Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries) आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील आणि तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. वृषभ (Taurus) आज तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. संध्याकाळी एखादी चांगली बातमी मिळू शकते. मिथुन (Gemini) आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कर्क (Cancer) आज तुम्ही भावनिकरित्या थोडे संवेदनशील असाल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.…

Read More

संगमनेर –  संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर संगमनेरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीत झालेल्या या घटनेमुळे शहरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान या घटनेचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. राजस्थान युवक मंडळाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभावेळी ही घटना घडली. मालपाणी लॉन्स येथे आयोजित या कार्यक्रमात आमदार खताळ उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते प्रेक्षकांशी हस्तांदोलन करत असताना, खांडगाव येथील एका व्यक्तीने हात मिळवण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती समजते. हा प्रकार अचानक घडल्याने एकच गोंधळ उडाला. आमदार खताळ यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकांनी तात्काळ प्रसंगावधान राखून हल्लेखोराला पकडले. त्याच वेळी मालपाणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या गुळातील भेसळीवर अन्न व औषध प्रशासन (FDA) कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते शंकर रावसाहेब ढमाले यांनी गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) संगमनेर येथील प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गुळात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि भेसळखोरांना क्लीनचीट देणाऱ्या अहिल्यानगरच्या अन्न व औषध प्रशासनाविरोधात हे उपोषण आहे. ढमाले यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना सांगितले की, शहरातील सिद्धी गुळ नैसर्गिक गुळ या नावाने विकला जाणारा गुळ खरेदी केल्यानंतर या गुळामुळे त्यांना आजारपणाचा सामना करावा लागला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या गुळात भेसळ असल्याचा संशय आल्याने त्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर,प्रतिनिधी: संगमनेर शहरातील मेनरोडवर कोणत्याही सण, उत्सव किंवा मिरवणुकीमध्ये कर्कश आवाजातील डीजे वाजवण्यास बंदी घालावी, अशी मागणी करत शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालयात जात प्रांताधिकारी अरुण उंडे यांना एक सामूहिक निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये, संगमनेर शहरातील मेनरोडवर डीजेच्या मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाचे गांभीर्य मांडण्यात आले आहे. डीजेच्या दणदणाटामुळे दुकानांमधील विक्री व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, आवाजाच्या कंपनामुळे अनेक घरांमध्ये वस्तू खाली पडून नुकसान होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. याशिवाय, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना डीजेच्या मोठ्या आवाजामुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने मेनरोडवर कोणत्याही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर, प्रतिनिधी: अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी, प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.  महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय जाहीर केला असून, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ (सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६) राज्यात लागू झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्रे उपलब्ध नाहीत. या कायद्यानुसार एसईबीसी प्रवर्गाला शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात १० टक्के आरक्षण मिळाले आहे. तसेच, न्या. शिंदे समितीच्या शिफारशीनुसार मराठा समाजातील काही विद्यार्थ्यांना कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी (ओबीसी) जातीची प्रमाणपत्रे…

Read More

आजच्या वेगवान डिजिटल युगात, जिथे बातम्या क्षणात जन्माला येतात आणि क्षणात विरून जातात, अशा स्पर्धेच्या काळात संगमनेरसारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात ‘दैनिक प्रवरातीर’सारखे वृत्तपत्र सातत्याने आपले स्थान टिकवून आहे. या यशामागे आहे. एक तरुण, ध्येयवेडा आणि सामाजिक जाणिवेची जाणीव असलेला संपादक, धिरज आणि त्याचे वडील शिवपालसिंह ठाकूर. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी, धिरजने आपल्या वडिलांकडून मिळालेला पत्रकारितेचा वारसा केवळ पुढेच नेला नाही, तर त्याला सामाजिक कार्याची आणि आधुनिकतेची जोड देऊन एक वेगळीच ओळख निर्माण केली. त्यांचे वडील, ज्येष्ठ संपादक शिवपालसिंह ठाकूर, यांनी ३० वर्षांपूर्वी संगमनेरच्या पत्रकारिता क्षेत्रात पाऊल ठेवले आणि आज धिरज त्याच पावलावर पाऊल टाकून यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. धिरजचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामात यश मिळेल आणि नवीन संधी चालून येतील. आर्थिक बाबींमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर सहज मात कराल. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतो. तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा. मिथुन: आज तुम्ही उत्साही आणि आनंदी राहाल. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे जाईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. कर्क: आज तुम्हाला भावनिकदृष्ट्या थोडे अस्थिर वाटू शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुम्हाला मिळेल, ज्यामुळे दिलासा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: शहरातील प्रवरा नदीच्या पात्रात मंगळवारी रात्रीच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी गेलेले विजय संभाजी कुटे (वय अंदाजे ४०) हा तोल जाऊन वाहत्या पाण्यात पडल्याने बेपत्ता झाला आहे. या घटनेमुळे संगमनेर शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिक आणि प्रशासन कसून प्रयत्न करत आहेत. दरम्यान अद्यापही शोध कार्य सुरू असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिली आहे. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या दरम्यान प्रवरा नदीवरील छोट्या पुलावर घडली. मूळचे रंगार गल्ली, संगमनेर येथील रहिवासी असलेले विजय कुटे हे आपल्या स्कुटी गाडीवरून कचरा टाकण्यासाठी आले असल्याची माहिती चर्चेत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहर आणि तालुक्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या प्रभा निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. आमदार तांबे म्हणाले की, गणपती बाप्पाचं आगमन हे आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येतं. गणेशोत्सव आपल्याला नवीन कामांची सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. संगमनेरकर नागरिक हे दहा दिवस मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. विविध गणेश मंडळांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी शहरात गर्दी होते, तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी नागरिक उत्साही असतात. यावेळी बोलताना त्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी गणेशोत्सवानिमित्त राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक सुखी, समाधानी व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे. तसेच, मराठा आरक्षणाचे आंदोलन यशस्वी होऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. थोरात यांनी आपल्या ‘सुदर्शन निवासस्थानी’ सपत्नीक गणेशाची स्थापना केली, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत कन्या डॉ. जयश्री थोरात आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. हसमुख जैन उपस्थित होते. यावर्षी काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी काही ठिकाणी पाऊस कमी आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडून शेतकरी सुखी आणि समाधानी व्हावा, अशी…

Read More