Author: Annant Ppangarkar

दैनिक राशीभविष्य: २ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीत प्रगती होईल. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस उत्तम असून, जुन्या व्याधींपासून सुटका मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वृषभ आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी काही ठोस पावले उचलली जातील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यापारात नवीन गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. मिथुन आज तुम्हाला तुमच्या वाणीवर ताबा ठेवावा लागेल, अन्यथा विनाकारण वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी ताणतणाव जाणवण्याची शक्यता आहे, त्यामुळे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुका पोलिसांनी नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हे घाट परिसरात मोठी कारवाई करत गुटखा आणि सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १९ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ मार्च २०२६ रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे अंमलदार गस्त घालत असताना त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीचा (क्रमांक एम.एच. ४६ एक्स. ४०४६) संशय आला. पोलिसांनी या वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला मोठा साठा मिळून आला. यामध्ये ६ लाख ५३ हजार ४०० रुपये किमतीचा विमल पान…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – शहर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत सुकेवाडी-समनापूर रोड परिसरातून तब्बल १० लाख ९४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी २१ किलो ४९० ग्रॅम वजनाचा गांजा आणि एक स्विफ्ट डिझायर कार हस्तगत केली असून, दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२६ रोजी रात्री आठ ते दहाच्या दरम्यान सुकेवाडी येथील समनापूर रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल विजय अण्णा खुळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रथमेश उर्फ भैय्या पोपट राऊत (वय २६, रा. घुलेवाडी, संगमनेर) आणि प्रथमेश सुरेश गोलवड (वय २१, रा. शिर्डी,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या आणि गेल्या काही दिवसांपासून ‘हे करावंच लागेल’ असे भीष्म गर्जना करणाऱ्या संगमनेर २.० च्या मोहिमेला सोमवारी सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी नेहमीच सॉफ्ट टार्गेट ठरलेल्या नवीन नगर रस्त्यावर मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली. या कारवाईची फलनिष्पत्ती समोर येण्यासाठी संगमनेरकरांना काही दिवसाची वाट बघावी लागणार आहे. संगमनेर नगर परिषदेने आत्तापर्यंत केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमा अक्षरशः फार्स ठरल्या आहेत. अतिक्रमण आणि नवीन नगर रोड हे पालिकेच्या दृष्टीने एक समीकरण बनले आहे. शहरातील कोणत्याही गल्लीबोळातील अतिक्रमणांना हात न लावणाऱ्या नगर परिषदेसाठी कारवाईचा गाजावाजा करण्याकरता नेहमी नगर रोड प्राधान्य क्रमावर…

Read More

दैनिक राशीभविष्य: २ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला मोठी संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी असलेले मतभेद संपुष्टात येतील. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे, परंतु घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. नवीन कामाची सुरुवात करताना मोठ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. वृषभ आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. व्यावसायिकांना आज अपेक्षित नफा मिळेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. मनात असलेले जुने विचार बाजूला सारून भविष्याचा विचार करणे हिताचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थिती मजबूत राहील. मिथुन आजचा दिवस बौद्धिक कामांसाठी उत्तम आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. नवीन…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यात राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे वेगाने पूर्ण केली जात असून, भविष्यात स्थानिक तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. हिवरगाव पावसा येथे जलसंपदा विभागाच्या सुमारे एक कोटी रुपये निधीतून ऊर्ध्व प्रवरा उजव्या कालव्यावरील ‘एस्केप’मधून पाणी सोडण्याच्या कामाचा आणि पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्यांच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्यासह कपिल पवार, प्रमोद राहाणे, जनार्दन आहेर आदीसह महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विखे म्हणाले की, निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्याने…

Read More

एखाद्या संस्थेला किती महत्व द्यायचं याचं मापदंड नसल्याने बिनकामाच्या संस्थांचं महत्व कमालीचं वाढतं. पात्रता नसताना महत्व मिळाल्याने या संस्थांना आभाळ ठेंगणं होतं. आणि या संस्था देशाची इभ्रत रस्त्यावर घालवायला मोकळ्या होतात. सत्ताधार्‍यांनी मोठ्या गाजावाजाने प्रोजेक्ट केलेल्या गलगोटीया नावाच्या युनिव्हर्सिटीचं असंच काहीसं सुरू आहे. इतर संघटनांच्या विद्यार्थ्यांना बदनाम करणं, त्या संघटनांविरोधी निदर्शनं करणं, त्यांच्यावर दगडं फेकणं असल्या राजकारणासाठी ज्यांचा वापर खुबीन केला जातो, अशा काही मोजक्या संस्थांमध्ये गलगोटीया युनिव्हर्सिटीचा अंतर्भाव होतो. विरोधकांना जो कोणी धडा शिकवेल त्यांच्यासाठी हिरवा गालीचा अंतरण्याचे उद्योग सत्ताधार्‍यांनी 2014 पासूनच सुरू केले आहेत. याची फळं गलगोटीया नावाच्या युनिव्हर्सिटीने नुकतीच देशवासीयांना चाखवली. हा केवळ राजकीय खेळ नाही. युनिव्हर्सिटी…

Read More

दैनिक राशीभविष्य: १ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन ऊर्जेचा असेल. प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी काळ अनुकूल आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, तर व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्साहाच्या भरात कोणालाही वचन देताना विचारपूर्वक द्या. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ आजचा दिवस आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यातील चिंता कमी होईल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवा, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. नवीन गुंतवणुकीचे विचार मनात असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मिथुन तुमच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला आज वाव मिळेल. मित्रमंडळींसोबत वेळ मजेत जाईल. कामाच्या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  सत्ता आणि पद हे केवळ अधिकार गाजवण्यासाठी नसून ते जनसेवेचे एक पवित्र माध्यम आहे, हाच विचार घेऊन संगमनेर नगरपरिषदेचे नगरसेवक योगेश (चिकू) जाजू यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. आपल्या प्रभागातील नागरिकांच्या अडीअचणी आणि प्रलंबित प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी त्यांनी ‘नगरसेवक आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला असून उद्या येत्या १ मार्चपासून ते प्रभागातील प्रत्येक गल्लीत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. निवडून आल्यानंतर अनेकदा लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील संपर्क कमी होतो, अशी तक्रार नागरिकांमध्ये असते. मात्र, योगेश जाजू यांनी याला छेद दिला आहे. मी तुमच्या मताने निवडून आलो असलो, तरी खऱ्या अर्थाने मी तुमचा सेवक आहे,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  शहर परिसरात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ३२ किलो ८४५ ग्रॅम गांजा जप्त करून खळबळ उडवून देणाऱ्या पोलीस कारवाईला आता कायदेशीर प्रक्रियेत एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या परवेझ दाऊद शेख याला संगमनेरच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, ११ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री संगमनेर शहर पोलिसांनी ‘गोल्डन सिटी’ परिसरात गुप्त माहितीच्या आधारे मोठी छापेमारी केली होती. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ३२ किलो ८४५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला होता. या मोठ्या साठ्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती आणि पोलिसांनी याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act)…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यात रविवारी (१ मार्च) राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या दौऱ्यात चंदनापुरी ते शिरापूर रस्त्यावरील ३ कोटी २४ लाख ७० हजार रुपये खर्चाच्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येईल. तसेच हिवरगाव पावसा येथील निळवंडे प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्यावरील १ कोटी ३२ लाख रुपयांच्या सी.आर. एस्केप कामाचे लोकार्पण होणार असून, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द दरम्यान बसवण्यात आलेल्या नव्या पथदिव्यांचा लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे.…

Read More

प्रवरानगर: डिजिटल युगात तंत्रज्ञान कितीही बदलले तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही, उलट ती नव्या माध्यमांतून अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त करत वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त असून समाजाने यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही अहिल्या नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी केले. प्रवरानगर येथील खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. मगरे, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सरपंच कल्पना मैड, सहायक ग्रंथ संचालक सचिन जोपुळे, साहित्यिक जयंत येलूलकर, प्रा. गणेश भगत,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली संस्कृती असल्याचे सांगत, तिच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन करत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यिक व कवींना सोबत घेऊन आपण एक ‘संगमनेर पॅटर्न’ तयार करू, असा विश्वास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्याचे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालयात संगमनेरमधील नामवंत कवी आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी काव्यसंमेलन व मराठी भाषा समृद्धीसाठी विशेष चर्चा झाली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सुधीर तांबे पुढे म्हणाले की, कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आपण हा उत्सव साजरा करतो, मात्र…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाचा वारसा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमनेर शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी ‘शिवजयंती उत्सव युवक समिती’ सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर समितीच्या नवनिर्वाचित नूतन पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, अध्यक्षपदी विनायक गरूडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ‘आपली समिती, आपली ताकद’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून या युवक समितीने आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला आहे. समितीच्या या नूतन कार्यकारिणीत अनुभवी आणि उत्साही तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. उपाध्यक्ष म्हणून हर्षल जेधे आणि विजय चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असून, किरण वर्पे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. समितीच्या कामात गती आणण्यासाठी…

Read More

आजचे राशीभविष्य: शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ ​मेष ​आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन ऊर्जेचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. ​वृषभ ​आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. धनलाभाचे योग असून जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरासाठी नवीन वस्तूची खरेदी करण्याचे बेत आखाल. ​मिथुन ​आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होऊ शकते. व्यवसायात सावधानता…

Read More

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करत सरकारकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी विशेषतः शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, शेतकऱ्यांचा हमीभाव, बिबट्यांचा वाढता प्रादुर्भाव आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर आपली भूमिका मांडली. शेती क्षेत्राबद्दल बोलताना आमदार तांबे म्हणाले की, सरकारने ‘एआय फॉर ॲग्री’ सारख्या उपक्रमांतून तंत्रज्ञानावर भर दिला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे औषधे आणि पाण्याचा वापर ३० ते ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो, ज्यामुळे उत्पादन खर्च घटेल. मात्र, तंत्रज्ञानापेक्षाही शेतकऱ्यांसाठी ‘हमीभाव’ हा अधिक महत्त्वाचा विषय आहे. अमेरिकेसोबत झालेल्या ट्रेड डीलचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गेल्या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि शासकीय विभागांमधील अनागोंदी कारभारावरून आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात राज्य सरकारला धारेवर धरले. प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी विशेषतः अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि आरोग्य विभागातील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधत प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. संगमनेर तालुक्यातील सामान्य जनता, शेतकरी आणि रुग्णांच्या हितासाठी त्यांनी विधिमंडळात आक्रमक पवित्रा घेतला. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कामकाजावर बोलताना आमदार खताळ यांनी स्पष्ट केले की, हा विभाग थेट गोरगरीब आणि कष्टकऱ्यांशी जोडलेला असतानाही तिथे अनेक अडचणींचा डोंगर उभा आहे. अनेक अन्न योजना स्थगित किंवा मर्यादित केल्यामुळे स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असून, गरजू…

Read More

अहिल्यानगर: सोशल मीडियावर सध्या ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने एक पत्रक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून हे पत्रक पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहे. या पत्रकाद्वारे असा दावा केला जात आहे की, १ मार्च २०२० नंतर ज्या मुलांच्या एका किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा १८ वर्षांखालील मुलांना दरमहा ४ हजार रुपयांची मदत दिली जाईल. या अफवेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत असून शासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनाने यासंदर्भात महिला व बाल विकास विभाग तसेच समाज कल्याण विभागाकडून अधिकृत माहिती घेतली असता, राज्यात अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचे…

Read More

कारवाईमुळे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड झाले असून पोलीस आता या प्रकरणाच्या अधिक मुळाशी जात आहेत. मालेगाव: येथील छावणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बनावट नोटांच्या प्रकरणाचा छडा लावण्यात मालेगाव परिमंडळ पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी थेट छत्रपती संभाजीनगर येथील बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार संतोष उत्तमराव केळसकर याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी पाचशे रुपयांच्या २०० बनावट नोटांसह नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण २ लाख ३६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाची सुरुवात २३ जानेवारी २०२६ रोजी झाली, जेव्हा सटाणा नाका येथील एचडीएफसी बँकेत एका फायनान्स कंपनीचे…

Read More

आजचे राशिभविष्य ​मेष ​मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात आपल्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ आपल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करतील. व्यापारात नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मात्र जीवनसाथीसोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करावा जेणेकरून विनाकारण वाद होणार नाहीत. ​वृषभ ​वृषभ राशीच्या लोकांसाठी आज धनलाभ होण्याचे संकेत आहेत. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांना नवीन संधी चालून येतील. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस सामान्य आहे, पण बाहेरचे अन्न खाणे टाळावे. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत मजेत जाईल, ज्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. ​मिथुन ​मिथुन राशीच्या व्यक्तींना आज संमिश्र फळे मिळतील. घाईघाईत…

Read More