Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी- शुद्धता आणि गुणवत्तेसाठी महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेल्या राजहंस दूध संघाने आता बेकरी उद्योगात आपले पाऊल टाकले आहे. ‘राजहंस मिल्क अँड बेक्स’ अंतर्गत उत्पादित करण्यात आलेल्या विविध दर्जेदार बेकरी पदार्थांचा भव्य शुभारंभ माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयात आयोजित ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शना’च्या उद्घाटन सोहळ्यात या नवीन उपपदार्थांचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले. याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार उभा असून दूध व्यवसायामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. संगमनेरची ओळख आता ‘दुधाचा तालुका’ म्हणून सर्वदूर पोहोचली असून राजहंसने नेहमीच आपल्या उत्पादनांची…
संगमनेर, प्रतिनिधी – थोर स्वातंत्र्यसेनानी आणि अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, ज्यांना सहकारातील संत मानले जाते, त्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती येत्या सोमवारी, १२ जानेवारी २०२६ रोजी ‘प्रेरणा दिन’ म्हणून संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील गावोगावी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अमृत उद्योग समूहाच्या वतीने मुख्य अभिवादन कार्यक्रम सकाळी ९ वाजता अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे होणार आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली असून, यावेळी माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ…
आश्वी, प्रतिनिधी- आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत आश्वी खुर्द येथील दोन महिलांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे. महांकाळेश्वर मंदिर परिसरात सापडलेली ३० हजार रुपये किमतीची सोन्याची वस्तू मूळ मालकिणीला परत करून त्यांनी माणुसकी जपली आहे. २७ डिसेंबर रोजी महांकाळेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या उज्वला भंडारे यांना सोन्याची एक मौल्यवान वस्तू सापडली. त्यांनी ही माहिती पती मनोज भंडारे यांना दिली. त्यानंतर पत्रकार संजय गायकवाड यांच्या मदतीने सोशल मीडियावर याबद्दल संदेश प्रसारित करण्यात आला. दरम्यान, १२ वीत शिकणाऱ्या श्रावणी जगताप या विद्यार्थिनीलाही त्याच वस्तूचा उर्वरित भाग सापडला होता. तिनेही या संदेशाला प्रतिसाद देत संपर्क साधला. योग्य चौकशीअंती सदर सोने कांताबाई दत्तात्रय मांढरे यांचे…
मेष – मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खुश राहतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, मात्र जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ असून जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. वृषभ – आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. धावपळीच्या कामांमुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढा. व्यवसायात नवीन करार करताना कागदपत्रांची नीट पडताळणी करा. नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. घरातील थोरामोठ्यांचा सल्ला घेतल्यास कठीण प्रसंगातून मार्ग काढणे सोपे होईल. मिथुन – मिथुन राशीच्या व्यक्तींना आज वैचारिक स्पष्टता जाणवेल. नवीन…
संगमनेर, प्रतिनिधी- पिंपळे पाझर तलावातून दोन्ही गावांसाठी रब्बी हंगामाचे पाणी शुक्रवारी (९ जानेवारी) सोडण्यात आले. आमदार अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन जलसंपदा विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या, ज्याची अंमलबजावणी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव आणि पारेगाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चिंचोली गुरव व पारेगाव परिसरात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पिंपळे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र, रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिके सध्या पाणीअभावी धोक्यात आली होती. पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. ही समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे…
संगमनेर, प्रतिनिधी- व्यावसायिक कामासाठी घेतलेली हातउसनवार रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश (चेक) बँकेत न वटल्याने संगमनेर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चं. प्र. रघुवंशी यांच्या न्यायालयाने एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. परक्राम्य संलेख अधिनियमाच्या कलम १३८ अन्वये हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादी ज्ञानेश्वर माधव वर्पे हे संगमनेर शहरात ‘वर्पे इन्श्युरन्स अँड मल्टी सर्विसेस’ नावाचा व्यवसाय करतात. आरोपी सागर भाऊसाहेब गोपाळे (वय ३८ वर्ष, रा. धांदरफळ बुद्रुक) यांचा ‘श्री स्वामी समर्थ ट्रान्सपोर्ट’ नावाचा व्यवसाय असून गाड्यांच्या विम्याच्या कामामुळे या दोघांचा परिचय झाला होता. जून २०२२ मध्ये आरोपीने आपल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी फिर्यादीकडून १ लाख २५ हजार…
संगमनेर, प्रतिनिधी- कृषी क्षेत्र हे अत्यंत व्यापक असून यामध्ये संशोधनासह आर्थिक समृद्धीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातील नवनवीन माहितीसाठी ‘कळस कृषी प्रदर्शन’ हे संपूर्ण राज्यात लोकप्रिय ठरले असून, अमृतवाहिनीतील या प्रदर्शनाच्या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्यावतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आयोजित ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाचे’ शानदार उद्घाटन थोरात यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष…
संगमनेर, प्रतिनिधी- तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीचा अत्यंत बेजबाबदार आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. गावाच्या स्वच्छतेसाठी शासनाकडून आलेली लाखो रुपयांची घंटागाडी गेल्या चार वर्षांपासून एका गोदामात सडत पडली असतानाच, याच गोदामात आपल्या देशाच्या महापुरुषांचे फोटो अत्यंत विदारक आणि अपमानस्पद अवस्थेत फेकल्याचे समोर आले आहे. थेट व्हिडिओ पुराव्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभाराचे वाभाडे निघाले असून संपूर्ण तालुक्यातून संतापाची लाट उसळली आहे. गावातील घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यासाठी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून शिबलापूर गावाला लाखो रुपये किमतीची घंटागाडी देण्यात आली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही गाडी नागरिकांच्या सेवेत येण्याऐवजी एका खासगी गोदामाची शोभा वाढवत आहे. गावात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असताना सरकारी मालमत्तेची…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा आणि मेहनतीचा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे, जी तुम्ही आत्मविश्वासाने पूर्ण कराल. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर जुनी देणी फेडण्यात तुम्हाला यश येईल आणि गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे सततच्या कामातून विश्रांती घेणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्याने मानसिक ताण कमी होईल. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कौटुंबिक सौख्याचा असेल. घरातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबत असलेले छोटे-मोठे मतभेद संपुष्टात येतील. व्यवसायात भागीदारीत काम करणाऱ्यांनी व्यवहारात पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात गैरसमज होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात…
संगमनेर, प्रतिनिधी- निवडणुकीच्या काळात ‘लाडकी बहीण’ म्हणत मतांची बेगमी करणाऱ्या महायुती सरकारने आता आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली असून संगमनेर तालुक्यातील तब्बल १७,९६७ महिलांना या योजनेतून अपात्र ठरवत डच्चू दिला आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यात महायुती सरकारबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली असून, निवडणुकीपुरता बहिणींचा वापर करून आता सरकारने विश्वासघात केला आहे, अशी घणाघाती टीका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चनाताई बालोडे यांनी केली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील विकसित तालुका असलेल्या संगमनेरमध्ये, जनतेला सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालय नेहमीच अग्रेसर असते. याच भावनेतून यशोधनच्या यंत्रणेने रात्रंदिवस काम करून तालुक्यातील सुमारे ९० हजार महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून…
