Author: अनंत पांगारकर
विशेष प्रतिनिधी / मुंबई NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. दिल्लीतील या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी २४ जुलै रोजी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईतील ऐतिहासिक शिवतीर्थासह (शिवाजी पार्क) संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या एकत्रित आंदोलनात आघाडीचे सर्व प्रमुख घटकपक्ष पूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याने राज्यभरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना झालेल्या बेदम मारहाणीचे फोटो आणि बातम्या सोशल मीडियावर पसरल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या लाठीमारात मुंबई, पुणे आणि नागपूरसह महाराष्ट्रातील अनेक मराठी तरुण जखमी झाले…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: दिल्ली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाने केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. या अत्याचारी कारवाईचा आणि विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांवर आलेल्या गदेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी संगमनेर येथे आज, बुधवारी (दिनांक २२ जुलै) सायंकाळी सहा वाजता भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा ‘समविचारी प्रवाह, संगमनेर’ यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष, सर्वपक्षीय व समविचारी संघटना तसेच संगमनेरमधील नागरिक, विद्यार्थी सहभागी होणार आहे. संगमनेर बस स्थानक येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. माळीवाड्यात या मोर्चाचा समारोप होणार आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: दैवी शक्ती, मंतरलेले उपचार आणि असाध्य आजार बरे करण्याचा दावा करत गोरगरीब जनतेची आर्थिक, शारीरिक व मानसिक पिळवणुकीचा आरोप असलेल्या वडगावपान (ता. संगमनेर) येथील भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याच्या कुटुंबाला सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्रकरणात राजेंद्र गडगेची पत्नी अश्विनी राजेंद्र गडगे आणि मुलगा शिवम राजेंद्र गडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी मंजूर केला आहे. नेमके प्रकरण काय? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव अॅड. रंजना पगार-गवांदे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात १७ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला होता. राजेंद्र बापू गडगे…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि उत्साहाचा राहील. नोकरी आणि व्यवसायात तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. वृषभ – आज नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक बाबतीत संयम ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वाद टाळण्यासाठी शांततेने चर्चा करा आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या. मिथुन – आज तुमची निर्णयक्षमता उत्तम राहील. बौद्धिक कामांमध्ये यश मिळेल आणि नवीन संधी चालून येतील. मित्रांशी संवाद वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल, परंतु वाहने चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. कर्क – आजचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली: जंतर मंतर मैदानावर सीजेपी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर अत्यंत घणाघाती टीका केली आहे. राहुल गांधी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत केवळ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीच नव्हे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी लावून धरली आहे. तसेच घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. घटनेनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : खरीप हंगामाच्या ऐन गर्दीत सातत्याने मागणी करूनही युरिया खत उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाशिक-पुणे महामार्गावर सुमारे दीड तास आक्रमक रास्ता रोको आंदोलन केले. महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदवत शेतकऱ्यांनी संपूर्ण वाहतूक रोखून धरली होती. आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन प्रशासन व काही शेतकऱ्यांनी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांना मध्यस्थीची विनंती केली. थोरात यांनी तातडीने कृषी विभागाला शासकीय बफर स्टॉकमधील युरिया मोकळा करण्याच्या सूचना दिल्या आणि प्रशासनाने ती मागणी मान्य करताच शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. नाशिक-पुणे महामार्गावर मंगळवारी सकाळपासूनच शेतकरी बांधव आणि महिला युरियासाठी पहाटे पाच वाजेपासून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर | अनंत पांगारकर गरीब आणि गरजूंना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी शासनाने सुरु केलेल्या ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चा संगमनेरमधील मेडीकव्हर हॉस्पिटलने साफ बट्ट्याबोळ चालवला आहे. गोरगरिबांच्या आरोग्याचा खेळ खंडोबा करत त्यांच्याकडून उघडपणे लाचेची उकळपटी करणाऱ्या मेडीकव्हर हॉस्पिटलमधील दोन बड्या धटिंगणांचा खरा चेहरा आता समोर आला आहे. रुग्णाच्या आईवर उपचार करण्यासाठी आणि तिचे ऑपरेशन या योजनेतून करून देण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या डेटा एंट्री ऑपरेटर सुभाष धाडवड आणि त्याला खतपाणी घालणारा हॉस्पिटलचा मॅनेजर सुजित गायकवाड या दोघांच्या मुसक्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आवळल्या असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: देशातील शिक्षण व्यवस्थेतील वाढती अनियमितता, परीक्षांमधील गोंधळ आणि विद्यार्थीविरोधी धोरणांमुळे तरुण वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी संगमनेर येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या देशातील शिक्षण क्षेत्रात विविध गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित प्रश्न, विविध स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता आणि विद्यार्थीहिताच्या मागण्यांकडे केंद्र सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे देशभरातील विद्यार्थी आणि युवकांमध्ये संतापाची लाट आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही व संविधानिक मार्गाने शांततापूर्ण आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित असलेली सर्व महत्त्वाची कामे सहजासहजी मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान राहील. व्यवसायात धनलाभाचे चांगले योग आहेत आणि जोडीदाराचा सल्ला अत्यंत लाभदायक ठरेल. वृषभ – आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. नाहक खर्च आणि वेळेचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे. व्यवसायात घाईगडबडीने कोणतेही आर्थिक निर्णय घेणे टाळा. आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर अधिक एकाग्रता ठेवण्याचा हा काळ आहे. मिथुन – आजचा दिवस खूप छान आणि लाभदायक सिद्ध होईल. बौद्धिक क्षमता आणि कार्यकुशलता वाढेल. नवीन लोकांशी झालेले संपर्क भविष्यात व्यवसायात फायदेशीर ठरतील. मुलांशी संबंधित असणारे प्रश्न…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली: ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान मोठा गोंधळ उडाला. कॉकरोच जनता पार्टीतर्फे (CJP) पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात हजारो विद्यार्थी व तरुण रस्त्यावर उतरले होते. संसदेच्या दिशेने कूच करणाऱ्या आंदोलकांनी सुरक्षा यंत्रणांचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला असता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संसद मार्ग आणि जंतरमंतर परिसरात जोरदार लाठीचार्ज केला. हाय-सिक्युरिटी झोनमध्ये जमा झालेल्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या तीव्र झटापटीत काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. रेल भवनजवळ पोहोचलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. या सर्व तणावपूर्ण परिस्थितीमुळे संसदेचे मुख्य प्रवेशद्वार बंद…
