Author: Annant Ppangarkar
प्रवीण पुरो / मुंबई शुक्रवार १३ डिसेंबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३.० सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीतील कुठल्या पक्षाला किती खाती मिळणार? कुठली खाती मिळणार? यावरून धाकधूक वाढली आहे. यातच शिंदेंच्या शिवसेनेतून कुणाला संधी मिळणार? याची नावे समोर आली आहेत. प्राप्त वृत्तानुसार, शिंदेंच्या शिवसेनेला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदे मिळतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जे आमदार मंत्री होते, त्यातील काही जणांना वगळून नव्यांना संधी देण्यात येईल, असंही सांगितलं जातं. संभाव्य मंत्र्यांच्या यादीत भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचा समावेश असेल. यंदा गोगावले यांची कोट घालण्याची इच्छा पूर्ण होईल असं मानलं जातं. अडीच वर्षांच्या कार्यकाळात…
शुक्रवार १३ डिसेंबर सहा वर्षाच्या मुलीसह चित्रपट पाहून स्कुटीवरून घरी परतत असलेल्या संगमनेर महाविद्यालयातील महिला प्रोफेसरला शहरालगतच्या घुलेवाडी फाट्याजवळ चार चाकी वाहनाने दिलेल्या धडकेत माय-लेकी जखमी झाल्या आहे. जखमी मायलेकींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यासंदर्भात जखमी असलेल्या प्रोफेसर ललिता बाबुलाल मालुसरे सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम. एच. 05 – 8886 या चार चाकी वाहनाच्या अज्ञात चालकाविरोधात मोटर वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, बुधवारी (११ डिसेंबर) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रोफेसर मालुसरे या आपल्या सहा वर्षे वयाच्या मुलीसह घुलेवाडी येथील छोटू महाराज टॉकीजमध्ये चित्रपट पाहून आपल्या स्कुटीवरून गोल्डन…
शुक्रवार १३ डिसेंबर मुंबई – महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित झाला असून यात भारतीय जनता पक्षाला २१, शिवसेनेला १३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे मिळणार आहे. नव्या मंत्रिमंडळात ४३ मंत्र्यांचा समावेश असेल. भारतीय जनता पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या आणि समोर आलेल्या संभाव्य २१ मंत्र्यांच्या नावाच्या यादीत अहिल्यानगरचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांचा समावेश नसल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्याकडून आता मंत्रिपदासाठी फिल्डींग लावली जाण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. भाजप आणि शिवसेनेकडून जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार असल्याचे चिन्ह असून राष्ट्रवादी काँग्रेस कडून मात्र चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट व राज्यमंत्रीपद दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुती…
विशेष प्रतिनिधी / मुंबई गुरुवार १२ डिसेंबर – महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. १६ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. महायुतीत मंत्रिपदावरून एकमत होत नसल्यामुळे आणि कोणाला किती मंत्रिपद द्यायची? कुठली खाती द्यायची? यावरून एकमत होत नसल्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचं बोललं जातंय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर ठाम आहेत. पण भाजपा हे खाते सोडण्याच्या तयारीत दिसत नाही. तर दुसरीकडे शिवसेनेला शांत करण्यासाठी शिंदे यांच्या पक्षाला सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि नगरविकास (UD) खात्यांची…
गुरुवार १२ डिसेंबर संगमनेर – संगमनेरच्या मालपाणी हेल्थ क्लब अँड रिसॉर्ट मधून तब्बल सहा लाख रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींकडे केलेल्या तपासानंतर ही चोरी उघड करण्यात पोलिसांना यश आले. हेल्थ क्लब अँड रिसॉर्ट मध्ये काम करणाऱ्या रिसेप्शनिस्टने ही चोरी केल्याच्या समोर आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. काय होती घटना – शहरालगत असलेल्या मालपाणी हेल्थ क्लब अँड रिसॉर्ट मधून रविवारी सकाळी सात ते मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान व्यवस्थापक सचिन सदाशिव गाडे यांच्या केबिनमधील तिजोरीतून सहा लाख रुपयांची रोकड चोरी गेली होती. यांच्यावर व्यक्त केला होता संशय…
गुरुवार १२ डिसेंबर गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या, घरफोड्या सातत्याने सुरू आहे. शहरातील मालपाणी हेल्थ क्लबच्या रिसॉर्टमधून तब्बल सहा लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या संदर्भात रिसॉर्टचे कर्मचारी सचिन सदाशिव गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गाडे यांच्या तिजोरीत सहा लाख रुपयांची रोकड जमा होती. तिजोरीतील ही रोख रक्कम चोरी गेली आहे. याप्रकरणी तिघा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांनी ही रोकड चोरल्याचा आरोप आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी विशाल चंद्रकांत शिंदे, सचिन अशोक काळे व प्रथमेश संजय मिसाळ या तिघांविरुद्ध…
गुरुवार १२ डिसेंबर जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी येरवड्याच्या खुल्या कारागृहातून पसार झाल्याची घटना समोर आली आहे. अनिल मेघदास पटोनिया (वय ३५) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव असून त्याच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटोनिया मूळचा ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरात असलेल्या म्हारल गावातील आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा, तसेच १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. खुले कारागृह स्वतंत्र शासकीय संस्था आहे. चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांची रवानगी खुल्या कारागृहात केली जाते. पटोनिया याची कारागृहातील वर्तणूक चांगली असल्याने त्याची रवानगी खुल्या कारागृहात करण्यात आली होती. बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे खुल्या कारागृहातील…
गुरुवार १२ डिसेंबर संगमनेर – रस्त्याने शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलींसमोर पॅन्ट काढून विकृत चाळे करणाऱ्या परप्रांतीय तरुणा विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या एक-दीड महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुख गुलामनबी अन्सारी (रा. पोद्दार स्कूल जवळील फर्निचर कारखान्याजवळ, सुकेवाडी मूळ रा. बरेली, उत्तर प्रदेश) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या विकृत आरोपीचे नाव आहे. अन्सारी हा गेल्या एक-दीड महिन्यापासून सुकेवाडी रस्त्यावर हा प्रकार सुरू होता. परिसरातील मुली शाळा कॉलेजला जात असताना आरोपी अन्सारी हा त्याची पॅन्ट काढून मुलींकडे बघत विकृत चाळे करत तसेच मुलींचा…
गुरुवार १२ डिसेंबर मुंबई : राज्यात महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महाविकास आघाडीचे काही आमदार खासदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असून भाजपकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवले जाण्याची चिन्ह आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीत भाजप नंबर वनचा पक्ष ठरल्याने महाविकास आघाडीतील आमदार, खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. या दाव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’ राबवले जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील कोणीही भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात नाही, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बावनकुळे यांचा दावा खोडून काढला आहे. नाना…
गुरुवार १२ डिसेंबर नवी दिल्ली : देशात कोरोनानंतर तरुणांच्या अचानक होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली. या प्रकारानंतर कोरोना लशीमुळे तरुणांचे अचानक होणारे मृत्यू वाढल्याची सर्वत्र चर्चा होती. तसेच कोरोना लशीच्या दुष्परिणामांबाबतही उलटसुलट चर्चा होत होती. मात्र, कोरोनाची लस या मृत्यूंना कारणीभूत नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले. आरोग्य मंत्री नड्डा यांनी बुधवारी राज्यसभेमध्ये या संदर्भात स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, ‘आयसीएमआर’च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की कोरोना लशीमुळे मृत्यूची अचानक होणाऱ्या शक्यता कमी होते. ‘आयसीएमआर’च्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी’ने १८ ते ४५ वयोगटातील लोकांवर एक अभ्यास केला. यामध्ये अशा लोकांचा समावेश करण्यात आला, ज्यांचा १ ऑक्टोबर २०२१…
गुरुवार १२ डिसेंबर मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसंदर्भात राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने एक पत्रक काढले आहे. योजनेच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या प्रश्नांना माजी महिला व बालकल्याण मंत्री एका ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिल आहे. लोकसभेला महायुतीला राज्यात मोठं अपयश पाहावं लागलं होतं. परंतु, त्यानंतर राज्यातील महायुती सरकारने राज्यातील महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना आणली. महायुतीमधील नेत्यांनी या योजनेचा व त्यामार्फत महायुती सरकारचा जोरदार प्रचार केला गेला. परिणामी महायुतीने राज्याच्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकल्या. विरोधकांनीही लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम झाल्याचे मान्य केले. महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची…
विशेष प्रतिनिधी /मुंबई बुधवार ११ डिसेंबर – लाडक्या बहिणींमुळे महायुतीचं सरकार आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने सांगतात. पण, लाडक्या बहीण योजनेसाठी नव्या अटी आणि शर्ती लावण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक महिलांना वगळले जाऊ शकते. मात्र, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम महिलांना यातून वगळण्याची मागणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सर्वाधिक लाभार्थी मुस्लिम – मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजने’चे सगळ्यात जास्त लाभार्थी हे मुस्लीम समाजाचे आहेत. मात्र, दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देण्यात येऊ नये, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. यामुळे खरेच दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना ‘लाडकी…
विशेष प्रतिनिधी / मुंबई बुधवार ११ डिसेंबर – भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नेहमी खालच्या पातळीवर टीका करतात. मंगळवारी पडळकर यांनी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे जाऊन शरद पवार यांच्याबद्दल टीका करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पडळकरांच्या विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर भाजपने पडळकर यांना जाब विचारत स्पष्टीकरण मागितलं आहे. पडळकर यांनी खालच्या पातळीवर टीका करताच राज्यभर त्यांचा आणि ज्या पक्षाचे ते आमदार आहेत त्या भाजपवर सर्वत्र जोरदार टीका होत होती. तरीही भाजपकडून याची अपेक्षित दखल…
बुधवार, ११ डिसेंबर संगमनेर – संगमनेर नगर परिषदेच्या सहकार्याने शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी नाशिक येथील खासगी संस्थेने सुरू केलेले वाँटर एटीएम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. यामुळे नागरिकांना खाजगी पाणी पुरवठा करणार्या व्यक्तीकडून पाणी घ्यावे लागत आहे. पालिकेची शुद्ध पुरवठा योजना ठेकेदाराला फायदेशीर ठरली आहे संगमनेर नगर परिषदेच्यावतीने दररोज शहरातील उपनगरात नळाव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन टाकुन कायम स्वरूपी हा प्रश्न मार्गी लावला आहे. पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे यासाठी प्रवरा नदीजवळ साई मंदिर परिसरात जल शुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. तरीही नगर परिषदेने दहा वर्षांपूर्वी नाशिक येथील ‘प्रथमेश एन्टरप्रायजेस’ या संस्थेला शहरात शुद्ध…
बुधवार, ११ डिसेंबर सातारा – व्यवस्थेला लागलेली लाचेची कीड किती भयानक आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून साताऱ्यामध्ये मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडी सत्र न्यायालयाच्या आवारात घडल्यानंतर साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून जिल्हा व सत्र न्यायाधीश महोदय धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यानंतर, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. न्यायाधीशालाच लाच घेताना पकडण्यात आले आहे. त्यामुळे लाचखोरीमध्ये न्याय यंत्रणादेखील बरबटल्याचे समोर आले आहे. राज्यातील न्याय पालिका क्षेत्रात मोठी खळबळ या कारवाईमुळे उडाली आहे. फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी संबंधितांकडून पाच लाखांची…
बुधवार, ११ डिसेंबर तत्कालीन मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालिकेसाठी दिलेल्या निधीतून शंभरावर कामे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. रखडलेल्या या कामांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे. ही काम तातडीने पूर्ण केली जावीत यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर मोर्चा नेत प्रशासकांना मागण्यांचे निवेदन दिले. यांनी दिले निवेदन – मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना हे निवेदन देण्यात आले असून यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक यांच्यासह माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर टोकसे, किशोर पवार, नूर मोहम्मद शेख, शैलेश कलंत्री, सिद्राम दिद्दी, योगेश जाजू, प्रमोद कडलग, अफजल शेख, एकनाथ श्रीपाद,…
बुधवार, ११ डिसेंबर – संगमनेर संगमनेरमधील उच्चभ्रूची वसाहत समजल्या जाणाऱ्या गोल्डन सिटीतील शिक्षकाचा शिवपुष्प बंगला अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या फोडत ५० ग्रॅम वजनाच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १५ हजार रुपयांची रोकड लांबविण्याची घटना समोर आली आहे. शिक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात दागिने चोरीच्या तसेच दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत असताना त्यातच आता दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंद घरे लक्ष केले असल्याचे समोर येत आहे. दरम्यान या संदर्भात पोलिसांकडून मोठी गुप्तता राखली जात आहे. ७ डिसेंबरला घडलेल्या चोरीच्या दोन घटनादेखील तब्बल तीन दिवसानंतर समोर आल्या आहे. शिक्षक असलेल्या विलास कारभारी काळे यांनी…
मंगळवार, १० डिसेंबर – अहिल्यानगर अवसायानात निघालेल्या नगर अर्बन सहकारी बँकेमध्ये अडकलेल्या पाच लाखांपेक्षा वरील ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांची संघटित शक्ती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने बँकेच्या ठेवीदारांचा रविवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता शहरातील महाजन गल्लीतील गायत्री मंदिरात ठेवीदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बँक बचाव कृती समितीचे सदस्य डी. एम. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, अर्बन बँकेच्या पाच लाखांच्या आतील ठेवीदारांना त्यांच्या ठेव रकमा प्राप्त झाल्या आहेत. मात्र, त्यापैकी कोणाही ठेवीदाराकडून बँक बचाव कृती समितीला याची माहिती दिली नाही. या ठेवीदारांना ठेवी मिळवून देण्यासाठी समितीने मोठा संघर्ष केला, लढा उभारला, याचाही…
बुधवार, १० डिसेंबर – मुंबई लोकभावनेची दिशा तुम्हाला कळली असती तर आज ही दशा झाली नसती. लोकांच्या मनात काय ते तुम्हाला कळलेच नाही, परिणामतः बाळासाहेब थोरात आज सभागृहात नाही, नाना पटोले तुम्ही तर २०८… म्हणजे थोडक्यात वाचले, असे चिमटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काढले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अनुक्रमे एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना शिंदे यांनी लोकांनी तुम्हाला नाकारले आहे…
मंगळवार, १० डिसेंबर – संगमनेर बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अन्याय, अत्याचार होत आहे. हिंदूंची मंदिरे, घरे जाळण्यात, तोडण्यात येत आहे. हिंदू साधूंना तुरुंगात टाकले जात आहे. याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी सकाळ हिंदू समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यांचा सहभाग – सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेला या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नागरिक पदाधिकारी तसेच संगमनेरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटना देखील सहभागी झाल्या. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ देखील यावेळी उपस्थित होते. यांना दिले निवेदन – मंगळवारी सकाळी लाल बहादूर शास्त्री चौकातून निघालेला हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. मोर्चासमोर महानुभव पंथाचे विजय…
