Author: Annant Ppangarkar

शनिवार, १७ ऑगस्ट मुंबई: लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे तेरा खासदार निवडून आले. तर एक बंडखोर उमेदवारही निवडून आला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पक्षाने राज्यातल्या २८८ मतदार संघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय या अर्ज विक्रीतून पक्ष निधीतही भरभरून पैसे जमा झाले आहेत. महाविकास आघाडीत कोणाला किती जागा मिळणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. असं असलं तरी काँग्रेसने मात्र राज्यातल्या २८८ मतदार संघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्यातून पक्ष चाचपणीही करत आहे.…

Read More

शुक्रवार, १६ ऑगस्ट  अहमदनगर – जिल्ह्यात १७ ते २० ऑगस्ट या कालावधीत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. नागरिकांनी खालीलप्रमाणे दक्षता घ्यावी… मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागाशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यातल्या युती सरकारपासून महाराष्ट्राची सुटका करणं हे आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे, अशा परिस्थितीत आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे, एकजूटीने लढायचं आहे, सरकार बदलायचं आहे, असा संदेश देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं. महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलण्याशिवाय गत्यंतर नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. शुक्रवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला पवार मार्गदर्शन करत होते. सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केले आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात प्रचारासाठी केलेलं यशस्वी नेतृत्व पाहता आगामी विधानसभा निवडणुकांसाठीही उद्धव ठाकरे यांच्याच खांद्यावर प्रचाराची जबाबदारी देण्याचा विचार महाविकास आघाडीत सुरू आहे. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याकडेच महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सोपवण्याकडे कल दिसून आला. विधानसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्याने महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात पुन्हा एकदा जोरदार प्रचार सुरू करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्या पाठोपाठ काँग्रेसनेही आपली आढावा बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि त्यांचं नेतृत्व यामुळं त्यांच्या हाती पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या…

Read More

शुक्रवार, १६ ऑगस्ट चिंचोली गुरव ते पारेगाव बुद्रुक रस्त्यावर मोटार सायकलवरून गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना तीन गोण्या गुटख्यासह पकडले. पोलिसांनी दुचाकीवरून वाहतूक होत असलेला ऐंशी हजार रुपयांचा गुटखा पकडल्याची माहिती समोर येतात संगमनेरमधील गुटखा किंग विजय भागवत हा फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिले आहे. संगमनेरमध्ये कायद्याचे उल्लंघन करत गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असते. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इंदिरानगरमधील (संगमनेर) विजय भागवत या गुटका किंगवर अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस मेहरबान असल्याचे आरोप वारंवार होत असतात. मात्र या तस्कराकडून मोठा मलिदा मिळत असल्याने संबंधित यंत्रणेचे कारवाईबाबत नेहमी कानावर हात असतात. सोमवारी स्वातंत्र्यदिनी संगमनेर तालुका पोलिसांना चिंचोली गुरव ते पारेगाव…

Read More

शुक्रवार, १६ ऑगस्ट मठाधिपदी सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटाच्या महंतावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. संगमनेरमध्ये दाखल करण्यात आलेला हा गुन्हा तपासासाठी सिन्नर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लखमीपुरा येथील अहमद रझा युनूस शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी शेख यांच्या टिपू सुलतान एक योद्धा युवा मंच संगमनेर या व्हाट्सअप ग्रुप वर गंगागिरी महाराज मठाधिपती सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान श्रीक्षेत्र गोदावरी तांबे यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित…

Read More

विकसित महाराष्ट्रासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु भारताच्या स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण गुरुवार, १५ ऑगस्ट मुंबई – राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे काम सुरु आहे. विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी…

Read More

गुरुवार, १५ ऑगस्ट  गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली कार न्यायालयातून परत मिळवून देण्यासाठी आणि पुण्यात मदत करण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेणाऱ्या सहाय्यक सरकारी वकील महिलेला लाच लुचपतच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. अंजला नलिनी कमलाकर नवगिरे (वय ५४ वर्ष, पुणे) असे लाच घेणाऱ्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता महिलेचे नाव असून पुणे लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. पुणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध जून २०२४ मध्ये हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात तक्रारदाराच्या नावावर असलेली मारुती स्विफ्ट कार जप्त करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेली कार परत मिळावी यासाठी तक्रारदार महिलेने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर कोर्ट,…

Read More

बुधवार, १४ ऑगस्ट वेतन फरकाची फाईल मंजूर करण्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आणि शिपाई लाचेच्या सापळ्यात अडकले आहे. सिन्नरच्या रामनगर आश्रम शाळेत लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही कारवाई केली. सुनिल वसंत पाटील (वय – ५४ वर्ष, मुख्याध्यापक, प्राथमिक आश्रमशाळा रामनगर ता. सिन्नर) आणि बाळू हिरामण निकम (वय ५५ वर्ष, शिपाई, प्राथमिक आश्रम शाळा, रामनगर, ता. सिन्नर, जिल्हा – नाशिक) अशी लाचखोर आरोपींची नावे असून दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या २०१६ ते २०२३ या दरम्यानच्या वेतन फरकाची फाईल मंजूर करून आणून फरकाची रक्कम काढून…

Read More

रवी राणांच्या वक्तव्याचा संगमनेर काँग्रेसने केला निषेध महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला लाचार होणार नाही बुधवार, १४ ऑगस्ट संगमनेर – महाराष्ट्राला संत व समाज सुधारकांची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात कायम महिलांचा सन्मान केला जातो. मात्र महायुती सरकारने मते खरेदी करण्याच्या नावावर महिला भगिनींचा स्वाभिमान दुखावला असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला कधीही लाचार होणार नाहीत. सरकारच्या घोषणासाठी लागणारा पैसा हा जनतेचा आहे, महायुतीचा नाही. आ. रवी राणांसह महायुती सरकारने महिलांची माफी मागावी, अशी मागणी दुर्गाताई तांबे यांनी केली आहे. संगमनेर बस स्थानक येथे संगमनेर तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्यावतीने रवी राणा यांचा निषेध करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, सुरेश थोरात, अर्चना बालोडे,…

Read More

बुधवार, १४ ऑगस्ट  विधानसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसचे दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही आमदारांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पक्ष बदलाच्या चर्चेने वेग पकडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर इच्छुकांचीही चाचपणी सुरू आहे. मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने काही जण पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. तर काहींनी पक्षांतर करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्या दृष्टीने भेटीगाठी वाढल्या आहेत. विद्यमान आमदारही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल? कोणत्या पक्षाच्या तिकीटावर विजयी होता येईल? विद्यमान पक्ष उमेदवारी देणार की नाही? याची चाचपणी करत आहेत. अशा स्थितीत…

Read More

बुधवार, १४ ऑगस्ट बिबट्या घरात घुसल्याने घराला बाहेरून कुलूप लावून घेतल्याने बिबट्याला पकडण्यासाठी गर्दीचा अडथळा येत होता, त्यामुळे पोलिसांना बघ्यांच्या गर्दीवर लाठीमार करावा लागला होता. या घटनेत पोलिसांनी घराला कुलूप लावून बिबट्याला कोंडून घेणाऱ्याला जबाबदार ठरवत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तब्बल दहा वर्षानंतर या पदाधिकाऱ्याची संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांशी संबंधित हा खटला असल्याने याकडे संगमनेर-अकोले तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील माळीझाप येथे ३ एप्रिल २०१४ रोजी भाऊसाहेब आल्हाट यांच्या राहत्या घरात ही घटना घडली होती. आल्हाट यांच्या घरात घुसलेल्या बिबट्याची माहिती मिळताच अकोले तालुका भाजपचे सरचिटणीस…

Read More

बुधवार, १४ ऑगस्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिनी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संगमनेर यांच्यावतीने शहरात आज बुधवारी (१४ ऑगस्ट) संध्याकाळी सात वाजता अखंड भारत संकल्प दिनानिमित्त मशाल फेरी होणार आहे. मशाल फेरीनंतर विराट पुरोहित यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. १४ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला भारत मातेला पुन्हा अखंड करण्याचा संकल्प गेली अनेक वर्षे संघटना करत आहे. आपली भारतमाता स्वतंत्र झाली, पण त्याच बरोबर तिचे अनेक तुकडे होत ती खंडित होऊन स्वतंत्र झाली. ही एक खुप मोठी वेदनादायक घटना संपूर्ण भारतीय समाजमनात आहे. यासाठी १४ ऑगस्टला सायंकाळी मशाल फेरी व विराट पुरोहित यांचे…

Read More

बुधवार, १४ ऑगस्ट  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना मुख्यमंत्री सचिवालयाकडून सा.प्र.वि. राशि-१ (राजशिष्टाचार) दिनांक २ ऑगस्ट, २०२४ च्या निर्णयानुसार कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना वित्त विभाग, शासन निर्णयानुसार विहित केलेल्या सर्व सेवा सुविधा अनुज्ञेय राहतील, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे एका ज्ञापनाद्वारे कळविण्यात आले आहे. डॉ. नीलम गोऱ्हे या सन २००२ पासून विधानपरिषदेच्या सन्माननीय सदस्या असून सध्या त्यांची सदस्यत्वाची ४ थी टर्म सुरू आहे. त्या सन २०१९ पासून विधानपरिषद सभागृहाच्या उपसभापतीपदी कार्यरत आहेत.

Read More

मंगळवार, १३ ऑगस्ट  आगामी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविल्यानंतर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू आहे. यातच अध्यक्षपदी पक्षातील एखाद्या महिलेची वर्णी लावावी असा पक्षांतर्गत सूर उमटला आहे. त्यामुळे भाजपच्या पुढील अध्यक्ष महिला किंवा ओबीसी असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी पाच तास बैठक झाली. यावेळी भाजपचा पुढील अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची चर्चा होती. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे सोपवल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षपदाची चाचपणी केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा,…

Read More

मंगळवार, १३ ऑगस्ट अडीच वर्षांचा असलेला नगराध्यक्षांचा कालावधी आता पुन्हा पाच वर्षांवर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून अन्य महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. 👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) : ✅ विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार. १४९ कोटीस मान्यता. ✅ मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय. लाखो नागरिकांना लाभ. ✅ डेक्कन कॉलेज,…

Read More

मंगळवार १३ ऑगस्ट  दहावीच्या परीक्षेचे रिसीट काढण्यासाठी साकुर गावात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बळजबरी करून साकुरच्या रुबाब पान शॉप मध्ये तिच्यावर अत्याचार बलात्कार केल्यानंतर या मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार चार महिन्यांपूर्वी समोर आला होता. यातील मुख्य आरोपीला सहाय्य करणाऱ्या चौथ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना सुमारे चार महिन्यांनी यश आले आहे. विजय शिवाजी खेमनर (वय २९ वर्ष रा. हिरेवाडी, साकुर) असे पोलिसांनी पकडलेल्या चौथ्या आरोपीचे नाव असून त्याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटना उघडकीस आल्यापासून हा आरोपी फरार होता. दहावीत शिकणारी मुलगी परीक्षेचे रिसीट आणण्यासाठी साकुर गावात आली होती. यावेळी आरोपी…

Read More

मंगळवार, १३ ऑगस्ट विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. सोळा पोलीस निरीक्षकांसह अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दहा पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी संध्याकाळी बदल्यांचे हे आदेश काढले. नव्या बदल्यांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेला नवे पोलीस निरीक्षक मिळाले असून या शाखेचा पदभार आता नितीन चव्हाण यांच्याकडे सोपविला जाणार आहे. तर जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेल्या आणि अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतर चर्चेत आलेल्या एलसीबीमध्ये (स्थानिक गुन्हे शाखा) मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फेरबदलांमध्ये या शाखेत बदल होण्याची चिन्हे होती, मात्र या शाखेचा कार्यभार अद्यापही…

Read More

सोमवार, १२ ऑगस्ट  प्रशासकीय कालावधीत संगमनेर नगर परिषदेने पाणीपट्टी व इतर करांमध्ये केलेली दरवाढ मागे घ्यावी, यासाठी काँग्रेसच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. वाढ मागे न घेतल्यास आंदोलनाचादेखील इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम सर्वसामान्य माणसांना भोगावे लागत आहे. चुकीच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी, व महागाई वाढली असेल सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा स्थितीत गेल्या अडीच वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये नगरपरिषदेने अन्यायकारक पद्धतीने पाणीपट्टी व अन्य करांमध्ये मोठी वाढ केली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, माजी नगरसेवक शैलेश कलंत्री, नितीन अभंग, किशोर पवार, गजेंद्र अभंग,…

Read More

सोमवार, १२ ऑगस्ट  ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभर सुरू असलेल्या “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत सोमवारी संगमनेर मध्ये नगर परिषदेच्यावतीने मोटार सायकल रॅली काढण्यात आली. तसेच यादरम्यान मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली आहे. अभियानाचा एक भाग असलेली मोटरसायकल रॅली नगरपरिषद प्रांगणातून सोमवारी काढण्यात आली. नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेत या रॅलीत सहभाग नोंदविला. नगरपरिषदेतून सुरू झालेली रॅली बाजारपेठ, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी, बस स्टॅन्ड, गणेश नगर, अकोले बायपास या मार्गाने पुन्हा नगरपरिषद सांगण्यात आली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला. मोटारसायकल रॅलीमध्ये उपमुख्याधिकारी संजय पेखळे, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद…

Read More