Author: Annant Ppangarkar

शनिवार, ०३ ऑगस्ट  काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी १ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून यातून रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याची माहिती सहकार महर्षी थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. आमदार थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी-वस्तीवर मूलभूत गरजांची पूर्तता करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. यातून तालुक्यात अनेक विकास काम मार्गी लागले आहे. थोरात यांचे सुसंस्कृत नेतृत्व आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका व केलेल्या विकास कामांच्या बळावर संगमनेर तालुका राज्य पातळीवर ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. या रस्त्यांचे होणार काम… कासारा दुमाला ते सावंत वस्ती रस्ता मजबुतीकरण…

Read More

शनिवार, ०३ ऑगस्ट | अनंत पांगारकर संगमनेर मधील बहुचर्चित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या गैर व्यवहार प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये समावेश असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या चेतन नागराजबाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अखेर जामीन मंजूर केला आहे. कपाटे यांना जामीन मंजूर झाल्याने ठेविदारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अपिलामध्ये जाणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय आसामी भाऊसाहेब कुटे याच्या अधिपत्याखाली असलेल्या संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे ८१ कोटी रुपयांचा कागदोपत्री घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याचा मुख्य ठपका चेअरमन असलेल्या भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह…

Read More

विशेष लेख… ३ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय अवयव दान दिवस साजरा केला जातो. याच दिवशी देशातील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याचे आठवण म्हणून २०१० पासून हा दिवस राष्ट्रीय अवयव दान दिवस म्हणून साजरा केला जातो. एखाद्याला नवीन जीवन देण्यासाठी अवयवदान करने हा एक उदात्य मार्ग असु शकतो. अवयवदान दिनानिमित्त आपण जागरूकता वाढवूया आणि अधिकाधिक लोकांना अवयवदाता म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करूया एका अवयवदात्यामुळे आठ पेक्षा अधिक लोकांना याचा उपयोग होतो. अवयवदानाच्या माध्यमातून आपले मौल्यवान अवयव दान करण्याचा संकल्प करण्याची आणि पुढे येण्याची संधी आपल्या सर्वांना आहे. अवयवदान जागृती वाढल्याने अधिकाधिक लोकांना अवयवदान करण्यास प्रोत्साहन मिळू शकते, अवयवदानाचे…

Read More

मुंबई | प्रवीण पुरो  करातून येणारा पैसा फुकट वाटण्यासाठी नाही, त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबविण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार असून याप्रकरणी काय निकाल येतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नवी मुंबईतील नावेद मुल्ला यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १४ ऑगस्टला वितरीत करण्यात येणारा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. मात्र ही योजना भ्रष्ट कृती असून मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार आहे. निवडणुकीत पैसे वाटल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते.…

Read More

शनिवार, ०३ ऑगस्ट  विशेष प्रतिनिधी | मुंबई विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये बैठकांचे नियोजनही सूरू आहे. असे असताना आता ”महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता, उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसचे इतके खासदार निवडून आलेत, असे विधान करत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आघाडीत मिठाचा खडा टाकला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब शिर्डीत साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या काही जागांवर दावा करणार असल्याचा प्रश्न केला होता. यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी कॉग्रेसची चांगलीच कान उघडणी केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता. आम्ही तिघे एकत्र आलो. विशेष…

Read More

जीएसटीमधून मिळणारा पैसा हा सरकारचा पैसा नसून तो सामान्य गोरगरिबांचा: डॉ. तांबे  दक्षिणमध्ये जनतेने चांगली दमछाक केली. लोकांनी आराम करण्यासाठी वेळ दिला. आता कुटुंबाला वेळ द्या: प्रभावती घोगरे  हुकूमशाहीचा राजकारणामुळे संपूर्ण तालुका अस्वस्थ: डॉ. पिपाडा  शुक्रवार, ०२ ऑगस्ट आश्वी परिसरातील गावांमध्ये मोठी दहशत आहे. विरोधी गावचा सरपंच असेल अथवा ग्रामपंचायत सदस्य असेल तर त्याचे पद घालविण्याचा प्रयत्न आपण कधी केला नाही. आता या उलट परिस्थिती असून विरोधी सरपंच आहे, म्हणून पिण्याच्या पाण्यापर्यंत राजकारणाचे विष नेऊन ठेवले आहे. पाणी योजना बंद पाडली जाते. मात्र माणसाला प्यायला पाणी देण्याच्या योजनेतही जेव्हा माणसं विष कालवतात तेव्हा अशा लोकांना माणसं विसरत नाही, जिरवाजिरवी आणि…

Read More

शुक्रवार, ०२ जुलै  दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शुक्रवारी रात्री संगमनेर पोलिसांनी बेकायदा चालविल्या जात असलेल्या कत्तलखान्याच्या परिसरातून कत्तलीसाठी निर्दयतेने अन्नपाण्यावाचून डांबून, बांधून ठेवलेल्या डझनभरापेक्षा अधिक जिवंत जनावरांची सुटका करत त्यांना गोशाळेमध्ये दाखल केले. वेळेत पोलीस पोचले नसते तर या जनावरांची देखील कत्तल अटळ होती. संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचा उच्छाद सुरू या अवैध धंद्याला संगमनेर पोलिसांसह नगर पोलिसांचे आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर कारवाया होत नसल्याच्या चर्चा सातत्याने होत या संदर्भात ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ वेब पोर्टलने देखील वृत्तमालिका सुरू ठेवत सातत्याने यावर प्रकाश टाकला आहे. या अवैध धंद्याचाच एक भाग असलेले संगमनेरमधील बेकायदा कत्तलखाने वारंवार टाकलेल्या छाप्यानंतर देखील सुरूच आहे. त्यामुळे…

Read More

शुक्रवार, ०२ ऑगस्ट संगमनेर नगर परिषदेच्या नाशिक-पुणे मार्गावरील आझाद सांस्कृतिक भवन व पै. नूरमहमद शेख शॉपिंग सेंटरची दुरवस्था झाल्याबाबतचे वृत्त शुक्रवारी सकाळी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ वेब पोर्टलवर प्रसिद्ध होताच काही वेळातच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. यामुळे स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी राहुल वाघ यांचे आभार मानले आहे. महाराष्ट्र संवाद न्यूजने सकाळी प्रसिद्ध केलेल्या बातमीची लिंक… https://maharashtrasanvadnews.com/?p=16569 देशाचे पहिले शिक्षण मंत्री, स्वातंत्र्य सेनानी मौलाना अब्दुल कलाम आझाद व संगमनेर नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष पै. नूरमहमद शेख यांच्या नावाने बांधलेल्या या वास्तूचे दुरवस्था झाल्याने या संदर्भात ॲड. सैफुद्दीन शेख यांनी मुख्याधिकारी राहुल वाघ यांना पत्र देत त्यांचे लक्ष वेधले होते. तसेच या संदर्भातील…

Read More

शुक्रवार, ०२ ऑगस्ट पोलीस ठाण्यात असलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून नील अहवाल पाठविण्यासाठी तसेच भविष्यात तक्रार झालेला त्रास न होण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय ३६) या सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध पुण्याच्या लोणीकंद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत प्रथम पाच लाख व तडजोडीनंतर एक लाख रुपये लाचेची मागणी केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्याच्या पोलिस हवालदारावर कारवाई होत नाही तोच सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे प्रकरण समोर आले आहे. तब्बल लाखाच्या पटीत लाच मागणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वरकमाईची चटक लागल्याचे…

Read More

शुक्रवार, ०२ ऑगस्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नगर जिल्ह्यातून सात लाख महिलांचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले आहे. प्राप्त झालेल्या या अर्जांची छाननी करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून प्रभारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या कक्षाला भेट दिल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी मनोज ससे यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा दैनंदिन आढावा, तालुकास्तरावर अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजन यामुळे सात लाख महिलांचे अर्ज भरून घेण्यात यश आले आहे. अर्जाच्या छाननी साठी स्वतंत्र कक्ष……

Read More

शुक्रवार, ०२ ऑगस्ट संगमनेर नगर परिषदेच्या नाशिक-पुणे मार्गावरील आझाद सांस्कृतिक भवन व पै. नूरमहमद शेख शॉपिंग सेंटरची दुरवस्था झाली असून देशाचे पहिले शिक्षण मंत्री, स्वातंत्र्य सेनानी मौलाना अब्दुल कलाम आझाद व संगमनेर नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष पै. नूरमहमद शेख यांची अवहेलना होत असल्याची तक्रार करत मुख्याधिकाऱ्यांनी या प्रश्न तातडीने लक्ष घालण्याची मागणी ॲड. सैफुद्दीन शेख यांनी केली आहे. ॲड. शेख यांनी यासंदर्भात मुख्याधिकारी राहुल वाघ यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संगमनेर नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून हे सांस्कृतिक भवन व शॉपिंग सेंटर बांधले आहे. मात्र गेल्या एक-दोन वर्षांपासून या इमारतीची दुरवस्था झाली असून तेथे मोठ्या…

Read More

शुक्रवार, ०२ ऑगस्ट  तक्रार अर्जावरून बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करून तक्रारदाराला योग्य ती मदत करण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागणारा पोलीस हवालदार १ लाख ७० हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. अमोल दशरथ जाधव असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दिघी पोलीस ठाण्यात त्याची नेमणूक आहे. जाधव याच्या विरोधात लाच मागणी आणि लाच स्वीकारल्याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, लाच लुचपतकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराने चोविसावाडी, चऱ्होली येथे बिल्डरकडून फ्लॅट खरेदी केला होता. बिल्डरने तक्रारदाराच्या परवानगीशिवाय परस्पर या फ्लॅटची दुसऱ्या व्यक्तीस विक्री केली. त्यामुळे तक्रारदाराने बिल्डर विरोधात फौजदारी गुन्हा…

Read More

विशेष प्रतिनिधी / उरण राज्यभर चर्चेत असलेल्या उरणच्या यशश्री हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून दररोज नवनवी माहिती समोर येत असून या हत्याकांडात लव्ह ट्रायअँगल आहे की नाही, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. उरणमधील पोलिसांनी हत्येच्या घटनेनंतर विविध बाजूंनी तपासाला सुरुवात केली.अनेक पथके नेमण्यात आली होती. या तपासातून २९ जुलै रोजी आरोपीला बंगळुरुतून अटक करण्यात आली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मुलीच्या अंगावर गोंदण्यात आलेल्या दोन टॅटूंवरुन लव्ह ट्रायअँगलचा शोध घेतला जात आहे. आता, टॅटू आर्टीस्ट पोलिसांच्या रडावर आहे. दाऊद आणि यशश्री हे १० वी पर्यंत एकत्र शाळेत शिकले आहेत. दरम्यान, आरोपी दाऊदने तिचा विनयभंग केला होता, त्यामुळे मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन दाऊदवर…

Read More

प्रवीण पुरो | मुंबई  लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. खास करून भाजपा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये २८८ विधानसभा जागांपैकी पक्षाला केवळ ५५ ते ६५ जागाच मिळू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भाजपाला लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जागा कमी मिळाल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठा फटका बसण्याची घोषणा शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात अद्याप कुठलेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नसले तरी भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेतून ही बाब स्पष्ट होत आहे. या सर्व्हेत आता असलेल्या १०५ जागा टिकणं अजिबात शक्य नसल्याचं अनुमान काढण्यात आलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार,…

Read More

गुरुवार, ०१ ऑगस्ट | अनंत पांगारकर गेल्या काही दिवसापासून संगमनेरमधील अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसागणिक ही संख्या वाढत चालल्याने शहराच्या शांततेला लवकरच गालबोट लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. ज्यांनी या अवैध धंद्यांवर नियंत्रण आणायचे तेच अवैध धंद्यातील भागीदार बनल्याने संगमनेरमध्ये पोलिसांचा धाक संपल्याचे दिसत आहे. बहुचर्चित शक्तिमान टॉवरसह संगमनेरच्या अनेक भागात मटका, गुटखा, जुगार, गांजा विक्री, बनावट दारू, लोटो, बिंगो, अवैध कॅफे हाऊस, भंगार दुकाने, गोवंश कत्तलखाने, दुचाकी चोऱ्या, मंगळसूत्र गंठण, दागिने, चोऱ्या, बेकायदा प्रवासी वाहतूक पोलिसांच्या वरदहस्ताने सुरूच आहे. त्यामुळे कोणी कितीही आवाज उठवा आमचे कोणीच काही करू शकत नाही, या अविर्भावात आता अवैध धंदे चालक-मालकांची…

Read More

गुरुवार, ०१ ऑगस्ट  अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार खासदार निलेश लंके यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांना आता विधानसभा निवडणूक लढविण्याचे वेध लागले आहे. यासाठी शेजारच्या संगमनेर अथवा राहुरीतून आपण इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर दुसरीकडे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उमेदवारीला भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी विरोध केला आहे. शेजारच्या संगमनेर अथवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी बाबत समन्वय होणार नसेल आणि संधी मिळाली तर निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगत श्रीरामपूर राखीव असल्याने व शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील हेच उमेदवार असल्याने आपल्यासमोर या दोन मतदारसंघांचा पर्याय असल्याचे डॉ. विखे यांनी म्हटले…

Read More

गुरुवार, ०१ ऑगस्ट महाभारतामध्ये जसा अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसत होता, तसाच आपल्याला पक्षाने दिलेला कार्यक्रम दिसायला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. डॉ. गोऱ्हे छत्रपती संभाजी नगर जिल्हा दौऱ्यावर असून बुधवारी सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. संभाजीनगर जिल्ह्यातील मध्यपूर्व, पश्चिम, गंगापूर, वैजापूर, कन्नड विधानसभा क्षेत्रातील, नांदेड, बीड आणि लातूर जिल्ह्यातील महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एसटी बस मध्ये महिलांना पन्नास टक्के प्रवास सवलत, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना,…

Read More

गुरुवार, ०१ ऑगस्ट बुधवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे दिल्ली बरोबरच संसदेच्या बाहेर आणि संसदेच्या आत पाणीच पाणी दिसून आले. करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या संसदेच्या इमारतीला गळती लागली आहे. या गळतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून संदीप चौधरी यांनी देखील आपल्या एक्स अकाउंट वर हा व्हिडिओ टाकला आहे. https://x.com/newsSChaudhry/status/1818842541829112180?s=19 करोडो मे बने इस नई वाली संसद का हाल देखिये, बहार पेपर लीक हो गया, अंदर पाणी का लिकेज! अशा आशियाखाली टाकलेला हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होताना दिसत आहे. नव्या संसद भवनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे २०२३ रोजी थाटामाटात उद्घाटन झालं. मात्र वर्षभरातच या संसद भवनाच्या इमारतीला…

Read More

गुरुवार, ०१ ऑगस्ट मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी (३१ जुलै) राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात राज्यपालपदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, राज्यपाल राधाकृष्णन यांचे कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांच्या…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई  शिवसेना (उबाठा) गटाच्या मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक आज बुधवारी पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन,’ असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. लोकसभेमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर आता त्यांच्याकडून विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आज मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबोधित करत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. लोकसभेत आपण जी कामगिरी केली, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना…

Read More