Author: Annant Ppangarkar

रविवार विशेष लेख — प्रवीण पुरो- केंद्रातल्या युती सरकारने नव्याने जारी केलेला वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या (GST) कर प्रणालीत सुधारणा करत देशभर जीएसटी बचत उत्सव साजरा करण्याचा नवा खेळ सुरू केला आहे. सात वर्षाच्या लुटीनंतर लोकांना वेडं बनवण्याचा हा नवा खेळ. याआधी नोटबंदीचा उत्सव, कोरोनात थाळ्या बडवण्याचा उत्सव साजरा करताना या सरकारने लोकांना अक्षरश: उल्लू बनवलं. नोटबंदी फसली आणि सत्ताधार्‍यांची स्वत:ची पुंजी वाढवली. कोरोनात थाळ्या वाजवल्या आणि पीएम केअर फंडाद्वारे हजारो कोटींची व्यक्तीगत कमाई केली. जीएसटी प्रणाली सुरू करताना त्यात असंख्य चुका आणि प्रचंड तक्रारींचा बोजा वाढला. या तक्रारींना जराही दाद न देणार्‍या या सरकारला आठ वर्ष उलटल्यानंतर…

Read More

मेष – व्यावसायिक दृष्ट्या आजचा दिवस उत्तम राहील. व्यवसायात चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. फॅशन, ग्लॅमर आणि डिझाइनिंगशी संबंधित लोकांना लाभ होईल. नोकरदार महिलांना कामाच्या ठिकाणी कौतुक मिळेल. कौटुंबिक जीवनात धार्मिक वातावरण राहील, पण आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. वृषभ – आज करिअरमध्ये नवीन बदल होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकता, ज्यामुळे धनलाभ होईल. तुमचा दांपत्य जीवन आनंदी राहील आणि तुम्ही जोडीदाराला भेटवस्तू द्याल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या आनंदी असाल. तुमच्या कर्मक्षेत्रात विस्तार होईल आणि पदोन्नतीचा योग बनत…

Read More

अहिल्यानगर – प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या ते अतिमोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने, अकोले तालुक्यातील निळवंडे धरण परिसरात अत्यंत सतर्कता बाळगण्याचे आवाहन उर्ध्व प्रवरा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी केले आहे. निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे नदीपात्र व धरणाच्या खालील परिसरातील पाण्याचा वेग व पातळी लक्षणीय वाढणार आहे. या संभाव्य परिस्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना म्हणून, नदीपात्र व जलाशय परिसरात असलेले कोणतेही साहित्य अथवा जनावरे तात्काळ हलविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. तसेच, विसर्गात टप्प्याटप्याने वाढ होण्याची…

Read More

संगमनेर: नाशिक परिमंडळात अहिल्यानगर मंडळांतर्गत येणाऱ्या संगमनेर विभागातील वीज वितरण सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संगमनेर उपविभाग-१ आणि २ चे विभाजन करून नवीन ‘संगमनेर उपविभाग-३’ स्थापन करण्यास महावितरणने मंजुरी दिली आहे. नवीन उपविभाग-३ च्या पद निर्मितीसाठी वार्षिक १,२६,७३,०९२ इतका खर्च तसेच कार्यालय निर्मितीसाठी १२ लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मंजुरी मिळाली असल्याचे आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. प्रशासकीय कामकाजातील अडचणी कमी व्हाव्यात, तसेच नागरिकांना सुलभ आणि जलद सेवा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संगमनेर भागात शेती पंपधारक, ग्राहक आणि व्यावसायिक यांची मोठी संख्या असल्याने वीज जोडणीस होणारा उशीर,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन माजी पोलीस उपअधीक्षक (DYSP) यांच्या मुलाने कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देत, दोन तरुणी आणि त्यांच्या मित्राला पिस्तुलाचा धाक दाखवून डांबून ठेवल्याची आणि त्यांच्यावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवरील ‘कॅटल हाऊस’ या हॉटेलमध्ये हा गंभीर प्रकार घडला. या प्रकरणी हॉटेलचा चालक व सेवानिवृत्त DYSP संजय देशमुख यांचा मुलगा सौरभ देशमुख याच्यासह वेटर मोहित मिलिंद ताम्हाणे यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गंगापूररोडवरील एका व्यावसायिक फोटोग्राफर तरुणीसह तिच्या मैत्रिणीला हॉटेलात डांबून ठेवत पिस्तुलाचा धाक दाखवून दोघींकडे शरीरसुखाची मागणी करण्यासह अनैतिक व्यवसाय करण्यास सांगितल्याचे फिर्यादीतून उघड झाले आहे. याप्रकरणी सौरभसह…

Read More

अहिल्यानगर – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक २७ ते २९ सप्टेंबर या तीन दिवसांदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात या कालावधीत वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना अत्यंत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. धरण विसर्ग वाढल्याने नदीकाठी पूरस्थितीचा धोका- पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नदीकाठच्या नागरिकांना विशेषतः सतर्क राहण्याचे आणि पाणीपातळीत वाढ झाल्यास तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर…

Read More

अहिल्यानगर – ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी राज्यभर दौरा करत असलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर आज (शनिवारी) अहिल्यानगर जिल्ह्यात अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात हाके यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या दगडफेकीत लक्ष्मण हाके यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी सहकाऱ्यांसाठी जात होते. नगर जवळील अरणगाव येथे दौरा सुरू असताना अचानक काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या…

Read More

छत्रपती संभाजीनगर: काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शनिवारी सकाळी पाहणी करून राज्य सरकारला ‘बाकी सारे सोडा, पहिले शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा’ असे कळकळीचे आवाहन केले आहे. त्यांनी तात्काळ आणि विनाअट मदत देण्याची मागणीही केली. बांधावर जाऊन जाणून घेतल्या व्यथा- बिहारमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित राहिल्यानंतर, थोरात यांनी तातडीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाकडे धाव घेतली. त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ढोरकिन आणि टाकळी फाटा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या पाहणी दौऱ्यात त्यांच्या समवेत खासदार कल्याण काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, इसुफ शेख, रवींद्र…

Read More

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचे दोन टायर शुक्रवारी सायंकाळी टेंभुर्णी बायपासवर खड्ड्यांमुळे अचानक फुटले. सुदैवाने, धाराशिव येथील शासकीय गाडीवरील चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला आणि डॉ. गोऱ्हे सुखरूप आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती तुमच्या कार्यालयाचे कार्यालयीन अधिकारी योगेश जाधव यांनी दिली. सोलापूरहून पुण्याकडे जात असताना ही घटना घडली. टेंभुर्णीच्या बायपास मार्गावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवास करताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. डॉ. गोऱ्हे यांच्या गाडीपाठोपाठ प्रवास करणाऱ्या आणखी दोन वाहनांचेही टायर त्याच परिसरात फुटल्याने या रस्त्याच्या गंभीर स्थितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. हे खड्डे लोकांच्या जीवावर बेतत असून ते तातडीने बुजविण्याची…

Read More

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी गावाजवळ शुक्रवारी (दि. २६ सप्टेंबर) सकाळी कंटेनर आणि टिप्परमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. विशेष म्हणजे, याच ठिकाणी आदल्या दिवशी (गुरुवारी) झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले होते, तर एका महिलेचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, डी एन 09 एस 9484 क्रमांकाचा कंटेनर घेऊन जाणारा चालक मोहम्मद सलीम (रा. वेदराम कॉलनी, हरियाणा) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याने एम एस 17 ए जी 5438 क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या टिप्परला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच डोळासने महामार्ग केंद्राचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी…

Read More

मेष – व्यवसायात काही अनावश्यक बदलांना सामोरे जावे लागेल. गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो. प्रवासात अडचणी येऊ शकतात.  वृषभ – प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस आहे. तब्येत उत्तम राहील. वैवाहिक जीवनात गोडी राहील आणि अचानक धनलाभ संभवतो.  मिथुन – अपूर्ण कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धनप्राप्ती होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नोकरीत लाभ होईल. कर्क – सक्रिय दृष्टिकोन कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवेल. वैयक्तिक जीवनात चांगला बदल आणि नात्यांमध्ये बहर येईल. मध्यस्थी करण्याची क्षमता वाढेल. सिंह – जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे, पण कोणालाही पैसे उधार देणे टाळा. कन्या – आनंददायी परिणाम मिळतील आणि तुमची प्रशंसा होईल. उत्पन्न वाढेल.…

Read More

अहिल्यानगर – जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी (७ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे. जिल्ह्यातील पंचायत समित्या सभापती पदासाठी कुठल्या प्रवर्गासाठी आरक्षित होतात याकडे आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक प्रक्रिया यामुळे सुरू झाल्याची मानले जात आहे. ग्रामविकास विभागाच्या ९ सप्टेंबर २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार, राज्यातील पंचायत समित्यांमध्ये सभापती पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी (या सर्व प्रवर्गातील महिलांसह) आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई विविध कारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्ष कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनाना जेरीस आणणाऱ्या राज्य सरकारने आता काळे झेंडे दाखवणारे आणि रस्ते अडवणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधी पोलीस कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याने आणि मराठवाड्यात पूर पाहणीसाठी आलेले आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचीही गाडी आडवण्याचा प्रयत्न झाल्याने महसूल मंत्री बावनकुळे आक्रमक झाले आहेत. त्यांनी मंत्र्यांची गाडी अडवणारे आणि काळे झेंडे दाखवणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती, पिके आणि…

Read More

संगमनेर – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर वैभवशाली आणि सुसंस्कृत ठरले असून, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिला शक्तीचा सन्मान करण्यासाठी या आठवड्यात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, (२७ सप्टेंबर) आणि रविवारी, (२८ सप्टेंबर) फक्त महिला भगिनींसाठी यशोधन मैदानावर सायंकाळी ७ ते १० या वेळेत मोफत ‘क्लब दांडिया’ होणार आहे. या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे, रविवारी (२८ सप्टेंबर) ‘देवयानी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री शिवानी सुर्वे दांडिया खेळण्यासाठी महिलांसोबत उपस्थित राहणार आहे. ती सहभागी झालेल्या सर्व महिला व युवतींसोबत स्वतंत्रपणे दांडिया खेळणार आहे. कुटुंब फाउंडेशन, शिवतांडव प्रतिष्ठान, हिंदुराजा प्रतिष्ठान आणि एकविरा फाउंडेशन यांच्या वतीने…

Read More

संगमनेर: संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी (काल) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील तिगाव परिसरात हा अपघात झाला. अर्जुन सचिन लोणारी (वय २९, रा. जोर्वे, ता. संगमनेर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अर्जुन लोणारी हे आपल्या दुचाकीने (क्र. एम.एच. १५ ए.सी. ८८९३) तळेगाव दिघे येथील महाविद्यालयाकडे जात असताना हा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तिगाव परिसरात समोरील दिशेने येणाऱ्या कंटेनर क्रमांक (एन. एल. ०१ ए. के. २३८८) वरील चालकाने अर्जुन यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातात अर्जुन गंभीर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वाळू, खडी आणि मुरुमाच्या वाहतुकीसाठी दरमहा २० हजार रुपयांची लाच (हप्ता) मागणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल अनिल रामनाथ गवांदे (वय ३५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.  ही कारवाई राहाता पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली असून, यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांचा खडी, मुरुम आणि वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या खडी भरलेल्या डंपरवर १८ सप्टेंबर २०२५ रोजी राहाता पोलिसांनी कारवाई करत तो जप्त केला होता. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल गवांदे यांनी तक्रारदारांना फोन करून भेटायला बोलावले. राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यवसाय सुरळीत चालू ठेवायचा असेल आणि डंपरवरील कारवाई टाळायची…

Read More

मेष (Aries) – आजचा दिवस अनुकूल आहे. कामांमध्ये यश आणि सन्मान मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाची प्राथमिकता ठरवून पुढे जा.  वृषभ (Taurus) – मेहनतीने स्थिती मजबूत होईल. वेळ आणि कामाचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. दीर्घकाळापासूनचे अडथळे दूर होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मिथुन (Gemini) – तुमच्या सूझबूझ आणि कल्पनाशक्तीमुळे मोठे लाभ मिळतील. साख (प्रतिष्ठा) आणि सन्मानात वाढ होईल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे.  कर्क (Cancer) – भावूकतेवर नियंत्रण ठेवा. आरोग्य थोडे मध्यम राहू शकते. कुटुंबात सौहार्द राखणे महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. सिंह (Leo) – सकारात्मक परिस्थितीचा फायदा घ्या. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यांमध्ये सहभाग…

Read More

अहिल्यानगर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपला वाढदिवस यावर्षी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसाच्या अनुषंगाने त्यांचा एक मेसेज समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.  काय म्हटले आहे तांबे यांनी या मेसेजमध्ये… प्रिय मित्र-मैत्रिणींनो, खरंतर 27 सप्टेंबरला माझा वाढदिवस आहे… दरवर्षी आपण सर्वजण मला प्रत्यक्ष अथवा डिजिटल माध्यमातून शुभेच्छा देता. तुमचे प्रेम व आपला ऋणानुबंध साजरा करण्याचा तो दिवस असतो. त्यामुळेच अनेकदा मला आवडत नसतानाही मी हा दिवस साजरा करतो, कारण तो दिवस आपल्याला भेटण्याची एक संधी असते. राजकीय-सामाजिक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम होऊन जातो. आणि स्पर्धेच्या…

Read More

संगमनेर – पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी गावाजवळ गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. संगमनेरकडून पुण्याकडे जाणाऱ्या कार आणि समोरून येणाऱ्या आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. एमएच १२ एफ १४२१ क्रमांकाची कार पुण्याकडे जात होती, तर एमएच १३ सीयू ९१५६ क्रमांकाचा आयशर टेम्पो संगमनेरच्या दिशेने येत होता. दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्याने कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग केंद्राचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल…

Read More

संगमनेर – आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीच्यावतीने शहरात नवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाला महिलांनी पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमामुळे महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच आनंददायी मनोरंजनाचा अनुभव मिळाला. संगमनेरमधील गणेश नगर, महाराणा प्रताप चौक, आदर्श कॉलनी, मालदाड रोड, ऑरेंज कॉर्नर आणि आझाद चौक या भागांमध्ये हा कार्यक्रम बुधवारी रात्री उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रत्येक ठिकाणी महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता, यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता पहिल्याच दिवशी दिसून आली.  या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. मैथिलीताई तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासोबत ‘आय लव्ह…

Read More