Author: Annant Ppangarkar
लहानपणी आई डबा करून दयायची पण लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितलेव की खूप वाटायचं. आपणही खावं पण आई म्हणायची, ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात आपण नाहीं. मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली. लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे. मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले. सुती कपडे महाग झाले. लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची, आई छानपैकी शिवून दयायची. शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची. मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले. लहान होतो…
सोमवार, ०५ ऑगस्ट पुणे – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्याकरीता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्यावतीने नवीन धोरण आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. शिंदे यांनी पाटील इस्टेट शिवाजीनगर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी, जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळा, एकता नगर सिंहगड रोड, खडकवासला येथे भेट देऊन रहिवासी तसेच स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, अण्णा बनसोडे, सिद्धार्थ…
सोमवार, ०५ ऑगस्ट अहमदनगर – कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना विशेष कृती योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदान तत्वावर फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅगेचा पुरवठा करण्यात येणार आहे. फवारणी पंपाच्या लाभासाठी ६ ऑगस्ट व कापूस साठवणूक बॅगेकरिता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारीत पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा कृषी विभागाचा उद्देश आहे. यासाठी राज्यशासनाकडून एकात्मिक कापूस आणि सोयाबीन इत्तर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षासाठी राबविण्यात येत आहे. २०२४-२५…
सोमवार, ०५ ऑगस्ट अज्ञात व्यक्तीने घराच्या पडवीत झोपलेल्या सत्तर वर्षे वयाच्या वृद्धाचा डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालत खून केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. साहेबराव भिमाजी उनवणे असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील झोळे गावात ही घटना घडली असून या वृद्धाचा खून कोणी आणि कशासाठी केला याची उकल करण्याचे आव्हान संगमनेर पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. साहेबराव उनवणे हे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून घराबाहेर असलेल्या पडवीमध्ये झोपले होते. अज्ञात व्यक्तीने केलेल्या खुनाचा हा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. सकाळी घराबाहेर आलेल्या उनवणे यांच्या सुनेला ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आल्याने हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. उनवणे…
सोमवार, ०५ ऑगस्ट संगमनेरमधील एका अल्पवयीन मुलीवर अहमदनगरमध्ये वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा व त्यातून ती गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगरमधील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा राजू पवार (रा. वडगाव गुप्ता रस्त्यावरील आठरे पाटील शाळेजवळ, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात या तरुणाविरुद्ध अत्याचार, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीने पीडित फिर्यादी अल्पवयीन मुलीवर ९ मार्च २०२४ रोजी दुपारच्या वेळी व २७ जुलै २०२४ रोजी सावेडी उपनगरातील एका बांधकामाच्या ठिकाणी अत्याचार केल्याचे म्हटले आहे. यातून पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती…
सोमवार, ०५ ऑगस्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘ती’ विवाहिता पती आणि मुलासोबत बँक खात्याची केवायसी करण्यासाठी बँकेत आली. बँकेत गर्दी असल्याने नवऱ्याला मुलासाठी खाऊ आणण्यास पाठविले आणि बँकेत असे काही घडले की नवऱ्याला बायकोच्या शोधासाठी थेट पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. पोलीस तपासात समोर आलेली धक्कादायक माहिती पाहून पोलिसांसोबत सर्वच चक्रावले. सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा गवगवा सुरू आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी बहिणींची धावाधाव सुरू आहे. अशा स्थितीत या योजनेच्या नावाखाली महिलेने आपल्या पती मुलासह बँकेत येत प्रियकरासोबत भुर्र होण्याचा प्रकार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये समोर आला आहे. घडलं असं की, नांदेडच्या…
सोमवार, ०५ ऑगस्ट स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समृद्ध विचारांचे वारसदार असलेले काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तरुणांना विविध स्पर्धा परीक्षा व वाचनालयाकरिता अध्यायावत सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता संगमनेर तालुक्यातील बारा गावांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालयाकरता ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला असल्याची माहिती युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी दिली. थोरात म्हणाल्या, तालुक्यातील युवकांशी साधलेल्या युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध गावांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. याकरता आमदार थोरात व आपण पाठपुरावा केला. संगमनेरमध्ये वाचन संस्कृती वाढवण्याकरता राज्यातील आदर्शवत मॉडेल उभारले जाणार आहे. संगमनेर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र झाले असून अनेक युवक…
सोमवार, ०५ ऑगस्ट मुळा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होत असून मुळा नदीला आलेल्या पुरामुळे संगमनेर व पारनेर तालुक्यांना जोडणारा साकुर नजीकचा मांडवे पूल पाण्याखाली गेल्याने या दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगडापासून मुळा नदीचा उगम होत असून नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. साकुर नजीकच्या मांडवे येथील पुलाच्या माध्यमातून संगमनेर-पारनेर हे दोन तालुके जोडले गेले आहे. सद्यस्थितीत रविवारी हा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन तालुक्यातील संपर्काचा मार्ग…
रविवार, ०४ ऑगस्ट शिर्डी एमआयडीसीत संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या कारखान्यास शासनाने मंजुरी दिली असून या कारखान्याच्या माध्यमातून शिर्डी व राहाता परिसरातील २ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. महसूल पंधरवडा निमित्त राहाता येथे विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभांचे मंत्री विखे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिर्डीचे प्रांताधिकारी माणिकराव आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, राहाता तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मुख्याधिकारी वैभव लोंढे आदी उपस्थित होते. सामाजिक अर्थसहाय्यातील संजय गांधी निराधार अनुदान, इंदिरा गांधी, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन, आदिवासी शासकीय प्रमाणपत्र व…
धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवा एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेनादलाची मदत घ्या, बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी रविवार, ०४ ऑगस्ट मुंबई : भारतीय हवामान खात्याने पुणे आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आज जोराचा पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण, औषधे, आरोग्य सुविधा इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत. पुणे परिसरातील…
रविवार, ०४ ऑगस्ट राज्याच्या आजी-माजी महसूलमंत्र्यांमधील वाद सर्वश्रुत असताना गेल्या दोन दिवसात या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या टीकाटिप्पणीनंतर आता विखे यांच्यावर पलटवार करत आमदार रोहित पवार यांचा संदर्भ देत राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे. अहमदनगरमध्ये तलाठी नियुक्तीपत्रे देताना मंत्री विखे यांनी तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचे म्हटले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि थोरात यांनी या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. भ्रष्टाचाराचे एक उदाहरण जरी मिळाले तरी मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा, असे जाहीर आव्हान राधाकृष्ण…
रविवार, ०४ ऑगस्ट अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत ३४३.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. शेजारील पुणे व नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे व नाशिक जिल्ह्यातून अहमदनगरमध्ये येणाऱ्या नद्यांच्या व धरणाच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भिमा, प्रवरा, कुकडी व गोड नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे या नदीकाठवरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्याच्या ७६.६६% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या) पर्जन्यमान झालेले आहे. आज दुपारी बारा वाजता जिल्ह्यातील गोदावरी…
रविवार, ०४ ऑगस्ट पाच लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील एक लाख रुपयांवर तडजोड करणाऱ्या लोणीकंद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय ३६ वर्ष) असे निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असून सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. थोरबोले लोणीकंद (पुणे) पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे. एका ३२ वर्षीय व्यक्ती विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्ज आला होता. या तक्रार अर्जाचा तपास सहाय्यक निरीक्षक थोरबोले यांच्याकडे सोपविण्यात आला होता. थोरबोले यांनी तपासात त्यांच्या बाजूने अहवाल देण्यासाठी तसेच भविष्यात त्रास न देण्यासाठी पाच लाख रुपयांची…
महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत गलिच्छ पातळी गाठणार्या भाजपला धक्क्यावर धक्के बसूनही त्या पक्षाचे नेते सुधारण्याचं नाव घेत नाहीएत. या घाणेरड्या राजकारणाचे फटके लोकसभेत पडले तरी हे नेते पक्षाला खड्ड्यात घालण्याची एकही संधी सोडत नाहीत, हे अनिल देशमुख यांच्यावरील कथित पलटवाराने दाखवून दिलं आहे. राज्यात गेल्या दहा वर्षातील राजकीय उलथापालथीचं केंद्र हे भाजपच होतं आणि आहे. या घटनांमागे असलेल्या अनेकांची नावं आता हळूहळू पुढे येऊ लागली आहेत. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात ज्या काही घटना घडल्या त्यामागच्या घडामोडी पाहिल्या की भाजपने महाराष्ट्राचं राजकारण किती खाली नेलं हे दिसून येतं. आघाडी सरकारमधले गृहमंत्री अनील देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईत समित कदम…
शनिवार, ०३ ऑगस्ट संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील अत्याचार, धर्मांतर प्रकरणातील आरोपी युसुफ दादा चौघुले याच्या पोलीस कोठडीत शनिवारी न्यायालयाने तिसऱ्यांदा ५ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी शादाब रशीद तांबोळी याच्यासह कुणाल विठ्ठल शिरोळे व आयाज अजीम पठाण हे अद्यापही फरार आहेत. फिर्यादी अल्पवयीन असताना देखील आरोपींनी तिला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्यासोबत सलगी केली. तिला फसवून मंचर येथे नेत अटकेतील आरोपी युसुफ चौघुले याच्या कारमधून फिर्यादीला पाण्यात गुंगीकारक औषध देऊन अर्धवट बेशुद्ध झाली असताना लग्नासाठी मंचरवरून चाकण येथे नेले. त्यानंतर तेथून दुसऱ्या गाडीतून मुंबई येथे पाठवून दिले होते. मुंबईत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तसेच तिचे धर्मांतर देखील…
शनिवार, ०३ ऑगस्ट संगमनेरमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या माध्यमातून अनेक जण गुन्हेगारीकडे वळत आहे. मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढीस लागल्याने हे धंदे बंद न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी दिला आहे. संगमनेर शहराच्या अनेक भागात गल्लोगल्ली मटक्याची दुकाने थाटली गेली आहे. याशिवाय अनेक प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांचा रस्त्यावर आता नागरिकांना देखील त्रास होऊ लागला आहे. बहुचर्चित ठरलेल्या शक्तिमान टॉवर्समध्ये देखील अनेक अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांनी आपले दुकाने सुरू केले असून पोलीस यंत्रणाच्या नजरेसमोर हे सर्व अवैध धंदे सुरू आहेत. मटका, गुटखा, जुगार, गांजा विक्री, गांजाची सिगारेट, उत्तेजक औषधी…
शनिवार, ०३ ऑगस्ट काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी १ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून यातून रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याची माहिती सहकार महर्षी थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. आमदार थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी-वस्तीवर मूलभूत गरजांची पूर्तता करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. यातून तालुक्यात अनेक विकास काम मार्गी लागले आहे. थोरात यांचे सुसंस्कृत नेतृत्व आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका व केलेल्या विकास कामांच्या बळावर संगमनेर तालुका राज्य पातळीवर ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. या रस्त्यांचे होणार काम… कासारा दुमाला ते सावंत वस्ती रस्ता मजबुतीकरण…
शनिवार, ०३ ऑगस्ट | अनंत पांगारकर संगमनेर मधील बहुचर्चित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या गैर व्यवहार प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये समावेश असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या चेतन नागराजबाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अखेर जामीन मंजूर केला आहे. कपाटे यांना जामीन मंजूर झाल्याने ठेविदारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अपिलामध्ये जाणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय आसामी भाऊसाहेब कुटे याच्या अधिपत्याखाली असलेल्या संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे ८१ कोटी रुपयांचा कागदोपत्री घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याचा मुख्य ठपका चेअरमन असलेल्या भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह…
विशेष लेख… ३ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय अवयव दान दिवस साजरा केला जातो. याच दिवशी देशातील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याचे आठवण म्हणून २०१० पासून हा दिवस राष्ट्रीय अवयव दान दिवस म्हणून साजरा केला जातो. एखाद्याला नवीन जीवन देण्यासाठी अवयवदान करने हा एक उदात्य मार्ग असु शकतो. अवयवदान दिनानिमित्त आपण जागरूकता वाढवूया आणि अधिकाधिक लोकांना अवयवदाता म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करूया एका अवयवदात्यामुळे आठ पेक्षा अधिक लोकांना याचा उपयोग होतो. अवयवदानाच्या माध्यमातून आपले मौल्यवान अवयव दान करण्याचा संकल्प करण्याची आणि पुढे येण्याची संधी आपल्या सर्वांना आहे. अवयवदान जागृती वाढल्याने अधिकाधिक लोकांना अवयवदान करण्यास प्रोत्साहन मिळू शकते, अवयवदानाचे…
मुंबई | प्रवीण पुरो करातून येणारा पैसा फुकट वाटण्यासाठी नाही, त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबविण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार असून याप्रकरणी काय निकाल येतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नवी मुंबईतील नावेद मुल्ला यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १४ ऑगस्टला वितरीत करण्यात येणारा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. मात्र ही योजना भ्रष्ट कृती असून मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार आहे. निवडणुकीत पैसे वाटल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते.…
