Author: अनंत पांगारकर
बुधवार १८ प्रतिनिधी नाशिक – परदेशात अत्यंत महागडी समजली जाणारी व कर्करोग उपचारावर महत्वाची असलेली ‘कार-टी सेल’ (CAR-T) थेरपी भारतीय संशोधनानंतर सवलतीत उपलब्ध झाली आहे. या सवलतीचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होण्यास सुरुवात झाली आहे. ही थेरपी नुकतीच एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये १७ वर्षीय रुग्णावर यशस्वी पार पडली. या रुग्णाचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले असून हा रुग्ण पूर्णपणे कर्करोगमुक्त झाला आहे. ही थेरपी ल्युकेमिया आणि लिम्फोमा यांसारख्या बी-सेल कर्करोगांवर (रोगप्रतिकारक प्रणालीच्यापेशींमध्ये तयार होणारा कर्करोगाचा प्रकार) उपचार करण्यासाठी महत्वाची असल्याचे एसएमबीटी हॉस्पिटलचे रक्तविकार कर्करोगतज्ञ डॉ. गिरीश बदरखे यांनी सांगितले. कार-टीसेल थेरपी ही मुंबई आयआयटीचे शास्रज्ञ डॉ. राहुल पूरवार आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे…
विशेष प्रतिनिधी / नागपूर राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या याचिकेवर निर्णय प्रलंबित असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात राज्यपालांनी सात जणांना विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्त केले. ही नियुक्ती बेकायदा असून, या नियुक्त केलेल्या आमदारांची नियुक्ती रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर शहराध्यक्ष सुनील मोदींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. यातील सुनावणीत न्यायालयाने नियुक्त झालेल्या सातही आमदारांना प्रतिवादी म्हणून नोटीसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी मंगळवारी मंगळवारी झाली. चित्रा वाघ, विक्रांत…
बुधवार १८ डिसेंबर छत्रपती संभाजीनगर : आईसोबत शेतात गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा खेळताना कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल मंगळवारी (१७ डिसेंबर) पैठण तालुक्यातील रजापूर शिवारात घडली. गाळ्यात फसलेल्या चिमुकल्यांच मृतदेह अग्निशामक दलाच्या पथकाने बाहेर काढले. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. प्रणव कृष्णा फणसे (वय ६) आणि जय कृष्णा फणसे (वय ९, दोघेही रा. आडूळ ता. बुद्रुक पैठण) अशी मृत पावलेल्या दोन चिमुकल्यांची नावं आहेत. या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा विठ्ठल फणसे यांची रजापूर शिवारात गट क्रमांक २८ मध्ये दोन एकर शेती आहे. दरम्यान, काल मंगळवारी कृष्णा यांची पत्नी वर्षा या कामानिमित्त शेतात…
मंगळवार १७ डिसेंबर संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले गावाच्या जवळ असलेल्या बेलसोंडावाडीमध्ये मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या घराला लागलेल्या आगीमध्ये घरातील संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान याची माहिती मिळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयाकडून संबंधित महिलेला संसारोपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लाईट नसल्याने मंगल सिताराम घुले या महिलेने आपल्या घरात तेलाचा दिवा लावला होता. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या घुले एकट्याच घरात राहावयास आहे. घरात तेलाचा दिवा लावून घुले शेजारी गेल्या असताना तेलाचा दिवा अचानकपणे खाली पडल्याने संपूर्ण घराणे हळूहळू पेट घेतला. हा प्रकार लक्षात येईपर्यंत आग मोठ्या प्रमाणात…
मंगळवार १७ डिसेंबर संगमनेर – शहरामध्ये नगरपालिकेच्यावतीने सध्या गटारी आणि आणखी काही कामे सुरू आहे. मात्र या कामांसाठी अचानकपणे रस्ते बंद करण्यात आल्याने संगमनेरकर नागरिकांची मोठे गैरसोय होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित भागातील रस्ते, चौक बंद करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच संबंधित रस्ते किती कालावधीसाठी बंद राहणार आहे याची माहिती नागरिकांना देण्याची मागणी संगमनेर नगर परिषदेच्या पथ विक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मोमीनपुरा या परिसरात, कवी अनंत फंदी नाट्यगृहापाशी, बाजारपेठेत नगर परिषदेच्यावतीने काम सुरू आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहे. मात्र रस्ते बंद…
ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणावर दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडी आक्रमक. ‘वन नेशन, नो इलेक्शन’ हे विधेयक लोकशाही व्यवस्था संपवण्यासाठी. मंगळवार, १७ डिसेंबर ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपेरशन करुन दलित बांधवांवर अत्याचार केले. सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणी सरकारच्या भूमिकेवर तोफ डागत भाजपा युती सरकारला लोकांच्या भावनांशी काही देणेघेणे नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी…
मंगळवार १७ डिसेंबर | अनंत पांगारकर संगमनेर – संगमनेर शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. दोन तासाच्या अंतरात संगमनेर बस स्थानकावर दोन प्रवासी महिलांच्या जवळील दीडशे ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार सोमवारी संध्याकाळी समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात लता शरद घुगे (रा. सायखेडा, निफाड) व शुभांगी रवींद्र कासार (रा. खराडी, पुणे) या दोन्ही महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दागिने चोरीचे स्वतंत्र दोन गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार नोंदविण्यात आले आहेत. संगमनेर शहरातील दागिने चोरीच्या घटना लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस…
सोमवार १६ डिसेंबर विशेष प्रतिनिधी | मुंबई महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आल्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. गेल्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या अनेकांना डच्चू देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू आहे. मंत्रीपद न मिळाल्याने महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते नाराज आहे. या नाराजांची मनधरणी करून त्यांची समजूत कशी काढायची, त्यांना शांत कसे करायचे याचं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर आहे. नाराज असलेल्या या दिग्गज नेत्यांना अडीच वर्षानंतर खांदेपालट झाल्यावर संधी मिळणार की पक्षातील आणखी कुठली मोठी जबाबदारी मिळणार यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. महायुतीच्या…
सोमवार १६ डिसेंबर अहिल्यानगर – गरजू महिलां व मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. योजने अंतर्गत महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि चालविण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी या योजनेच्या लाभासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्लॉट क्र.४/५/३, जिव्हाळा हाऊस, खोडदे यांची इमारत, वंदे मातरम कॉलनी, कल्याण रोड, अहिल्यानगर येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.
सोमवार १६ डिसेंबर अहिल्यानगर – जिल्ह्यात १९ ते २४ डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताहांतर्गत ‘प्रशासन गाव की ओर’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आदी उपस्थित होते. तर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सालीमठ म्हणाले, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करावे. विविध महामंडळांनी लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा. नाविन्यपूर्ण कल्पना वापरून नागरिकांना विविध सेवा सुलभपणे उपलब्ध करून द्याव्यात. गाव कचरामुक्त किंवा…
