Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विषयी प्रश्न विचारल्याने वाईट वक्तव्य करत थुंकणाऱ्या शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या विरोधात संगमनेरच्या बस स्थानक चौकात शिवसेनेने (शिंदे गट) निषेध करत आंदोलन केले. राऊत यांनी शिवसेनेविषयी (शिंदे गट) वाईट वक्तव्य केल्यास शिवसेना गप्प बसणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे, उपतालुका प्रमुख विठ्ठल ढगे, माजी शहर प्रमुख दिनेश फटांगरे, अमोल मतकर, बाळासाहेब राऊत, वाहतूक सेना तालुका प्रमुख अरुण उदमले, वैद्यकीय सहाय्यता कक्ष तालुका प्रमुख महेश उदमले, मागासवर्गीय सेल तालुका प्रमुख राहुल पवार, सरपंच सुदाम खैरे, अभिषेक गायकवाड, उपशहर प्रमुख अमोल रनाते, बाळासाहेब व्यवहारे,…
समाज माध्यमांवर जातीवाचक मेसेज अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मंगळवारी संगमनेरमध्ये निघणाऱ्या भगवा मोर्चाला पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही ही परवानगी ऐनवेळी दिली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर संयोजकांकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. दरम्यान संगमनेर बंदचे कोणतेही नियोजन नसल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. बंदची अशी कोणतीही सक्ती करता येणार नसल्याने व्यावसायिकांनी मंगळवारी आपले व्यवसाय सुरू ठेवावेत, अशी माहिती संगमनेरचे नूतन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात हिंदूंच्या सणांवर होणारे हल्ले, दिल्लीत साक्षीची जिहादींकडून झालेली हत्या आणि शहरातील जोर्वे नाका येथे जोर्वे गावातील आठ हिंदू तरुणांवर झालेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज / रविवार विशेष प्रवीण पुरो, मुंबई नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा घाट आणि त्यानुशंगाने विरोधी पक्षांच्या बहिष्काराचं वास्तव लक्षात घेतलं तर हा सारा खेळ एका निर्लज्ज राजाच्या अहंकारासाठी खेळला जात असल्याचं स्पष्ट आहे. इतकं सारं होत असताना राजाची निबृध्द प्रजा या सार्या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असेल तर देशाला कोणीही वाचवू शकणार नाही. पहिल्या क्रमांकाच्या लोकशाहीचा डंका पिटणार्या केंद्र सरकारच्या बेगड्या लोकशाहीचं सर्वत्र वस्त्रहरण होत असताना राजा स्वत:चीच पाठ थोपटून घेतो तेव्हा तो पुरता निर्लज्ज झाला असंच मानलं जातं. प्रगल्भ लोकशाहीचा पुरस्कर्ता असलेल्या भारताचं जगभर पुरतं हसं होऊनही ५६ इंची छाती काढत राजा स्वत:चच खरं करतो तेव्हा या राजाला…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दंडकारण्य अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संगमनेर तालुक्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त 1100 वटवृक्षाचे रोपण करण्यात आले असून वटवृक्षासह सर्व देव वृक्ष हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे असल्याने या सर्व वृक्षांचे नागरिकांनी संवर्धन करावे, असे आवाहन माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केले आहे. दंडकारण्य अभियानांतर्गत तालुक्यातील विविध ठिकाणी वटवृक्षांचे रोपण व पूजन करण्यात आले. तसेच संगमनेर तालुक्यात सौ दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत खांडगाव, कर्हे, निमोण, पिंपळे, नान्नज दुमाला, पारेगांव बु, सोनोशी, पोखरी हवेली, मालदाड येथे वटपूजन व वृक्षारोपण करण्यात आले. तांबे म्हणाल्या, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानाचा तालुक्यात मोठा विस्तार झाला आहे. यामध्ये नागरिकांचाही मोठा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर शहरातील जोर्वे नाका येथे घडलेल्या घटनेनंतर संगमनेर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सतर्कता दाखवत पोलीस यंत्रणेने परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असले तरी या घटनेचे पडसाद समाज माध्यमांवर उमटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस सतर्क झाले असून समाज माध्यमांवरील मेसेज मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ‘ॲडमिन’वर पोलीस कारवाई करण्याचा इशारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिला आहे. पोलीस निरीक्षक मथुरे यांनी या संदर्भात केलेले आवाहन देखील पोलीस खात्याकडून विविध व्हाट्सअप ग्रुप, समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आले आहे. समाज माध्यमांवर विविध टीका टिप्पणी करणारे तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – शासकीय कामाच्या नावाखाली यापूर्वी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा झाला. त्याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून सर्व शासकीय कामांकरीता क्रश सॅण्ड वापरण्याचे धोरण शासन घेणार आहे, अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांसह अस्तगाव परिसरातील गावांमधील नागरिकांच्या भेटी घेवून ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याच्या सूचना दिल्या. शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, उपविभागीय अधिकारी विलास गायकवाड, जलसंपदा विभागाचे महेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी शहरातील जोर्वे नाका येथे घडलेल्या मारहाण प्रकरणी संगमनेर करांना शांततेचे आवाहन केले आहे. या संदर्भातील त्यांचे एक पत्र मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. संगमनेरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले असून यातील गुन्हेगारांना परत शिक्षा झाली पाहिजे प्रशासन देखील या संदर्भात काळजी घेत आहे मात्र या घटनेला जातीय धार्मिक किंवा सामाजिक रंग देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये गुन्हेगाराला जात धर्म नसतो जो गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी थोरात यांनी या पत्राच्या माध्यमातून करताना संगमनेरकरांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. थोरात यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मंगळवारी (6 जून) काढण्यात येणाऱ्या सकल हिंदू समाज भगवा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून ‘मोर्चा काढा मात्र सर्वतोपरी काळजी घ्या’, असे आवाहन करत मंगळवारच्या मोर्चाला प्रशासनाने काही अटींवर परवानगी दिली. तसेच स्वयंस्फूर्तीने शहर व तालुक्यातील बहुतांशी गावात बंद देखील पाळला जाणार आहे. महाराष्ट्रात हिंदूंच्या सणांवर होणारे हल्ले, दिल्लीत साक्षीची जिहादींकडून चाकूने अनेक वार करून केलेली हत्या व जोर्वे गावातील ८ हिंदू तरुणांवर तलवारीने झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ ६ जुन रोजी होणाऱ्या सकल हिंदु समाज ‘भगवा मोर्चा व संगमनेर शहर तालुका बंद”च्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बोलवली बैठक होती. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – शिंदे फडणवीस सरकारने आज अचानक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. सरकार गेल्या वर्षी जुलैमध्ये सत्तेत आल्यापासून राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरू आहे. आपल्या कामगिरीमुळे सातत्याने वलयांकित ठरलेल्या तुकाराम मुंडे यांची देखील पुन्हा बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या… यादी… 1. श्रीमती सुजाता सौनिक, IAS (1987) ACS (AR&OM), GAD, मंत्रालय, मुंबई यांना ACS (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 2. श्री एस. व्ही. आर. श्रीनिवास, IAS (1991) MC, MMRDA, मुंबई यांना OSD, धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 3. श्री लोकेश चंद्र, IAS (1993) GM, BEST,…
महाराष्ट्र संवाद न्यूज स्थापनेनंतर प्रथमत:च संगमनेर मर्चंट बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात सत्ताधारी गटाला यश आले. विशेष म्हणजे सत्ताधारी गटाकडून काही विरोधी उमेदवारांना देखील संधी दिली गेल्याने परंपरागत प्रमुख विरोधी उमेदवारांनी देखील निवडणूक बिनविरोध करण्याचा मोठेपणा दाखविला. अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून राजेंद्र कारभारी वाकचौरे यांनी सुरुवातीलाच व्यापारी एकताच्या बिनविरोध निवडीची सलामी दिली होती. त्यानंतर उर्वरित 16 जागांसाठी 38 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या काही मिनिटांपर्यंत विमुक्त जाती भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातील जागे संदर्भात चर्चा सुरू होती. शेवटी तीही जागा बिनविरोध करण्यात सत्ताधारी मंडळाला यश आले. बिनविरोध निवड झालेले उमेदवार खालीलप्रमाणे: सर्वसाधारण…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: शहरातील नासिक-पुणे महामार्गावर असलेल्या जोर्वे नाका येथे रविवारी रात्री झालेल्या हाणामारी आणि दंगल प्रकरणी पोलिसांनी सोळा आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने पाच तारखेपर्यंत वाढ केली आहे. सुरुवातीला पकडलेल्या 16 आरोपींची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता पोलिसांच्यावतीने सरकारी वकील मिराज पर्बत यांनी जोरदार व्यक्तिवाद करत आरोपींच्या पोलीस वाढ करण्याची मागणी केली. आरोपींच्या वकिलांचा आणि सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत आणखी वाढ केली. रविवारी रात्री जोर्वे नाका येथे झालेल्या वादातून काही नागरिकांवर प्राणघात हल्ल्याचा प्रयत्न झाला. धारदार शस्त्राचा वापर करत दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. गुन्हेगारांनी थेट कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत अशांतता…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – राज्यात जनतेच्या मनातील सरकार असल्यामुळेच लोकांच्या हिताचे निर्णय होत आहेत. सर्व समाज घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु आहे. सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची भरपाई या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल, अशी ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राहाता तालुक्यातील वाकडी व पंचक्रोशीतील गावांमधील शेतकरी, नागरिकांचा समस्या मंत्री विखे पाटील यांनी आज राहाता येथे जाणून घेतल्या. ‘शासन आपल्या दारी’ या शासन उपक्रमाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. यावेळी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. विखे म्हणाले, शासन आपल्या दारी…
नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन कार्यशाळा महाराष्ट्र संवाद न्यूज शेवगाव – कोरोना महामारीनंतर रशिया-युक्रेन युद्धाच्या जागतिक पातळीवरील झालेल्या आर्थिक ध्रुवीकरणाचा सकारात्मक परिणाम म्हणून भारतीय रुपया हे चलन जागतिक पातळीवर अमेरिकन डॉलर नंतर आंतरराष्ट्रीय चलन म्हणून पर्याय ठरू पाहत आहे, सद्यस्थितीत जागतिक आर्थिक क्रमवारीत भारताचे असलेले पाचवे स्थान लवकरच आणखीन मजबूत होऊन येत्या काही वर्षांत भारत जागतिक पातळीवर तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल, असा आशावाद एमएफडी सुनील कडलग यांनी व्यक्त केला. मंगळवारी मेडिकल असोसिएशन आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने चला अर्थसाक्षर होऊया या उपक्रमांतर्गत ‘नवीन युगाचे आर्थिक व्यवस्थापन’ या कार्यशाळेत कडलग बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय लड्डा होते. रोटरी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाकरिता ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील विकास कामासाठी एक कोटी तीन लाख रुपयांचा निधी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते,आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सिमेंट बंधारे, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजनासह अनेक विकासाच्या योजना आमदार थोरात यांनी सातत्याने राबविल्या. सहकारातून समृद्धी निर्माण झालेला हा तालुका राज्यात विकसित असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये गणला जातो. सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे येळुशी ठाकरवाडी वस्ती अंतर्गत सामाजिक सभागृहाचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज आज सकाळी किरकोळ कारणाने बायकोशी कटकट झाली, वैतागून दवाखान्यात आलो होतो. ओपीडी मध्ये नर्सने एक केसपेपर आत आणून दिला. पेशंटचं नाव वाचलं, पुढे वय लिहिलं होतं…१०३ वर्षे! मी सिस्टरला आत बोलवून ‘नीट वय विचारत जा!’ असं म्हणालो. “सर, त्याहून जास्ती असेल असं घरचे म्हणताहेत” ती म्हणाली. मी खुर्चीवरून उठून पलीकडे गेलो. टेबलावर कृश, छोटीशी आजी, अबोली रंगाची साधीशी नऊवारी नेसलेली, सुरकुत्याने भरलेला चेहरा, तोंडचं बोळकं, चेहऱ्यावर मिश्किल हसू.. ऐकायचा प्रॉब्लेम असेल असं उगाच गृहीत धरून मी बरोबर उभ्या असलेल्या सुनेला ‘काय होतंय” असं विचारलं. ती काही सांगणार इतक्यात “मला इचारा, मी सांगते की” आजी हसून म्हणाली. “मला…
Maharashtra sanvad news Anant Pangarkar संगमनेर – अहमदनगरसह नाशिक व पुणे जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या आणि व्यापाऱ्यांची आर्थिक कामधेनू म्हणून परिचित असलेल्या संगमनेर मर्चंट बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की बँकेची निवडणूक लागणार? याचा आज दुपारपर्यंत अंतिम निर्णय समोर येणार आहे. दरम्यान सत्ताधारी गटाने निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. नव्या जुन्यांचा मेळ साधत सत्ताधारी गटाने आपल्या व्यापारी एकता पॅनलची अंतिम यादी जाहीर केली आहे. बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाले असून शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. सत्ताधारी गटाच्या काही संचालकांनी दुसऱ्या इच्छुक उमेदवारांना संधी मिळावी यासाठी यावेळी उमेदवारी अर्ज भरले नाही. राखीव जागेपैकी एका…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने ३ व ४ जूनला भंडारदर्याच्या पांजरे गावात काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या काजवा महोत्सवाला जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट देण्याचे आवाहन नासिक पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक श्रीमती मधुमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे. सरदेसाई-राठोड यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, काजवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या पर्यटकांना प्रशिक्षित मार्गदर्शकासोबत काजवे बघण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील आनंद घेता येणार आहे. तसेच या महोत्सवाच्या ठिकाणी स्थानिक आदिवासी लोकांनी उत्पादन केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री देखील करण्यात येणार आहे. यामध्ये भंडारदरा परिसरामध्ये विशेष करुन घेतल्या जाणाऱ्या काळा भात व…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कांदा अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले मात्र ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर ई पीक पेऱ्याची नोंद झाली नाही अशा शेतकऱ्यांनी समितीचे अहवाल संबंधितांकडे सादर करण्याचे आवाहन संगमनेरच्या सहकारी संस्थेचे उपनिबंधक संतोष कोरे यांनी केले आहे. या संदर्भात कोरे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाकडील कांदा अनुदान योजनेप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, चेट पणन अनुज्ञाप्ती धारक व नाफेडमध्ये शासन निर्णय दिनांक २७ मार्च २०२३ नुसार दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतक-यांनी कांदा अनुदान मिळणेसाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. परंतु ज्या ठिकाणी शेतक-यांचा ७/१२ उता-यावर ई पीक पे-यांची…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्याना योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात ५ लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत करण्यात येत असुन या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत कार्ड प्राप्त करुन घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात ४४ अंगीकृत रुग्णालये असुन १ हजार २०९ प्रकारच्या विविध आजारावर मोफत उपचार केले जातात. या आजारामध्ये हृदय विकार, मेंदू विकार, किडनी विकार, अपघात, कर्करोग इत्यादी प्रकारच्या गंभीर आजारावर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या योजनेचा लाभ हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्याना दिला…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – वैद्यकीय व्यवसायासाठीचे परवानगी नसताना देखील रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बनावट डॉक्टरवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद आयुब शेख, (रा. नवरंग कॉम्प्लेक्स, बागवानपुरा, संगमनेर) असे या बनावट डॉक्टरचे नाव आहे. विशेष म्हणजे संगमनेर शहरात या डॉक्टरचा दवाखाना राजरोसपणे सुरू होता. संगमनेर नगर परिषदेच्या कॉटेज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी प्रतिभा कचकुरे यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अधिनियमाचे कलम 33 व 37 प्रमाणे संगमनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष राहुल वाघ यांनी संबंधित डॉक्टरवर…
