Author: Annant Ppangarkar

बुधवार, २३ ऑक्टोंबर  मुंबई – महायुतीचा घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली ३८ उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी जाहीर केली. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. या तीनही मतदार संघातून विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत अहमदनगर शहरमधून संग्राम जगताप, कोपरगावमधून आशुतोष काळे व अकोलेमधून डॉ. किरण लहामटे यांना उमेदवारी देण्यात आले आहे. याशिवाय या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे,…

Read More

बुधवार, २३ ऑक्टोंबर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली असून पहिल्या यादीत ४५ जणांचा समावेश आहे. मुख्यमंत्री शिंदे स्वतः कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. याशिवाय पहिल्या यादीत गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, अर्जुन खोतकर, अब्दुल सत्तार, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, सुहास कांदे, दादा भुसे, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, भरत गोगावले, तानाजी सावंत, शहाजी बापू पाटील, शंभुराजे देसाई, दीपक केसरकर आदी उमेदवारांचा प्रमुख उमेदवारांत समावेश आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जागा गेल्या अनेक वर्षापासून ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहे. शिवसेना फुटीनंतर ही जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे असल्याचे म्हटले जाते. शिंदे गटाकडे प्रबळ उमेदवार नसल्याने भाजपचे…

Read More

बुधवार, २४ ऑक्टोंबर दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून जामीन मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुख्य आरोपी चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्या जामीन अर्जावर मंगळवारी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्णय देत जामीन अर्ज फेटाळला. यामुळे कुटेंची दिवाळी आता कारागृहात साजरी होणार आहे. ऐन दीपावलीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा निर्णय दिल्याने ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा आर्थिक घोटाळा समोर आला लेखा परीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुमारे ८१ कोटी रुपयांच्या या घोटाळ्याच्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपींत पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब दामोदर कुटे याच्यासह व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ, चीफ अकाउंटंट भाऊसाहेब संतू गायकवाड, चेतन…

Read More

बुधवार, २३ ऑक्टोबर लाखो रुपयांचे विदेशी मद्य घेऊन निघालेला एक मोठा ट्रक संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा शिवारात संगमनेर-अकोले तालुक्याच्या बॉर्डरवर एका ओढ्यात पलटी झाला. या ट्रकमध्ये असलेल्या लाखो रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्यांचे खोके आजूबाजूच्या लोकांनी आणि काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चोरले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी या ट्रकचा चालक आणि दारू घेऊन पळालेले चोरटे अद्याप सापडलेले नाहीत. नाशिकहून पुण्याकडे जाणारा हा ट्रक मुख्य महामार्गाने न जाता ग्रामीण भागात घुसलाच कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून मॅकडॉल कंपनीच्या दारूच्या बाटल्याचे बॉक्स घेऊन अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (क्र. एम.एच.१२ एल.टी. ७३२९ हा पुणे…

Read More

बुधवार, २३ ऑक्टोबर २०२४ मेष – आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टीने अनुकूल ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस. अपेक्षित गाठीभेटी होतील. धनलाभाचे योग. वृषभ – आपल्या कार्यक्षेत्रात तसेच नोकरीच्या ठिकाणी तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आरोग्य चांगले राहून आर्थिक लाभ संभवतो. स्थावर- जमिनी विषयीची कामे गतीमान होतील. मिथुन – व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभ संभवतो जुनी आर्थिक येणी येतील. परिवारातून आनंददायक वाढता मिळतील. कुटुंबात एखादे धार्मिक अनुष्ठान घडू शकेल. नातेवाईक आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. कर्क – काही अप्रिय निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. शांतचित्ताने देणे द्या. वादविवाद टाळा. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न अथवा समस्या…

Read More

मंगळवार, २२ ऑक्टोंबर  संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अकरा इच्छुकांनी पहिल्याच दिवशी पंचवीस उमेदवारी अर्ज नेले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठीची रंगत आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व गेल्या चार दशकांपासून माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात करत आहेत. दरवेळी त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या उमेदवार विरोधी पक्षांकडून देण्यात आला. यावेळी देखील विरोधी पक्षाकडून कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे यांनी तेथील पराभव जिव्हारी लागल्याने या मतदारसंघात थोरात यांच्या विरोधात जोरदार प्रचार मोहीम राबविली असली तरी ते उमेदवार असतीलच याबाबत मात्र साशंकता आहे.…

Read More

मंगळवार, २२ ऑक्टोबर पुण्यातील खेड शिवापूर येथील टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी एका वाहनातून नेले जात असलेले पाच कोटी रुपये जप्त केले होते. याबाबत पुण्याचे एस पी पंकज देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधून यासंदर्भात माहिती दिली आहे.आयकर विभाग आणि निवडणूक आयोग यांच्यासोबत मिळून ही कारवाई करण्यात आली होती. पाच कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारी एम.एच. ४५ ए.एस. २५२६ या क्रमांकाची गाडी अमोल नलावडे यांच्या मालकीची असून त्यांनी ही गाडी आपण बाळासाहेब आसबे यांना विकल्याचा दावा केला आहे. नलावडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. तसेच ज्यांच्याकडे हे पैसे सापडले ते…

Read More

मंगळवार, २२ सप्टेंबर  विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होताच उमेदवारी अर्ज घेण्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने अहिल्यानगर जिल्ह्यात उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. तर जिल्ह्यात शेवगाव विधानसभा मतदारसंघ तीन आणि कर्जत जामखेड मतदार संघात एका उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी दाखल केला आहे.विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम खऱ्या अर्थाने मंगळवारपासून सुरू झाला आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील विविध मतदारसंघात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज नेले असल्याने मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत.  मतदार संघ निहाय विक्री झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे… संगमनेर – ११ व्यक्ती २५ अर्ज राहुरी – २० व्यक्ती २९ अर्ज  नेवासा – २० व्यक्ती ४१…

Read More

मंगळवार, २२ ऑक्टोबर मुंबई – सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून पंचवीस-पंचवीस कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगार झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? असा प्रश्न करत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पवारांचा हा व्हिडिओ आणि त्या अनुषंगाने उपस्थित केलेले प्रश्न चर्चेत आले आहे. आमदार रोहित पवारांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की, लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा…

Read More

मंगळवार, २२ ऑक्टोबर  मुंबई – भारतीय जनता पक्षाने आपली ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना एबी फॉर्म चे वाटप केले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातून अकोले मतदार संघात विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांना एबी फॉर्म दिल्याने ते महायुतीचे या मतदारसंघातील उमेदवार असतील. अकोले मतदार संघाची जागा डॉ. किरण लहामटे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे राहिली आहे. लहामटे यांना एबी फॉर्म मिळाल्याने महायुतीच्या जागा वाटपात ही जागा अजित पवार गटाकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. समोर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच गेल्या वेळी…

Read More

मंगळवार, २२ ऑक्टोंबर पुणे – पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधित गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याची प्राथमिक माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा मार्गावर खेड-शिवापूर येथे पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. या नाकाबंदी दरम्यान खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एका वाहनातून मोठी रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना संबंधित गाडीतून किती रोख रक्कम मिळाली आहे? याबाबतचा अधिकृत आकडा समजू शकलेला नाही. पण माहितीनुसार, या गाडीत पोलिसांना जवळपास ५ कोटींची रोख रक्कम मिळाली आहे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे आणि पुढील तपास सुरु केला आहे. ही गाडी एका बड्या नेत्याची तथा विद्यमान आमदाराची असल्याची…

Read More

मंगळवार, २२ ऑक्टोबर  वहिवाटिस बंद केलेला रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी अडीच वर्षाच्या बालकासह संपूर्ण कुटुंबाचे संगमनेर प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू होऊन चार दिवसाचा कालावधी उलटला तरी देखील मार्ग निघाला नव्हता. अखेरीस ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’आणि ‘संगमनेर टाइम्स’ने या उपोषणकर्त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत उपोषणार्थींची समस्या लक्षात घेत त्यांना सोमवारी सकाळी दोन पर्यायी रस्ते काढून दिले. असे असले तरी मूळ बंद केलेल्या रस्त्याबाबत अपील सुरूच राहणार आहे. रस्ता केस मध्ये तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांच्या बाजूने निर्णय देऊन देखील रस्ता वहिवाटीला खुला करून देण्यात आला नाही. उलट तहसीलदारांच्या निर्णयाविरोधात प्रांत अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यात आले. दादागिरीने रस्ता बंद करून कुटुंबाला…

Read More

मंगळवार, २२ ऑक्टोबर २०२४ मेष – आपल्या कार्यक्षेत्रात आपणास आता जास्त काम पडणार असल्याने जास्त दगदग होणार आहे. यामुळे आपल्याला थोडेसे थकल्यासारखे वाटण्याची शक्यता आहे. कुटुंबाला फारसा वेळ देता येणार नाही. वृषभ – शुभ ग्रहांची उत्तम साथ मिळणार आहे. बेकार व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता. महत्त्वाच्या कामात यश लाभेल, बँकेची कामे करून घ्या. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या. मिथुन – स्वतःच्या हिंडणे फिरणे यावर नियंत्रण ठेवा. तसेच खाणेपिणे यावरही लक्ष ठेवणे आवश्यक. विनाकारण वादावादी घालू नका. कुठल्याही कारणाने दिवसाचा बेरंग होणार नाही याची काळजी घ्या. कर्क – पती-पत्नीमध्ये वाद विवाद होण्याची शक्यता आहे. दोघांनी समजुतीने घ्यावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीमध्ये काही…

Read More

सोमवार, २१ ऑक्टोंबर भारतीय जनता पक्षाने रविवारी ९९ उमेदवारांची विधानसभा निवडणुकीचे पहिली यादी जाहीर केली. त्या पाठोपाठ महाविकास आघाडीची यादी जाहीर होण्याची चिन्ह असताना आता तिसऱ्या आघाडीने आपले दहा उमेदवार जाहीर करत महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढविले आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी तयार झाल्या असून परिवर्तन महाशक्तीने सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत आपल्या दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बच्चू कडू, संभाजी राजे, राजू शेट्टी आदींच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आले असून चांगले उमेदवार मिळाले तर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात देखील उमेदवार दिले जाणार आहेत तसेच जेथे चांगले उमेदवार मिळतील तेथे निवडणूक लढवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.…

Read More

सोमवार २१ ऑक्टोबर  नेवासे – निवडणुकीसाठी ईव्हीएम सुरक्षिततेच्यादृष्टीने अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रविवारी नेवासा येथील स्ट्राँगरूमला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी स्ट्राँगरूममधील जागेचे नियोजन याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. ईव्हीएम सुरक्षेच्यादृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पोलीस अधीक्षकांनी पाहणी केली. नेवासा तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील विविध कक्षांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी भेट देऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेच्या आढावा घेऊन कामकाजाची पाहणी केली तसेच निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने सूचना दिल्या. सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी नेवासा विधानसभा निवडणूक…

Read More

सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४ मेष – आजचा दिवस आपणास कार्य सफलतेचा जाणार आहे. आवश्यक कामांकडे लक्ष दिले जाणार आहे. मनोबल पण उत्तम राहणार आहे. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहणार आहे. वृषभ – मन आज हलके होणार आहे. कामाचे टेन्शन दूर होणार आहे. त्यामुळे कामामध्ये लक्ष पण लागणार आहे. कामही सहजतेने होणार आहेत. सामाजिक कामामध्ये कार्यरत राहाल प्रतिष्ठा मिळेल. मिथुन – काही व्यक्तींना कामाची दगदग होणार आहे. कामाचा ताण जाणवेल. सहकाऱ्यांची सहकार्याची अपेक्षा ठेवू नका, ते आपणास मदत करू शकणार नाहीत. आपले खिसा पाकीट सांभाळा. कर्क – आपल्या कामामध्ये आपण स्वतः लक्ष घालाल, त्यामुळे महत्त्वाची कामे करून घ्या. व्यापार-व्यवसायात आपणास अपेक्षित यश…

Read More

रविवार, २० ऑक्टोबर मुंबई – राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ६६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६६० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे. सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.…

Read More

रविवार, २० ऑक्टोबर  संगमनेर – अनेक वर्षांपासून वापरात असलेला पूर्वापार वहिवाटीचा रस्ता दादागिरीने बंद करून कुटुंबाला रस्त्यापासून वंचित ठेवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी आणि तहसीलदार यांनी हा रस्ता वहिवाटिस मोकळा करून द्यावा असा आदेश दिलेला असतानाही कुठलीही दखल न घेणाऱ्या संगमनेरच्या प्रशासनाच्या विरोधात संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील संपूर्ण कुटुंबाने आपल्या अडीच वर्षाच्या बालकासह गेल्या तीन ते चार दिवसापासून प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेले आहे. ऊन, वारा, पावसात हे उपोषण चालू असून प्रांत कार्यालयाकडून या संदर्भातली माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कळविली आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसाचे उपोषणकर्ते जागेवरच असल्याने माणसे मेल्यानंतर न्याय मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव…

Read More

रविवार, २० ऑक्टोबर  मुंबई – भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपले पहिले उमेदवार यादी जाहीर केले असून या यादीत राज्यभरातून ९९ जणांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच जणांना पहिल्या यादीत संधी मिळाली आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव पाथर्डी मतदार संघातून विद्यमान आमदार मोनिका राजळे, कर्जत जामखेड मतदार संघातून आमदार राम शिंदे यांच्यासह राहुरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले आणि पाथर्डी मतदारसंघातून प्रतिभा पाचपुते यांना संधी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. नगर दक्षिणमधून पराभूत झालेले माजी खासदार सुजय विखे माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात…

Read More

रविवार, २० ऑक्टोंबर राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बार उडतो असं दिसताच सत्ताधारी युती सरकारने जणू महाराष्ट्रच विकायला काढलाय असे निर्णय घेऊन टाकले आहेत. यापूर्वी विधानसभा वा लोकसभेच्या निवडणुकीआधी असे निर्णय घेतले गेले. पण यावेळचे निर्णय म्हणजे अतिरेकाचा कळस म्हणता येईल. महाराष्ट्र कंगाल झाला तरी चालेल पण सत्ता मिळालीच पाहिजे, ही मनिषा बाळगलेल्या महायुतीतील तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र विकायला काढलाय, अशीच ही परिस्थिती आहे. जो मागेल त्याला रमणा वाटायचा असा खेळ सरकारने खेळला आणि राज्याला रिकामं खोकं बनवून टाकलं. हा सारा तात्पुरता मामला असावा, असं वाटत असताना या योजना कायम सुरू राहतील, असं जाहीर करत मुख्यमंत्र्यांनी राज्य विक्रीचा परवानाच मिळवलाय, असंच जणू सांगून…

Read More