Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आपल्या ताब्यातील दुचाकी हयगयीने व भरधाव वेगात चालवून दुसऱ्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक देत दुचाकीवरील पती-पत्नीच्या अपघातास व त्यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या विचारते स्वरावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक दशरथ सहाणे (रा. चिखली, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर बाबुराव तोरकडी (रा. धांदरफळ, ता. संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात फिर्यादी अशोक सहाणे आणि त्यांची पत्नी सुनीता हे दोघेजण जखमी झाले होते. या संदर्भात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल धनवट करत आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर- कोरोनासारखे संकटे आली, सोशल माध्यमांची स्पर्धा वाढली तरी मुद्रित माध्यमांचे महत्व कधीही कमी होणार नाही. मात्र वृत्तपत्रांनी उथळ बातम्या देण्याऐवजी विश्लेषणात्मक लेखन आपल्या वृत्तपत्रातून करावे. ती काळाची गरज आहे. सध्या राजकारणाचा दर्जा झपाट्याने घसरला आहे अशावेळी माध्यमांनी सवंग लोकप्रियतेसाठी धावणार्या वाचाळ नेत्यांना माईक व लेखनीबंदी करावी तरच माध्यमांचा दर्जा टिकवून राहील, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र संघटनेच्या वतीने रविवारी संगमनेरात संपादक राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ. थोरात बोलत होते. व्यासपीठावर माजी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. वि. ल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शुक्रवारी (ता. २ जून) सकाळी सव्वा आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुर्गाभिषेक करून महाआरती केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगतगुरू संत तुकोबारायांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष मोरे महाराज यांचे जाहीर व्याख्यान शनिवारी (ता. ३ जून) सायंकाळी सहा वाजता नगर परिषदेसमोरील लालबहादूर शास्त्री चौक येथे होणार आहे. यासाठी संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्कृती संवर्धन मंडळ व सकल हिंदू समाज, बजरंग दल प्रखंड संयोजक…
Maharashtra sanvad news By Anant Pangarkar संगमनेर – कोरोना महामारीमुळे रखडलेल्या पोलिसांच्या बदल्यांना काही दिवसांपूर्वी मुहूर्त लाभला. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी महत्त्वाची शाखा असलेल्या एलसीबीसह जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यातील दीर्घकाळ वतनदार बनलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. बदल्या करताना बहुतांशी वतनदारांना चांगले काम करतील या आशेने मनाजोगे पोलीस ठाणे देखील दिले. मात्र संगमनेर शहर पोलीस ठाण्यासह उपविभागातील अनेक कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी अद्यापही हजर झालेले नाहीत. मनाप्रमाणे बदली होऊनही नव्या नियुक्तीच्या ठिकाणी जाण्यास इच्छुक नसलेल्या कर्मचाऱ्यांना शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी तातडीने मुक्त करण्याची आवश्यकता आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना नव्या नियुक्तीच्या ठिकाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली असून अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले. चौंडी (ता.जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार गोपीचंद…
डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी… शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद! महाराष्ट्र संवाद न्यूज निळवंडे, निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निब्रळ येथे यशस्वीरित्या पार पडली. यावेळी महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: शहरातील नासिक-पुणे महामार्गावर असलेल्या जोर्वे नाका येथे रविवारी रात्री झालेल्या हाणामारी आणि दंगल प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या वीसवर गेली आहे. यातील सोळा आरोपींना मंगळवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर उर्वरित आरोपींना न्यायालयाने बुधवारी पाच जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रविवारी रात्री जोर्वे नाका येथे झालेल्या वादातून काही नागरिकांवर प्राणघात हल्ल्याचा प्रयत्न झाला. धारदार शस्त्राचा वापर करत दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. गुन्हेगारांनी थेट कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत अशांतता निर्माण केल्याने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. यामुळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेर वकील संघाचे विद्यमान अध्यक्ष ॲड. उदयसिंह जगन्नाथ ढोमसे पाटील यांना ‘एशिया इंटरनॅशनल रिसर्च युनिव्हर्सिटी बेंगलोर’ यांच्या वतीने देण्यात येणारी मानाची डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. डॉक्टरेट मिळवणारे संगमनेर वकील संघाचे ते पाहिले वकील ठरले. ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील यांना कुलगुरू डॉ. अरुणकुमार, न्यायमूर्ती हरिदास व मान्यवरांच्या उपस्थितीत बंगलोर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाने त्यांना “स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक स्थित्यंतरे” या विषयावरील लेखनासाठी डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले. ढोमसे यांचा वकीलीबरोबर, पत्रकारितेतील अनुभव (Master In Journalism, Master In Political Science पदव्या) शेती विषयक वृत्तपत्रांचे योगदान तसेच दुग्ध उत्पादन वाढीबाबत त्यांनी पुणे विद्यापीठाकडे…
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३१ मे २०२३ रोजी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी होत आहे. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. धरण लाभक्षेत्र परिसरातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून पाण्यासाठी असलेली प्रतिक्षा संपणार आहे. निळवंडे प्रकल्प नेमका काय आहे ? त्याच्या वैशिष्ट्याविषयी माहिती देणारा लेख… महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : ‘संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सुरू असताना, साखर आयुक्तांकडे तातडीची बैठक घेऊन श्री गणेश सहकारी साखर कारखाना हा विखे पाटील कारखान्याला पाच वर्षे कराराने चालवायला देणे हा शेतकरी, सभासद आणि कामगारांशी विश्वासघात आहे. यापूर्वी दहा वर्ष गणेश सहकारी साखर कारखाना हा विखे पाटील कारखान्याच्या ताब्यात होता, त्याच काळात गणेश कारखाना संकटात सापडला, त्यांना दहा वर्षात जे जमले नाही ते पाच वर्षात काय जमणार? मुळात हा करार कारखाना चालवण्यासाठी नाही तर कारखाना कायमचा बंद करण्यासाठी केलेला आहे, सत्तेचा हा गैरवापर गणेश परिसरातील सभासद व शेतकरी सहन करणार नाही’, असा घणाघात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. थोरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर, शहरातील जोर्वे नाका भागात झालेल्या किरकोळ कारणावरील हाणामारीचे रूपांतर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत जाऊन पोहोचले. या हल्ल्यात तब्बल आठ जण जखमी झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी जिल्हा पोलिसांनी दिवस-रात्र घरपकड करत 16 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने 2 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून जोर्वे नाका भागांमध्ये जोर्वे येथील नागरिकांवर धारदार शास्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार झाला. यात सुनील पोपट थोरात, तन्मय राजेश दिघे, पुंडलिक पोपट दिघे, विजय मंजाबापू थोरात, अजय भिमाजी थोरात, जितेंद्र कैलास…
कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचे महत्त्वपूर्ण योगदान संगमनेर तालुक्यात सर्वांना सन्मानाची वागणूक महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्शावर संगमनेर तालुक्याचा सहकार वाटचाल करत असून आज सहकाराचे आदर्शवत मॉडेल हा तालुका ठरला आहे. कारखान्याच्या विकासात कामगारांचेही महत्त्वपूर्ण योगदान असून तालुक्यात शेतकरी, कामगार, युवक, महिला, सर्वसामान्य नागरिक यांच्यासह सर्वांना सन्मान दिला जात असून तालुक्यातील वातावरण हे एक परिवारासारखे आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूल व कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 29 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर, येथील मालपाणी उद्योग समूहाच्या पुढाकाराने केंद्र सरकार पुरस्कृत ‘भविष्य निर्वाह निधी आपल्या दारात’ हा उपक्रम संगमनेरमध्ये झाला. जनता दरबार स्वरूपाच्या या उपक्रमामध्ये अनेकांच्या भविष्य निर्वाह निधीच्या आणि निवृत्त वेतनाशी संबंधित समस्यांची सोडवणूक झाल्याने कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू सफल झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. भविष्य निर्वाह निधीच्या नगर विभागाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी मालपाणी इंडस्ट्रियल पार्कच्या शिवशक्ती सभागृहामध्ये सोमवारी (ता.29) दिवसभर लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यामध्ये अंमलबजावणी अधिकारी अमित आहुजा, दीपक चौधरी, समन्वयक अन्वर खान आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे महेश धनके यांचा समावेश होता. मालपाणी उद्योग समूहाचे मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक शिवाजी आहेर यांच्यासह कारखान्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आपल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विद्यालये यांची गुणवत्ता चांगली असल्याने आज याच शाळांमधून केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील मंगेश पाराजी खिलारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ३९६ व्या रँकने उत्तीर्ण होत यश मिळविले. याबद्दल आमदार थोरात यांच्या हस्ते तालुक्यातील सुकेवाडी येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव कुटे, माजी नगरसेवक व उद्योजक गोरख कुटे, सरपंच योगिता सातपुते, उपसरपंच सुभाषराव…
अप्पर पोलीस अधीक्षक, डीवायएसपी, पोलीस निरीक्षक यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचे नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात दहशत अवैध व्यवसाय आणि गुंडागर्दीचा अड्डा म्हणून जोर्वे नाक्याची ओळख महाराष्ट्र संवाद न्यूज प्रतिनिधी – रविवारी रात्री शहरातील जोर्वे नाका परिसरात झालेली हाणामारीची घटना आणि त्यामुळे संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात झालेले तणावाचे वातावरण या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता बाळगत परिस्थिती नियंत्रणात ठेवली असली तरी या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. वादाला कारणीभूत ठरलेली अतिक्रमनेच नगर परिषदेच्या माध्यमातून उध्वस्त करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळीच मोठ्या पोलीस फौज फाट्यासह नगरपालिकेने ही कारवाई सुरू केलेली कारवाई दुपारी बारा वाजेपर्यंत देखील सुरूच होती. श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज चंद्रपूर : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर (वय 47 वर्ष) यांचे नवी दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. धानोरकर राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. चारच दिवसांपूर्वी त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. वडिलांपाठोपाठ चार दिवसांनी मुलाचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पिता पुत्राच्या लागोपाठ झालेल्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर आणि दोन मुले असा परिवार आहे. प्रकृती अस्वस्थामुळे भद्रावती येथे झालेल्या वडिलांच्या अंतिम संस्काराला बाळू धानोरकर उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे वडिलांचे अंतिम विधी धानोरकर यांचे भाऊ अनिल यांनी केले होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर / शिर्डी :- निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कालव्याची कामे ठेकेदारांनी निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मात्र कामामध्ये जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी राहाता आणि संगमनेर तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या कामांची सोमवारी पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी, मनोली, घुलेवाडी, कुरण, खांजापूर, निळवंडे, कौठे कमळेश्वर, गोगलगाव, आडगाव, मापारवाडी, लोणी खुर्द, बाभळेश्वर, पिंप्री निर्मळ, वाकडी आदी गावात कालव्यांच्या सुरू असलेल्या…
वाळू वाहतुकीकरिता खुली परवानगी देणार मोदी आवास योजनेअंतर्गत मागील त्याला घरकुल देणार वाळू तस्करांना पाठीशी घालणारे महसूल पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार महाराष्ट्र संवाद न्यूज पुणतांबे :- वाळू धोरणात सुटसुटीतपणा आणून वाळू वाहतूकीकरिता खूली परवानगी देण्यात येईल. ओबीसी समाजाच्या घरकुलासाठी मोदी आवास योजना केंद्र शासन आणत आहे, यात मागेल त्याला घरकुल देण्यात येईल तसेच गायरान जागेवर बांधण्यात आलेले घरकुले नियमित करण्यात येतील. अशा महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केल्या. राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील पहिल्या शासकीय वाळू केंद्राचे उद्घाटन व लोकार्पण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी, उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या चाचणी शुभारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. ३१ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची तयारी धरण स्थळावर सुरू करण्यात आली असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंददायी अशा सोहळ्यास उपस्थित राहावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. त्यांनी या कार्यक्रमास येण्याचे मान्य केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर :- पुण्याहून संगमनेरमध्ये विक्रीसाठी आणलेला गांजा संगमनेर शहर पोलिसांनी पकडला आहे. दोन किलो गांजा सह पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आणलेली आलिशान टाटा कंपनीची नेक्सन कार आणि विवो कंपनीचा मोबाईल असा 4 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोर्वे रोडने जाणाऱ्या एका संशयित वाहनचालकाला त्यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र वाहन चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत वाहन वेगात घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पथकाने त्याला कोल्हेवाडी रस्त्यावरील चर्चजवळ पकडले. वाहनाचे झडती घेतली…
