Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दैनिक युवावार्ता, युवा पॉलिप्रिंट आणि युवा उद्योग समूहाचे संचालक सुदीप किसन हासे यांनी ओरिएंटल विद्यापीठ, इंदोर येथून संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. व्यवसायाची मोठी जबाबदारी समर्थपणे सांभाळत त्यांनी मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंग या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात हे उल्लेखनीय संशोधन यश संपादन केले आहे. डॉ. सुदीप हासे यांनी “Design and Analysis of Cloud Deployed Intelligent Analysis of Real Time Twitter Data (TSaaS)” या विषयावर आपले संशोधन सादर केले. या संशोधनादरम्यान त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डीप लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांच्या या संशोधनकाळात नामांकित स्कोपस इंडेक्स्ड जर्नल्समध्ये चार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील फुलविक्रेते, रांगोळी, पणत्या, आकाशकंदील व झाडू विक्रेत्यांसह इतर सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय करता यावा, यासाठी १ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रस्त्यालगत योग्य ठिकाणी तात्पुरती दुकाने लावण्यास परवानगी द्यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख अमर कन्हैयालाल कतारी यांनी केली आहे. यासंदर्भात आज संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष मैथिली तांबे यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. दिवाळी हा सण छोट्या व्यावसायिकांसाठी वर्षातील अत्यंत महत्त्वाचा काळ असून, या दिवसांत मिळणाऱ्या रोजगारावर आणि उत्पन्नावर अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांची दिवाळी अवलंबून असते. त्यामुळे या व्यावसायिकांना रोजगाराची आणि व्यवसायाची योग्य संधी…
आजचे राशीभविष्य- मेष – आजच्या दिवशी तुम्हाला जवळच्या एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाइकाकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेली एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता असून सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने मनात थोडी धाकधूक राहील, परंतु धैर्याने परिस्थितीचा सामना केल्यास यश नक्की मिळेल. आपल्या योजना गुप्त ठेवणे आज तुमच्या फायद्याचे ठरेल. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहण्याचा आहे. कोणतेही मोठे किंवा नवीन काम सुरू करण्यापूर्वी घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. नोकरी आणि व्यवसायात सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील. पैशांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगार यांच्या हिताला प्राधान्य देण्याची परंपरा जपणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने अपघाती मृत्यू झालेल्या सभासदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. कारखान्याच्या वतीने सभासदांचा प्रत्येकी दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला असून, या विमा संरक्षणांतर्गत अपघातात मृत्यू झालेल्या सभासदांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीत हा कार्यक्रम झाला. यावेळी आंबी खालसा येथील कै. सुखदेव नामदेव गाडेकर, राजापूर येथील कै. माधव हासे आणि वडगाव पान येथील कै. मनाजी रेवजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांची कारवाई सुरूच असून, संगमनेर शहरात देखील कारवाई करण्यात आली आहे. कादरीनगर परिसरामध्ये कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या तब्बल १० गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गोवंशीय जनावरांची कत्तल व अवैध वाहतूक करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष तपास पथक तयार केले होते. हे पथक सोमवारी (दि. २७) संगमनेर शहर पोलीस ठाणे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरमधील तीन बत्ती चौकात ट्रॅफिक पोलिसांशी झटापट आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप असलेल्या कासम खान अमीर खान पठाण आणि अशफाक रफीक सय्यद या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे. सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांच्या न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी झाली. ३ डिसेंबर २०११ रोजी संगमनेर शहरातील तीन बत्ती चौकात ट्रॅफिक पोलीस म्हणून कर्तव्य बजावत असताना एका कार चालकाने गाडी चुकीच्या बाजूने आणल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यावरून झालेल्या वादात आरोपींनी पोलिसाला शिवीगाळ, धमकी देऊन झटापट केल्याचा आणि शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- तालुक्यात उद्भवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी अंधारात जाऊ नये या मानवतेच्या भावनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यातील गरजू कुटुंबांसाठी ‘दिवाळीचा शिधा’ उपलब्ध झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमार्फत दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेल्या ग्रामीण भागातील घराघरांपर्यंत हा शिधा त्वरित पोहोचवला जाणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या माहितीनुसार तालुक्यातील दुष्काळ, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोहयोची कामे आणि शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या प्रश्नांवर प्रशासकीय नियोजन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. टंचाई आढावा बैठकांनुसार ज्या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई…
आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जावान आणि उत्साही राहील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळाल्यामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदाराची पूर्ण साथ लाभेल. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून बाहेरचे खाणे टाळावे. वृषभ – आजचा दिवस संयमाने वागण्याचा आहे. व्यवसायात आर्थिक लेनदेनाबाबत सावधगिरी बाळगावी, अन्यथा नुकसान होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत जुन्या विषयांवर चर्चा होऊ शकते, त्यामुळे बोलताना गोडवा ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. मिथुन – आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक ठरेल. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरच्या समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक आणि नाट्यपरंपरेला आधुनिकतेची जोड देणारे, कवी अनंत फंदी यांच्या नावाने उभारण्यात येत असलेले एक हजार आसनक्षमतेचे अद्ययावत बंदिस्त नाट्यगृह लवकरच प्रेक्षकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यातील कामाची आमदार सत्यजित तांबे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. हे अद्ययावत नाट्यगृह पूर्णत्वाकडे जात असल्याने संगमनेरमधील नाट्यप्रेमी आणि कलारसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह बंदिस्त करण्याच्या कामाचा पाया रचला गेला. या प्रकल्पासाठी आमदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आणि भीमाशंकर परिसरातील शेकडो एकर जंगल कथित प्रकल्पाच्या नावाखाली नष्ट केले जात असल्याचा गंभीर आरोप करत, या विनाशकारी जंगलतोडीला तात्काळ स्थगिती देण्याची जोरदार मागणी संगमनेर तालुक्यातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केली आहे. या संदर्भात अनेक स्थानिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढते तापमान, पाण्याची तीव्र टंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जनता होरपळून निघत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील अनेक भागांत तापमान ४५ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्याला विकासाची आणि सुसंस्कृत राजकारणाची मोठी परंपरा लाभली असून, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात यापुढेही तालुक्याचा विकासाचा वेग असाच कायम राखला जाईल, असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला आहे. चिकणी येथे ५७ लाख रुपये निधीतून पूर्ण झालेल्या विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी रामहरी कातोरे, अजय फटांगरे, कॉम्रेड कारभारी उगले, विलास वर्पे, भारत वर्पे, मोहनराव करंजकर, भारत शेलकर, शेतकरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद वर्पे, रमेश वर्पे, दर्शन वर्पे, सचिन वर्पे, प्रशांत वर्पे, पंकज हासे, संदीप वर्पे आणि राहुल मुटकुळे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने आक्रमक पावले उचलली आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून २४ ऑक्टोबर २०२६ रोजी संगमनेर येथील ‘मेसर्स जगदंबा फूड प्रॉडक्ट्स’ या अन्न प्रक्रिया उद्योगावर धडक कारवाई करत प्रशासनाने तब्बल १५,००,५६६ रुपये मूल्याचा संशयास्पद, मिसब्रँडेड व कमी दर्जाचा अन्नसाठा जप्त केला आहे. गुजरातच्या उंझा येथील ‘डी. ए. पटेल’ या पुरवठादाराकडून हा माल मागवण्यात आला होता, यामध्ये ८,९९,७०० रुपये किमतीची ५,९९८ किलो धने डाळ आणि ६,००,८६६ रुपये किमतीची ३,५९८ किलो बडीशेप असा एकूण ९,५९६ किलो साठा ताब्यात घेण्यात आला आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शेतातील मातीचा भराव सुरू ठेवण्यासाठी कारवाईची भीती दाखवून १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने एका वनपालाला रंगेहात पकडले आहे. जहीर सिराज शेख (वय ४७) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित वनपालाचे नाव आहे. रविवारी (दि. २५) दुपारी माळेगाव येथील हॉटेल शिवकृपा येथे सापळा रचून तक्रारदाराकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. एसीबीने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, तक्रारदाराची कोऱ्हाळे खुर्द येथे ४ हेक्टर शेतजमीन आहे. अलीकडील पावसामुळे शेतातील माती वाहून नीरा नदीत गेल्यामुळे त्यांनी नदीपात्रातील माती पुन्हा शेतात टाकण्याचे काम सुरू केले होते. मात्र, गत २६ सप्टेंबर रोजी वनपाल जहीर शेख…
आजच्या दिवसाचे राशिभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी जुळवून घ्यावे. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. धार्मिक ग्रंथांच्या वाचनात वेळ जाईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. वृषभ – आजचा दिवस खर्च आणि आराम यांच्यात संतुलन राखण्याचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी, विशेषतः पोटाची जुनी तक्रार डोके वर काढू शकते. मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवावा लागेल. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवावा. मिथुन – आज मित्रांकडून आणि ओळखीच्या व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेलेधन हाती येऊ शकते. मुलांच्या अभ्यासामुळे काहीशी चिंता वाढू शकते. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि कागदपत्रे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ग्रामीण भागातील गरजू महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत, माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने एक अत्यंत दिलासादायक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांसाठी नॉर्मल म्हणजेच प्राकृतिक प्रसूती असो वा सिझेरियन (शस्त्रक्रिया) असो, दोन्ही प्रकारच्या प्रसूती पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत. केवळ प्रसूतीच नव्हे, तर गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात गर्भाची योग्य वाढ, प्रकृतीची तपासणी आणि कोणत्याही गुंतागुंतीशिवाय प्रसूती व्हावी, यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या चारही सोनोग्राफी तपासण्या देखील पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पाच हजाराहून अधिक एएनसी रुग्ण महिलांनी प्रसूतीपूर्व सेवांचा लाभ घेतला आहे;…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- गेल्या चाळीस वर्षांत विविध सत्तास्थाने मिळूनही संगमनेर शहरातील संजय गांधी नगर आणि वडार वस्ती परिसरातील नागरिकांच्या घरांचा व मालकी हक्काचा प्रश्न सुटू शकला नाही, अशी खरमरीत टीका करत या भागातील रहिवाशांच्या घरांचे उतारे त्यांच्या नावावर करून देण्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. शहरातील वडार वस्ती व संजय गांधी नगर येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. निवडणुकीपुरता मतांसाठी वापर करून मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना रोखून आता नागरिकांच्या मनातील भीती दूर केली जाईल आणि त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आपण कटिबद्ध राहू, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. यापूर्वी तत्कालीन महसूलमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करत १५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतील कासारवाडी-खांडगाव प्रवरा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून नदीपात्रात टिप्परमध्ये वाळू भरत असताना सनी संजय चव्हाण आणि अमोल संजय जोंधळे या दोघांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान पोलिसांनी टाटा कंपनीचा टिप्पर आणि वाळू असा एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील खांजापूर येथे अग्नेश्वर मंदिराच्या कामावरून झालेल्या वादातून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी पंचायत समिती सदस्य अशोक बबन सातपुते हे शनिवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास खांजापूर गावातील अग्नेश्वर मंदिर येथे मंदिराचे सुरू असलेले बांधकाम पाहण्यासाठी गेले होते. त्याच वेळी तेथे असलेल्या पोपट शिवाजी सातपुते यांनी “देवाचे काम चालू आहे, एवढे पैसे लागणार नाहीत, हे सगळे पुढारी पैसे खातात” असे विधान केले. अशोक सातपुते यांनी “तुम्ही अशी काही बदनामी करू नका व फालतू चर्चा करू नका”…
प्रवीण पुरो – सत्ता मिळावी म्हणून मराठा समाजाला गोंजारणं, ती राबवता यावी म्हणून त्यांच्यात फूट पाडून त्यांना आपलंसं करणं, संकट आलं की त्या समाजाच्या नावाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची धार कमी करण्याचं कारस्थान रचणं, सत्ता स्पर्धेत कोणी आलं की त्याचे समाजाच्या नावाखाली पाय ओढणं, अशा कुटील कारस्थानांचा गोतावळा गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात उभा करण्यात आला आहे. इथे सत्तेतील सहकारी एकनाथ शिंदे यांनाही सोडलं जात नाही. सत्तेच्या स्पर्धेतून त्यांनी माघार घ्यावी यासाठी जरांगे यांच्या नेतृत्वाखालच्या आंदोलनाचा खुबीने वापर करून घेणं या गोष्टी राज्यात इतक्या खुबीने घडवल्या जात आहेत की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. ५०० कोटींच्या कथित फंडाची गोष्ट याच पद्धतीत…
आजचे राशिभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी उत्साही आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आला आहे. नोकरीच्या क्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून बाहेरचे खाणे टाळावे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. वृषभ – आजचा दिवस आर्थिक बाबतीत अत्यंत लाभदायक ठरेल. व्यवसायात नवीन लाभाचे मार्ग खुले होऊ शकतात. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि परस्पर समज वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्तम यश मिळवण्यासाठी अधिक एकाग्रतेची गरज भासेल. प्रवासाचे योग असून तो प्रवास सुखकर आणि फायदेशीर ठरेल. मिथुन – आज आपल्या वाणीत गोडवा राहिल्यामुळे अनेक कठीण कामे सहजतेने…
