Author: अनंत पांगारकर

संगमनेर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक बदल झाले असले तरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे संगमनेरमधील ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालय सामान्य नागरिकांसाठी एक विश्वासार्ह आणि हक्काचे मदत केंद्र म्हणून उभे आहे. हे कार्यालय, राजकीय स्थिती कशीही असो, जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी २४ तास कार्यरत असल्याचे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरचे राजकीय समीकरण बदलले असले तरी, बाळासाहेब थोरात यांचे हे जनसंपर्क कार्यालयाने आजही सामान्य नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणेच मदतीचे आणि विश्वासाचे केंद्र म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे. त्यांच्या प्रामाणिक कामामुळे आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेमुळे हे कार्यालय कायमच जनतेच्या हितासाठी कार्यरत राहील, असा विश्वास…

Read More

संगमनेर – मोहसीन शेख गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या संगमनेर नगर परिषदेमध्ये विकासकामे ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. माजी नगरसेवक डॉ. दानिश खान यांनी शहरातील त्यांच्या प्रभागात असलेल्या लखमीपुरा भागात रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात अनोखे ‘गांधीगिरी’ आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गुलाबाची रोपे लावून त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रकाश टाकला आणि नागरिकांचे मूलभूत प्रश्न किती गंभीर आहेत, हे अधोरेखित केले. कोट्यवधींची विकासकामे रखडली- तत्कालीन कौन्सिलचा कालावधी संपल्याने मागील चार वर्षांपासून संगमनेर नगर परिषदेची निवडणूक झालेली नाही आणि कौन्सिल अस्तित्वात नसल्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. कौन्सिल अस्तित्वात असताना तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे प्रस्तावित…

Read More

मेष (Aries): आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, पण खर्च जपून करा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus): तुमच्या मेहनतीचे फळ आज नक्की मिळेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. कामात यश मिळवण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करा. मिथुन (Gemini): आज काही निर्णय घेताना सावध राहा. अनावश्यक वादात पडू नका. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार जपून करा. दिवसभर थोडा तणाव जाणवू शकतो. कर्क (Cancer): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळेल. नवीन योजना आखण्यासाठी उत्तम दिवस. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आर्थिक आवक…

Read More

संगमनेर –  घुलेवाडी (संगमनेर) येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याने माजी सरपंच भास्करराव पानसरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असताना, रुग्णालयातील मेडिकल सुविधा आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जर या परिस्थितीत तातडीने सुधारणा झाली नाही, तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने संगमनेर तालुक्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी घुलेवाडी येथे अद्ययावत ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, सध्या या रुग्णालयातील प्रशासनाचे काम समाधानकारक नसल्याचे पानसरे यांनी सांगितले. रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत, त्यांच्या नातेवाईकांना कोणतेही योग्य मार्गदर्शन केले जात…

Read More

संगमनेर-  पुणे-नाशिक महामार्गावर खांडगावकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री एक भीषण अपघात घडला. मालवाहू ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दिनेश राजू लोखंडे (वय ३३, रा. संगमनेर खुर्द) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कामावरून घरी परतत असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. या घटनेने संगमनेर परिसरात शोककळा पसरली आहे. दिनेश लोखंडे हा मालपाणी कंपनीत कामाला होता. मंगळवारी रात्री तो नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून घरी परतत होता. त्याचवेळी, अहमदाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या (MH 14 LS 7191) या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दिनेशच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्याचा डावा पाय पूर्णपणे तुटला होता. अपघाताची माहिती मिळताच संगमनेर…

Read More

मेष (Aries)- आजचा दिवस तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि अधिक उत्पादनशील राहण्यासाठी चांगला असू शकतो. तुमच्यात उत्साहाची लाट येऊ शकते, ज्यामुळे तुम्ही बऱ्याच काळापासून पुढे ढकललेली कामे पूर्ण करू शकता. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा व्यावसायिक परिस्थितीत तुमचे मत मांडण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे. वृषभ (Taurus)- आज तुम्हाला स्थिरता आणि आरामाची गरज वाटू शकते. तुमच्या घरगुती जीवनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि प्रियजनांसोबत वेळ घालवण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे. आर्थिक बाबतीत, खर्चावर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या बजेटचे पालन करण्याचा प्रयत्न करा. मिथुन (Gemini)- आज तुमच्या संवाद कौशल्यात सुधारणा होईल. नवीन लोकांशी संपर्क साधण्यासाठी, महत्त्वाच्या चर्चा करण्यासाठी किंवा काहीतरी…

Read More

संगमनेर –  माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ कार्यालयाने संगमनेर तालुक्यातील सुमारे १२ हजार असंघटित कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कामामध्ये मदत पोहोचवण्याचं श्रेय घेणाऱ्या इतर लोकप्रतिनिधींवर असंघटित कामगारांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंगसे यांनी टीका केली आहे. मुंगसे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटल्यानुसार, सन २०२२-२३ पासून थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंद्रजीत थोरात व डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘यशोधन’ कार्यालयाने गावागावात जाऊन गरजू कामगारांना मदत केली. ज्यांना सरकारी योजनांची माहिती नव्हती, त्यांना घरी जाऊन माहिती दिली, फॉर्म भरण्यासाठी मदत केली आणि त्यांना शिष्यवृत्ती, आजारपणात मदत व इतर लाभ मिळवून दिले. यशोधन कार्यालयात दररोज सहा कर्मचारी या कामगारांच्या…

Read More

मेष (Aries) – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus) – आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा आव्हानात्मक असू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शांत राहण्याचा प्रयत्न करा. मिथुन (Gemini) – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने लोक प्रभावित होतील. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मकता दिसेल. कर्क (Cancer) – आज तुम्हाला मानसिक शांती मिळेल. जुने वाद मिटू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला (SEC) जोरदार फटकारले आहे. न्यायालयाने राज्यातील या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिले असून, ही शेवटची मुदतवाढ असल्याचेही स्पष्ट केले आहे.  यापूर्वी, २०२२ मध्ये न्यायालयाने जे. के. बांठिया आयोगापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी जागा पूर्ववत करून चार महिन्यांत म्हणजेच ऑगस्ट २०२५ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या निर्देशांचे पालन न केल्याने न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सीमांकन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून त्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्याचे…

Read More

संगमनेर –  सोमवारी पहाटे पुणे-नाशिक महामार्गावर रायतेवाडी फाटा येथे एक भरधाव वेगातील कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने हॉटेल मालक बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून पुण्याकडे जात असलेल्या एका भरधाव कंटेनरच्या (क्रमांक HR 55 AT 2926) चालकाला झोपेची डुलकी लागली. यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर थेट महामार्गालगतच्या ‘हॉटेल दिव्यांका’ मध्ये शिरला. हा अपघात पहाटे ५ ते ५:१५ च्या सुमारास घडला. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी हॉटेलचे मालक दत्तात्रेय मांडेकर हॉटेलच्या आत झोपले होते. मोठा आवाज झाल्याने त्यांना जाग आली आणि समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरडा…

Read More