Author: अनंत पांगारकर
शुक्रवार, २६ ऑक्टोबर संगमनेर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी आणखी पाच इच्छुक उमेदवारांनी १० उमेदवारी अर्ज नेले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ३१ इच्छुकांनी ६३ उमेदवारी अर्ज नेले असून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. शनिवार, रविवारची सुट्टी वगळता शेवटच्या दोन दिवसात प्रमुख उमेदवारांचे अर्ज नेले जाणार असून लगेचच त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर झाली असून अद्याप त्यांनी देखील उमेदवारी अर्ज नेलेला नाही. तर महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळालेल्या अजिज व्होरा यांनी देखील अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. व्होरा आज उमेदवारी अर्ज…
शुक्रवार २५ ऑक्टोंबर अहिल्यानगर – भरारी पथकाने अहिल्यानगर शहरात दोन ठिकाणी वाहतूक करण्यात येत असलेली रोकड पंचनामा करुन ताब्यात घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अवैध मद्य, रोकड वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी अहमदनगर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी चेकपोस्ट, आठ भरारी व स्थाई पथके नेमण्यात आली आहेत. भरारी पथकाने १६ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता नालेगाव भागातील अमरधाम येथे ३ लाख ८४ हजार ३०० रुपये एवढी रोख रक्कम दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यात घेतली. याबाबतचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक करीत आहेत. तर कायनेटीक चौक येथे २४…
शुक्रवार, २५ ऑक्टोंबर संगमनेर – बाहेरचे लोक तालुक्यात येऊन हावभाव करत भाषणे करत आहे. त्यांच्यासारखी भाषणे ही आपली संस्कृती नाही, ते घाबरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी जशी शांत, संयमी बाळासाहेब थोरातांची कन्या आहे, तशीच भाऊसाहेब थोरातांची नात देखील आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा, अशा थेट शब्दात काँग्रेस नेत्या जयश्री थोरात यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या टीकाकारांना उत्तर दिले आहे. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली युवा संवाद यात्रा गुरुवारी रात्री संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे आली होती. घुलेवाडी येथील यात्रेत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात देखील सहभागी झाले होते. डॉ. थोरात म्हणाल्या, विस्ताराने मोठा असलेला संगमनेर तालुका आमदार बाळासाहेब…
त्यांचे समर्थकच सांगतात… संगमनेर चांगले तर खरी दडपशाही त्यांच्याकडेच! राहता तालुका देखील आता दहशतमुक्त करायचाय! थोरात यांचा शुभारंभानंतर प्रथमच युवा संवाद यात्रेत सहभाग शुक्रवार, २५ ऑक्टोंबर संगमनेर – गोरगरिबांना चांगले जीवनमान मिळवून देण्यासाठी येथील राजकारण आहे. राज्यभरात सुसंस्कृत आणि प्रगतशील अशी संगमनेरची ओळख निर्माण झाली आहे. मात्र त्यांच्या तालुक्यात खऱ्या अर्थाने दहशत निर्माण करणारेच लोक इकडे येऊन खोटे आरोप करतात. त्यांच्या तालुक्यात जाऊन त्यांच्या समर्थकांना विचारा ते सांगतील राज्यात संगमनेर सगळ्यात चांगला तर खरी दडपशाही राहता तालुक्यामध्ये आहे. दडपशाहीच्या जोरावर त्यांचे राजकारण इकडे आणण्याचा त्यांचा प्रयत्न असून या दडपशाहीच्या व्हायरसला इकडे येऊ द्यायचे नाही, असे आवाहन विधिमंडळ पक्षाचे नेते…
शुक्रवार, २५ ऑक्टोंबर मुलाच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हामध्ये त्याला अटक न करण्यासाठी आणि दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी खासगी व्यक्तीच्या मदतीने २५ हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्ती विरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली. पोलीस उपनिरीक्षक माणिक बाळासाहेब मांडगे आणि खासगी व्यक्ती सुभाष मुंजाळ (रा. कवठे यमाई, ता. शिरुर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिरूर पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करू नये तसेच त्याला मदत करू यासाठी पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली…
शुक्रवार, २५ ऑक्टोबर २०२४ मेष – कौटुंबिक सौख्य लाभून संततीकडून त्यांच्या प्रगतीपर बातम्या मिळतील. व्यवसाय-धंद्यात जुनी येणी वसूल होतील. आत्मविश्वासात वाढ होऊन जिद्द व चिकाटी वाढेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. वृषभ – आरोग्य उत्तम राहून उत्साहात भर पडेल. दैनंदिन आपली रोजची कामे आपण वेळेवर पूर्ण करू शकाल. काही महत्त्वाच्या गाठीभेटी झाल्यामुळे दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करता येतील. मिथुन – महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. नियोजनात आयत्या वेळेस काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. कुटुंबातून सहकार्य लाभेल. सरकारी कामांना विलंब लागण्याची शक्यता. कर्क – आपल्या कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे तसेच हाताखालील मंडळींचे अपेक्षित असलेले सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबासाठी तसेच स्वतःसाठी काही नवीन…
गुरुवार, २४ ऑक्टोंबर मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत अपेक्षेप्रमाणे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. एआयसीसीचे जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल यांनी गुरुवारी काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पाठोपाठ काँग्रेसने देखील उमेदवारी यादी जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचे बहुतांशी उमेदवार स्पष्ट झाले आहेत. विधिमंडळाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात नवव्यांदा संगमनेरमधून निवडणुकीला सामोरे जात आहे. काँग्रेसचे उमेदवार पुढीलप्रमाणे… अक्कलकुवा -…
गुरुवार, २६ ऑक्टोबर मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पाठोपाठ गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत ४५ उमेदवारांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, राहुरी, कोपरगाव, शेवगाव आणि कर्जत-जामखेड मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, जयप्रकाश दांडेगावकर, गुलाबराव देवकर, हर्षवर्धन पाटील, बापूसाहेब पठारे, रोहिणी खडसे, युगेंद्र पवार, रोहित आर आर पाटील यांचा प्रमुख उमेदवारांमध्ये समावेश आहे. पारनेरमधून अहिल्या नगरचे विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके, राहुरीमधून विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे, कोपरगावमधून संदीप वर्पे, शेवगावमधून प्रताप ढाकणे आणि कर्जत जामखेड मधून विद्यमान आमदार…
गुरुवार, २४ ऑक्टोंबर संगमनेर – संगमनेर विधानसभा मतदारसंघातून गुरुवारी ‘ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ पक्षाच्या वतीने भागवत धोंडीबा गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्याकडे दाखल केला. तर आतापर्यंत २६ इच्छुकांनी ५३ उमेदवारी अर्ज नेले आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. शासकीय सुट्ट्यांचा कालावधी वजा जाता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे या तीन दिवसात मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची चिन्ह आहेत. गुरुवारी भारत संभाजी भोसले, विठ्ठल संतोष अभंग, अब्दुल अजीज अहमद शरीफ व्होरा (वंचित बहुजन आघाडी), संपत मारुती कोटकर (वंचित बहुजन आघाडी), विक्रमसिंह सतीशराव खताळ पाटील (भारतीय जनता…
गुरुवार, २६ ऑक्टोंबर संगमनेर – संगमनेर तालुक्यात विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून चांगला सहकार आणि निर्माण झालेली चांगली संस्कृती यापुढील काळात जपायची असल्याचे प्रतिपादन करताना सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांसाठी ३०१५ रुपयांचा मागील हंगामाचा प्रति टनाचा ऊस भाव माजी मंत्री, काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केला. गुरुवारी थोरात यांच्या हस्ते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात यांच्यासह सहकारातील संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब…
