Author: अनंत पांगारकर

आज धनत्रयोदशी असल्यामुळे काही राशींना विशेष धनलाभ आणि प्रगतीचे योग आहेत. कोणतेही मोठे निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. मेष (Aries) – आजचा दिवस आनंददायक आणि उत्साही असेल. तुमच्या जोडीदाराला प्रभावित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा वाढेल. नोकरीमध्ये यशाच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करा. अध्यापन, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील लोकांना यश आणि पदोन्नतीचे योग आहेत. धनलाभाचे योग आहेत, जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. वृषभ (Taurus) – आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आणि आरामदायी असेल. कामाची वेळेवर पूर्तता आणि प्रभावी आत्मविश्वासाच्या बळावर तुम्हाला दिवसभर शांतता व समाधान मिळेल. तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि मानसिक ताण कमी होईल. मिथुन…

Read More

अहिल्यानगर – राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्यासह मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला‌.  सात्वंनपर भावना व्यक्त करतांना सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, दिन- दलित, शोषीत, गरीब, कष्टकऱ्यांच्या पाठिशी कर्डिले नेहमीच ठामपणे उभे राहिले. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग असे काम केले. सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्याविषयी अपार, प्रेम व स्नेह होता. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण…

Read More

संगमनेर – शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायामुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक विकासाला मोठा आधार मिळाला आहे. संगमनेर तालुक्यातून दररोज सुमारे ९ लाख लिटर दुधाची निर्मिती होत असून, शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे महत्त्व अनमोल आहे. भाकड जनावरांसाठी सरकारने प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केली. राजहंस दूध संघ येथे आज (शुक्रवार १७ ऑक्टोंबर) वसुबारस निमित्त गाईंचे पूजन करण्यात आले. यावेळी चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हॉइस चेअरमन राजेंद्र चकोर, संचालक संतोष मांडेकर, विलास कवडे, गोरखनाथ नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. रणजितसिंह देशमुख म्हणाले की, माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध…

Read More

संगमनेर – माजी मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. थोरात म्हणाले की, कर्डिले यांच्या निधनाने ग्रामीण विकासाची दृष्टी आणि ‘ग्रामीण शहाणपण’ असलेले लोकनेते हरपले आहेत. अनेक वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले आणि राज्याच्या मंत्रिमंडळात दुग्धविकास मंत्री म्हणून काम केलेले शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्यांची भावना जाणणारे नेतृत्व होते, असे थोरात यांनी नमूद केले. तसेच, जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे काम प्रभावी ठरले. मुद्देगिरीने बोलणारे आणि माणसांची कदर करणारे नेतृत्व गमावल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकारणावर चांगली पकड…

Read More

संगमनेर – वॉटरपार्क आणि थीमपार्कच्या माध्यमातून देशभरात नावलौकिक मिळवणाऱ्या मालपाणी उद्योग समूहाने आता संगमनेरच्या मनोरंजन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. शहराच्या सांस्कृतिक जीवनात गेल्या अनेक वर्षांपासून जाणवणारी अत्याधुनिक चित्रपटगृहाची पोकळी भरून काढत, या उद्योग समूहाने दोन पडद्यांचा समावेश असलेल्या ‘मालपाणी मल्टिप्लेक्स’ची उभारणी केली आहे.आज (शुक्रवार, दि. १७) सायंकाळी या मल्टिप्लेक्सचा भव्य शुभारंभ होत आहे. या नव्या मल्टिप्लेक्समुळे दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी संगमनेरकरांना लोणी किंवा नाशिक येथे करावी लागणारी ‘वारी’ आता थांबणार आहे. ‘गाय छाप’मुळे देशात परिचित असलेल्या मालपाणी उद्योग समूहाने गेल्या दोन दशकांत वॉटरपार्क आणि थीमपार्कच्या क्षेत्रात मोठी व्यावसायिक क्रांती घडवली आहे. शिर्डी येथील वॉटरपार्कपासून सुरू झालेला हा प्रवास आशिया खंडातील…

Read More

संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तांबे म्हणाले की, ‘प्रस्थापित नसतानाही आपल्या कर्तृत्वाने दोन दशकांहून अधिक काळ अहिल्यानगरच्या राजकारणात स्वतःचा दबदबा निर्माण करणारे कर्डिले साहेबांचे जाणं अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारं आहे. दुःख व्यक्त करताना नेमकं काय म्हणाले तांबे… प्रस्थापित नसतानाही प्रस्थापितांच्या जिल्ह्यात स्वतःच्या एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राजकारण करून मागील दोन दशकांहून अधिक काळ आपल्या कर्तृत्वातून एक वेगळाच दबदबा निर्माण करणारे माजी मंत्री, राहुरी विधानसभेचे आमदार व अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन मा. शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि…

Read More

अहिल्यानगर: भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी मंत्री आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६६ वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून कर्डीले यांच्या निधनाची माहिती दिली आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे शिवाजीराव कर्डीले यांना त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तेथे आणण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. राहुरीच्या आमदारकीसोबतच शिवाजीराव कर्डीले यांच्याकडे अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपदही होते. अनेकदा…

Read More

आजचा दिवस धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे, कारण एकादशी आणि दिवाळीची सुरुवात यानिमित्ताने होत आहे. आज रमा एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. आजपासून दिवाळी सणाला सुरुवात होते, दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच आज वसूबारस आहे. मेष (Aries): व्यस्तता आणि धावपळ राहील पण आर्थिक लाभ होतील. व्यवसायाच्या योजना भविष्यात फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. अतिउत्साहात जास्त खर्च टाळावा. वृषभ (Taurus): मित्रांच्या भेटीचे योग आहेत. मोठा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा. जुने प्रकल्प पूर्ण होतील आणि नवीन संधी मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. मिथुन (Gemini): व्यावसायिक उन्नती होईल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. सर्जनशील कामात यश आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कर्क (Cancer):…

Read More

संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यात असलेल्या चंदनापुरी घाटात आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. संगमनेरहून साकुरच्या दिशेने निघालेली एसटी बस (एमएच ०७ सी ९२५२) चंदनापुरी घाटातील एका धोकादायक वळणाजवळ साईड गटारीच्या अंदाज न आल्याने बसच्या डाव्या बाजूची चाके गटारात गेल्याने बस एका बाजूला पलटी झाली. मात्र शेजारीच डोंगर असल्याने ती डोंगरावर कलल्यामुळे या अपघातात बसमधील शालेय विद्यार्थ्यांसह १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरहून साकुरकडे प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस जेव्हा चंदनापुरी घाटातून प्रवास करत होती, तेव्हा धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावर पलटी झाली. अपघात होताच…

Read More

संगमनेर – संगमनेर शहरामध्ये एका कॉलेजमध्ये मजुरी करणाऱ्या महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीतून समोर आला असून या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात या संदर्भातील अधिक माहिती समोर येणार आहे.  एका तीस वर्षीय वयाच्या महिलेने या संदर्भात आरोपी विरोधात फिर्याद दिली असून आरोपीचे पूर्ण नाव अद्याप उपलब्ध झाले नाही. या संदर्भात मंगळवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत चांगुलपणाचा आव आणीत तिचा गैरफायदा घेत तिचे सोबत 4 एप्रिल 2025 पासून 23 सप्टेंबर 2025 यादरम्यान पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचे म्हटले…

Read More