Author: Annant Ppangarkar

शनिवार, १९ ऑक्टोबर  संगमनेर – संगमनेरची बाजारपेठ हे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी नगर परिषदेने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. खरेदीच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या नागरिकांना पार्किंगची व्यवस्था व्हावी, घनकचऱ्याचे व्यवस्थापन व्हावे, शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात यावे तसेच शहरातील सर्व स्ट्रीट लाईट सुरू असाव्यात आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे. दिवटे यांच्यासह माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री,…

Read More

शनिवार, १९ ऑक्टोबर २०२४ मेष – आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने महत्त्वाची कामे हातावेगळी करण्याचा प्रयत्न कराल. आपल्याला परदेशातून अपेक्षित असलेले संदेश येतील. वृषभ – दैनंदिन कामे सातत्याने पूर्ण करावी लागणार आहेत. मानसिक तणाव किंवा प्रकृती अस्वस्थ यामुळे काम करण्यास उत्साह नसेल. एखादी महत्त्वाची बातमी समजण्याची शक्यता आहे. मिथुन – आजचा दिवस आपल्याला सावधतेने घालवावा लागणार आहे. आपला कामाचा वेग चांगला राहणार आहे. आर्थिक व्यवहार होतील, मात्र दुसऱ्यावर जास्त विश्वास ठेवू नका. कर्क – नवीन कामे मिळतील, पण त्याचा पूर्णपणे आधी आपण अभ्यास करून घ्यावा. अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, चिकाटी आणि सातत्य यांनी तुमची काम…

Read More

शुक्रवार, १८ ऑक्टोबर  संगमनेर – संगमनेर तालुक्याच्या विविध भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मानवांवर केलेल्या हल्ल्यात अनेकांचे जीव गेले. नदीपात्रालगच्या पट्ट्यात सर्रासपणे वावर असलेल्या बिबट्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसात निमगाव टेंभीसह परिसरातील गावांमध्ये ऊस पट्ट्यात बिबट्यांकडून झालेल्या लागोपाठच्या दोन महिलांचा मृत्यू झाला. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू पथकांची देखील मदत घेण्यात आली. तसेच वनविभागाने श्वानांची देखील मदत घेतली. दोन दिवसांपूर्वी एका बिबट्याला पकडण्यात यश आले असताना शुक्रवारी आणखी एक बिबट्या जाळ्यात सापडला. बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावले असले तरी सराईत बिबटे आता पिंजऱ्यांना देखील चकवा देत आहे. त्यामुळे बिबट्यांना पकडण्यासाठी…

Read More

निवडणूक विशेष वृत्त | मोहसीन शेख शुक्रवार, १८ ऑक्टोंबर सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अद्याप तिढा कायम असतानाच वंचित बहुजन आघाडीने मात्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. वंचित चे आतापर्यंत ५१ उमेदवार जाहीर झाले असून तिसऱ्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि राहुरी मतदार संघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. वंचितने उमेदवार जाहीर करत संगमनेरच्या निवडणुकीत रंगत वाढविली आहे. वंचित बहुजन आघाडीने राज्यात आत्तापर्यंत सर्वाधिक ५१ जातनिहाय उमेदवार जाहीर केले असून सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या आणि सलग आठ टर्म आमदार, माजी मंत्री असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात मुस्लिम समाजाचे अजीझ अब्दुल व्होरा यांना वंचित ने…

Read More

शुक्रवार, १८ ऑक्टोंबर  अहिल्यानगर – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासूनच्या ४८ तासामध्ये जिल्ह्यातील शासकीय कार्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच खाजगी मालमत्तेवरील भित्तीपत्रके, घोषणा फलक, रंगविलेल्या जाहिराती, कोनशिला, झेंडे काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यातील शासकीय कार्यालय परिसरातील ११,६४१, सार्वजनिक ठिकाणच्या ९,५०२ तर खाजगी मालमत्तेवरील ३,८२६ अशा एकूण २४ हजार ९६९ जाहिराती काढण्यात आल्या असल्याची माहिती आचारसंहिता कक्षातर्फे देण्यात आली आहे. अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये शासकीय कार्यालय परिसर १,८६४, सार्वजनिक ठिकाण ३९१ तर खाजगी मालमत्तेवरील ३२०, संगमनेर मतदारसंघ शासकीय कार्यालय परिसर ८१६, सार्वजनिक ठिकाण १,०८८, खाजगी मालमत्तेवरील २५५, शिर्डी मतदारसंघ कार्यालय परिसर ९१६, सार्वजनिक ठिकाण १,६४१, खाजगी मालमत्तेवरील ३५१,…

Read More

शुक्रवार, १८ ऑक्टोबर  नाशिक – १८ शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्याकरिता प्रत्येकी सातशे रुपये प्रमाणे लाचेची मागणी करून तडजोडीअंती ११ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील दोघा अधिकाऱ्यांना लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. किरण रंगनाथ दराडे (वय ४० वर्ष, कनिष्ठ लेखाधिकारी, वित्त विभाग) व सचिन प्रभाकर पाटील (वय ४० वर्ष, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) वित्त विभाग) असे जिल्हा परिषदेतील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणारे तक्रारदार हे शिक्षक असून त्यांच्यासह अठरा शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्यासाठी या सर्वांची सेवा पुस्तके लेखा अधिकारी किरण…

Read More

शुक्रवार, १८ ऑक्टोबर  अहिल्यानगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी झालेल्या ३ हजार ७६३ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या ४ हजार ५१२ मतदान यंत्रांची पहिली जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, ईव्हीएम समन्वयक शारदा जाधव, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ४ हजार ५१२ बॅलेट युनिट, ४ हजार ५१२ कंट्रोल युनिट आणि ४ हजार ८८७ व्हीव्हीपॅट यंत्रांची पहिली सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय…

Read More

शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०२४ मेष – कामाचे नियोजन करावे लागणार आहे. नाहीतर खूप धावपळ होण्याची शक्यता आहे. सहकारी सहकार्य करण्यास नाराज असतील. त्यामुळे गोड बोलूनच काम करून घ्यावे लागणार आहे. वृषभ – व्यापार-व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार सुरळीत होतील. कामाचा व्याप वाढणार आहे. भागीदाराचे सहयोग मिळेल. त्यामुळे कामातील अडचणी कमी होतील व मार्ग सापडतील. कामे पूर्ण होतील. मिथुन – तुमच्या मनातील तणाव दूर करा, तरच काम सुरळीत होतील. आनंदी राहा आणि कामाला लागा. उत्साहाने काम केल्यास सुरळीत कामे होतील. जास्तीची कामे मात्र तुम्हाला करावी लागणार आहेत. कर्क – आपल्या कल्पकतेचा व सृजनशीलतेची साहित्यिक लेखक कवी यांना चांगला फायदा होईल. नवी कामे मिळतील,…

Read More

गुरुवार, १७ ऑक्टोंबर संगमनेर – विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असतानाच संगमनेरमध्ये अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ४२ लाख १५ हजार रुपयांची बेहिशोबी रक्कम हस्तगत करण्यात यश मिळविले. पोलिसांनी पकडलेली रक्कम हवाल्याची असल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहे. अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती समोर येते. पोलीस अधीक्षकांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व्यावसायिकांचा, बेहिशोबी मालमत्ता बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार संगमनेरमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे…

Read More

गुरुवार, १७ ऑक्टोबर अहिल्यानगर – जिल्ह्याच्या सर्वच भागात बिबट्याचा वावर वाढला असल्याने आणि सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला असल्याने ऊसतोड करत असताना शेतकरी व मजुरांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल यांनी केले आहे. ऊसतोड सुरू असताना मजुरांनी व शेतकऱ्यांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अनेकदा त्यांना ऊसतोड सुरू असलेल्या भागातच खेळायला मोकळे सोडले जाते. मुलांना ठेवलेल्या ठिकाणी हातात घुंगराची काठी घेऊन मोठ्या व्यक्तीस थांबवावे, जेणेकरून बिबट्या दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येते. खूप वाकुन ऊसतोड करू नये. अशा वेळी दुसराच एखादा प्राणी आहे असे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो. ऊसतोड सुरू असताना ट्रॅक्टरमधील टेपरेकॉर्डरवर किंवा चांगल्या…

Read More

गुरुवार, १७ ऑक्टोंबर अहिल्यानगर – जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमधील पोलीस, उत्पादन शुल्क आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने आणि प्रभावीपणे वाहनांची तपासणी करून अवैध मद्य, पैसे किंवा प्रलोभनासाठी उपयोगात येणाऱ्या भेटवस्तूंच्या वाहतूकीला प्रतिबंध करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अहिल्यानगरचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील आणि दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, डॉ.सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अविनाश बारगळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, देवेंद्र कटके आदी उपस्थित होते. शेजारील जिल्ह्यातील यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास त्याचे चांगले परिणाम…

Read More

गुरुवार, १७ ऑक्टोबर  अहिल्यानगर – निवडणूक आयोगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर व अहिल्यानगर शहर हे दोन विधानसभा मतदारसंघ “खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील” ठरविले आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अतिरिक्त पथके तैनात केली जाणार आहेत. निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी ही माहिती दिली. गत विधानसभा निवडणुकीत तत्कालीन अहमदनगर आणि सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघ खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील ठरवला गेला होता. यावेळी मात्र संगमनेरसह अहिल्यानगर शहर मतदारसंघाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील म्हणजे काय?  केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये तेलंगणा, राजस्थान, मिझोराम, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकी वेळी खर्चाच्या…

Read More

गुरुवार, १७ ऑक्टोबर अहिल्यानगर – भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने जिल्ह्यात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून हे आदेश देण्यात आले आहेत. वरील नमूद ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे…

Read More

गुरुवार, १७ ऑक्टोबर  आरपीआय (आठवले) पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष अशोक अभंग यांचे नुकतेच निधन झाले. दलित चळवळीतील कार्यकर्ता म्हणून परिचित असलेल्या अभंग यांच्या कुटुंबियांचे सोमवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी आठवले यांच्या समवेत अहिल्या नगर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव विजय वाकचौरे, राजाभाऊ कापसे, भीमा बागुल, शहराध्यक्ष कैलास कासार, आशिष शेळके, शानू बेगमपुरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आठवले सोमवारी अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. ज्यावेळी त्यांनी अभंग यांच्या कुटुंबियांचे भेट घेत दुःख व्यक्त केले.

Read More

गुरुवार, १७ ऑक्टोंबर अहिल्यानगर – निवडणूक कालावधीत शासकीय कार्यालयांच्या परिसरात निवडणूक प्रचार करण्यास बंदी असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी म्हटले असून तसे आदेश निर्गमित केले आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ही बंदी राहणार आहे. बंदी दरम्यानच्या या कालावधीत कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी, हितचिंतकांनी सभा घेणे, रॅली काढणे, निवडणुकीसंदर्भात पोस्टर्स बॅनर्स पॅम्प्लेटस्, कट आऊटस् किंवा जाहिरात फलक लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे, या आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे, मतदारांना प्रलोभन दाखविणे, निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे, राजकीय कामासाठी सदर…

Read More

गुरुवार, १८ ऑक्टोबर २०२४ मेष – विरोधकांनी तोंड वर काढले तरी त्याचा काही फारसा फायदा होणार नाही. आपल्या कामाने व धाडसाने विरोधकांना नामोहरम कराल. आजचे धोरण ठरवताना पूर्ण विचार करून मगच अमलात आणावे. वृषभ – नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश येण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. काही कुयोग जरी असले, तरी तुम्ही सर्व चांगल्या तहेने निभावून नेणार आहात. प्रगती होणार आहे. मिथुन – कुठलेही काम विचारपूर्वक करा, अति धाडस करू नका. बोलताना संयम पाळा, फसवणुकीपासून सांभाळा. कोणतेही काम अर्धवट राहणार नाही याची काळजी घ्या. कर्क – व्यापार व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. शुभ ग्रहांच्या भ्रमणामुळे आपले काम चांगल्याप्रकारे होतील. जर आपण कलाक्षेत्र, साहित्य याच्यामध्ये…

Read More

प्रवीण पुरो | बुधवार, १६ ऑक्टोबर मुंबई – विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊन २४ तासांचा अवधीही झाला नाही, तोच महायुतीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. जानकर यांचा पक्ष आता राज्यात २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीच्या जागा वाटपात आपल्या पक्षाला विचारात घेतलं गेलं नसल्याच्या कारणाने महादेव जानकर यांनी हा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला, अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख जानकर यांनी महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. जानकर यांच्या निर्णयामुळे महायुतीला मोठं खिंडार पडलं आहे. महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी एक-दोन दिवसात जाहीर होणार असून, त्यात…

Read More

बुधवार, १६ ऑक्टोंबर अहिल्यानगर – विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांना आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्या विहित वेळेत मिळाव्यात यासाठी सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे. प्रचार फेरी, जाहीर सभा, चौक सभा यासह सर्व प्रकारच्या सभा, तहसिल अंतर्गत सभा व रॅलीची परवानगी संबंधित पोलीस निरीक्षक यांच्याकडून प्राप्त होणार आहे. परवानगीसाठी अर्ज व डी-१ नमून्यात अतिरिक्त माहिती, नगरपालिका/महानगरपालिकेचे जाहिरात लावण्याचे शुल्क व नाहरकत दाखला तसेच अनूसूची १६ आवश्यक आहे. सभेच्या ठिकाणी पोस्टर्स, झेंडे, कापडी बॅनर्स लावण्यासाठी महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्याकडून परवानगी देण्यात येणार आहे. परवानगीसाठीच्या अर्जासोबत खाजगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र व महानगरपालिका,…

Read More

बुधवार, १६ ऑक्टोंबर नाशिक – तक्रारदाराला ओमनी गाडीवर सोडा विक्रीचा व्यवसाय करू देण्यासाठी आणि कोणतीही कारवाई न करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराला एसीबीच्या (अँटी करप्शन) अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. एजाझ काझी असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून ते धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. कार्यालयातच लाच स्वीकारणाऱ्या काझी याच्या विरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ओमनी गाडीवर सोडा विक्री करण्याचा व्यवसाय करीत असून सदरचा व्यवसाय करू देण्यासाठी व कोणतेही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी लाचखोर पोलीस हवालदार एजाझ काझी (वय- ५२ वर्ष, नियुक्ती देवपूर पोलीस स्टेशन) याने तक्रारदाराकडे चार…

Read More

बोगस लाभार्थ्यांना जमीन देण्यासाठी आढळा नदीचा केला ओढा.. सुमारे ४०० एकर राखीव वनक्षेत्राचे वाटप बुधवार, १६ ऑक्टोबर संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग गावात केंद्र सरकारच्या राखीव वन जमिनीचे परस्पर वाटप करण्याचा प्रताप तत्कालीन तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने केल्याचे समोर आल्यानंतर वनविभागाने देखील सदर जमीन ही राखीव वनक्षेत्र असल्याने ती वनविभागाची असल्याचे पत्र दिले आहे. आता जवळेकडलग येथील बारा शेतकऱ्यांनी या संदर्भात संगमनेरच्या प्रांत अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करून बोगस लाभार्थ्यांनी मिळवलेली जमीन पुन्हा सरकारने ताब्यात घ्यावी आणि सर्व नोंदणी व फेरफार रद्द करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे स्थानिक महसूल, वनविभाग आणि भूमी अभिलेख विभागाला हाताशी धरून बोगस लाभार्थ्यांनी…

Read More