Author: Annant Ppangarkar
अहिल्यानगर ता. १७ – ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळून गावकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या स्वामित्व योजनेंतर्गत ५० लाख मालमत्ता पत्रकाचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात येणार आहे. शनिवारी (१८ जानेवारी) रोजी दुपारी १२-३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या योजनेअंतर्गत भूमी अभिलेख विभागामार्फत आतापर्यंत ३ लाख १७ हजार गावांमधून ड्रोनद्वारे सर्व्हेचे काम पूर्ण करण्यात आले असुन १ लाख १९ हजार गावांमधून २ कोटी १९ लाख मालमत्ता पत्रक तयार करण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक-पुणे महामार्गावर शुक्रवारी (१७ जानेवारी) सकाळी झालेल्या तीन वाहनांच्या भीषण अपघातामध्ये नऊ जणांचा करुण अंत झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमधील दुर्दैवी घटनेत आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला. आता त्या पाठोपाठ नारायणगाव जवळ झालेल्या या अपघातामुळे महाराष्ट्र हळहळला आहे. एसटी बस, ट्रक आणि मॅक्झिमो व्हॅनमध्ये हा मोठा अपघात झाला. देबुबाई दामू टाकळकर (वय ६५ वर्ष, रा. वैशखखेडे ता. जुन्नर जि. पुणे), विनोद केरूभाऊ रोकडे (वय ५० वर्ष, रा. कांदळी ता. जुन्नर जि. पुणे), युवराज महादेव वाव्हळ (वय २३ वर्ष, रा. १४ नंबर कांदळी ता. जुन्नर…
संगमनेर – १२ गायी आणि २ वासरांची संगमनेरच्या बेकायदेशीर कत्तलखान्यात कत्तल होण्यापूर्वीच पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी या गोवंश जनावरांना जीवदान दिले आहे. संगमनेर शहरातील मदिना नगर येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हा प्रकार समोर आला. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना मदिनानगरमधील एका काटवणामध्ये कत्तलीसाठी जिवंत गोवंश जनावरे बांधून ठेवले असल्याची माहिती मिळाली होती. सोनवणे यांनी यासंदर्भात आपल्या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस उपाधीक्षकांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे व पोलीस नाईक राहुल डोके यांचे घटनास्थळी जात मिळालेल्या माहितीच्या आधारे मदिनानगरमध्ये जात पाहणी केली असता पथकाला चौदा…
मुंबई – गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य निवडणूक आयुक्तपदाच्या उमेदवाराची शिफारस करण्याचे सर्वाधिकार देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यापूर्वी, राज्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाला राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांकडे नावाची शिफारस करण्याचे अधिकार होते, त्यानंतर मुख्यमंत्री ते नाव राज्यपालांकडे पाठवायचे. पण मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे आता मुख्यमंत्री राज्यपालांना थेट उमेदवाराची शिफारस करतील. राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक आहेत. तसेच येत्या काही महिन्यांत या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेण्यात येतात. स्थानिक स्वराज्य संस्थांवर…
मुंबई, दि. १६ : राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१६ जानेवारी) राज्य मंत्री परिषदेची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेट आणि राज्य मंत्री उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे ३४३ सेवा ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात. मात्र या सर्वच सेवा आपले…
मुंबई : महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. वेगवेगळे निर्णय घेत प्रशासनावर एकहाती अंमल बसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशातच त्यांच्या एका नवीन निर्णयामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या मंत्र्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नव्या सरकारमध्ये मंत्री आस्थापनेवर खासगी सचिव अथवा विशेष कार्य अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर खासगी व्यक्तीच्या नियुक्तीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मंत्र्यांना धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी महायुतीच्या आमदारांची शाळा घेतली. त्यावेळेस त्यांनी या सर्व आमदारांना महत्त्वाचा कानमंत्र दिला. सरकारी अधिकाऱ्यांसोबत नम्रपणे बोला, बदली आणि दलाली अशा कामापासून…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील यात सहभागी असलेल्या बेरोजगार तरुणांना अद्यापही या योजनेचे मानधन मिळालेले नाही. या मानधना संदर्भात प्रांताधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शास्त्र भारतीय संघटनेच्यावतीने निवेदन पाठविण्यात आले आहे. सहभागी बेरोजगार तरुणांना मानधन न मिळाल्यास छात्र भारती संघटनेच्यावतीने राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. युवा वर्गाचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर वेळेत योग्य मार्गदर्शन आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी भांडवल उपलब्धता शासन विविध योजनांच्या माध्यमातून करून देत आहे. रोजगार इच्छुक युवक-युवती आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि युवा वर्गाला रोजगाराच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज शेतात आईवडील कापुस वेचत असताना जवळच शेतात खेळत असलेल्या ९ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील कविटखेडा येथे बुधवारी (ता. १५ जानेवारी) रोजी घडली आहे. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यात खळबळ उडाली आहे. महेश सिद्धार्थ आखडे असे घटनेत मुत्यु झालेल्या शेतमजूर मुलांचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, गोरख चव्हाण यांच्या कविटखेडा शिवारातील गट क्रं १३३ मध्ये सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली. कविटखेडा शिवारात शेतातील कामे करण्यासाठी मध्यप्रदेश येथील शेतमजूर सकाळी कापूस वेचणीसाठी गेले होते. दरम्यान, त्यांचा ९ वर्षांचा मुलगा महेश हा शेतातच खेळत असताना दडी धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप…
संगमनेर – राज्यात बिबट्यांची संख्या वाढत असून त्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले चिंतेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली होती. त्यासंदर्भातील निवेदनदेखील त्यांनी सरकारला दिले होते. बिबट्यांच्या नसबंदीबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागत असल्याने तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी १४ जानेवारीला पत्रकार परिषदेत सांगितले. ऊस तोडल्यानंतर बिबट्यांचा अधिवास संपतो आणि ते मानवी वस्तीत जातात. मग मानवी वस्तीतील कुत्रे, शेतात काम करणारे शेतकरी यांच्यावर हल्ला होण्याचे प्रकार घडतात. आमदार सत्यजित तांबे यांनी चार दिवसांपूर्वी बिबट्यांच्या नसबंदीबाबत पत्र दिले आहे.…
जामखेड – शहरालगत असणाऱ्या जांबवडी रस्त्यावर बुधवारी भीषण अपघात घडला आहे. या अपघातात बोलेरो वाहन रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे नियंत्रण सुटून विहिरीत पडले. या दुर्दैवी घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. अशोक विठ्ठल शेळके (वय २९), रामहरी गंगाधर शेळके (वय ३५), किशोर मोहन पवार (वय ३०), चक्रपाणी सुनील बारस्कर (वय २५) अशी ह्या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहे. हे चौघेही अपघातग्रस्त बोलेरोमधून प्रवास करत होते. अपघातग्रस्त बोलेरो जांबवडी गावाच्या दिशेने जामखेडकडे येत असताना रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खडीवरून गेल्याने बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बोलेरो गाडी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडली. या घटनेमुळे अपघातस्थळी एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक…
संगमनेर दि. १५ – एका गावाहून दुसऱ्या गावी थेट मटणाचे जेवण करण्यासाठी गेलेल्या दोघा जणांनी मटन खाताना मटणाचे पीस हे बोकड मटण नसून दुसऱ्या प्राण्याचे पीस आहे, असा संशय घेतल्याने हाणामारी आणि जातीवाचक शिवीगाळ झाल्याची तक्रार झाल्यानंतर एकमेकाविरोधात ॲट्रॉसिटी आणि इतर गुन्हे दाखल करण्याची घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या साकूर येथील हॉटेल आसरा या ठिकाणी संगमनेर तालुक्यातीलच अंभोरे गावातून आदिनाथ तुकाराम मोरे (वय २४ वर्ष, धंदा मजुरी, रा. अंभोरे, ता. संगमनेर) हा मित्र केतन याच्यासमवेत आसरा हॉटेलमध्ये मटणाचे जेवण करण्यासाठी गेले होता. जेवणात दिलेले मटणाचे पीस हे बोकडाचे नसल्याचे संशय आला व त्यामुळे मित्राला उलट्या झाल्या. या…
संगमनेर – राज्यभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या सहकारमहर्षी T- 20 क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व अंतिम सामन्यासाठी शुक्रवारी (१७ जानेवारी) दुपारी चार वाजता भारताचा माजी कसोटी कर्णधार तथा संगमनेर तालुक्याचा सुपुत्र अजिंक्य रहाणे उपस्थित राहणार आहे. याशिवाय माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एक जानेवारीपासून राज्यस्तरीय टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे हे २५ वे वर्ष असून यामध्ये ३२ संघांचा सहभाग आहे. यावर्षी या स्पर्धेत रणजी…
अहिल्यानगर दि. १५- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २२ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शिर्डी, दि. १५ – शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी घालण्याचे आदेश शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी जारी केले आहेत. शिर्डी विमानतळ येथे दिवसा व रात्री वेगवेगळ्या विमान कंपन्यांची विमाने व हेलिकॉप्टर उतरत असतात आणि उड्डाण करीत असतात. रात्रीच्यावेळी वैमानिकांना दिशा आणि ठिकाण निश्चित करण्यासाठी धावपट्टीवर आणि हवाई वाहतूक नियत्रंण (एटीसी) टॉवरद्वारे लाईटचा उपयोग केला जातो. शिर्डी विमानतळ परिसरातील २५ किलोमीटर परिघात उच्च शक्तीच्या लेझरमुळे वैमानिकांचे लक्ष विचलित होणे आणि संभाव्य अक्षमतेमुळे विमानाच्या कार्यप्रणालीत गंभीर अडथळे येऊ शकतात. सहज हाताळता येणाऱ्या (हॅंड हेल्ड लेझर) उपकरणाची कमी किंमत व बाजारातील सहज उपलब्धतेमुळे अशा…
मुंबई – मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी संदर्भात महायुतीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी मोठ वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत निवडणुकीआधी सरकारने बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा प्रत्यक्षात येण्यापूर्वीच आता सुमारे ६० लाख महिलांचे या योजनेतील अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री भुजबळ यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र असलेल्या महिलांना स्वतःहून नावे मागे घेण्यास सांगितले होते. जर बहिणींनी स्वतःहून या योजनेतून नाव काढले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही भुजबळ यांनी म्हटले होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण…
मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचीत्यावर शिवसेनेचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि आमदार या मेळाव्याला उपस्थित राहतील, असं कदम यांनी म्हटलं आहे. शिंदे गटाच्या या मागणीमुळे पुन्हा एकदा शिंदे व ठाकरे गटामधील वाद उफाळून येण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले आमदार प्रसाद लाड यांनी नोव्हेंबर २०२२…
संगमनेर – संक्रांतीच्या पूर्वसंध्येला प्राण घातक ठरू शकणाऱ्या नायलॉन मांजा विक्रेत्यावर संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने कारवाई करत सुमारे साडेसात हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला. नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जीवितास इजा होण्याची शक्यता असल्याने याची जाणीव असताना देखील संगमनेरमध्ये नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना मिळाली होते. त्यांनी आपल्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके, महिला पोलीस कॉन्स्टेबल ताई शिंदे यांना संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले. पथकाने बाजारपेठेतील गृह वस्तू भंडाराजवळील तेली खुंट परिसरात मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता तेथे जहीर रऊप…
नाशिक – प्रियकर आणि त्याच्या पत्नीच्या जाचाला कंटाळून २८ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी संगमनेरमधील पती-पत्नी विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहित महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुक्यातील लोहारे मिरपूर येथील संशयित पती-पत्नी विरोधात विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व संशयित एकाच गावातील रहिवासी असून नाशिक रोड येथील बनकर मळा भागात राहणाऱ्या अर्चना प्रविण गोरे (२८) या विवाहीतेने शनिवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केली होती. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचा आरोप फिर्यादी भावाने केला असून पती-पत्नीच्या जाचास कंटाळून आपल्या बहिणीने आत्महत्या…
मुंबई, दि. १३ – दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे पणन विभागाकडून १०० दिवसात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणारे ॲग्रो हब मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत उभे करावेत. या ठिकाणी सर्व-सोयी सुविधा उभारण्यात याव्यात. या ॲग्रो हबसाठीचा आराखडा तयार करून सादर करा. पुढील वर्षापासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करा. शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व…
बीड – बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटून देखील पोलीस तपासा संदर्भात माहिती देत नसल्याचा गंभीर आरोप करत देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सोमवारी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत न्यायासाठी आक्रोश केला. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यावर बांगड्या फेकल्या. आंदोलनावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या आंदोलनात गावातील महिला सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. आंदोलनातील महिलांनी मुख्य आरोपी अजूनही मोकाट कसा? त्याला खुनाच्या कलमाखाली अटक का करण्यात आली नाही? असा संताप व्यक्त केला. संताप व्यक्त करत महिलांनी एसपी गावात यांच्यावर बांगड्या फेकत देशमुख हत्याकांड…
