Author: Annant Ppangarkar
रविवार, २४ नोव्हेंबर – संगमनेर शनिवारी संगमनेर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी १०५६० मतांनी पराभव केला. मतदार संघातील सर्वच गावांमध्ये खताळ यांना थोरात यांच्यापेक्षा निर्णायक आघाडी मिळाली. टपाली मतदानामध्ये खताळ यांना ८९१ तर थोरात यांना २१८३ मते मिळाली. या निवडणुकीत अमोल खताळ यांना १,१२,३८६ तर थोरात यांना १,०१,८२६ मते मिळाली. थोरात आणि खताळ यांना मतदान केंद्र आणि गाव निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे… इमेज झूम करून बघा..
रविवार, २३ नोव्हेंबर लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाची परिणती आपसातील हाय व्होल्टेज लढतींवर झाली होती. काही मतदारसंघात कौटुंबिक लढती रंगल्या होत्या. बारामतीमध्ये थेट सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत रंगली होते. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना पुतण्या युगेंद्र पवार यांच्याशी सामना करावा लागला. राज्यात विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आल्यानंतर प्रत्येक जण आपापल्यापरीने कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार जिंकला, किती मितं मिळाली, कोणता उमेदवार पडला, बलाढ्य उमेदवारांचं काय झालं, कौटुंबिक लढतींचं काय झालं, हाय व्होल्टेज लढतींचं काय झालं? या मागची कारण शोधत त्यावर विश्लेषण करत आहे. मात्र अशाच एका लढतीची उत्सुकता अजित पवार यांच्या विधानामुळे…
रविवार, २४ नोव्हेंबर राज्यातील जनतेचा स्पष्ट कौल मिळाल्यानंतर महायुतीने सरकार स्थापन करण्याचा हालचाली सुरू केल्या आहे. राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून २६ नोव्हेंबर पूर्वी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा येत्या काही तासात होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागते याच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहे. सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पाऊले टाकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर पार पडली आहे. या बैठकीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी…
रविवार, २४ नोव्हेंबर – मुंबई राज्यात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत दिसणार आहे. दरम्यान महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार आणि मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सुरू असून राज्यातील जनतेची उत्सुकता वाढीस लागली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार नव्या सरकारचा उद्या सोमवारी (२५ नोव्हेंबर) वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे प्रमुख जे. पी. नड्डा यांच्यासह केंद्रातील काही दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता असून नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागते तसेच मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळते यावर सध्या तर्कवितर्क सुरू आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आहे. शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून राज्यात २८८ पैकी २३५ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे तर ४९ जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले असून अन्य ०४ जागांवर इतरांचा विजय झाला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला १४५ सदस्यांचा आकडा गाठण्यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येत असून मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्राचे हे आहे २८८ नवे आमदार 1) अक्कलकुवा- आमश्या पाडवी (शिवसेना) 2) शहादा-राजेश पाडवी (भाजपा) 3) नंदुरबार-विजयकुमार गावीत (भाजपा) 4) नवापुर-शिरीषकुमार नाईक (काँग्रेस) 5) साक्री-मंजुळा गावीत (शिवसेना) 6) धुळे ग्रामीण-राघवेंद्र पाटील(भाजपा)…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्य विधान सभेच्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागून महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा जबर झटका बसला आहे. आघाडीचे आगामी मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं होतं त्या संगमनेरचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव काँग्रेस पक्षाच्या चांगलाच जिव्हारी लागला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही पराभव झाला. हा निकालही आश्चर्यकारक मानला जातो. मुंबई माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांनाही पराभव पत्करावा लागला. भाजपने अमित यांना पाठिंबा देऊनही त्यांचा पराभव झाल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरलं आहे. तिकडे वरळी मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे विजयी झाले. त्यांनी माजी मंत्री मिलिंद…
शनिवार २३ नोव्हेंबर – मुंबई विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. पाठोपाठ राज्यात महायुती सरकारने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. अहमदनगर जिल्ह्यातही महायुतीच्या दिशेने कल हेच धक्कादायक निकाल समोर आले आहे. जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने प्रत्येकी चार-चार तर शिवसेना शिंदे गटाने दोन जागांवर विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या दोन्ही जागांवर दिलेले भाजपचे उमेदवार निवडून आले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला प्रत्येकी एकेका जागेवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जिल्ह्यात एकही जागा मिळू शकली नाही. निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोल मध्ये देखील महायुती सत्ता…
शनिवार, २३ नोव्हेंबर – संगमनेर अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचे निकाल समोर आले आहे. समोर आलेल्या निकालामध्ये महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना प्रत्येकी चार-चार तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहे. तर महाविकास आघाडी मधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला केवळ एकेका जागेवर समाधान मानावे लागले आहे. अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष काळे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले असून त्यांना तब्बल १,२४,६२४ एवढे मताधिक्य मिळाले आहे. त्या पाठोपाठ भाजप नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ७०२८२ एवढ्या मताधिक्याने आणि भाजपाचे विक्रम पाचपुते ३६८२७ एवढ्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहे. …
संगमनेर – प्रतिनिधी विधानसभा निवडणूक मतमोजणीनंतर उमेदवारांच्या समर्थकांनी काढलेल्या मिरवणुकीत बस स्थानक चौकात गर्दीतून वाहन चालकांना वाट काढून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला वाहनाचा धक्का लागल्याने ते गंभीर जखमी होऊन पायाला इजा झाली आहे. जखमी पोलीस अधिकाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. संगमनेर बस स्थानक चौकात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केल्याने वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे (आर्थिक गुन्हे शाखा) हे बस स्थानक चौकात बंदोबस्त करीत असताना गर्दीत एका वाहन चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाच्या धडकेत त्यांच्या पायाला इजा झाली आहे. दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास बस स्थानकासमोर हा प्रकार घडला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश…
शनिवार २३ नोव्हेंबर – संगमनेर संगमनेर विधानसभा मतदारसंघात चार दशकानंतर प्रथमच परिवर्तन बघावयास मिळाले असून शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार अमोल खताळ यांनी राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव केला. राज्यातील दिग्गजांच्या भराभवांमध्ये हा पराभव गणला जात असून नवखे उमेदवार असलेले खताळ राज्याच्या राजकारणात पोहोचले आहे. उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे… अमोल खताळ (महायुती) – ११२३८६ मताधिक्य – १०५६० बाळासाहेब थोरात (महाविकास आघाडी) – १०१८२६ अजीज ओहोरा (वंचित बहुजन आघाडी) – २०६९ योगेश सूर्यवंशी (मनसे) – १२८५ दत्तात्रय ढगे (अपक्ष) – ५४७ शशिकांत दारोळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) – २२६ भारत भोसले (समता पार्टी) – १७४…
महाराष्ट्र संवाद न्यूज – प्रतिनिधी शनिवार, २३ नोव्हेंबर राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गेल्या चार दशकांपासून आमदार असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या होम स्पीचवर पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे नवखे उमेदवार आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक असलेल्या अमोल खताळ यांनी थोरात यांचा पराभव केला आहे. राज्यातील बऱ्या नेत्याचा पराभव करणारे खताळ या मतदारसंघात अखेर गेमचेंजर ठरले. थोरात यांचा पराभव संगमनेरकरांसाठीच नव्हे तर राज्यातील काँग्रेससाठी धक्कादाय ठरला असून गेल्या चार दशकानंतर प्रथमता विरोधकांना या मतदारसंघात मिळालेले यश थोरात यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारे आहे. येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा…
शनिवार 23 नोव्हेंबर – शिर्डी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या फेरी अखेर महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 6332 मतांनी आघाडीवर आहेत. विखे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांनी तिसऱ्या फेरी अखेर 12886 तर विखे यांनी 19218 मते मिळविली आहे. तर बंडखोरी केलेल्या डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी तिसऱ्या फेरी अखेर 136 मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीचे राजू शेख यांनी 146 मते मिळविली.
शुक्रवार, २२ नोव्हेंबर – अहिल्यानगर बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी लागत आहे. दरम्यान या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांनी पैशाचा वापर केल्याचे समोर येऊ लागले आहे. निवडणूक कामासाठी नेमलेल्या भरारी पथकांनी देखील कोट्यावधी रुपये, सोन्याचे दागिने पकडले असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणूक कामासाठी वापरलेल्या एसटी बस मध्ये दुसऱ्या दिवशी प्रवाशांना बसच्या सीट खाली पाचशे रुपयांचे दोन नोटांचे बंडल आढळून आले. नोटांच्या मोजणीनंतर तब्बल ८६ हजाराची रोकड असल्याचे समोर आले असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव एसटी आगाराच्या कोपरगाव-वैजापूर-कोपरगाव आशा फेऱ्या मारणाऱ्या एसटी बसमध्ये सीटखाली प्रवाशाला पाचशे रुपयांच्या नोटांची दोन…
शुक्रवार २२ नोव्हेंबर – संगमनेर बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी उद्या शनिवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी ८.०० वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रिडासंकुल येथे होणार आहे. २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत असून पारदर्शक मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी “महाराष्ट्र संवाद न्यूज”ला दिली आहे. संगमनेर मतदार संघाचा निकाल दुपारपर्यंत अपेक्षित आहे. बुधवारी एकुण २८८ मतदान केंद्रावर शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पाडली. मतदान प्रक्रियांमध्ये कोणताही अनुचित प्रकार समोर आला नाही. १४७ मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाकडून वेबकास्टिंग करण्यात आले. यामुळे मतदान केंद्रावर मतदानासाठी लागणाऱ्या रांगा व मतदान केंद्रातील तसेच…
शुक्रवार, २२ नोव्हेंबर – ठाणे उल्हासनगर कॅम्प ५ मधील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या मागील बाजूला असलेल्या कचरा पट्टीतील झाडाझुडपात एका तीन वर्षीय मुलीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अल्पवयीन मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरमधील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगवेगळी चार पोलीस पथके तयार करून तपास सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अल्पवयीन मुलगी ही कुटुंबासह हिल लाईन पोलीस ठाण्याच्या परिसरात राहत होती. १८ नोव्हेंबर रोजी मृत मुलगी…
शनिवार, २२ नोव्हेंबर – बीड बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती असलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षकाने वर्षभरातच तब्बल २ कोटी ७ लाख ३१ हजार रुपये कमविल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हरिभाऊ नारायण खाडे (रा. विकासवाडी, पो. रेडणी ता. इंदापूर, जि. पुणे) आणि त्याची पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे या दोघांवर अपसंपदा बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी ही कारवाई केली असून लाच…
शुक्रवार, २२ नोव्हेंबर – पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. mahahsscboard.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर आज (२१ नोव्हेंबर) दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, १० ची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि १७ मार्च २०२५ रोजी संपेल. दहावीची परीक्षा सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत पहिली शिफ्ट आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत दुसरी शिफ्ट अशा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. इयत्ता १२ वी सामान्य, बायफोकल आणि व्होकेशनल…
गुरुवार २१ नोव्हेंबर – संगमनेर बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी संगमनेर विधानसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी समोर आलेल्या या आकडेवारीत संगमनेरमध्ये ७५.१९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे. राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानात मोठी वाढ झाली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात १,४८२८४ (पुरुष), १,४०,८८९ (महिला) व १ (अन्य) असे एकूण २,८९,१७४ इतके मतदान होते त्यापैकी बुधवारी झालेल्या मतदानानंतर १,१४१८२ (पुरुष), १,०३,२५० (महिला) व ० (अन्य) अशा एकूण २,१७,४३२ इतक्या मतदारांनी मतदान केल्याचे…
गुरुवार, २१ नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी राज्यभरात मतदान झाले. यावेळी मतदान केंद्रात बेकायदेशीरपणे मोबाईल घेऊन जात मतदान करतानाचे फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपळे निलख येथील विद्या विनयनिकेतन शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४७४ या मतदान बुथवर बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला. मार्टिन जयराज स्वामी (वय २५, रा. संध्यानगरी सोसायटी, पिंपळे निलख) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात निवडणूक मतदान केंद्र अधिकारी नरेंद्र देशमुख (वय ५४, रा. भांगरवाडी, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मतदान बुथवर प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून कर्तव्य करीत होते. यावेळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज निवडणूक विशेष गुरुवार २१ नोव्हेंबर बुधवारी राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडले. शनिवारी राज्याची सूत्रे कोणाच्या हाती जाणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान विविध संस्थांच्या एक्झिट पोलचे अंदाज बघता राज्यात सत्ता स्थापनेसाठी मोठा संघर्ष दिसत आहे. सरकार स्थापनेसाठी दावा करण्याकरिता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी असल्याने आणि या दोन दिवसात सत्ता स्थापनेत दिरंगाई झाल्यास राज्यात दबक्या पावलांनी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्हे आहेत. अनेक आजी-माजी आमदार, मंत्र्यांकडून तसेच राजकीय विश्लेषकांकडून ही शक्यता वर्तवली जात आहे. असे घडल्यास राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी होणारा अपक्ष आमदार आणि फोडाफोडीच्या खोक्यांचा घोडेबाजार जनतेला बघावा लागणार आहे. त्यामुळे विधानसभेचा…
