हल, शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी डास निर्मुलन मोहिम, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, हायटेक पद्धतीचा अवलंब करुन दरवर्षी होणारेे माहेश्‍वरी वधु-वर परिचय संम्मेलन अशा विविध उपक्रमांद्वारे मंडळाने शहराच्या सामाजिक क्षेत्रात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या संगमनेर-अकोले तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून बुधवारी पहाटे दोन वाजेपर्यंत ‘कोंबिंग ऑल आऊट ऑपरेशन’ राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. आगामी काळात येऊ घातलेले सण, उत्सव शांततेमध्ये पार पडावेत, त्याचप्रमाणे गुन्हेगारांवर एकत्रित रित्या एकाच वेळी कारवाई करण्याच्या उद्देशाने संगमनेर शहर संगमनेर तालुका घारगाव आश्वी अकोले आणि राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन राबविण्यात आले. यात संगमनेर उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यासंदर्भात पोलीस प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. मंगळवारी रात्री पोलीस प्रशासनाने दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये तब्बल ४३ जिवंत गोवंश जनावरे कत्तली होण्यापूर्वीच वाचविली आहेत. विशेष म्हणजे यातील एका कारवाईत जिवंत गोवंश जनावरांनी आरडाओरडा करू नये, यासाठी कत्तलखाना चालकाने गोवंश जनावरांच्या तोंडाला काळ्या रंगाच्या चिकटपट्ट्या चिकटविण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात दोघा कत्तलखाने चालकांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारित सन १९९५ कलम ५, ९(अ) तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा कलम ३, ११ प्रमाणे दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | सकारात्मक माझ्या घराजवळ पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा आहे. त्या शाळेच्या पटांगणावर मी कधी कधी चालायला जाते. त्या पटांगणात निरागसतेच्या लहरी पसरलेल्या असतात म्हणून की काय कोण जाणे पण तिथे गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं. काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला. त्यावरचा मजकूर बघून माझे पाय थबकले. “Buddy Bench” असे शब्द लिहिले होते. त्याच्या खाली अजून दोन ओळी होत्या. हा काय प्रकार आहे असा विचार करत मी उभी असताना एक नऊ वर्षाची, पोनिटेल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली. मी तिला विचारलं, “ हा नवा आहे का ग बेंच?” ती म्हणाली, “ नाही. “बडी बेंच” नवा नाही.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी पेमगिरी येथील बाळासाहेब भोर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. क्रांतिसेनेचे राज्य संपर्कप्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी त्यांना नवनियुक्तीचे पत्र दिले आहे. याअगोदर भोर यांच्याकडे क्रांतिसेनेच्या युवक तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती ती त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे. विशेष करून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आपापल्या परीने शक्य होईल त्याप्रमाणे न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आहे. खांडगाव पेमगिरी रस्त्याचा प्रश्न असेल किंवा प्रवरेच्या पाटाच्या खोदकामात शेतकऱ्यांच्या तुटलेल्या पाईपलाइनचा प्रश्न असेल तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठ्याचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नांबाबद त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. कोरोनाच्या संकटात त्यांनी कुचकामी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अनंत पांगारकर | संगमनेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीवरून शिर्डीमध्ये मंजूर केलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा विभाजनासाठी कळीचा मुद्दा ठरले आहे. त्यामुळे जिल्हा विभाजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर संगमनेर जिल्ह्याच्या मागणीसाठी जिल्हा कृती समितीच्यावतीने मंगळवारी प्रांताधिकार्‍यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन प्रस्तावित आहे. उत्तर नगर दक्षिणचे मुख्यालय कोठे करावे, यावरून या प्रश्नाचे भिजत घोंगडे पडले असून संगमनेर, श्रीरामपूरसह शिर्डी जिल्हा मुख्यालयाच्या स्पर्धेत आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून महसूल मंत्री पद नगर जिल्ह्यात विशेषत: शिर्डी, संगमनेर मतदार संघामध्ये आहे. पालघर जिल्ह्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात सहाव्या आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाला वेगळ वळण मिळाल आहे. दर्शनाच्या डोक्यात आणि शरीरावर आढळलेल्या गंभीर जखमांमुळे तिच्या मृत्यू झाल्याचा अहवाल पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येत आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्ती विरोधात वेल्हे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची पाच पथके आरोपीचा शोध घेत आहे. दर्शना पवार हिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत रविवारी आढळून आल्याने याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आता मात्र पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. दर्शना दत्ता पवार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेअंतर्गत संगमनेर येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक ऋषिकेश जगदीश मालाणी यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्रा. ऋषिकेश मालाणी यांनी बँकिंग अँड फायनान्स या विषयांतर्गत “महाराष्ट्रातील नागरी सहकारी पतसंस्थांच्या समस्या आणि संभावनांचा अभ्यास” या विषयावर संशोधन कार्य केले. त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रो. डॉ. आर. एन. वाकचौरे यांचे मार्गदर्शन लाभले. पीएचडी प्रबंधाच्या मौखिक सादरीकरणासाठी रेफरी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. डॉ. वीणा हुंबे तर बहिस्थ परीक्षक म्हणून वींझर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संजीव लाटे यांचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार निविष्ठा वेळेत उपलब्ध होतील यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी. तसेच बोगस निविष्ठा विक्री व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. खरीप हंगाम तयारी संदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. तदनंतर उपस्थित अधिकाऱ्यांची बैठक घेत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 3 जुलै 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्‍ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा, महासभा, आंदोलने व जातीय संवेदनशील वातावरण इत्‍यादीमुळे सार्वजनिक शांतता राखण्‍यासाठी जिल्‍हादंडाधिकारी यांनी 3 जुलै 2023 रोजीच्‍या रात्रीचे 12 वाजेपर्यंत हे प्रतिबंधात्‍मक आदेश लागु राहतील, असे प्रसिध्‍दीस दिलेल्‍या पत्रकान्‍वये कळविले आहे. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने (ठाकरे) वर्धापन दिनानिमित्त सोमवारी शहरातील नेहरू गार्डन जवळ असलेल्या शिवसेना कार्यालयात सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. पदाधिकारी कार्यकर्त्यांचा नागरिकांनी यावेळी प्रसादाचा लाभ घेतला. शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरदेखील एकनिष्ठ शिवसैनिकांनी रविवारी मुंबईत झालेल्या पदाधिकारी शिबिरात मोठी गर्दी केली होती. या शिबिरासाठी संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी मुंबई येथे उपस्थित राहून मान्यवरांचे मार्गदर्शन घेतले तसेच आज १९ जूनला शिवसेना शहर व तालुक्याच्यावतीने (ठाकरे गट) संगमनेर येथील नेहरू गार्डन परिसरातील कार्यालयात सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदाधिकारी व…

Read More

विखे गटाची सत्ता उलथून सभासदांनी केले परिवर्तन महाराष्ट्र संवाद न्यूज  राहाता – राहाता तालुक्याची कामधेनु असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर गणेश परिसरातील सभासदांनी विश्वास ठेवून श्री गणेश परिवर्तन पॅनलचे 18 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय केले असून विखे गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. राज्यभराचे लक्ष लागलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी उठली होती. काँग्रेस पक्षाचे नेते व सहकारातील आदर्श नेतृत्व आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच गणेशच्या निवडणुकीत लक्ष घातले. युवा नेतृत्व विवेकभैय्या कोल्हे व आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली गणेश परिवर्तन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: शहरातील नासिक-पुणे महामार्गावर असलेल्या जोर्वे नाका येथे रविवारी (ता २८मे) रात्री झालेल्या हाणामारी आणि दंगल प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या वीस आरोपींना सोमवारी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जवळपास तीन आठवडे आरोपी तुरुंगामध्ये होते. शहरातील जोर्वे नाका येथे झालेल्या वादातून काही नागरिकांवर धारदार शस्त्राचा वापर करत प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला. यात जोर्वे येथील आठ जणांना बेदम मारहाण करत जखमी करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या घटनेचे पडसाद तालुक्यात व शहरात देखील उमटले. घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये…

Read More