Author: अनंत पांगारकर

मुंबई: राज्य सरकारच्या गृह विभागाकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच असून मंगळवारी भारतीय पोलीस आणि राज्य पोलीस दलातील १८ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेत पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केलेल्या सोमनाथ वाघचौरे यांची श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, शिर्डी आणि संगमनेर या तीन उपविभागांमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले होते. उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी त्यांना पोलीस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे.  संगमनेर येथून बदली झाल्यानंतर सध्या ते दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल (गट क्रं. ५) येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज, मुंबई:  मीरा भाईंदरमध्ये आज होणाऱ्या मनसेच्या सर्वपक्षीय मोर्चापूर्वीच ठाणे-पालघरचे मनसे विभागप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी पहाटे त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसेने या मोर्चाचे आयोजन केले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली असून, अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्याही अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती, तरीही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम होती. अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर मराठी बांधवांना मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते. यामुळे काशिमीरा पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता…

Read More

मुंबई, 7 जुलै 2025: महाराष्ट्रात वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संरक्षणासाठी तातडीने कायदा लागू करण्याची मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी आज विधान परिषदेत केली. नाशिक जिल्ह्यातील ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकत्याच झालेल्या प्राणघातक हल्ल्याची आणि गेल्या वर्षी अहमदनगर जिल्ह्यात आढाव दांपत्याच्या निर्घृण हत्येची उदाहरणे देत तांबे यांनी या कायद्याची गरज अधोरेखित केली. आमदार तांबे यांनी सभागृहात सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मागील वर्षी ॲड. राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांची हत्या झाली होती. या घटनेनंतर वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न राज्यभर ऐरणीवर आला होता. त्यावेळीही 1 मार्च 2024 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वकील संरक्षणाबाबत कायदा तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सोमवारी दुपारी १०,००० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे जलसंपदा विभागाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आमदार अमोल खताळ यांनी देखील नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी निळवंड्यात येत असल्याने, धरणाचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या सांगवी, धांदरफळ, मंगळापूर, खांडगाव, कासारा दुमाला, संगमनेर खुर्द, निंबाळे, रायते, वाघापूर, खराडी, पिंपरणे, जोर्वे, रहिमपूर, कनोली आणि ओझर बंधारा परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. आमदार खताळ यांनी आवाहन केले आहे की, नदीपात्रात असलेले जनावरे, पाण्याचे पंप, शेती…

Read More

अहिल्यानगर / अकोले, दि. ७ –  निळवंडे (उर्ध्व प्रवरा) धरणातून आज (सोमवार, दि. ७ जुलै) सकाळी ९ वाजता ६५७० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काही तासांत विसर्ग टप्याटप्याने वाढण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे प्रवरा नदीपात्रात पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या अकोले, संगमनेर, ओझर बंधाऱ्याखालील गावांसह राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील सर्व नदीकाठच्या गावांना व वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात ठेवलेले जनावरं व तत्सम साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरणे अथवा उशिरा हालचाल टाळावी, असे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी: महायुती सरकारने सुरू केलेल्या घरेलू कामगार योजनेअंतर्गत महिलांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात काही दलालांकडून लाभार्थींची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारींवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणताही योजनेसाठी पैसे देऊ नका, असे आवाहन करत, पैसे घेऊन लाभार्थींची आणि महायुती सरकारची बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा आमदार खताळ यांनी दिला. महायुती सरकारने घरेलू कामगार महिलांसाठी सुरू केलेल्या योजनेतील लाभार्थी महिलांना आ. अमोल खताळ यांच्या उपस्थितीत साहित्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी रामभाऊ राहाणे, शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, दिपाली वाव्हळ, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, पायल ताजणे, गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, गोकुळ दिघे, रेखा गलांडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज- पंढरपूर:  आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सपत्नीक शासकीय महापूजा केली. पहाटे ३ वाजता ही महापूजा पार पडली, यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा देखील उपस्थित होत्या. महापूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह आणि नाशिक येथील मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आणि दुग्धाभिषेक केला. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच राज्याच्या विकासासाठी विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना केली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या वर्षी नाशिक जिल्ह्यातील जातेगावचे कैलास…

Read More

पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भाषिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. केंद्राच्या त्रिभाषा सुत्राचं ओझं महाराष्ट्रावर टाकण्याच्या फडणवीस सरकारच्या निर्णयाला तमाम मराठीजनांनी ठोकरून लावल्यावर राज्यात राहणारे अमराठी गट आणि व्यक्तींनी मराठी भाषेविरोधात जाणीवपूर्वक मोहिमा सुरू केल्या आहेत. सत्ताधार्‍यांची फूस असल्यानेच मराठीला विरोध करणार्‍यांचे चेहरे उजळ माथ्याने पाहण्याची वेळ राज्यातल्या जनतेवर ओढावली आहे. परप्रांतियांचे इतके लाड राज्यात आजवर कोणीच केले नाहीत. राज्यातलं आजचं सरकार तर लाचार झाल्यागत या लोकांपुढे शरण आलं आहे. सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळेच मराठीचा दुश्‍वास करणार्‍या परप्रांतियांची हिंमत वाढू लागली आहे. ही सत्तेसाठी काहीही स्वीकारण्याची ही अंगिकारलेली लाचारी होय. इतकी हिंमत या सरकारमध्ये कशी आली? महाराष्ट्रात हिंदी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची आषाढी एकादशी संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यासह अनेकांनी याप्रसंगी पांडुरंगाच्या चरणी महाराष्ट्राच्या सुख-समृद्धी, बंधुभाव आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली. आषाढी वारीची परंपरा ही मानवतेला साद घालणारी असून, ‘महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म’ असल्याचा विचार यावेळी मांडण्यात आला. चैतन्य नगर येथील विठ्ठल मंदिरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या पत्नी कांचनताई यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची आरती आणि पूजा करण्यात आली. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे, विश्वास मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, वैष्णव मुर्तडक, नाना देशमुख,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  तीन महिन्याच्या कालखंडात एसटी महामंडळाच्या संगमनेर आगारात १० नवीन बसेस (लालपरी) दाखल झाल्या आहेत. यात आज आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ५ नवीन बसेसचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार खताळ यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांसह नव्या एसटी बसमधून शहरातील मुख्य मार्गावरून फेरफटका मारला. आमदार अमोल खताळ यांनी यावेळी बोलताना, संगमनेर आगारातील एसटी कर्मचारी, चालक, वाहक यांच्या समस्या शासन दरबारी मांडून सोडविल्या जातील असे आश्वासन दिले. आषाढी एकादशीपूर्वीच नव्या एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. साडेतीन महिन्यांपूर्वी आमदार खताळ यांच्या पाठपुराव्याने संगमनेर डेपोसाठी १० नव्या बसेस मिळाल्या होत्या. यापैकी ५ बसेस या अगोदरच आगारात दाखल झाल्या होत्या.…

Read More