Author: Annant Ppangarkar
बुधवार, दि. १२ जून २०२४ लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याच्या कारणावरून प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे यांच्या निलंबनाला काही तास उलटत नाही तोच आता विधान परिषदेचे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांचे सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. पक्ष विरोधी काम करणाऱ्या काँग्रेसमधील नेत्यांवर निलंबनाची कारवाई सुरू झाली असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून कारवाई सत्र सुरू झाले आहे. गावंडे पाठोपाठ लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन…
बुधवार, दि.१२ जून २०२४ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारी दाखल केलेल्यापैकी तब्बल १५ जणांनी माघार घेतली असून यात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे पाटील या दिग्गज उमेदवारासह काँग्रेसच्या उमेदवाराचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात २१ उमेदवार उरले असून या मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षक मतदार संघासाठी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १५ जणांनी माघार घेतली. यात मंगळवारी चौघांचा तर आज ११ जणांचा माघार घेणाऱ्यात समावेश आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्याने या निवडणुकीत आता महाविकास आघाडी कडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा…
बुधवार, दिनांक १२ जून २०२४ उत्तरप्रदेशमधून संगमनेरमध्ये रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीय व्यक्तीकडून एका मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवस्तीत हा प्रकार समोर आला असून पकडलेल्या आरोपीने सुरुवातीला पोलिसांना खोटे नाव सांगून तक्रारदार व पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने आपले खरे नाव पोलिसांना सांगितले. प्रकाश रामनरेश निसाद (रा. पावबाकी रोड, संगमनेर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी, ४२ वर्षीय पीडित महिला वेडसर असून ती आपल्या आईसह शहराच्या उपनगरात राहते.…
बुधवार, दिनांक १२ जून २०२४ दरोड्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेली टोळी संगमनेर पोलिसांनी बुधवारी पहाटे पकडली. टोळीतील चौघेजण पोलिसांच्या हाती लागले तर दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. बबलू अनिल निकाळे (रा. आंबेडकर नगर, राहता) याच्यासह तिघा अल्पवयीन मुलांचा आरोपींमध्ये समावेश असून रितेश सदाफळ व बुट्ट्या सदाफळ (दोघे रा. गणेश नगर, राहता) अशी पसार झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील अमरधाम जवळील एका चिंचेच्या झाडाच्या आडोशाला पोलिसांना संशयास्पदरित्या हालचाली करताना आढळून आले. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढला मात्र त्यापैकी चौघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. तर दोघे पसार झाले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून…
बुधवार, दि. १२ जून २०२४ लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या सचिवाला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. प्रदेश काँग्रेस सचीव प्रशांत गावंडे यांच्यावर ही कारवाई प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने करण्यात आली असून त्यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे. बुधवारी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी पटोले यांच्या आदेशावरून गावंडे यांच्यावर कारवाईचे आदेश काढले आहे.
बुधवार दिनांक १२ जून २०२४ संगमनेरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. विशाल संपत बोऱ्हाडे (रा. माधवनगर, राजापूर रस्ता, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून तो पसार झाला आहे. या संदर्भात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी (दि. ११) गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिच्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा विशाल बोऱ्हाडे याने गैरफायदा घेतला. मुलीला त्याच्या घरी घेऊन जात त्याने तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. ४ जून संध्याकाळी…
बुधवार दिनांक १२ जून २०२४ जमिनीच्या खरेदी व्यवहारापोटी शिवसेनेच्या शहरप्रमुखांकडून २५ लाख रुपये घेऊन त्या बदल्यात करून दिलेले साठेखत रद्द न करता अथवा घेतलेले पैसे परत न देता त्याच जमिनीची परस्पर दुसऱ्याला विक्री करत फसवणूक केल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते (वय ४९ वर्ष, रा. भूषणनगर, केडगाव, अहमदनगर) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. सातपुते यांच्या तक्रारीवरून नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात अंकुशराव जयवंतराव नागरे, जालिंदर जयवंतराव नागरे, गजेंद्र बाळासाहेब नागरे, शांताबाई बाळासाहेब नागरे, कविता संजय फुंदे व राजकुमार अंकुशराव नागरे (सर्व रा. संगम जळगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचे…
मंगळवार, दिनांक ११ जून २०२४ नगर जिल्ह्यासह जिल्ह्यातून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांची संख्या मोठी असल्याने दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, राहण्याची व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह आदी सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे तसेच याबाबत काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. आषाढी वारीच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, संत निळोबाराय पालखीचे अध्यक्ष अशोकराव सावंत, मानाच्या पालख्यांचे तसेच जिल्ह्यातील दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते. सालीमठ म्हणाले, पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील अनेक दिंड्या…
मंगळवार, दिनांक ११ जून २०२४ सरकारने आम्ही दिलेल्या व्याख्येनुसार सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान त्यांनी उपचारासाठी नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मोठा लढा उभारत शासनाला या संबंधीचा अध्यादेश काढण्यास भाग पाडले होते मात्र या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याने जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. शनिवारपासून अंतरवली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. मंगळवारी आरोग्य विभागाचे पथक वैद्यकीय तपासणीसाठी उपोषण स्थळी आले होते. तपासणीअंती जरांगे यांचा बीपी, शुगर कमी झाल्याने त्यांना वैद्यकीय उपचारांची…
मंगळवार, दिनांक ११ जून २०२४ मंगळवारी झालेल्या पावसाने संगमनेर शहराला चांगलेच झोडपून काढले. तासाभरापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या या पावसामुळे शहरातील बहुतांशी रस्त्यावर सर्वत्र पाण्याचे नाले प्रवाहित होऊन रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. नवीन नगर रस्त्यावर गुडघाभरापेक्षा अधिक उंचीने पाणी वाहताना दिसत होते. शनिवारी झालेल्या पावसामुळे संगमनेरात शेतीच्या कामाला वेग आला असताना मंगळवारी देखील पावसाने संगमनेरात जोरदार हजेरी लावली. मंगळवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वातावरणात उकाडा जाणवत होता. सायंकाळी पावणे चारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नेहमीप्रमाणे शहरातील नाल्यांची दूरवस्था पुन्हा एकदा उघडी पडली होती. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची एकच…
मंगळवार, दि.११ जून लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या नाम साधर्म्यामुळे आणि चिन्हांच्या साधर्म्यामुळे पक्षीय उमेदवारांना मोठा फटका बसल्याचे समोर आले असताना आता नाशिक शिक्षक मतदार संघात नामसाधर्म्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोठा ट्विस्ट बघावयास मिळाला. नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराच्या धोका टाळण्यासाठी प्रमुख उमेदवार प्रयत्नशील झाले आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी केवळ दोन दिवसांचा वेळ असल्याने नाशिक शिक्षक मतदार संघात मोठ्या राजकीय घडामोडी बघावयास मिळत आहे. महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार किशोर दराडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे यांच्या नावाशी नामसाधर्म्यामुळे असलेल्या दोन अपक्ष उमेदवारांनी मंगळवारी निवडणुकीतून माघार घेतली. नाशिक…
मंगळवार, ११ जून २०२४ पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरिपाच्या पेरणीला लागला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करा तसेच बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सर्व विभागीय आयुक्तांना दिले. सोमवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीसाठी महसूल, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पवार यांनी पहिल्याच पावसात पुण्यात उद्भवलेल्या परिस्थितीची दखल घेत महापालिकेने याबाबत त्वरित आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. राज्यात काही भागात १०० मिलिमीटर अथवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला आहे. अशा परिस्थितीत वापसा आल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरण्याचे नियोजन करावे यासाठी, कृषी विभागाच्या समन्वयाने जनजागृती केली…
मंगळवार, ११ जून २०२४ राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’ सरकारचा शपथविधी सुरू असताना दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये वैष्णवदेवी दर्शनाला निघालेल्या भक्तांच्या गाडीवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यात १० हिंदू भाविक ठार झाले आणि ३३ जण जखमी झाले. या रक्तपाताची जबाबदारी केंद्रातील चौकडीवर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या जोडीला असलेल्या चंद्राबाबू नायडू, नितेश कुमार तिच्यावर असल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे की, काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यावर येथे सर्व काही ठीकठाक असल्याचा निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देत होते. प्रत्यक्षात काश्मीरमधील हालत अधिक नाजूक होताना दिसत…
मंगळवार, दिनांक ११ जून २०२४ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी उद्या बुधवारचा (१२ जून) अंतिम दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. नगर जिल्ह्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजपाच्या विवेक कोल्हे आणि डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यापैकी कोणाची माघार होते की दोघेही महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरतात हे देखील स्पष्ट होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्जाची छाननी पार पडली. ३८ उमेदवारांनी दाखल केलेल्या ५३ उमेदवारी अर्ज पैकी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर निवडणूक आयोगाच्या निकषानुसार अमोल बाळासाहेब दराडे आणि सारांश महेंद्र भावसार या इच्छुकांचे वय ३० वर्षापेक्षा कमी असल्याने दोघांचे उमेदवारी अर्ज…
अठराव्या लोकसभेचे निकाल जाहीर झाले आणि भारतीय मतदार किती परिपक्व आहे याची प्रचिती जगाला आली. दर दहा वर्षांनी प्रस्थापित सत्तेला जोरदार झटका देण्याचा सिलसिला भारतीय मतदारांनी यावेळी देखील कायम ठेवला. भले भले निवडणूक विश्लेषक, निवडणूक रणनीतीकार, एक्झिट पोलवाले, ओपिनियन पोलवाले सगळेच तोंडघशी पडले. सगळ्यांचेच अंदाज चुकले. एनडीए विरुध्द इंडिया आघाडी झालेल्या लढाईत जनतेने सगळ्यांच्याच डोळ्यात खसकन अंजन घातलं. दोघांनाही ठिकाण्यावर आणलं. कोणीही जनतेला गृहीत धरून चालू नये हा संदेश सर्व राजकारण्यांना दिला. सरकारी पक्ष उतणार नाही आणि विरोधी पक्ष हतबल होणार नाही असा हा निकाल आहे. सरकार काठावर तरले, त्यांना टेकुची गरज आहे, भाजपचा जनाधार…
सोमवार, दिनांक १० जून २०२४ देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेत कारभार हाती घेतला असून मोदींच्या तिसऱ्या टर्मला सोमवारी सुरुवात झाली. शपथविधीनंतर नव्या मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक सोमवारी झाली असून या बैठकीत नव्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यात आले. काही मंत्र्यांकडे पूर्वीचेच खाते ठेवण्यात आले असून यामध्ये संरक्षण खात्याचा पदभार राजनाथ सिंह, गृह खात्याचा पदभार अमित शाह, अर्थ खात्याचा पदभार निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री पदाचा पदभार एस. जयशंकर, रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्रालयाचा पदभार नितीन गडकरी यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे. याशिवाय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचा तर मुख्यमंत्रीपद काढून घेतल्यानंतर केंद्रात बोलावलेल्या शिवराज…
सोमवार, दिनांक १० जून २०२४ साखरपट्ट्यात अवैधरित्या गर्भलिंग निदान करत मुलींना गर्भातच मारून टाकण्याचे प्रकार समोर आले असतानाच आता अवैधरित्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी एका डॉक्टरसह खाजगी व्यक्तीवर बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश सोपानराव जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे (रा. लक्ष्मीनगर, फलटण) आणि नितीन बाळासाहेब घुले (रा. ढेकळवाडी, बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. डॉ. जगताप यांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांना बारामती परिसरात एक डॉक्टर गर्भलिंग निदान चाचणी करण्याकरिता आल्याची माहिती मिळाली होती.…
सोमवार, दिनांक १० जून २०२४ बिहारच्या पूर्णिया मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या मात्र उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडून आलेल्या पप्पू यादव यांनी सोमवारी प्रियंका गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि यादव यांची दिल्लीत भेट झाली. पप्पू यादव यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट हवे होते पण युतीमध्ये पूर्णियाची जागा आरजेडीच्या कोट्यात गेली, त्यानंतर त्यांनी पूर्णियातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पप्पू यादव यांनीही निवडणूक प्रचारादरम्यान अनेकदा सांगितले होते की, ते काँग्रेसच्या विचारसरणीच्या सर्वात जवळ आहेत. बिहारच्या सर्वाधिक लोकप्रिय जागांपैकी एक असलेल्या पूर्णिया येथून स्वतंत्र लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पप्पू यादव पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचले, त्यानंतर त्यांनी काँग्रेस सरचिटणीस…
सोमवार, दिनांक १० जून २०२४ देशातील सर्व सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागामध्ये नोंदणीसाठी आभा कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने घेतला आहे. त्यामुळे आता आभा कार्ड काढणे आवश्यक ठरणार आहे. रुग्णालयांचे मूल्यांकन, रुग्ण आणि संबंधित वैद्यकीय सामग्रीसाठी आभा कार्डची नोंदणीच ग्राह्य धरली जाणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नुकत्याच झालेल्या १४ व्या बैठकीमध्ये देशातील सर्व सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, अपघात विभाग आणि आपत्कालिन विभागामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या पूर्व नोंदणीसाठी आभा कार्ड आवश्यक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांची नोंदणी…
सोमवार, दिनांक १० जून २०२४ नरेंद्र मोदी रविवारी देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा सत्तारूढ झाले. सोमवारी त्यांनी आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात केली. पदभार हाती घेत असताना पीएम सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. या निर्णयांतर्गत आता देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होतील. शेतकरी या निधीची वाट पाहत होते. आचारसंहितेमुळे हा निधी मिळण्यास अडचण निर्माण झाला होता. २०१८ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. आता पंतप्रधान किसान निधीचा सतरावा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून वीस हजार कोटी रुपयांचा निधीसाठी मंजुरी दिल्याने त्याचा देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. सध्या…
