Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातून संगमनेर तालुक्यात समृद्धी निर्माण झाली असून हा तालुका आता दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात आहे. आगामी काळात पंजाबप्रमाणे दुग्ध क्षेत्रात क्रांती करण्याकरता रणजीतसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘मिशन ५० लिटर’ क्षमतेच्या गाईंच्या निर्मितीमुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती होईल, असे गौरवोद्गार पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांनी काढले आहेत. तर पशुपालकांनी आगामी काळात ‘कमी गाई जास्त दूध’ हे सूत्र वापरावे, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.सोमवारी वसंत लॉन्स येथे संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने आयोजित ‘मिशन ५० लिटर’ दुग्ध क्रांती कार्यशाळेत ते बोलत होते.…
संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी सोमवारी सकाळी धांदरफळ, डेरेवाडी, निमज यांसह विविध गावांतील नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलेल्या या भागातील महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विलंब न लावता तातडीने सरसकट पंचनामे पूर्ण करावेत, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल, असे स्पष्ट निर्देश आमदार खताळ यांनी यावेळी प्रशासनाला दिले. तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, डेरेवाडी, गोडसेवाडी, निमज आणि राजापूर या गावांमध्ये गारपिटीने गहू, कांदा, टोमॅटो, मका आणि डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले असून उभी पिके जमिनीदोस्त झाली…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे घडलेल्या बहुचर्चित खुनाच्या घटनेतील आरोपींना न्यायालयाने अखेर शिक्षा सुनावली आहे. सोमवारी न्यायालयाने मुख्य आरोपीला जन्मठेप तर अन्य दोघांपैकी एका आरोपीला दहा वर्षाची सक्त मजुरी व तिसऱ्या आरोपीला दहा वर्षे साध्या कैदेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. या खटल्याची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, २२ जून २०२० रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वडगावपान येथील फिर्यादी प्रतीक बाबासाहेब चत्तर यांच्या ‘कमळेश्वर चिकन शॉप’वर ही घटना घडली होती. आदल्या दिवशी झालेल्या भांडणावरून पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपी राहुल देविदास काळे, देविदास हरिभाऊ काळे आणि रामनाथ सावित्रा गायकवाड हे तेथे आले होते. त्यांनी फिर्यादीचे वडील बाळासाहेब चत्तर यांना…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षाने केलेल्या फसवणुकीचे प्रकरण तालुक्यात चांगले चर्चेत आले असून सोमवारी न्यायालयाने संस्थापक अध्यक्ष मधुकर बादशहा वाळे याच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली तर त्याची संचालक पत्नी आणि पतसंस्थेचे महिला व्यवस्थापक यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मुख्य आरोपीच्या कोठडीत वाढ झाल्याने पोलीस चौकशीतून काय समोर येते याकडे लक्ष लागले आहे. कर्ज देण्याच्या बहाण्याने एका अनुसूचित जातीच्या कुटुंबाची जमीन हडपण्याचा प्रकार समोर आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने संगमनेर तालुक्यातील झोळे येथील कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षाने आपल्या पदाचा गैरवापर करून बनावट कागदपत्र आधारे फसवणूक केल्याप्रकरणी संचालक मंडळाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फसवणूक,…
संगमनेर, प्रतिनिधी- रविवारी संगमनेर तालुक्यातील पश्चिम भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. याचबरोबर अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला याचबरोबर सरकारने तातडीने पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी अशी आग्रही मागणी केली. निमज, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी समवेत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, अनिल काळे, बाळासाहेब देशमाने, अरुण गुंजाळ, सागर डोंगरे, मंगेश मतकर, रमेश गुंजाळ, विजय राहणे, दत्तू…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा राहील. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनाला उभारी मिळेल. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे कठीण निर्णय घेणे सोपे जाईल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ: आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील, मात्र घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मिथुन: आज आपणास आपल्या बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल, अन्यथा विनाकारण वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो, परंतु संयमाने परिस्थिती हाताळल्यास यश नक्की मिळेल. कर्क: कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. नवीन वस्तू किंवा वाहन खरेदीचे योग जुळून…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून पठार भाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव पट्टा अशा तीन विभागांत हा तालुका विभागलेला आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशामुळे तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असून, उन्हाळ्याची तीव्रता वाढताच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत शासनाच्या मदतीची प्रतीक्षा न करता, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून टंचाईग्रस्त ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे. एक कुटुंबप्रमुख म्हणून जनतेच्या अडीअडचणीला धावून जाण्याची आपली परंपरा थोरात यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा जपली आहे. संगमनेर तालुक्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांसाठी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, या…
संगमनेर, प्रतिनिधी – नव्या पिढीतील अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण केलेले आमदार सत्यजित तांबे यांनी मुंबई येथे संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांची प्रभावी मांडणी केली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा जपत आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या आमदार तांबे यांनी या अधिवेशनात युवकांची बेरोजगारी, महिला सुरक्षा, नाशिक-पुणे रेल्वे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. त्यांच्या या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक मांडणीची सध्या राज्यभर चर्चा होत आहे. अधिवेशनातील उपस्थिती आणि कामकाजाच्या बाबतीत आमदार सत्यजित तांबे यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. १९ दिवसांच्या कामकाजापैकी १७ दिवस…
नाशिक: नाशिकमध्ये महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत नाशिक जिल्हा न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. खरातची कोठडी संपल्याने रविवारी त्यास न्यायाधीश एम. व्ही. भराडे यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासासाठी आणखी वेळ हवा असल्याचे सांगत तीन दिवसांच्या वाढीव कोठडीची मागणी केली, ती न्यायालयाने मान्य केली. न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, आरोपी तपासात सहकार्य करत नाहीये. खरातवर आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आहेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने आरोपीचा मोबाईल डेटा रिकव्हर…
संगमनेर, प्रतिनिधी- येथील अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा संगमनेरच्या वतीने आयोजित ‘बोलक्या बाहुल्या’ या पपेट शो कार्यक्रमास पालक आणि बालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सह्याद्री कॉलेजमधील के.बी. दादा देशमुख सभागृहात रंगलेल्या या कार्यक्रमात पपेट शो कलाकार संगीता पुंडगे यांनी आपल्या बाहुल्यांच्या माध्यमातून नागपंचमी, होळी, अफजलखान वधाचा ऐतिहासिक प्रसंग, लावणी, हिंदी गीते आणि देशभक्तीपर गीतांची जोड देऊन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मनोरंजन आणि प्रबोधनाचा हा अनोखा मिलाफ बालकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरला. या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष अनिल देशपांडे, डॉ. विवेक वाकचौरे, अरविंद गाडेकर, प्रा. अरुण लेले, दर्शन…
